Call Recording | कॉलरकडून तुमचा कॉल रेकॉर्ड तर होत नाही ना?, कॉल रेकॉर्डिंग होतं असल्यास कसं कळेल पहा
Call Recording | भारतासह अनेक देशांमध्ये फोन कॉल रेकॉरर्डिंग करणे बेकायदेशीर आहे. मात्र तरी देखील अनेक व्यक्ती सर्रास याचा वापर करतात आणि समोरच्याची फसवणूक करतात. सध्या अनेक उच्च दर्जेचे फोन बाजारात आले आहेत. यामध्ये कॉल रेकॉरर्डिंग सुरु होताच समोरील व्यक्तीला तुमचा कॉल रेकॉर्ड केला जात आहे असा वॉईस मॅसेज जातो. असा मॅसेज आल्याने व्यक्ती लगेच सावध होतो. मात्र असे अनेक ऍप आहेत ज्यात सहज कुणाचाही फोन रेकॉर्ड केला जातो. तर काही फोनमध्ये ऑटो मोडवर रेकॉर्डिंग होते. त्यामुळे तुमचा कॉल रेकॉर्ड केला जात आहे का हे समजत नाही.
2 वर्षांपूर्वी