Car Loan EMI Calculator | तुम्ही कार किंवा बाईक लोन घेतला आहे? महिन्याचा EMI किती रुपयांनी वाढणार पहा
Car Loan EMI Calculation | भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) पुन्हा एकदा रेपो दरात वाढ केली आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बुधवारी रेपो दरात ०.२५ टक्के वाढ करण्याची घोषणा केली. या वाढीनंतर रेपो रेट ६.५० टक्क्यांवर गेला आहे. मे २०२२ नंतर ची ही सलग सहावी वाढ आहे. रेपो दरात २.५० टक्क्यांची वाढ झाली आहे. रेपो दरात वाढ झाल्याने गृहकर्ज, कार कर्ज, वैयक्तिक कर्जाचा ईएमआय वाढणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयानंतर बँकाही कर्जमहाग करण्यास सुरुवात करणार आहेत. कर्जाच्या ईएमआय कॅल्क्युलेटरवरून जाणून घेऊया की जर तुम्ही 5 वर्षांसाठी कार लोन घेत असाल तर व्याजदर वाढल्यानंतर त्याचा नवीन ईएमआय काय असेल.
2 वर्षांपूर्वी