काँग्रेस पक्ष दिल्ली अध्यादेशावरील विधेयकाला संसदेत विरोध करणार, आप कडून स्वागत, आता विरोधकांच्या बैठकीकडे लक्ष
Centre Ordinance Vs Aam Aadmi Party | दिल्लीतील सेवांच्या नियंत्रणाच्या मुद्द्यावर केंद्र सरकारच्या अध्यादेशाला पाठिंबा देणार नसल्याचे काँग्रेसने रविवारी स्पष्ट केले. देशातील संघराज्य संपवण्याच्या मोदी सरकारच्या कोणत्याही प्रयत्नांना विरोध करणार असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. राज्यपालांच्या माध्यमातून विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये हस्तक्षेप करण्याच्या केंद्राच्या कोणत्याही निर्णयाला विरोध करू, अशी पक्षाची भूमिका स्पष्ट आहे, असे काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी सांगितले. काँग्रेसच्या या वक्तव्यामुळे आम आदमी पक्ष सुखावला आहे. त्यांनी ही सकारात्मक गोष्ट असल्याचं म्हटलं आहे.
2 वर्षांपूर्वी