Centum Electronics Share Price | अफाट पैसा! सेंटम इलेक्ट्रॉनिक्स शेअरने मागील 5 दिवसांत 36.69% परतावा दिला, शेअर खरेदीसाठी झुंबड
Centum Electronics Share Price | सेंटम इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या मल्टीबॅगर स्टॉकने अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. या कंपनीने नुकताच आपले तिमाही निकाल जाहीर केले. तिमाही निकालाच्या पार्श्वभूमीवर कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. सेंटम इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या शेअरने मागील पाच दिवसांत लोकांना 36.69 टक्के परतावा कमावून दिला आहे. 30 मे रोजी या कंपनीचे शेअर्स 7.63 टक्क्यांच्या वाढीसह 1,047.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1331.58 कोटी रुपये आहे. आज गुरूवार दिनांक 1 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 8.62 टक्के वाढीसह 1,117.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहे.
2 वर्षांपूर्वी