महत्वाच्या बातम्या
-
आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहोत | औरंगजेबाचे नाही - चंद्रकांत पाटील
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचे आम्ही वंशज आहोत, औरंगजेबाचे नाही. त्यामुळे औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर झालंच पाहिजे,” अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन संघटनात्मक आढावा घेतला. यानंतर माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटलांनी ही मागणी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत दारुण पराभव | आता म्हणतात केंद्रानेच मला मिशनवर धाडलं
नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पुण्यासहीत दारुण पराभव झाला. अगदी त्यापूर्वी भाजप राज्यातील सर्वच्या सर्व जागा जिंकेल असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यानंतर पुन्हा चर्चा रंगली आहे. कोथरुडची निवडणूक एवढंच माझं मिशन नाही. कोरोनामुळं काही मर्यादा होत्या. पुण्याचं दिलेलं मिशन पूर्ण होईपर्यंत पुण्यात राहणार.
4 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंनी पक्षवाढीसाठी राज्यभर फिरलं पाहिजे | त्याने आपला जनाधार कळतो
महाराष्ट्रातील तब्बल १४ हजार २३४ ग्रामपंचायतींसाठीचा अधिकृत निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे. कोरोनाच्या काळात एप्रिल ते डिसेंबरमध्ये या ग्रामपंचायतींची मुदत संपलेली होती. त्यामुळे या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला असून, १५ जानेवारीला मतदान होणार आहे, तर १८ जानेवारीला मतमोजणी करण्यात येणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
निवडणुकीतील अपयश | चंद्रकांत पाटील राजीनामा द्या | भाजपमधूनच विरोध सुरु
राज्यातील 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघाच्या निकालातून (results of 3 graduate and 2 teacher constituencies) राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीला एकजुटीचं फळ मिळाल्याचं पाहायला मिळालं होतं. तर दुसरीकडे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढल्यानं भारतीय जनता पक्षाला जबरदस्त धक्का बसला होता. कारण, भारतीय जनता पक्षाला औरंगाबादसह हक्काचा मानला जाणारा पुणे आणि नागपूर पदवीधर मतदारसंघ देखील गमवावा लागला होता. पदवीधरच्या या तिनही मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता. तर पुणे शिक्षक मतदारसंघातही राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी ठरला होता.
4 वर्षांपूर्वी -
केंद्राने केलेला कृषी कायदा रद्द होणार नाही | चंद्रकांत पाटलांचं पवारांना थेट प्रतिउत्तर
मागील काही दिवसांपासून केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात पंजाब आणि हरयाणाचे शेतकरी दिल्ली सीमेवर आंदोलन करत आहे. केंद्र सरकारने संसदेत आणलेले तीन कृषी कायदे रद्द करावे, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. याच पार्श्वभूमीवर तोडगा काढण्यासाठी मोदी सरकार आणि संघटनांची शनिवारी बैठक झाली. परंतु, या बैठकीत शेतकऱ्यांच्या मागणीवर अद्याप पूर्णपणे तोडगा निघाला नसून आता पुढची चर्चा ही 9 डिसेंबरला होणार आहे. त्यामुळे केंद्र सरकार देखील हट्टाला पेटल्याची चर्चा दिल्लीत रंगली आहे.
4 वर्षांपूर्वी -
विधानसभा युतीत लढवणारे प्रदेशाध्यक्ष आता म्हणतात 'हिंमत असेल तर त्यांनी एकेकट्यानं लढावं'
पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणूक निकालांमध्ये आश्चर्यकारक काहीही नाही. तिघे-तिघे मिळून एकट्याशी लढल्यानंतर यापेक्षा वेगळं चित्र दिसणार नव्हतं. तरीही आम्ही निकराने लढलो. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी एकेकट्यानं लढावं. पण त्यांच्यात ती हिंमत नाही,’ अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. भारतीय जनता पक्षाच्या या पराभवाला तीन पक्षाची एकजूट कारणीभूत असल्याचं पाटील यांनी मान्य केलं आहे. पुण्यात मतं खाणारा तिसरा ताकदीचा उमेदवार नसल्यामुळं भारतीय जनता पक्षाला फटका बसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यासाठी त्यांनी यापूर्वीच्या निवडणुकीतील मतदानाचे दाखलेही दिले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
पुण्यात भाजपचा 'वन वे पराभव' | प्रदेशाध्यक्षांच्या नैत्रुत्वात पुणे हातचं गेलं
राज्यातील 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघाच्या निकालातून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीला एकजुटीचं फळ मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. पुणे पदवीधर मतदार संघामध्ये महाविकास आघाडीचे अरुण लाड विजयी झाले आहेत. त्यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार या मतदारसंघात एकूण ६२ उमेदवार होते.
4 वर्षांपूर्वी -
दमछाक होतं कसेबसे नवव्या फेरीत जिंकून आणि लॉटरी लागून झालेले आमदार - मंत्री सतेज पाटील
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मागच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे लॉटरी लागून निवडून आलेले होते. कारण, आठव्या नवव्या फेरीमध्ये त्यांना विजय मिळाला होता अशी टीका गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केली आहे. पुणे विभाग पदवीधर मतदार संघ आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवार अरुण लाड आणि जयंत साळगावकर यांच्या प्रचारासाठी मंत्री सतेज पाटील हे पंढरपूरात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही टीका केली.
4 वर्षांपूर्वी -
राज्याला सोडाच कोल्हापूरलासुद्धा चंद्रकांत पाटलांचा उपयोग झाला नाही | मुश्रीफ यांनी सुनावले
पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी शनिवारी पुण्यात ओबीसी मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार यांच्यावर टीका केली होती. ‘राजकारणात येण्याआधी मला शरद पवार मोठे नेते वाटायचे. पण, राजकारणात आल्यावर समजले की, शरद पवार खूप छोटे नेते आहेत. त्यांचा अभ्यास नसतो’, असे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले होते.
4 वर्षांपूर्वी -
अर्णब आमचा पोपट नाही | तेच पोपट पाळतात - चंद्रकांत पाटील
Republic TV’चे संपादक आणि विवादित पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवरुन भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. “अर्णव आमचा पोपट नाही, आम्ही पोपट वगैरे पळत नाही, पोपट तेच पाळतात”, असा टोला आमदार चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारला लगावला आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोल्हापूरमधून निवडून येणार होतात | मग मेधा कुलकर्णींचं तिकीट का कापलं
राज्यातील २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत कोल्हापूरमधून निवडून येणार होतात असं म्हणता मग पुण्यात कोथरूड मधून मेधा कुलकर्णी यांचा अधिकार भारतीय जनता पक्षाने का डावलला? असा प्रतिप्रश्न करत अन्न आणि औषध मंत्री छगन भुजबळ यांनी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना सणसणीत टोला लगावला आहे. कालच त्यांनी राष्ट्रवादीला आव्हानाची भाषा करताना कोल्हापुरातून निवडून आलो नाही, तर हिमालयात जाईन, असं राजकीय चॅलेंज दिलं होतं. त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांना राजकीय चिमटे काढण्यास सुरुवात केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
विधान परिषद | राज्यापालांकडे संविधानिक अधिकार | त्याचं सर्वांना पालन करावेच लागेल
विधान परिषदेच्या १२ जागांचा प्रश्न पुन्हा वादाच्या रूपात समोर येण्याची शक्यता आहे. राज्य सरकारमधील प्रतिनिधी आणि भारतीय जनता पक्षातून येणाऱ्या वक्तव्यातून त्याचे संकेत मिळू लागले आहेत. याबाबत प्रसार माध्यमांनी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे विचारणा केली. त्यावर व्यक्त होताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, ‘राज्यापालांकडे संविधानिक अधिकार असतात आणि त्याचं सर्वांना पालन करावेच लागेल’. पाटील यांनी केलेल्या सूचक वक्तव्यातून राज्य सरकार विरुद्ध राज्यपाल वाद पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे असं राजकीय विश्लेषकांनी म्हटलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज ठाकरे खूपच स्पष्ट बोलतात | त्यांना स्पष्ट बोलण्याची सवय आहे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात एकहाती भगवा फडकला पाहिजे असे म्हटले. त्यावरुन चर्चांना सुरुवात झाली. यावर विरोधी पक्ष नेते आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे. पक्ष वाढवण्यासाठी भगवा एकहाती फडकवा असं बोलणं गैर नाही, सगळेच आपापला पक्ष वाढवत असतात. पण आम्ही प्रत्यक्षात ती कृती करून दाखवतो अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. तसेच उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नाही, शरद पवार घराबाहेर पडतात असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
शरद पवार हेच राज्य चालवतात | उद्धव ठाकरेंना बोलून काहीच उपयोग नाही
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात एकहाती भगवा फडकला पाहिजे असे म्हटले. त्यावरुन चर्चांना सुरुवात झाली. यावर विरोधी पक्ष नेते आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे. पक्ष वाढवण्यासाठी भगवा एकहाती फडकवा असं बोलणं गैर नाही, सगळेच आपापला पक्ष वाढवत असतात. पण आम्ही प्रत्यक्षात ती कृती करून दाखवतो अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. तसेच उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नाही, शरद पवार घराबाहेर पडतात असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
मी या वयात फिरतोय | तु किमान घराबाहेर पड | असंच पवारांना म्हणायंचं असेल
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालपासून राज्यातील अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे. या आधी मुख्यमंत्री घरातून बाहेर पडत नव्हते म्हणून विरोधी पक्ष टीका करत होते. तर आता बाहेर पडल्यावरही मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सुरुच आहे. मुख्यमंत्र्यांनी धावत प्रवास करून उपयोग नाही. त्यांनी कोरडा प्रवास करू नये. ते मुख्यमंत्री आहेत. थेट निर्णय घेऊ शकतात. शेतकऱ्यांना थेट मदत देऊ शकतात, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. बाबा, या वयात मी इतका फिरतो तू किमान घराबाहेर पड, असं कादाचित शरद पवारांना म्हणायचं असेल, अशी बोचरी टीकाही यावेळी त्यांनी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
यांच्या बापाची पेंड आहे का? | चंद्रकांत पाटील यांचा शरद पवारांवर निशाणा
बाजार समित्यांना सेस गोळा करता येणार नाही, अशी तरतूद केंद्र सरकारने नवीन कृषी कायद्यात केली आहे. मात्र, बारामती बाजार समितीने पत्रक काढून सेस गोळा करणार असल्याचे जाहीर केले आहे. अरे सेस काय तुमच्या बापाची पेंड आहे. सेसचा मलिदा खायदा मिळणार नसल्याने विरोधकांची तडफड चालू आहे.
4 वर्षांपूर्वी -
पुणे महापालिकेतील सत्तेबाबत अजित पवारांना जर काही स्वप्न पडत असतील तर…
महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टोला लगावला. पुण्यामध्ये आयोजित एका पक्षांतर्गत कार्यक्रमावेळी बोलताना पाटील यांनी, “पुणे महापालिकेतील सत्तेबाबत अजित पवारांना जर काही स्वप्न पडत असतील तर यासंदर्भात ऊर्जा वायाला घालवू नका आम्ही पण तुमचे बाप आहोत,” अशा शब्दांमध्ये पवार यांना टोला लगावला.
4 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरेंनी सलग ५ मिनिटं मराठा आरक्षणावर बोलून दाखवावं | चंद्रकांत पाटलांचं टीकास्त्र
मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने स्थगित केल्यानंतर विरोधकांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षण विषयावर सलग 5 मिनिटं बोलून दाखवावं अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्य सरकार चालवण्याबाबत गंभीर नाहीत असंही यावेळी पाटील म्हणाले. खरंतर मराठा आरक्षण प्रकरणात सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान कोर्टाने वर्ष 2020-21 साठी मराठा आरक्षण स्थगित करण्याचा निर्णय दिल्यानंतर एकच संतापाची लाट उसळली आहे. याचे पडसाद आता राज्यभर उमटायला सुरूवात झाली आहे. मराठा आरक्षणाचा वाद आता पुन्हा पेटला आहे.
4 वर्षांपूर्वी -
शपथपत्रात माहिती लपवल्याप्रकरणी चंद्रकांत पाटील अडचणीत | न्यायालयाचे चौकशीचे आदेश
भाजप प्रदेशाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांना सध्याच्या घडीला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. न्यायालयानं पाटील यांच्या नावे फेक ऑफिडेव्हीट प्रकरणी तपासाचे आदेश दिले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
सरकारमधील मंत्र्यांनी अधिकाऱ्यांच्या बदल्या करून प्रचंड पैसा गोळा केला - चंद्रकांत पाटील
राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी पंधरा टक्के बदल्यांच्या नावाखाली अनेक मलाईदार ठिकाणी मर्जीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या करून प्रचंड पैसा गोळा केला आहे. याची सीआयडीकडून चौकशी करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी केली.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर नीचांकी पातळीवर, चार्टवर ओव्हरसोल्ड, BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- Smart Investment | स्मार्ट गुंतवणुकीचा हा फॉर्म्युला तुम्हाला 2 कोटी रुपये परतावा देईल, समजून घ्या आणि श्रीमंत व्हा
- LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा
- RVNL Share Price | RVNL आणि Just Dial शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, मिळेल 190% परतावा - NSE: RVNL
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH
- Life Insurance Policy | लाईफ इन्शुरन्सचे एकूण प्रकार किती; तसेच जनरल आणि लाइफ इन्शुरन्समधील नेमका फरक काय लक्षात ठेवा
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सहित हे 4 शेअर्स फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
- 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार आणि DA लवकरच वाढणार? 8'वा वेतन आयोगाबाबत महत्वाची अपडेट
- IRFC Share Price | आयआरएफसी शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने मालामाल करणार, स्टॉक ब्रेकआऊट देणार, टार्गेट नोट करा - NSE: IRFC