महत्वाच्या बातम्या
-
पुण्यात चंपा साडी सेंटरचं राष्ट्रवादीकडून उदघाटन
”आम्हाला हवी विकासाची गाडी, नकाे आम्हाला चंपा साडी” असे म्हणत एनसीपीच्यावतीने चंद्रकांत पाटील यांनी साड्या वाटल्याचा निषेध करण्यात आला. पुण्यातील खंडाेजीबाबा चाैक येथे एनसीपीकडून आंदाेलन करण्यात आले. यावेळी चंद्रकांत पाटील आणि भारतीय जनता पक्षाच्या निषेधार्थ घाेषणा देण्यात आल्या.
5 वर्षांपूर्वी -
कोल्हापूरबाबत ‘तसं’ मी झोपेतही बोलू शकत नाही : चंद्रकांत पाटील
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरमध्ये युतीच्या झालेल्या पराभवानंतर पत्रकार परिषद रविवारी घेतली होती. यावेळी एका वक्तव्यावरून चंद्रकांत पाटील यांना समाज माध्यमांवर ट्रोल केलं गेलं. कोल्हापूरबद्दल केलेल्या त्या विधानाची चर्चा सर्वत्र सुरू होती. आता त्यावर चंद्रकांत दादांनी एक व्हिडिओ शेअर करत स्पष्टीकरण दिलं आहे. पत्रकार परिषदेत मी व्हॉटसअपवर आलेले मेसेज वाचून दाखवले. जो मेसेज वाचून दाखवला त्यामध्ये शेवटचं वाक्यही होतं. त्या शेवटच्या वाक्याशी मी सहमत नाही. कोल्हापूरच्या जनतेचा अपमान होईल असं वाक्य मी झोपेतही उच्चारू शकणार नााही असं त्यांनी म्हटलं.
5 वर्षांपूर्वी -
आयत्या बिळात चंदूबा..राष्ट्रवादीचा चंद्रकांत पाटलांवर हल्ला
विधानसभा निवडणुकीचे मतदान जसजसे जवळ येऊ लागले आहे, तशी प्रचाराला धार चढली आहे. वर्तमानपत्रे, मोबाइल, टीव्ही वाहिन्यांसह सोशल मीडियातून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघातून लढणारे भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सध्या विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनं आज एका जुन्या मराठी म्हणीचं विडंबन करून पाटलांवर हल्ला चढवला आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोथरूड: चंद्रकांत पाटील आल्याने आता ब्राह्मण समाजातच फूट पडण्यास सुरुवात? सविस्तर
विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यानुसार भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना थेट कोथरूड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आणि विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांच्यसह इतर तब्बल १२ विद्यमान आमदारांचा पत्ता कापण्यात आला होता.
5 वर्षांपूर्वी -
अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांना थेट 'चंपा' संबोधत जोरदार प्रतिउत्तर दिलं
पवार म्हणाले,की भाजपकडून विधानसभा निवडणुकीतही ३७० चा मुद्दा उपस्थित केला जातो आहे. मात्र, त्यातून शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारी, महागाई, कायदा-सुव्यवस्था या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत का? गेल्या पाच वर्षांत भाजपने एकही आश्वासन पूर्ण केले नाही. शेतकरीविरोधी फडणवीस सरकारने महाराष्ट्राला कर्जबाजारी करून अधोगतीकडे नेले. शेतीमालाला भाव, कर्जमाफी, नोकरभरती, बेरोजगारी, धनगर आरक्षण अशी कित्येक उदाहरणे देता येतील.
5 वर्षांपूर्वी -
कोथरूड: चंद्रकांत पाटलांसाठी मेधा कुलकर्णी यांचा पत्ता कट
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आज आपल्या १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कोथरूड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. तर, दक्षिण कराडमधून अतुल भोसले यांना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात उतरवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, तब्बल १२ विद्यमान आमदारांचा पत्ता कापण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
चंद्रकांत पाटलांना 'ब्राह्मण द्वेष्टी' असं संबोधत कोथरुड मतदारसंघातून ब्राह्मण महासंघाचा तीव्र विरोध
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे पुण्यातील कोथरुडमधून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. कोल्हापूर येथील मतदारसंघातून निवडणूक लढण्याऐवजी चंद्रकांत पाटील सुरक्षित मतदारसंघाच्या शोधात होते असं म्हटलं जातं आहे. शरद पवारांचं पश्चिम महाराष्ट्रातील राजकारण चंद्रकांत पाटलांना माहित असल्याने त्यांनी सुरक्षित मतदारसंघाचा शोध काही दिवसांपासून सुरु केला होता.
5 वर्षांपूर्वी -
पुणेकरांनी चंद्रकांत पाटलांवर रोष व्यक्त करताच पालकमंत्र्यांनी काढता पाय घेतला
अरणेश्वर येथील टांगेवाले वसाहत येथे संतप्त नागरिकांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा निषेधाच्या घोषणा देत ते केवळ या ठिकाणी फोटो काढण्यासाठी आले आहेत, असा आरोप केला. टांगेवाले वसाहत येथे आंबिल ओढ्याला आलेल्या पुरामुळे भिंत पडून पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने संसार उद्ध्वस्त झाले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
उद्धव म्हणाले युतीचा फॉर्मुला लोकसभेलाच ठरला; चंद्रकांत दादा म्हणतात कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही
युतीचा फॉर्मुला लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाच्या वेळीच ठरलेला आहे. युतीमध्ये कुठलाही तिढा नाही. येत्या एक ते दोन दिवसांत युतीची घोषणा होईल,’ अशी माहिती शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. भाजपवर नाराज असलेले विदर्भातील शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला.
5 वर्षांपूर्वी -
चंद्रकांत पाटील यांच्या विधानाला मी किंमत देत नाही: उद्धव ठाकरे
युतीचे जागावाटप निम्म्या जागांच्या समीकरणात होणार नाही, या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केल्यानंतर जागावाटपाचा अधिकार मी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमित शहा यांचाच असल्याचे ठासून सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपण चंद्रकांत पाटील यांच्या विधानाला किंमत देत नसल्याचे सूचित केले.
5 वर्षांपूर्वी -
टेलिमॅटिक कंपनी, २५० बोगस गुंतवणूकदार, करोडोचा फायदा; पाटलांच्या प्रचंड संपत्तीची ईडी चौकशी कोणी टाळली?
मंत्री चंद्रकांत पाटील सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना लक्ष करण्यासाठी त्यांच्याकडे एवढी संपत्ती आली कुठून असा प्रश्न उपस्थित करत आहेत. मात्र ईडी मार्फत चौकशी केवळ सत्ताधाऱ्यांचीच केली जाते याचा अजून एक प्रत्यय समोर आला आहे. कारण काही दिवसांपूर्वी भाजपचा सहकारी पक्ष शिवसेनेनेच चंद्रकांत पाटील यांच्या प्रचंड संपत्तीची ईडी चौकशीची मागणी केली होती.
5 वर्षांपूर्वी -
भाजप नेत्यांना किती जागा निवडून येणार त्याचा अंदाज अचूक येतो; पण पुराचा नाही ? राज ठाकरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सांगली आणि कोल्हापूरमधील पूर परिस्थितीला अनुसरून प्रसार माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली. महत्वाचं म्हणजे त्यांनी आगामी विधानसभा निवडणूक पुढे ढकलण्यासाठी थेट निवडणूक आयोगाशी पत्र व्यवहार करणार असल्याची माहिती यावेळी दिली.
5 वर्षांपूर्वी -
VIDEO: घरी होणार नाही अशी चांगली व्यवस्था उपलब्ध करुन देत आहोत: चंद्रकांत पाटील
पावसाने थोडी विश्रांती घेतल्याने कोल्हापूरचा महापूर ओसरण्यास शुक्रवारी सकाळी सुरुवात झाली आहे. जवळपास तीन फूट पाण्याची पातळी कमी झाली आहे. सध्या पंचगंगा नदीची पाणीपातळी ५२.११ फूट असून आलमट्टी धरणातूनसुद्धा विसर्ग वाढविण्यात आला आहे. त्यामुळे पूर ओसरायला सुरुवात झाली आहे; परंतु कोल्हापूर, साता-यासह पुण्यात पावसाचा ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. अलमट्टी धरणामधून साडेचार लाख क्युसेक विसर्ग सुरू झाल्याने कोल्हापुरात दोन फूट पाणी पातळी कमी झाल्याने पूरग्रस्तांना किंचीत दिलासा मिळाला आहे. पूरग्रस्तांसाठी ६० हून अधिक स्वयंसेवी संस्था कार्यरत असून मदतीचा प्रचंड ओघ सुरू झाला आहे. याउलट सांगलीमध्ये परिस्थिती आहे. मदतकार्याचा धडाका सुरू असला तरी, पूरस्थिती अद्यापही आटोक्यात येण्याची चिन्हे नाहीत.
5 वर्षांपूर्वी -
कसबा विधानसभेसाठी चंद्रकांत पाटील आग्रही? वेटिंगलिस्ट'वरील नेते ५ वर्ष वेटिंगवरच?
विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तस तशी सुरक्षित मतदारसंघ शोधण्याची धडपड सर्वच पक्षातील उमेदवारांकडून होताना दिसते. भारतीय जनता पक्षातील वरिष्ठ नेते आणि विद्यमान महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोल्हापूरमध्ये राजकारण खेळत सध्या अचानकपणे पुण्यातील कसबा विधानसभेच्या जागेवर डोळा ठेऊन असल्याचं वृत्त आहे आणि त्यासाठी त्यांनी अंतर्गत चाचपणी देखील सूर केल्याचे समजते.
5 वर्षांपूर्वी -
भाजपच्या मेळाव्यात महिला कार्यकर्त्यांच्या साड्यांचे पदर ओढले व चिमटे काढले; तक्रारींवर वरिष्ठ म्हणाले?
काही दिवसांपूर्वी भाजपशी संबंधित नेत्यांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यावर कालच्या पुण्यातील मेळाव्यातील प्रकारामुळे भाजपमध्ये असे किती लोकं अजून आहेत, जे महिलांसाठी धोकादायक आहेत. कारण स्वतः भाजपच्या महिलांनी रागाने पक्षाच्या ग्रुपवर मेसेज टाकून तीव्र संताप व्यक्त केला. दरम्यान घडलेल्या धक्कादायक प्रकाराबद्दल जेव्हा संबंधित महिला पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे तक्रार केली तेव्हा, ‘जावू दया सोडून दया. पत्रकार आहेत इथं. उगीच विषय वाढेल. पक्षाचे नाव जाईल असे सांगितले गेले’. सदर घटनेने संबधित महिला हादरून गेल्या असल्या तरी वरिष्ठांनी प्रकरण मिटवण्यासाठी शक्ती पणाला लावल्याचं वृत्त आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्री म्हणतात ती मतं फक्त मोदींमुळे; तर चंद्रकांत पाटील म्हणतात बुथप्रमुख व पन्नाप्रमुखांमुळे
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षात जोरदार बैठका सुरु झाल्या आहेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीस विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाजनादेश यात्रा काढून महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत आणि पक्षासाठी पोषक वातावरण निर्मिती केली जाणार आहे. तत्पूर्वी भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकांवर बैठक सुरु आहेत.
5 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्री म्हणून आदित्य यांना प्रोजेक्ट केल्याने आदित्य व शिवसेनेचेही नुकसान
सध्या शिवसेनेकडून युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांना राज्यभर प्रमोट करण्याचे आणि ब्रँड आदित्य सामान्यांच्या माथी मारण्याचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. त्यानिमित्त राज्यभर आदित्य ठाकरे यांच्या नावाने इव्हेंट आयोजित केले जात असून, त्यासाठी एका नामांकित खासगी कंपनीला काम देण्यात आले असून, त्यांच्या योजनेनुसारच सर्व नियोजन सुरु आहे. त्यासाठी जागोजागी आदित्य संवाद सुरु करण्यात आले असून, त्यासाठी तंत्रज्ञानाची देखील मदत घेतली जाते आहे.
5 वर्षांपूर्वी -
अजब! चंद्रकांत पाटील भाजप पक्ष काँग्रेसयुक्त करून, राज्य काँग्रेसमुक्त करणार?
महाराष्ट्र भाजपचे नवनिर्वाचित अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे एकाच विषयावरील दावे नक्की काय सांगत आहेत ते सामान्यांच्या विचार शक्तीपलीकडील आहे. कारण कालच चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं की राज्यातील अजून अनेक काँग्रेस आमदार भारतीय जनता पक्षात थेट आमदारकीचा राजीनामा देऊन प्रवेश करतील. तत्पूर्वी देखील अनेक काँग्रेस आमदारांनी भाजपमध्ये प्रवेशकरून मंत्रिपदं खिशात घातली आहेत.
5 वर्षांपूर्वी -
गडकरी म्हणतात आयुष्याभर टोल भरा; राज्यातले नेते म्हणतात दादांचं ओळखपत्र दाखवल्यास टोल माफ
भारतीय जनता पक्षाचे ओळखपत्र दाखवल्यास टोल नाक्यावर टोल घेतला जात नाही. कारण त्यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील आणि आपला फोटो असतो असं धक्कादायक विधान भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आणि इचलकरंजीचे आमदार सुरेश हाळवणकर यांनी केला होतं. सांगली येथे पार पडलेल्या मेळाव्यात बोलताना त्यांनी जाहीरपणे हे भाष्य केले होते.
5 वर्षांपूर्वी -
तुमचं ओळखपत्र दाखवल्यास टोल माफ; आमचा झेंडा दिसला तरी 'दांडा वर' : मनसेकडून खिल्ली
भारतीय जनता पक्षाचे ओळखपत्र दाखवल्यास टोल नाक्यावर टोल घेतला जात नाही. कारण त्यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील आणि आपला फोटो असतो असं धक्कादायक विधान भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आणि इचलकरंजीचे आमदार सुरेश हाळवणकर यांनी केला आहे. सांगली येथे पार पडलेल्या मेळाव्यात बोलताना त्यांनी जाहीरपणे हे भाष्य केले.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार