ChatGPT Job Effect | चॅट जीपीटी'मुळे या क्षेत्रातील नोकऱ्यांना प्रचंड धोका, कोणत्या नोकऱ्या सुरक्षित? लिस्ट मध्ये तुमची नोकरी कोणती?
ChatGPT Job Effect | सध्या भारतासह जगभरात चॅट जीपीटी AI तंत्रज्ञानाची जोरदार चर्चा सुरु आहे. चॅट जीपीटीमुळे लोकांचे जीवन अधिक सोपे झाले आहे, मात्र दुसऱ्याबाजूला याच तंत्रज्ञानाने करोडो लोकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत, असे संकेतही मिळत आहेत. चॅटजीपीटी ची निर्मिती करणारी कंपनी ओपनएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम ऑल्टमन म्हणाले की कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान समाजाला नवीन आकार देईल आणि त्यांना चिंता आहे की एआय चॅटबॉट्स बऱ्याच विद्यमान नोकऱ्या नष्ट करू शकतात. ते म्हणाले की चॅट जीपीटी अनेक वास्तविक धोक्यांसह येते. यानंतर खुद्द ओपनएआयनेच त्याच्या येण्याने कोणत्या नोकऱ्यांना धोका निर्माण होऊ शकतो आणि कोणत्या नोकऱ्या पूर्णपणे सुरक्षित आहेत हे सांगितले.
2 वर्षांपूर्वी