महत्वाच्या बातम्या
-
Chhagan Bhujbal Vs Fadnavis | ED, IT, CBI'चा अतिरेकी वापर | फडणवीसांच्या नैतृत्वातील हा डाव त्यांच्यावरच उलटेल - भुजबळ
राज्यात भाजपाची सत्ता गेल्यानंतर महाविकास आघाडीतील मंत्र्यांवर आणि नेत्यांवर ईडी, इन्कम टॅक्स आणि सीबीआयच्या माध्यमातून राजकीय डाव आखला गेल्याचं मोठ्या प्रमाणावर निदर्शनास आलं आहे. फडणवीसांच्या काळात मंत्री असणारे शिवसेनेचे मंत्री देखील त्यांना सत्ता गेल्यावर गुन्हेगार असल्याचा साक्षात्कार होताना दिसत आहे. विशेष म्हणजे राज्य सरकारला कामच करू द्यायचं नाही असा जणू निश्चय दिल्लीश्वरांनी केला आहे का असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
3 वर्षांपूर्वी -
BREAKING | महाराष्ट्र सदन कथित घोटाळा प्रकरणी छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता
महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या महाराष्ट्र सदन कथित घोटाळा प्रकरणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या(एसीबी) न्यायालयाकडे दोषमुक्त करण्यासाठी भुजबळांनी अर्ज दाखल केला होता. छगन भुजबळ यांच्यासोबत त्यांचा पुतण्या समीर भुजबळ यांनीही हा अर्ज दाखल केला होता.
3 वर्षांपूर्वी -
१२ आमदारांच्या नियुक्तींसदर्भात राज्यपालांवर अदृश्य दबाव - छगन भुजबळ
आमदारांच्या रखडलेल्या नियुक्तीवरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारीवर दबाव असल्याचा आरोप केला आहे. याबाबत राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना पत्रकारांनी विचारले असता, राज्यपालांचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. त्यामुळे ते सकारात्मक निर्णय घेतील. परंतू त्यांच्यावर अदृश्य दबाव असल्याचा टोला लगावत भुजबळांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.
3 वर्षांपूर्वी -
राज्यात नव्हे, संपूर्ण देशातील ओबीसींचे राजकीय आरक्षण बाधित होणार आहे | मोदींसोबतच्या बैठकीतच ते स्पष्ट झालं - भुजबळ
पोटनिवडणूका पुढे ढकलाव्यात अशी आमची मागणी आहे. याबाबत भारतीय जनता पक्षाने ओबीसी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे त्याचे आम्ही स्वागत करतो मात्र भारतीय जनता पक्षवाले जे आरोप करत आहेत ते अत्यंत दुर्दैवी आहे. भारतीय जनता पक्षाचे राज्य सरकार असतानाच केंद्राने त्यांच्या मागण्यांना केराची टोपली दाखवली.
4 वर्षांपूर्वी -
केंद्राकडील तयार इंपिरिकल डाटा ताबडतोब मिळू शकतो | पण भाजप तो मिळू देत नाही - छगन भुजबळ
पोटनिवडणूका पुढे ढकलाव्यात अशी आमची मागणी आहे. याबाबत भारतीय जनता पक्षाने ओबीसी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे त्याचे आम्ही स्वागत करतो मात्र भारतीय जनता पक्षवाले जे आरोप करत आहेत ते अत्यंत दुर्दैवी आहे. भारतीय जनता पक्षाचे राज्य सरकार असतानाच केंद्राने त्यांच्या मागण्यांना केराची टोपली दाखवली.
4 वर्षांपूर्वी -
ओबीसींच्या आरक्षणावरून फडणवीसांचा भुलभुलैय्या | कोर्टाकडूनच ओबीसींच्या संख्येची विचारणा - भुजबळ
दोन दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षणावरून महत्वाचा निर्णय दिला. त्यावरून भाजप नेत्यांनी पुन्हा राज्य सरकारवर आरोप करण्यास सुरवात केल्याचं पाहायला मिळालं. स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षणाबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस करत असलेल्या दाव्यात काही तथ्य नाही.
4 वर्षांपूर्वी -
छगन भुजबळ यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह | राष्ट्रवादी आमदाराच्या लग्नात पवारांसह हजेरी
अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. छगन भुजबळ यांनी स्वत: ट्विट करुन याची माहिती दिली आहे. दरम्यान, काल शरद पवार यांच्यासोबत भुजबळांनी लग्नाला हजेरी लावली होती.राष्ट्रवादीच्या देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे यांचा लग्नसोहळा काल नाशिकमध्ये पार पडला. या सोहळ्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर भुजबळ यांनी हजेरी लावली होती.
4 वर्षांपूर्वी -
महापालिका निवडणुका | जागावाटपात अडचण आल्यास निकालानंतर एकत्र येऊ - भुजबळ
शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीचे जागावाटप होईपर्यंत आघाडीतील प्रत्येक घटक पक्ष आपल्या पक्षाचा संघटनात्मक विस्तार करीत राहील. भारतीय जनता पक्षासह विविध पक्षांत नाराज आहेत. परंतु त्यांना प्रवेश देतांना वरिष्ठ पातळीवर निर्णयानंतरच त्याचा पक्षप्रवेशाचा निर्णय होईल. जागावाटपात अडचणी आल्यास स्वतंत्र निवडणूक लढता येईल. निवडणूक निकालानंतर देखील एकत्र येण्याचा पर्याय असेल, असे प्रतिपादन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
4 वर्षांपूर्वी -
ईडीची धाड महाराष्ट्रातील 'ऑपरेशन लोटस'चं पहिलं पाऊल असू शकतं - भुजबळ
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावरील कारवाई हे महाराष्ट्रातील ‘ऑपरेशन लोटस’चं पहिलं पाऊल असू शकतं,’ अशी शंका व्यक्त करतानाच, ‘कारण काहीही असो, भाजपचा मूळ उद्देश यशस्वी होणार नाही,’ असा ठाम विश्वास राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला. ‘अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या आणि इतर प्रकरणांमध्ये सरनाईक अतिशय आक्रमकपणे बोलत होते. सरकारची बाजू मांडत होते. त्यामुळे ही कारवाई अपेक्षित होती,’ असं भुजबळ म्हणाले.
4 वर्षांपूर्वी -
सरकार नियमानुसार अर्नबची काळजी घेतेय | राज्यपालांनी जास्त चिंता करू नये - छगन भुजबळ
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी (Anvay Naik Suicide Case) सध्या अटकेत असलेले रिपब्लिकन वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना तळोजा कारागृहात (Arnab Goswami in Taloja Jail) ठेवण्यात आलं आहे. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना तुरूंगात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान, या प्रकरणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh) यांच्याशी चर्चा केली आहे. अर्णब गोस्वामी यांच्या प्रकृती व सुरक्षेबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी चिंता व्यक्त केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
पार्थ पवार हे थोडे अपरिपक्व असल्याचं पवारांनी म्हटलं आहे | हिंदीत नया है वह - छगन भुजबळ
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांच्यावर टीका केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. शरद पवार यांनी पार्थ पवार अपरिपक्व असून, त्याच्या वक्तव्याला कवडीची किंमत देत नाही अशा शब्दांत बुधवारी फटकारलं. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी शरद पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना ‘नया है वह’ अशी मार्मिक टिप्पणी केली. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.
5 वर्षांपूर्वी -
भाजपचे आमदार फुटू नयेत म्हणून वरिष्ठ त्यांना सत्ता येण्याचं लॉलीपॉप दाखवत आहेत - भुजबळ
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. ही भेट राजकीय नव्हती. आम्हाला सरकार पाडण्यात काहीही कुठलाही रस नाही. आत्ता कोरोनाची लढाई सुरु आहे. त्यामुळे कोरोनाच्या संदर्भात आणि शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी ही भेट होती. महाराष्ट्रातली कोरोनाची परिस्थिती मी अमित शाह यांच्या कानावर घातली आहे. तसेच फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यामुळे पुन्हा राज्यातील सरकार पडणार अशी चर्चा सुरु झाली.
5 वर्षांपूर्वी -
भुजबळ म्हणाले; राज ठाकरेंनी प्रबोधनकारांची शिकवण लक्षात ठेवावी...पण का? - सविस्तर
कोरेगाव-भीमा प्रकरणातील आरोपी आणि हिंदू एकता आघाडीचे नेते मिलिंद एकबोटे यांनी रविवारी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. येत्या २४ तारखेला संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त वढू बुद्रूक याठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी ते कृष्णकुंज येथे आले होते. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये काहीवेळ चर्चा झाली. राज ठाकरे आणि एकबोटे यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत.
5 वर्षांपूर्वी -
ओबीसींची स्वतंत्र जनगणना करा - छगन भुजबळ
जनगणनेच्या अर्जात बदल केले जावेत अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे. बिहार राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात ओबीसी समाजाची वेगळी जनगणना करावी असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. जनगणनेच्या फॉर्ममध्ये ओबीसीचा एक वेगळा पर्याय दिला तर जनगणना होऊ शकते असंही यावेळी त्यांनी सांगितलं. यासाठी अधिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.
5 वर्षांपूर्वी -
मी स्वत: देखील राणेंच्या संपर्कात आहे; भुजबळांकडून राणेंची खिल्ली
महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. शिवसेनेने भारतीय जनता पक्षासोबत न जाता राष्ट्रवादी, काँग्रेससोबत जाऊन सरकार स्थापन केले. याबाबत नारायण राणे यांना प्रश्न विचारला असता, “भारतीय जनता पक्ष कोणाकडे गेली नव्हती. शिवसेना स्वत: आली होती. केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. महाराष्ट्रात देखील भारतीय जनता पक्षाच्या आमदारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला कुणाचीही फिकीर नाही. खरतर काळजी करण्याची गरज त्यांना आहे. कारण त्यांचे ५४ पैकी ३५ आमदार नाराज आहेत”, असे नारायण राणे म्हणाले होते.
5 वर्षांपूर्वी -
भुजबळांना भेटल्यानंतर खडसे पवारांच्या भेटीला; भाजपवर ओबीसी नेत्यांचा राजकीय बॉम्ब पडणार?
भाजपत ओबीसी नेते नाराज असून या पक्षाचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे आपल्याला भेटले अशी माहिती राष्ट्रवादी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी आज नाशिक येथे पत्रकारांना दिली. मंत्रीपदी निवड झाल्यानंतर आज प्रथमच भुजबळ यांचे नाशिकमध्ये आगमन झाले. त्यानंतर भुजबळ फार्म येथे त्यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.
5 वर्षांपूर्वी -
मनसे'नंतर वसंत गीते भाजपाला रामराम ठोकण्याच्या तयारीत; भुजबळांची भेट घेतली
भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत गीते यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली आहे. ‘छगन भुजबळ यांना सदिच्छा दिल्या आणि त्यांचं स्वागत केलं. त्यांचे आशीर्वाद घेण्याकरीता भेट घेतली,’ अशी प्रतिक्रया वसंत गीते यांनी दिली आहे. तसंच यावेळी वसंत गीते यांनी भुजबळांवर चांगलीच स्तुतीसुमने उधळली.
5 वर्षांपूर्वी -
आधी पुण्यातील पूरस्थितीकडे लक्ष द्या; जागावाटप बाजूला राहू द्या: छगन भुजबळ
मागील ३ दिवसांपासून पुण्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. बुधवारी रात्री शहरात झालेल्या पावसाने उच्चांक गाठला. रात्री 8 च्या दरम्यान सुरू झालेल्या पावसाने शहराला अक्षरशः झोडपून काढले. शहरातील सर्वच भागात रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते. त्यात अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने अनेक लोक वाहून गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शहरात अतिवृष्टी होत असल्याने तसेच आपत्कालीन परिस्तिथी निर्माण झाली असल्याने पुणे जिह्यातील 5 तालुक्यांच्या शाळांना आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मतदान आणि मतमोजणीत ३ दिवसांचं अंतर गडबड करण्यासाठी का? भुजबळ
शनिवारी निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र आणि हरियाणा राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं. एकिकडे निवडणूक आयोगाच्या वतीने या महत्त्वाच्या घोषणा केल्या जात असतानाच देशातील राजकीय पटलावर मोठ्या हालचाली आणि प्रतिक्रियांची लाट उसळल्याचं पाहायला मिळालं.
5 वर्षांपूर्वी -
छगन भुजबळ यांचे संयुक्त प्रचार सभेतील संपूर्ण भाषण
छगन भुजबळ यांचे संयुक्त प्रचार सभेतील संपूर्ण भाषण
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा