आगामी छत्तीसगड विधानसभा निवडणूक भाजपसाठी अवघड, ED लागली कामाला, मुख्यमंत्र्यांच्या जवळील व्यक्तींच्या घरी छापेमारी
Chhattisgarh Assembly Election 2023 | छत्तीसगड मध्ये विधानसभा निवडणूक २-३ महिन्यांवर येऊन उभी राहिली आहे. मात्र भाजपकडे छत्तीसगडसाठी स्थानिक नैतृत्वच नसल्याने मोठी राजकीय अडचण निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे आगामी छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव निश्चित मानला जातोय. परिणामी काँग्रेस नेत्यांना भाजपमध्ये आणण्यासाठी पुन्हा तेच तंत्र उपसण्यात आलं आहे जे अनेक राज्यांमध्ये अंमलात आणलं आहे. होय! ED अचानक वेगाने छत्तीसगडमध्ये कामाला लागली आहे. मात्र यातून काँग्रेसला काही फरक पडेल असं दिसत नाही. स्वतः मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी देखील ED धाड सत्रावरून मोदी-शहांची फिरकी घेतली आहे.
1 वर्षांपूर्वी