Cigarette Shares Crash | धूर निघाला! बजेटमधील घोषणेमुळे सिगरेट कंपन्यांचे शेअर्स कोसळू लागले, पुढे नेमकं काय होणार?
Cigarette Stocks Crash | काल आर्थिक वर्ष 2023 चा अर्थसंकल्प लोकसभेत सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पिय भाषणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सिगारेटवर अतिरीक्त कर लावण्याची घोषणा केली. या घोषणेनंतर बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये गॉडफ्रे फिलिप्स इंडिया आणि आयटीसी लिमिटेड कंपन्याच्या शेअर मध्ये जबरदस्त घसरण झाली. सिगारेट कंपन्यांच्या शेअर्समध्ये पाच टक्क्यांचा लोअर सर्किट लागला होता. गुरुवार दिनांक 2 फेब्रुवारी 2023 रोजी गॉडफ्रे फिलिप्स इंडिया कंपनीचे शेअर्स 1.81 टक्के वाढीसह 1,853.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. तर आयटीसी कंपनीचे शेअर्स 5.42 टक्के वाढीसह 381.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी