महत्वाच्या बातम्या
-
Viral Video | शिंदे पिता-पुत्रच काय, तुम्ही सुद्धा न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअरवर पैसे मोजून पेड जाहिरात करू शकता, हे आहे बिलबोर्ड रेट कार्ड
Viral Video | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात सुरु केलेल्या विविध उपक्रमांची माहिती न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअरच्या स्क्रीनवर झळकली. याचे व्हिडीओ आता समोर आले आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह खासदार श्रीकांत शिंदे आणि राहुल कनाल यांचाही फोटो या स्क्रीनवर दिसला. राज्यातील विविध उपक्रमांची माहिती स्क्रीनवर दाखवली गेली.
1 वर्षांपूर्वी -
शिंदेंनी शिवसेनेत बंड करताना अजित पवार यांना जवाबदार धरलं होतं, तेव्हा एकनाथ शिंदें धादांत खोटं बोलत होते हे आज सिद्ध झालं
DCM Ajit Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी त्यांचे काका शरद पवार यांनी स्थापन केलेल्या पक्षावर आपला अधिकार असल्याचा दावा केला आहे. शरद पवार हे प्रदीर्घ काळ राष्ट्रवादीचे नेतृत्व करत आहेत. मात्र, आता राजकीय हालचाली वेगात आहेत. अजित पवार पक्षाच्या इतर 9 नेत्यांसह आज शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. हे मंत्रीपद ते भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शेअर करणार आहेत. तसेच आम्ही राष्ट्रवादी पक्ष म्हणून सत्तेत आलो आहोत असं देखील अजित पवार पत्रकार परिषदेत म्हणाले. मात्र आता अजित पवार यांच्या भाजपसोबत जाण्याने शिंदे गट अडचणीत सापडला आहे.
1 वर्षांपूर्वी -
सर्व्हेत संपूर्ण राज्यात शिंदे गटाला 5% मतं मिळत नसल्याने, शिंदेनी पेड जाहिरात देऊन स्वतःच स्वतःची टक्केवारी जाहीर केली? फडणवीसांना डच्चू
Shinde Camp Advertisement | मागील दिवसांपासून अनेक सव्हे प्रसिद्ध झाले असून त्यात शिंदे गटाची अवस्था अत्यंत वाईट असल्याचं समोर आलाय. सर्वच बाजूने महाविकास आघाडी उजवी असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच सामान्य जनतेला एकनाथ शिंदे यांचा भाजपच्या आहारी जाऊन शिवसेना पक्ष फोडण्याचा निर्णय रुचलेला नाही हे देखील आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे. मागील एका प्रतिष्ठित सर्व्हेत संपूर्ण महाराष्ट्रात शिंदे गटाला केवळ ५% टक्के मतं मिळतील अशी आकडेवारी समोर आली होती. मात्र आता शिंदेंनी ‘आर्टिफिशिअल’ म्हणजे स्वतःच आकडेवारी जाहीर करून आणि त्याची जाहिरात करून अधिक टक्केवारी दाखवून स्वतःला प्रसिद्धीत ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरु केल्याचं पाहायला मिळतंय.
2 वर्षांपूर्वी -
10 वर्षात महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची एक वीटही भाजपने रचली नाही, आता ठाकरे सरकारच्या काळातील विकास कामांचं 'नामकरण' सुरु
CM Eknath Shinde | छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने रायगडावर भव्यदिव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबोधित केलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीन महत्त्वाच्या घोषणा केल्या. मुंबईतील कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव देण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तसेच प्रतापगड प्राधिकरण स्थापन करण्यात येणार आणि शिवसृष्टीसाठी 350 कोटी रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.
2 वर्षांपूर्वी -
शिंदेंची ठाण्यात घराणेशाही! ठाकरेंच्या कृपेने एकनाथ शिंदे मंत्री, मुलगा खासदार आणि भाऊ नगरसेवक, मात्र घराणेशाहीची टीका ठाकरेंवर
CM Eknath Shinde | देशात आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जंयतीनिमित्त नव्या संसद भवनाचे उद्धाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले आहे. या नव्या संसद भवनावरून आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जंयतीवरून आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या विरोधकांवर टीकेची तोफ डागली आहे. नव्या संसद भवनाच्या उद्धाटनाच्या कार्यक्रमावर काही लोक आक्षेप घेतात,हे दुदैव असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. एकनाथ शिंदे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जंयतीनिमित्त कार्यक्रमात बोलत होते.
2 वर्षांपूर्वी -
राज्यावर अनेक संकटं असताना महाराष्ट्र 'राम-भरोसे', मुख्यमंत्री शिंदें सुट्टीवर की महाशक्तीकडून 'कायमच्या सुट्टीपूर्वी' 3 दिवसांची सुट्टी मंजूर?
CM Eknath Shinde on Leave | विधानसभा निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढील दोन दिवस कर्नाटक आणि दोन दिवस मॉरिशसच्या दौऱ्यावर जाणार आहेत. आज म्हणजे २५ व २६ एप्रिल रोजी ते कर्नाटकात असतील, त्यानंतर २७ रोजी नागपूरला भेट देतील आणि २८ व २९ रोजी मॉरिशसचा दौरा करतील.
2 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांचे प्रश्न, महागाई, बेरोजगारीवरून लोकांना विचलित करण्यासाठी मोदींची माणसं अयोध्येत दाखल? सामान्य जनता किती सतर्क?
CM Eknath Shinde on Ayodhya Visit | एकाबाजूला राज्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाल्याने त्यांच्यावर भीषण आर्थिक संकट कोसळलं आहे. तर एकूणच देशात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून महागाईने आणि बेरोजगारीच्या मुद्द्यांनी रौद्र रूप धारण केल्याने सामान्य लोकांना दैनंदिन आयुष्य जगताना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. एका बाजूला राज्यात शिंदे सरकार सत्तेत आल्यापासून अनेक मोठे प्रकल्प गुजरात निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रातून एकरात्रीत कागदोपत्री गुजरातला पळविण्यात आले.
2 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी आणि महागाईवरून जनतेकडून मतं मिळणं अवघड, शिंदे धामिर्क मुद्यांवर केंद्रित, 9 एप्रिल अयोध्या दौरा
CM Eknath Shinde on Ayodhya Tour | देशात कोरोना संसर्गाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. विशेषतः महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना विषाणूचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. गुरुवारी महाराष्ट्रात कोरोना विषाणूचे 803 नवीन रुग्ण आढळले आहेत, जे आदल्या दिवसाच्या तुलनेत खूप जास्त आहे. त्याचवेळी, राज्यात गेल्या 24 तासांत 3 जणांचा मृत्यू झाला आहे.
2 वर्षांपूर्वी -
हे तर ऐतिहासिक खोटं बोलणारे मोदी भक्त मुख्यमंत्री? कोरोनाकाळात फोनवर ऑक्सिजन पाठवला सांगितलं, पण 'हे' सत्य लोकांपासून लपवलं
CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज घेतलेल्या रत्नागिरीतील खेडमधील गोळीबार मैदानावरून उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. मी काम करणारा मुख्यमंत्री आहे, घरात बसून फक्त आदेश देणारा मुख्यमंत्री नाही असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. विशेष म्हणजे स्वतःची पाठ स्वतःच थोपटून घेण्यासाठी त्यांनी थेट कोरोना काळात आपण लोकांना एका फोनवर लोकांना कसा ऑक्सिजन पुरवठा केला होता हे सांगितलं. वास्तविक एका महत्वाच्या कॅबिनेट मंत्रिपदावरील मंत्र्याने फोन लावून एखादी गोष्ट पाठविणे यात विशेष काय? पण एकनाथ शिंदे यांनी फक्त फोनकरून पाठवलेली ती गोष्ट मिळविण्यासाठी कोणाला किती झगडावं लागलं होतं हे त्यांनी लोकांना सांगितलं नाही. कारण ते मंत्री असताना त्यांचे फोन केंद्रातील भाजप नेते तर उचलणार नव्हते. पण, ज्यांचे फोन मुख्यमंत्री पदी असताना (उद्धव ठाकरे ) देखील भाजपचे वरिष्ठ याच कोरोना काळातील ऑक्सिजनच्या पुरवठ्यावरून उचलत नव्हते आणि त्यावेळी नेमकं काय केलं आणि कसा देश-विदेशातून ऑक्सिजन झगडून आणला आणि इस्पितळापर्यंत पोहिचवला ते मीडिया रेकॉर्डवर आहे. हा तोच शिंदेंना आयात मिळालेला ऑक्सिजन होता जो त्यांनी मग फोनकरून ठाण्यातील आजूबाजूच्या इस्पितळांना पाठवला होता. आता नशीब कोरोना काळात शिंदेंना शिवसेना फोडली नव्हती असं बोलण्याची वेळ आली आहे. कारण त्यावेळी महाराष्ट्रातील इस्पितळांच्या वाट्याला आलेला ऑक्सिजन फॉक्सकॉन प्रमाणे एका फोनवर गुपचूप गुजरातला वळवला नसताना याची चर्चा देखील समाज माध्यमांवर सुरु झाली आहे. नेमकं काय घडलं होतं तेव्हा ते वाचा म्हणजे शिंदे किती ऐतिहासिक खोटं बोलत आहेत त्याची जाणीव होईल.
2 वर्षांपूर्वी -
अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत पळ काढला, तर ढाल-तलवार चिन्हावर निवडणूकच न लढणाऱ्या शिंदेंचा हास्यास्पद राजकीय दावा
Shinde Camp | शिवसेनेतील फुटीनंतर अंधेरी पूर्व येथील निवडणुकीच्या अनुषंगाने शिंदे यांना ढाल-तलवार चिन्ह देण्यात आलं आहे. वास्तविक या चिन्हावर त्यांनी अजून एकही निवडणूक लढवलेली नाही. दुसरीकडे, सुप्रीम कोर्टात वाद असताना ठाकरे मशाल चिन्हासह थेट अंधेरी पूर्व पोटनिवडणूक लढवून ती मोठ्या मतांनी निवडून देखील आल्याचं पाहायला मिळालं होतं.
2 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्री शिंदेंवर भूखंड घोटाळ्याचा गंभीर आरोप, न्यायालय हस्तक्षेप झाल्याचं सांगतं तेव्हा ही बाब गंभीर - उद्धव ठाकरे
CM Shinde Accused of Plot Scam | हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भूखंडावरुन झालेल्या आरोपामुळे चांगलाच गदारोळ माजला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकासमंत्री असताना 83 कोटींचा भूखंड 2 कोटी रुपयांना विकल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत केला. विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी करत विधानसभेतून सभात्याग केला. तर, उद्धव ठाकरे यांनी देखील जाहीर पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदेच्या राजीनाम्यासाठी आक्रमक भूमिका घेतली.
2 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्री शिंदेंवर भूखंड घोटाळ्याचा गंभीर आरोप, 86 खोक्यांचा भुखंड फक्त 2 खोक्यांना दिल्याचा आरोप
CM Shinde Accused of Plot Scam | हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांनी जोरदार आघाडी घेतली. पहिल्या दिवशी महाविकास आघाडी बॅकफूटवर असल्याचं दिसून आलं होतं. त्यानंतर आता विधान परिषदेत महाविकास आघाडी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना निशाण्यावर घेतलं. त्यावेळी विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भूखंड घोटाळ्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केला आहे. याबद्दल मुख्यमंत्री शिंदेंनी सभागृहात स्पष्टीकरण दिलं आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जोरदार पाठराखण करत विरोधकांनी उत्तर दिले आहे.
2 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरेंचं समृद्धी महामार्गाच्या कामावर लक्ष होतं, श्रेय फडणवीसांना देण्यासाठी शिंदेची धडपड, शिंदेच्या तोंडून शिंदेंची पोलखोल
Balasaheb Thackeray Samrudhi Highway | हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा नागपूर ते शिर्डी या मार्गाचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज म्हणजे ११ डिसेंबरला करण्यात येतं आहे. हे उद्घाटन करत असताना मला खूप आनंद होतो आहे. या समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव दिलं गेल्याचा मला खूप आनंद आहे. आनंद आणि अभिमान यासाठी वाटतो आहे की ज्या वेळी मागच्या सरकारमध्ये म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा MSRDC चा मंत्री म्हणून माझ्यावर विश्वास दाखवला. तो प्रकल्प मी इथपर्यंत आणू शकलो याचा आनंद आहे असं सांगताना उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळाकडे कानाडोळा करत फडणवीसांचा जयजयकार केल्याचं पाहायला मिळाले.
2 वर्षांपूर्वी -
सुप्रीम कोर्टात 29 ला सुनावणी, 50 आमदार आणि 12 खासदारांसाठी गुवाहाटी 5 स्टार हॉटेलात 100 खोल्या बूक, खोके पुन्हा चर्चेत
Shinde Camp in Guwahati | महाराष्ट्राच्या राजकीय पेचप्रसंगासंदर्भात शिवसेनेच्या दोन्ही गटांनी अनुक्रमे उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दाखल केलेल्या याचिकांवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी २९ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. मुख्य न्यायमूर्ती डी.वाय.चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने वकिलांना या खटल्याचे लेखी स्वरूपात संकलन पूर्ण करण्यास सांगितले आणि चार आठवड्यांत मुख्य मुद्दे विचारात घेऊन ते लेखी स्वरूपात देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर सर्वाधिक धाकधूक शिंदे गटाची झाल्याची बातमी आहे.
2 वर्षांपूर्वी -
शिंदे गटाच्या नेत्यांकडून महिलाविरोधी वादग्रस्त वक्तव्यांची मालिका, लोकांमध्ये रोष वाढतोय, मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक
Shinde Camp Meeting | महाराष्ट्राचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. सुप्रिया सुळेंच्या टीकेला उत्तर देत असताना सत्तारांची जीभ घसरली. त्यांनी गलिच्छ भाषेत टीका करत असताना सत्तारांच्या टीकेनंतर राज्यभरात संताप व्यक्त होतो आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने आता अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
गर्दी दिसली, माईक मिळाला..आम्ही १ महिन्यापूर्वी हे केलं, २ महिन्यापूर्वी ते केलं, ३ महिन्यापूर्वी असं केलं, साडेतीन महिन्यापूर्वी ते केलं
CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मागील काही दिवसांपासून सातत्याने भेटीगाठी होत आहेत. त्यात शिंदे कधी गणपती निमित्त, कधी दहीहंडी, कधी दिवाळी तर कधी इतर गर्दी असेल अशा ठिकाणी आपल्या शिवसेना फोडीच्या राजकीय गाथा सांगायची संधी सोडत नाहीत. सुप्रीम कोर्टाच्या तारखा जसजशा पुढे सरकत आहेत तोपर्यंत शिंदेंच्या या गाथा जबरदस्तीने का होईना, लोकांनां ऐकाव्या लागणार आहेत असं म्हटलं जातंय.
2 वर्षांपूर्वी -
खड्डेमुक्त मुंबईची मुख्यमंत्र्यांची गर्जना, मात्र शिंदे पुत्राच्या बंगल्यापासूनच खड्डेमय कल्याणची अशी पोलखोल झाली होती
CM Eknath Shinde | इंडिया टुडे कॉनक्लेव्हच्या मंचावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्याची डेडलाईन सांगितली. मुंबईतील रस्त्यांवर पडणाऱ्या खड्ड्यांचा मुद्दा मुलाखतीदरम्यान उपस्थित करण्यात आला. आजही मुंबईत थोडाफार पाऊस होतो, तेव्हा गाड्या नीट चालू शकत नाही. मुंबई आजही ट्रॅफिकची समस्या आहे. मेट्रोचा प्रोजेक्ट निर्धारित वेळ निघून गेली, तरीही सुरूच आहे. वेळेत पूर्ण होत नाहीये. कारण मुंबईतील रस्ते जोपर्यंत सुधारणार नाही, तोपर्यंत पुढील काम कसं होईल? असा प्रश्न एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला.
2 वर्षांपूर्वी -
ठाकरे सरकारच्या काळातील भरतीवर शिंदे सरकारचा रोजगार इव्हेन्ट, शिंदेंच्या बंडामुळे नियुक्त्या रखडल्याच सत्य आलं समोर
Shinde Sarkar Rojagar Event | देशभरात बेरोजगारीचा मुद्दा मोठ्या प्रमाणावर अधोरेखित झाला आहे. वर्षाला दोन कोटी रोजगार देऊ असं वचन देऊन सत्तेत आलेलं मोदी सरकार मात्र याविषयात पूर्णपणे नापास झालं आहे. त्यात गुजरात निवडणुकीत बेरोजगारी आणि महागाई हे मुद्दे उच्च स्थानी असल्याने मोदी सरकारच्या अडचणी प्रचंड वाढल्या आहेत. परिणामी, शिंदे सरकार सत्तेत येताच मोदी सरकारने महाराष्ट्रातील लाखोंचा रोजगार देणारे प्रकल्प गुजरातला पळवले आणि संपूर्ण राजकारण ढवळून निघालं आहे. परिणामी काही दिवसांपूर्वी मोदी सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते दिल्लीतून एक इव्हेन्ट गुजरात निवडणुकीच्या तोंडावर घडवून आणला होता. त्यात केंद्रातील विविध खात्यातील नवनियुक्त उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्याचा इव्हेन्ट आयोजित करून आम्ही रोजगार निर्माण करत आहोत असं भास निर्माण करताना २ कोटी रोजगारावरून माध्यमांना विचलित केले. मात्र याच इव्हेन्टसाठी संबंधित उमेदवारांना ६ महिने नियुक्ती पत्रापासून ताटकळत ठेवण्यात आल्याची माहिती पुढे आली होती.
2 वर्षांपूर्वी -
नुकसानग्रस्त शेतकरी राहिला बाजूला, मुख्यमंत्री गणपती, दहीहंडी, दिवाळी भेटीनंतर स्वतःच्या शेतात मुक्कामी, विशेष फोटोसेशनही
CM Eknath Shinde | राज्यातील भागात पावसात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. उभे पीक पाण्यात गेले असून शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. राज्यातील शेतकरी भीषण आर्थिक संकटात सापडला आहे. प्रशासनाने व विमा कंपन्यांनी तात्काळ दखल घेत झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी शेतकरी करत आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घ्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. एका बाजूला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेत आहेत. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नुकसानग्रस्त शेतकरी सोडून स्वतःच्याच शेतात निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पोहोचल्याच पाहायला मिळतंय.
2 वर्षांपूर्वी -
भाजपाची सत्ता पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक महापालिकेत, ते वगळून बीएमसीतील व्यवहारांची कॅगमार्फत चौकशी, शिंदेंवर शंका वाढणार?
CM Eknath Shinde | महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर आता कोरोनाकाळात मुंबई महापालिकेनं मंजुर केलेल्या विकासकामांच्या आर्थिक व्यवहारांची कॅगमार्फत चौकशी करण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारनं घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. त्यामुळं आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची अडचण वाढण्याची शक्यता आहे. कारण गेल्या २५ वर्षांपासून मुंबई महापालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता होती. सध्या पालिकेचा कार्यकाळ संपल्यानं प्रशासकामार्फत कारभार पाहिला जात आहे.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी खास सरकारी स्कीम, महिना कमवाल 20,000 रुपये, जबरदस्त फायद्याची योजना
- EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, आता EPF खात्यातील पैसे ATM वरून काढा, सहज शक्य होणार, नवे नियम