CMS Info Systems Share Price | CMS इन्फो सिस्टम्स शेअरमध्ये मोठी उलाढाल, शेअरधारकांनी काय करावे? स्टॉक डिटेल वाचून निर्णय घ्या
CMS Info Systems Share Price| शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये CMS इन्फो सिस्टम्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स कोसळले होते. मात्र आज हा स्टॉक तेजीत धावत आहे. खरे तर CMS इन्फो सिस्टम्स लिमिटेड कंपनीच्या प्रवर्तकांनी त्यांचे काही शेअर्स विकले आहेत. या प्रवर्तकांमध्ये सायन इन्व्हेस्टमेंट होल्डिंग्सने सीएमएस इन्फो सिस्टीम कंपनीचे 13.7 टक्के भागभांडवल 638 कोटी रुपयेच्या ब्लॉक डीलद्वारे खुल्या बाजारात विकले आहेत. कंपनीच्या शेअर होल्डिंग डेटानुसार मार्च 2023 च्या तिमाहीपर्यंत सायन इन्व्हेस्टमेंट होल्डिंग्स कंपनीकडे CMS इन्फो सिस्टीम्स कंपनीचे 60.24 टक्के भाग भांडवल होते. आता त्यांचे भाग भांडवल 60.24 टक्केवरून घसरून 46.54 टक्केवर आले आहे. आज सोमवार दिनांक 12 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.70 टक्के वाढीसह 321.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी