Concord Biotech IPO | गुंतवणूकदार तुटून पडले! कॉनकॉर्ड बायोटेक IPO ला अप्रतिम प्रतिसाद, पहिल्याच दिवशी मोठा परतावा देण्याचे संकेत
Concord Biotech IPO | कॉनकॉर्ड बायोटेक लिमिटेड या औषधांचा कच्चा माल बनवणाऱ्या कंपनीचा IPO मागील आठवड्यात शुक्रवारी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. IPO इश्यूच्या पहिल्या दिवशी हा स्टॉक 58 टक्के सबस्क्राईब झाला होता. NSE वर उपलब्ध आकडेवारीनुसार, कॉनकॉर्ड बायोटेक लिमिटेड कंपनीने आपल्या IPO मध्ये 1,46,50,957 शेअर्स जारी केले होते. त्या तुलनेत IPO ला पहिल्या दिवशी 85,05,660 शेअर्सची बोली प्राप्त झाली आहे. शेअर बाजारात बिग बुल नावाने प्रसिद्ध असलेले राकेश झुनझुनवाला यांच्या कुटुंबाची कॉनकॉर्ड बायोटेक लिमिटेड कंपनीमध्ये मोठी गुंतवणूक आहे.
2 वर्षांपूर्वी