उत्तर भारतात ओबीसी कार्ड, तर कांग्रेस अध्यक्ष पदासाठी काँग्रेसकडून मल्लिकार्जुन खरगे यांच्यामार्फत दलित कार्ड?, भाजप दुहेरी राजकीय पेचात?
Congress President Poll | देशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीला पुन्हा एकदा नवे वळण मिळाले आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी अध्यक्षपदाची निवडणूक न लढवण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या जागी मल्लिकार्जुन खरगे आता अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार आहेत. पक्षाध्यक्षपदाची निवडणूक आपण लढवणार नसून त्यांचे सहकारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उमेदवारीत प्रस्तावक असतील, असे काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी शनिवारी सांगितले. खरगे आज दुपारी उमेदवारी अर्ज भरू शकतात, असे सांगण्यात येत आहे. असे झाल्यास काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक आता शशी थरूर आणि खरगे यांच्यात रंगणार आहे. एकाबाजूला उत्तर भारतात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ओबीसी कार्ड पुढे केलेलं असताना दुसरीकडे काँग्रेसने मल्लिकार्जुन खरगे यांना पुढे करून दलित कार्ड पुढे केलं आहे. त्यामुळे सोनिया गांधी यांच्या माष्टरस्ट्रोकने आता भाजपमध्ये टेन्शन वाढलं आहे.
2 वर्षांपूर्वी