हर घर महंगाई | ज्या महागाई - बेरोजगारीच्या मुद्द्यामुळे मोदी सरकार सत्तेत, तेच मुद्दे 2024 भाजपाला भोवणार?
काँग्रेसने महागाई विरोधात देशभरात आंदोलन सुरूच ठेवले आहे. दिल्ली पोलिसांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना ताब्यात घेतलं आहे. काँग्रेसचे अनेक खासदार विजय चौकात ठाण मांडून बसले आहेत. खरंतर राहुल गांधी हे काँग्रेसच्या खासदारांना घेऊन संसद भवन ते राष्ट्रपती भवन असा मोर्चा काढत होते. पण पोलिसांनी त्यांना विजय चौकात अडवलं आणि राहुल गांधींसह अनेक नेत्यांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी काँग्रेसला मोर्चा काढू दिला नाही. या भागात कलम १४४ लागू आहे. तर दुसरीकडे काँग्रेस कार्यालयातून मोर्चा काढणाऱ्या प्रियांका गांधी यांनाही ताब्यात घेण्यात आलं.
3 वर्षांपूर्वी