महत्वाच्या बातम्या
-
काँग्रेसनं शिवसेनेसोबत जाऊ नये: सुशीलकुमार शिंदे
काँग्रेस पक्ष हा सेक्युलर पक्ष आहे सर्वधर्मसमभाव मानणारा पक्ष आहे. काँग्रेसने शिवसेनेसोबत मुळीच जाऊ नये अशी भूमिका सुशीलकुमार शिंदे यांनी घेतली आहे. सुशीलकुमाऱ शिंदे हे माजी केंद्रीय मंत्री आहेत. त्यांनी काँग्रेसने शिवसेनेसोबत जाण्याच्या भूमिकेला कडाडून विरोध दर्शवला आहे. जनमत मान्य करुन काँग्रेसने विरोधात बसावं असंही त्यांनी म्हटलं आहे. काँग्रेस हा सेक्युलर पक्ष आहे काँग्रेस पक्षाची विचारधारा आणि शिवसेनेची विचारधारा या दोहोंमध्ये खूप फरक आहे. त्यामुळे काँग्रेसने शिवसेनेसोबत जाऊ नये असं माझं स्पष्ट मत आहे असं शिंदे यांनी म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
वंचित'मुळे आघाडीच्या ३२ जागा पडल्या; बाळासाहेब थोरातांची देखील टीका
लोकसभा निवडणुकीपाठोपाठ राज्याच्या विधानसभा निवडणुकीतही वंचित बहुजन आघाडीचा फटका काँग्रेस-एनसीपीच्या आघाडीला बसला आहे. राज्यातील २८८ मतदारसंघापैकी ३२ जागांवर वंचितमुळे काँग्रेस एनसीपीचे उमेदवार पडल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेस-एनसीपीला अपेक्षित यश मिळाले असले तरी ३२ जागांवर काँग्रेस-एनसीपी उमेदवार अगदी थोड्या फरकाने पराभूत झाले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस-एनसीपी सेनेला पाठिंबा देऊ शकतात: पृथ्वीराज चव्हाण
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानुसार मतदाराने भाजप-शिवसेना युतीला कारभारासाठी आणखी ५ वर्षे दिली आहेत. मात्र, भाजपला सत्तेपासून दूर करण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसची एकत्र येण्याची शक्यता राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्रातील एकूण २८८ विधानसभा जागांपैकी भाजपाने १०५ जागा जिंकल्या आहेत. तर मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने ५६ जागा जिंकल्या आहेत. अशा प्रकारे भाजप-शिवसेना युतीला एकूण १६१ जागा मिळाल्या. राष्ट्रवादी कॉंग्रेसने ५४ तर कॉंग्रेसने ४३ जागा जिंकल्या आहेत.
5 वर्षांपूर्वी -
कॉंग्रेस नेते डीके शिवकुमार यांना जामीन मंजूर
लाँडरिंग प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने कॉंग्रेस नेते डीके शिवकुमार यांना जामीन मंजूर केला आहे. २५ लाखांच्या वैयक्तिक बाँडवर जामीन मंजूर झाला आहे. यासह कोर्टाने त्यांना देशाबाहेर जाऊ नका असे निर्देश दिले आहेत. कोर्टाने असेही म्हटले आहे की ते पुराव्यांशी छेडछाड करणार नाहीत आणि साक्षीदारांवर प्रभाव पाडणार नाहीत याची काळजी घ्यावी.
5 वर्षांपूर्वी -
संतापजनक पोस्ट: तुम्ही बलात्कार रोखू शकत नसाल तर किमान त्याचा आनंद घ्या
नशीब हे बलात्कारासारखे असते. तुम्ही त्याला रोखू शकत नाही. तर किमान त्याचा आनंद घ्या’, हे वाक्य कोणा गुन्हागार अथवा बलात्कार प्रकरणातील आरोपीचे नाही तर एका लोकप्रतिनिधीच्या पत्नीचे आहे. केरळमधील काँग्रेसचे खासदार हिबी ईडन यांच्या पत्नीने फेसबुकवर बलात्कारासारख्या घटनेचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. खासदार हिबी ईडन यांची पत्नी अन्ना लिंडा ईडन यांनी मंगळवारी फेसबुकवर एक पोस्ट लिहली. या पोस्टमध्ये त्यांनी नशीबाची तुलना बलात्कारासारख्या घटनेशी केली होती.
5 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादी सोबत असताना काँग्रेसला शत्रूची गरज नाही: काँग्रेस महासचिव राजन भोसले
विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर अनेक संस्थांचे एक्झिट पोल समोर आले आहेत. यातील सर्वच पोल्समध्ये काँग्रेस-एनसीपी’चा विधानसभा निवडणुकीत दारूण पराभव होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हे अंदाज समोर आल्यानंतर काँग्रेस आणि एनसीपीमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे.
5 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र देशात आघाडीवर: मनमोहन सिंग
भारतीय अर्थव्यवस्थेला दिशा दाखवणारी मुंबई व महाराष्ट्र गंभीर आर्थिक संकटात आहे. राज्यातील उद्योजकांमध्ये नैराश्य असून गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात सर्वाधिक कंपन्या बंद पडल्या आहेत. केंद्र व राज्य सरकारची लोकविरोधी धोरणे यास जबाबदार आहेत,’ असा घणाघाती आरोप माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी आज येथे केला.
5 वर्षांपूर्वी -
मागील ५ वर्षांत महाराष्ट्रात सर्वाधिक कंपन्या बंद पडल्या: मनमोहन सिंग
भारतीय अर्थव्यवस्थेला दिशा दाखवणारी मुंबई व महाराष्ट्र गंभीर आर्थिक संकटात आहे. राज्यातील उद्योजकांमध्ये नैराश्य असून गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात सर्वाधिक कंपन्या बंद पडल्या आहेत. केंद्र व राज्य सरकारची लोकविरोधी धोरणे यास जबाबदार आहेत,’ असा घणाघाती आरोप माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी आज येथे केला.
5 वर्षांपूर्वी -
तिहार जेलमध्ये चौकशीनंतर पी चिदंबरम यांना ईडीकडून अटक
माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांना सक्तवसुली संचलनालयाकडून अटक करण्यात आली आहे. ईडीच्या तीन सदस्यांच्या टीमकडून पी चिदंबरम यांची तिहार जेलमध्ये चौकशी करण्यात आली. जवळपास एक तास पी चिदंबरम यांची चौकशी सुरु होती. चौकशीनंतर पी चिदंबरम यांना अटक करण्यात आली. मंगळवारी विशेष न्यायालयाने ईडीला पी चिदंबरम यांची चौकशी तसंच अटकेची परवानगी दिली होती. मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी पी चिदंबरम ५ सप्टेंबरपासून तिहार जेलमध्ये आहेत.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात युतीचे सरकार येण्यास पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळातील कारभार जबाबदार: राज ठाकरे
राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा प्रचार जोरात सुरू आहे. त्यासाठी रोज सभा घेत ते सरकार आणि विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडत आहेत. आज त्यांनी यवतमाळ जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी वणीमध्ये झालेल्या प्रचार सभेत सरकारसह विरोधकांवरही टीका केली. पाच वर्षांपूर्वी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कारभारामुळेच त्यावेळी सत्तेत येण्यासाठी भारतीय जनता पक्ष-शिवसेनेला मदत झाली, असा घणाघाती हल्ला राज ठाकरे यांनी केला. पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळातील कारभाराचा त्यांच्या पक्षालाही काही फायदा झाला नाही, असेही राज ठाकरे म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजे 2 लाख मतांनी पराभूत होणार: पृथ्वीराज चव्हाण
विधानसभा निवडणुकीसोबतच सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठीही मतदान पार पडणार आहे. भाजपाकडून निवडणूक लढविणारे छत्रपती उदयनराजे भोसले पोटनिवडणुकीत 2 लाख मतांनी पराभूत होणार असा दावा काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. मोदी-शहा कोणीही आले तरी उदयनराजेंचा पराभव निश्चित आहे असा टोला पृथ्वीराज चव्हाणांनी लगावला आहे.
5 वर्षांपूर्वी -
देशात श्रीमंत पक्ष भाजप; मात्र आयकर विभागाची धाड काँग्रेस मुख्यालयात?
महाराष्ट्र आणि हरयाणामध्ये विधानसभा निवडणुकांतील प्रचार शिगेला पोहोचत असताना प्राप्तिकर खात्याने छापा घालून काँग्रेस मुख्यालयातील लेखा विभागाला टाळे लावले. एवढेच नव्हे, तर लेखा विभागातील पाच पगारदार कर्मचाऱ्यांच्या घरावर प्राप्तिकर खात्याने छापे घातले असून, सर्व कर्मचाऱ्यांच्या नातेवाइकांचीही चौकशी करण्यात येत आहे. मोदी सरकारने राजकीय सूडभावनेतून केलेली ही अत्यंत निंदनीय कारवाई, अशा शब्दात काँग्रेसने या घटनेचा धिक्कार केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
विधानसभेसाठी आघाडीचा 'शपथनामा' प्रसिद्ध, बेरोजगारांना ५ हजार 'बेरोजगारी भत्ता'
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने आपला शपथनामा अर्थात जाहीरनामा सोमवारी मुंबईत प्रसिद्ध करण्यात आला.या जाहीरनाम्यात शेतकरी, शिक्षण, रोजगार, आणि आरोग्य अशा ठळक मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, खासदार सुप्रिया सुळे, अनिल गोटे, एकनाथ गायकवाड उपस्थित आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी १३१ जागा तर काँग्रेस आणि मित्र १५७ जागा लढणार आहे. लोकसंग्रामचे नेते अनिल गोटे हे आघाडीकडून धुळे मतदारसंघातून रिंगणात उतरले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
माजी खासदार मिलिंद देवरा यांची पावलं भाजपाच्या दिशेने?
काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ह्यूस्टन येथील हाउडी मोदी या कार्यक्रमामधील भाषणाचं कौतुक केलं. या कार्यक्रमात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पदेखील उपस्थित होते. या कार्यक्रमातील मोदींचे भाषण भारताची बौद्धिक आणि सांस्कृतिक ताकद दाखविणारे आहे. मिलिंद देवरांनी केलेल्या या ट्विटमुळे देवरा भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
हर्षवर्धन पाटलांचा भाजपात प्रवेश; इंदापूरमध्ये राष्ट्रवादीशी थेट लढत होणार
काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन हर्षवर्धन पाटील यांनी भाजपात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसबाबत नाराजी व्यक्त केलीच होती. ते भाजपात प्रवेश करतील अशी चर्चा होती. अखेर आज काँग्रेसचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. ते इंदापूर मतदार संघातूनच भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवणार का? हा प्रश्न कायम आहे. मात्र आज त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
भ्रष्टाचार प्रकरण: उद्या कृपाशंकर सिंह यांना गुजरातच्या वॉशिंग पावडरने धुवून भाजपमध्ये घेणार
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकी अगोदर काँग्रेस व राष्ट्रावादीतील दिग्गज नेत्यांचे पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचे सत्र जोरदार सुरू आहे. आज दुपारीच काँग्रेसमध्ये लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रवेश केलेल्या व उत्तर मुंबई मतदारसंघातून पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढवलेल्या उर्मिला मातोंडकर यांनी पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला असताना आता, काँग्रेस नेते कृपाशंकर सिंह यांनी देखील काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
उर्मिला मातोंडकर यांच्या राजीनाम्यानंतर मुंबई काँग्रेसमध्ये जुंपली
काँग्रेस पक्षातल्या अंतर्गत राजकारणाला कंटाळून आपण काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत आहोत असं आजच अभिनेत्री आणि खासदारकीला उभ्या राहिलेल्या उर्मिला मातोंडकर यांनी जाहीर केलं. या राजीनाम्यावरुन आता मिलिंद देवरा आणि संजय निरुपम यांच्यात जुंपली आहे. मिलिंद देवरा यांनी ट्विट करुन उर्मिला मातोंडकर यांनी योग्यच गोष्टी मांडल्या आहेत असं म्हटलं आहे. काँग्रेसचा मुंबई अध्यक्ष म्हणून मी उर्मिला मातोंडकर यांना पूर्ण पाठिंबा दिला होता. त्यांनी उत्तर मुंबईतून निवडणूक लढवली. मात्र त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला.
5 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्री कमलनाथ यांना धक्का, शीखविरोधी दंगलीची फाइल केंद्रीय गृह मंत्रालय उघडणार
माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम, काँग्रेसचे संकटमोचक डी.के. शिवकुमार यांच्यापाठोपाठ काँग्रेसचे आणखी एक बडे नेते आणि मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ अडचणीत येण्याची शक्यता आहे. १९८४मध्ये झालेल्या शीख विरोधी दंगलीची फाइल पुन्हा उघडण्याची तयारी केंद्रीय गृहमंत्रालयाने सुरू केली आहे. ही केस पुन्हा उघड झाल्यास कमलनाथ यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
5 वर्षांपूर्वी -
भाजपमधील विरोधानंतर अब्दुल सत्तारांनी अखेर शिवबंधन बांधलं
काँग्रेसमधून बाहेर पडलेले माजी आमदार अब्दुल सत्तार यांनी अखेर शिवसेनेचा भगवा हाती घेतला आहे. सत्तार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सोमवारी मातोश्री या निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केला. गेल्या काही दिवसांपासून सत्तार भाजपात जाणार असल्याची चर्चा होती. मात्र ऐनवेळी त्यांनी शिवबंधन बांधले.
5 वर्षांपूर्वी -
RBI कडून घेतलेले पैसे केंद्र सरकार कोणत्या योजनांसाठी वापरणार याचं उत्तर मोदींकडे नाही
माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी देशाच्या जीडीपी दरात झालेल्या घसरणीबद्दल मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. मानव निर्मित संकटामुळे भारतीय अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. या सर्व परिस्थितीला मोदी सरकार जबाबदार आहे, अशी टीका माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी केली. भारतातल्या आर्थिक क्षेत्रात आलेल्या मरगळीसाठी त्यांनी मोदी सरकारला जबाबदार ठरवले आहे. ही आर्थिक मंदी मानवनिर्मित असून ढिसाळ व्यवस्थापनामुळे निर्माण झाली आहे, असे ते म्हणाले.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो