महत्वाच्या बातम्या
-
नोटाबंदी, जीएसटी या मानव निर्मित संकटामुळे भारतीय अर्थव्यवस्था डबघाईला: डॉ.मनमोहन सिंग
माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी देशाच्या जीडीपी दरात झालेल्या घसरणीबद्दल मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. मानव निर्मित संकटामुळे भारतीय अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. या सर्व परिस्थितीला मोदी सरकार जबाबदार आहे, अशी टीका माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी केली. भारतातल्या आर्थिक क्षेत्रात आलेल्या मरगळीसाठी त्यांनी मोदी सरकारला जबाबदार ठरवले आहे. ही आर्थिक मंदी मानवनिर्मित असून ढिसाळ व्यवस्थापनामुळे निर्माण झाली आहे, असे ते म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
भाजपा पेक्षा शिवसेना आणि काँग्रेसच्या आमदारांची कामगिरी चांगली: प्रजा फाउंडेशन अहवाल
राज्यभरामध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर राजकीय क्षेत्रासंदर्भात काम करणाऱ्या मुंबईतल्या प्रजा फाउंडेशन मुंबईमधील आमदारांच्या कामाचा लेखाजोखा मांडला आहे. प्रजाने केलेल्या सर्वेक्षणामधून समोर आलेल्या अहवालामध्ये मुंबईतील भारतीय जनता पक्षाच्या आमदारांपेक्षा शिवसेनेच्या आमदारांची कामगिरी सरस असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे पहिल्या ३ आमदारांच्या यादीत भारतीय जनता पक्षाच्या एकाही आमदाराच्या नावाचा समावेश नाही. शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे हे सर्वोत्तम कामगिरी करणारे आमदार असल्याचे प्रजाने आपल्या अहवालात म्हटले आहे. सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या आमदारांच्या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर मुंबादेवी मतदारसंघाचे काँग्रेसचे अमीन अमीर अली पटेल असून तिसऱ्या स्थानी मालाडचे आमदार अस्लम रमझान अली शेख यांचा समावेश प्रजाने आपल्या अहवालात केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
काँग्रेसचे संकटमोचक देखील ईडीच्या कचाट्यात; डी. के. शिवकुमार यांना समन्स जारी
काँग्रेसचे ‘संकटमोचक’ अशी ओळख असलेले डी. के. शिवकुमार यांच्यावरच संकट ओढावले आहे. त्यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) समन्स जारी केले असून चौकशीसाठी बोलविले आहे. त्यामुळे डी. के. शिवकुमार आज दिल्लीतील ईडी कार्यालयात हजर राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, कर्नाटकातील काँग्रेस जेडीएस सरकार पाडताना डी. के. शिवकुमार यांनी भारतीय जनता पक्षातील धुरंदरांचा धूर काढला होता आणि त्यानंतर ते भविष्यात भाजपाला धोका निर्माण करू नये म्हणून आधीच त्यांचा बंदोबस्त करण्यात येत असल्याचं म्हटलं जातं आहे.
5 वर्षांपूर्वी -
काँग्रेसने आम्हाला १४४ जागा आणि मुख्यमंत्रिपद द्यावं: प्रकाश आंबेडकर
राज्यात विधानसभा निवडणुका तोंडावर येवून ठेपल्या आहेत. वेगवेगळ्या पक्षाकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आज अकोल्यात ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषेद घेतली. या पत्रकार परिषेद ते बोलताना म्हणाले, विधानसभा निवडणुकीत १४४ जागा आणि मुख्यमंत्रिपद द्यावे, असा प्रस्ताव वंचित बहूजन आघाडीने काँग्रेसला दिला आहे. निर्णयासाठी वंचितने ऑगस्ट अखेरपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे असे ते म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
ईव्हीएम'विरोधात एल्गार! २१ ऑगस्टला विरोधकांचा मोर्चा
निवडणूक होत असताना पारदर्शकता बाळगली गेलीच पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आहे. त्याचमुळे ईव्हीएमला आमचा विरोध आहे. विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर निवडणूक घेतली गेली पाहिजे अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली. लोकशाहीत हे घडता कामा नये असेही अजित पवार यांनी यावेळी म्हटलं आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सगळ्यांच्या वतीने भूमिका मांडली आणि त्यामध्ये त्यांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित केली. विधानसभा निवडणुकीत EVM नको बॅलेट पेपर आणा अशी मागणी विरोधकांनी एकमुखाने केली आहे. ईव्हीएम विरोधात २१ ऑगस्ट रोजी आम्ही मोर्चा काढणार आहोत. ही जनभावना आहे त्यामुळे या मोर्चात एकाही पक्षाचा झेंडा नसेल. लोकांचं म्हणणं काय आहे? ते आम्ही मांडणार आहोत असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
5 वर्षांपूर्वी -
भाजप-सेनेच्या 'महाजनादेश आणि जण आशीर्वाद' यात्रेला 'शिवस्वराज्य यात्रेने' उत्तर
आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील सत्ता कायम राखण्यासाठी भारतीय जनता पक्षाने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. एकीकडे इतर पक्षांमधील नेत्यांना पक्षामध्ये प्रवेश देण्यात येत असतानाच थेट मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी भारतीय जनता पक्षाने महाजनादेश यात्रेची घोषणा केली आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या या महाजनादेश यात्रेला एनसीपी’च्या माध्यमातून प्रत्युत्तर देणार असून, खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली येत्या 6 ऑगस्टपासून या शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात होणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
काँग्रेस-राष्ट्रवादीला पक्ष टिकवायचा असल्याने आरोप: गिरीश महाजन
मागील काही दिवसांपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील लोकांचे भारतीय जनता पक्षातील आणि शिवसेनेतील प्रवेश हा सत्तेचा गैरवापर करत, प्राप्तिकर विभाग आणि ईडीच्या मार्फत दबाव टाकून करून घेतले जात आहेत असे आरोप धक्कादायक आरोप विरोधकांनी केले आहेत. काही दिवसांपूर्वीच कागलच्या राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरी आयकर विभागाने अचानक धाडी घातल्या होत्या.
5 वर्षांपूर्वी -
एकनाथ गायकवाड मुंबई कांग्रेसचे नवे कार्याध्यक्ष
मिलिंद देवरा यांच्या राजीनाम्यानंतर गेले काही दिवस अधांतरी असलेल्या मुंबई काँग्रेस अध्यक्षपदावर अखेर तोडगा निघाला आहे. मिलिंद देवरांचा राजीनामा मंजूर न करता ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार एकनाथ गायकवाड यांची मुंबई काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गायकवाड हे मुंबई काँग्रेसचा दलित चेहरा म्हणून ओळखले जातात. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दलित आणि मराठी माणसाची नियुक्ती करून काँग्रेसने नवा डाव खेळलाय. एकनाथ गायकवाड हे उद्या २८ जुलैला सकाळी ११ वाजता.
5 वर्षांपूर्वी -
लवकरच भाजपमधून लोकं काँग्रेसमध्ये येतील: बाळासाहेब थोरात
गोवा, कर्नाटक या राज्यांमध्ये जे काही घडलं आहे ते लक्षात घेता भाजपला सत्तेची हाव सुटली असल्याची टीका काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. अन्य पक्षांतून लोक भाजपमध्ये जात आहेत. मात्र, लवकरच भाजपामधूनही लोक काँग्रेसमध्ये येतील, अशी भविष्यवाणी थोरात यांनी केली. विरोधी पक्षनेते पद सांभाळणारे एकनाथ खडसे यांना भाजपने योग्य तो सन्मान दिला नाही. त्यांच्यासारखे अनेक जण भाजपमध्ये दुःखी आहेत. लवकरच ते आमच्याकडे येतील. दोन महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. लोकसभेनंतर ही निवडणूक काँग्रेससाठी महत्त्वाची आहे, असं थोरात यांनी म्हटलं.
5 वर्षांपूर्वी -
दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी निधन
कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले आहे. शीला दीक्षित यांच्या जाण्याने दिल्लीच्या राजकारणात कॉंगेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. कारण शीला दीक्षित या कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि प्रशासन हाताळणाऱ्या हुशार नेत्या होत्या. तसेच त्यांनी कॉंग्रेस पक्षाकडून पंधरा वर्ष दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती.
6 वर्षांपूर्वी -
विरोधक मनसेलाचं नाही, तर डोनाल्ड ट्रम्प यांना देखील सोबत घेतील: संजय राऊत
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जसजशा जवळ येत आहेत तशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टोलेबाजी सुरु झाली आहे. राज्यातील राजकीय वर्तुळात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहत आहे. सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची जय्यत तयारी सुरु केली आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला पायउतार करण्यासाठी कॉंग्रेसकडून इतर पक्षांसोबत आघाडी करण्यासाठी हालचाल केली जात आहे. यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्याने कॉंग्रेस आघाडीत महाराष्ट्र नवनिर्माण सेने सहभागी होणार असल्याची जोरदार चर्चा आहे.
6 वर्षांपूर्वी -
जागा वाटपावरून आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता?
दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काल काँग्रेस आणि एनसीपी दरम्यान बैठक पार पडली. या बैठकीत एकूण जागा वाटपा विषयी सविस्तर चर्चा झाली. दरम्यान यावेळी एनसीपीने विधानसभेसाठी एकूण जागांपैकी निम्म्या जागांची मागणी काँग्रेसकडे केली आहे. त्यामुळे आघाडीत बोलणी प्राथमिक स्तरावर असतानाच पुन्हा बिघाडी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
6 वर्षांपूर्वी -
कुमारस्वामींना धक्का, बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यावर निर्णय घेण्याचा सुप्रीम कोर्टाचा आदेश
कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएसच्या एकूण १५ बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यावर निर्णय घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत. त्यामुळे सत्ता संघर्षाच्या नाट्यामध्ये मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना जोरदार राजकीय धक्का बसणार असल्याचे सध्या तरी दिसत आहे. दरम्यान बंडखोर आमदारांचे राजीनामे मंजूर झाल्यास कुमारस्वामी यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागेल हे निश्चित आहे.
6 वर्षांपूर्वी -
मराठी भाषा भवनाच्या प्रश्नावर शिवसेना गप्प का : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका २ महिन्यांवर आल्या आहेत. त्याच अनुषंगाने राज्यातील विरोधी पक्षांनी विविध मुद्द्यांवरून राज्य सरकारवर धारेवर धरण्यास सुरुवात केली आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मराठी भाषा भवनाच्या प्रश्नावरून सत्ताधारी शिवसेनेवर सडकून टीका केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
आमदार खरेदी-विक्री लवकरच मध्य प्रदेशात देखील होणार? लोकशाही विकत घेतली जाते आहे?
मतदाराने एखाद्या अमुक पक्षाला मतदान केले आणि निवडून आलेल्या आमदाराने स्वतःच विकून एकप्रकारे मतदाराच्या मताला विकून स्वतःच्या खिशात बक्कळ पैसा कोंबणे असाच होतो. एकीकडे भाजपने पैशाच्या बळावर लोकशाहीचे धिंडवडे काढण्याचा सपाटाच लावला असून काँग्रेस देखील हतबल असल्याचं पाहायला मिळत आहे. मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री कमलनाथ कर्नाटक राज्यात दाखल होताच, मध्य प्रदेशात आर्थिक बळावर हालचाली सुरु झाल्याचं म्हंटल जात आहे.
6 वर्षांपूर्वी -
विधानसभा निवडणुकीत वंचित व मनसेला सोबत घेणार: बाळासाहेब थोरात
लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर काँग्रेसमध्ये मोठी उलथापालथ झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र त्यानंतर थेट राहुल गांधींपासून अनेकांनी स्वतःच्या पदाचे एकावर एक असे राजीनामा सत्र सुरु केले. त्यानंतर महाराष्ट्रात देखील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था दयनीय झाल्याने आणि पक्षाचा केवळ एकच खासदार निवडून आला जो आयत्यावेळी शिवसेनेतून आयात करण्यात आला होता.
6 वर्षांपूर्वी -
आकृती बिल्डरसंबंधित SRA प्रकल्पबाधितांनी घेतली माजी आ. सुरेश शेट्टी यांची भेट; गृहनिर्माण मंत्र्यांची देखील भेट घेणार
अंधेरी पूर्व येथील एमआयडीसी येथील गणेशपाडा आणि जोगेश्वरी येथील हरीनगर भागातील SRA प्रकल्पबाधितांनी माजी आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांची भेट घेतली. सदर प्रकल्प आकृती बिल्डरशी संबंधित असून अनेक पात्रं रहिवाश्यांना त्यांचे भाडे तसेच घरांचा ताबा मागील काही वर्षांपासून अजून मिळालेलं नाही. त्यात संपर्क साधणाऱ्या प्रकल्पबाधितांना आकृती बिल्डरकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
लोकसभा निवडणुकीपूर्वी मतभिन्नता होती, पण आता मत परिवर्तन झाले आहे: अशोक चव्हाण
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला पराभूत करण्यासाठी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आघाडीत सहभागी करून घेण्याबाबत काँग्रेस पक्ष सध्या अनुकूल असल्याचे संकेत काँग्रेसचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना दिले आहेत. चव्हाण नागपुरात सोमवारी एका विवाह सोहळ्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी हे ही प्रतिक्रिया नोंदवली.
6 वर्षांपूर्वी -
ईव्हीएम मुद्यावरून राज ठाकरे आणि सोनिया गांधींची भेट; आंदोलन पेटणार?
नवी दिल्लीच्या दौऱ्यावर असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोनिया गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. लवकरच महाराष्ट्रात पुढच्या दोन महिन्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी सोनिया गांधींची घेतलेली भेट खूप महत्वपूर्ण समजली जाते. दोन्ही नेत्यांमध्ये कार् सविस्तर चर्चा झाली ते समजू शकलेले नसलं तरी ईव्हीएम हा चर्चेचा मुख्य मुद्दा होता असं म्हटलं जात आहे. लोकसभा निवडणुकीच्यावेळीही राज ठाकरेंनी मोदी-शाहंविरोधात जोरदार प्रचार करत अप्रत्यक्षपणे काँग्रेस-एनसीपीच्या आघाडीला साथ दिली होती. त्यावेळी मनसेने लोकसभेची निवडणूक लढवली नव्हती.
6 वर्षांपूर्वी -
मिलिंद देवरा यांचा मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा
मुंबई काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे वृत आहे. दरम्यान सदर राजीनामा देताना त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत मुंबई शहर युनिटचे निरीक्षण करण्यासाठी दिल्लीतील 3 वरिष्ठ नेत्यांच्या सामूहिक नेतृत्वाची तात्पुरती स्थापना करण्याची शिफारस देखील राजीनामा देण्यापूर्वी केली आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो