महत्वाच्या बातम्या
-
कर्नाटकात लवकरच राजकीय भूकंप? काँग्रेसचे व जेडीएस'चे ११ आमदार फुटणार
कर्नाटकात लवकरच मोठा राजकीय भूकंप होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. कारण काँग्रेसचे एकूण ८ तर जेडीएसचे ३ असे मिळून तब्बल ११ आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. एकूण संख्याबळानुसार जर १२ आमदारांनी राजीनामे सोपवले तर विद्यमान सरकार अल्पमतात येऊ शकते. मागील वर्षी कर्नाटक विधानसभेची निवडणूक पार पडली, तेव्हा पासून कर्नाटकातील भाजपचे धुरंदर सरकार पाडण्यासाठी जोरदार प्रयत्न करत होते, मात्र लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या बहुमतानंतर या हालचालींनी पुन्हा जोर धरला होता.
5 वर्षांपूर्वी -
विधानसभा २०१९: जिंकण्या हरण्यापेक्षा काँग्रेसची मूळं नष्ट करण्याची रणनीती? सविस्तर
देशातील निवडणूक असो किंवा राज्यातील काँग्रेसचा मूळ पारंपरिक मतदार हा मुस्मिल आणि बहुजन समाज हाच राहिला आहे. मराठा आरक्षण देऊन राष्ट्रवादीला संकटात टाकलंच आहे, मात्र सध्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसचं मूळंच नष्ट करण्याची शिस्तबद्ध योजना आखण्यात आली आहे. लोकसभेत भले प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला काहीच हाती लागलं नसेल, मात्र काँग्रेसला लोकसभेत भुईसपाट करण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आणि त्यात जवळपास काँग्रेसच्या एकूण ८ मतदारसंघाचा समावेश होता. औरंगाबादची जागा जरी एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी जिंकली असली तरी त्यात बहुजन समाजाचा वाटा फार कमी असून, तिथली इतर राजकीय गणितं त्याला कारणीभूत ठरली आहेत.
5 वर्षांपूर्वी -
स्वाभिमानी शेतकरी संघटना विधानसभेत एकूण ४९ जागा लढवणार: राजू शेट्टी
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आता राज्यातील सर्वच लहान मोठे पक्ष कामाला लागले आहेत. काँग्रेस-एनसीपीच्या जागावाटपाची अजून बोलणी झाली नसताना इतर लहान सहकारी पक्षांनी त्यांनी किती जागा लढवायच्या ते निश्चित करण्यासाठी बैठकांचा सपाटा लावला आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेत देखी काँग्रेस आघाडीला फक्त खेळवत बसण्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडीने घेतल्याचे प्रथम दर्शनी तरी दिसत आहे. तुम्ही आम्हाला किती जागा द्याव्यात यापेक्षा आम्हीच काँग्रेसला ४० जागा सोडतो असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसची खिल्ली उडवली आहे.
5 वर्षांपूर्वी -
विधानसभा: वंचित आघाडीची कॉंग्रेसकडे ५० जागांसाठी मागणी; परंतु कॉंग्रेस देणार ३० जागा
लोकसभा निवडणुकीत देशभर दारुण पराभवाला सामोरे जावे लागल्याने राज्यातील कॉंग्रेस आघाडीने राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कोणताही धोका न पत्करण्याचं धोरण अवलंबलं आहे आणि त्यासाठीच काँग्रेसकडून समविचारी पक्षांसोबत मोर्चेबांधणी सुरु झाली आहेत. दरम्यान याच अनुषंगाने काल कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील नेत्यांची बैठक बोलावली होती. यावेळी बैठकीत राहुल गांधी यांनी कॉंग्रेस आघाडीला सोबत वंचित आघाडीला देखील सामील करा, असा आदेश राज्यातील नेत्यांना दिला आहे. सदर विषयावर सखोल चर्चा झाल्यावर काँग्रेसकडून वंचित बहुजन आघाडीला एकूण २५ जागा देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षणाच्या जल्लोषात 'मुका मोर्चा' म्हणून खिल्ली उडवणारे सामील का? : सचिन सावंत
संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या मराठा आरक्षणावर मुंबई हायकोर्टाने काल निर्णय दिला आहे. कोर्टाच्या या निर्णयावर विधान भवनात भारतीय जनता पक्ष आणि सेनेच्याचं आमदारांनी नव्हे तर विरोधी पक्षांनी देखील जल्लोष केल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी शिवसेनेवर जुन्या आठवणींना उजाळा देत जोरदार निशाणा साधला. यात त्यांनी सामना दैनिकातून ‘मुका मोर्चा’ म्हणणारे देखील सामील का? असा प्रश्न सचिन सावंत यांनी केला.
5 वर्षांपूर्वी -
ईव्हीएमला विरोध करत बॅलेट पेपरने निवडणुका घेण्यासाठी तृणमूलच्या खासदारांची निदर्शनं
काल बसपाच्या सर्वेसेवा मायावती यांनी इव्हीएमवर संशय व्यक्त करत अनेक प्रश्न उपस्थित केले होते. दरम्यान, यावेळी मायावतींनी लोकसभा निवडणुकीतील अनेक गैरप्रकारांवर प्रकाश टाकला होता. तसेच जगातील प्रगत देश देखील बॅलेट पेपरने निवडणुका घेत असताना आणि भारतात सर्वच विरोधी पक्षांचा इव्हीएमला विरोध असताना केवळ भाजप आणि निवडणूक आयोगच त्याच समर्थन करत आहे, असं मायावतींनी अधोरेखित करत वेगळाच संशय व्यक्त केला.
5 वर्षांपूर्वी -
काँग्रेसचं पानिपत झालं म्हणून आमच्याबरोबर बसायला तयार आहात का? प्रकाश आंबेडकर
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस पक्षाचं देशभर पानिपत झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर हाती आलेल्या आकडेवारीनंतर काँग्रेसच्या अनेक जागा बहुजन वंचित आघाडीच्या उमेदवारामुळे पडलायचं दिसलं आणि काँग्रेसने प्रकाश आंबेडकरांसोबत जुळवून घेण्याच्या गोष्टी करण्यास सुरुवात केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे काँग्रेसचं पानिपत झालं आहे म्हणून आमच्याबरोबर बसायला तयार आहात का?, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
अशोक गेहलोत काॅंग्रेसचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष होणार?
लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवाची जबाबदारी स्विकारत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आणि आज देखील ते त्यांच्या राजीनाम्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे वृत्त आहे. दरम्यान काँग्रेसला आता गांधी घराण्याव्यतिरिक्त नवा अध्यक्ष मिळणार असून राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचं नाव काँग्रेसच्या नव्या अध्यक्षपदासाठी निश्चित झाल्याची माहिती समोर येत आहे.
6 वर्षांपूर्वी -
काँग्रेसमुक्तीच्या नावाखाली भाजप-सेनाच काँग्रेस-राष्ट्रवादीयुक्त होत आहे?
काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून आयात केलेल्या २ नेत्यांना फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे. काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षात गेलेल्या जुने कट्टर काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटलांना सर्वप्रथम मंत्रिपदाची शपथ घेण्याची संधी देण्यात आली तर एनसीपीतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या जयदत्त क्षीरसागर यांनी विखेंनंतर शपथ घेतली. भाजप-सेनाच काँग्रेस-राष्ट्र्वादीयुक्त होत आहे का अशी जोरदार चर्चा रंगली आहे.
6 वर्षांपूर्वी -
डॉ. मनमोहन सिंग यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात
अर्थशास्त्राचे जागतिक विद्वान, भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर, मृदूसालस आणि सुसंस्कृत पंतप्रधान म्हणून ज्यांनी भारताचे १० वर्ष नेतृत्व केले त्या डॉ. मनमोहन सिंग यांची राजकीय कारकीर्द भविष्यात राजकीय गणित जुळण्याची आशा मावळल्याने संपुष्टात आली आहे. त्यांच्या राज्यसभा खासदारकीच्या कार्यकाळाचा आजचा शेवटचा दिवस होता. पुढील महिन्यात होणार्या राज्यसभेच्या निवडणुकीत डॉ. मनमोहन सिंग हे आसाममधून निवडून येऊ शकत नाहीत. तर तामिळनाडूच्या डीएमके पक्षाने त्यांना पाठिंबा द्यायला नकार दिला आहे.
6 वर्षांपूर्वी -
काँग्रेसमध्ये हंगामी अध्यक्ष निवडीच्या हालचाली?
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राजीनामा देणार आणि तो स्वीकारला जाणार का हे अजून निश्चित झालेले नसताना आता काँग्रेसमध्ये हंगामी अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरु झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान विद्यमान अध्यक्ष राहुल गांधी जर काँग्रेस अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर ठाम राहिले तर काँग्रेसमध्ये या हालचालींना जोर येईल असं वृत्त आहे. तसेच त्यांनी निर्णय बदलला नाही तर अशावेळी पक्षाकडून दुसऱ्या पर्यायाचा विचार करण्यात येत आहे. गांधी कुटुंबीयाकडे अध्यक्षपद नको या परिस्थितीत पक्षाकडून हंगामी अध्यक्ष बनविण्याचा विचार सुरु करण्यात आला आहे.
6 वर्षांपूर्वी -
ते स्वतःच निवडून येण्याची शास्वती नाही; त्यांच्या भरोसे स्वबळावर ही राजकीय आत्महत्या?
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रापासून ते संपूर्ण देशभर सपाटून मार खाल्ल्यानंतर राज्यातील काँग्रेसमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी जोरदार बैठका सुरु आहेत. त्यात आगामी विधानसभा निवडणुक राष्ट्रवादीला वगळून स्वबळावर किंवा वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊन लढवावी अशी मागणी पुढे आली आहे. मात्र काँग्रेसकडे आजच्या घडीला राज्य पातळीवरील चेहराच शिल्लक नसल्याने ते असं धाडस नेमकं कोणत्या आधारावर करत आहेत ते समजायला मार्ग नाही.
6 वर्षांपूर्वी -
विधानसभेपूर्वी काँग्रेसचे आमदार फोडण्यासाठी फडणवीसांकडून फोन: अशोक चव्हाण
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काँग्रेसच्या आमदारांना फोन करून भाजपात प्रवेश करण्याच्या ऑफर्स देत आहेत असा आरोप काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस हे सतत आमच्या आमदारांना फोन करत आहेत. त्यासोबतच भाजप मधले काही नेते देखील काँग्रेसच्या काही आमदारांना गळाला लावण्यासाठी प्रयत्न करत आहेत असा गंभीर आरोप अशोक चव्हाणांनी केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
अब्दुल सत्तार भाजपात आल्यास औरंगाबाद भाजपमध्ये मोठी फूट पडण्याची शक्यता
काँग्रेसचे सिल्लोडमधील बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांना पक्षात घेण्यास भारतीय जनता पक्षात प्रवेश देण्यावरून जोरदार विरोध होत आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या तीव्र विरोधामुळे आमदार अब्दुल सत्तार यांच्या भारतीय जनता पक्षातील प्रवेशाच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ पातळीवरुन अब्दुल सत्तार यांच्या पक्षप्रवेशाबाबत हस्तक्षेप होण्याची शक्यता असून स्थानिक नेते मंडळी नक्की काय निर्णय होतो त्यावर बारीक लक्ष ठेवून असल्याचं वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
तेलंगणा राज्य काँग्रेसमुक्तीच्या दिशेने; १९ पैकी १२ आमदारांचा गट टीआरएसमध्ये विलिन
लोकसभा निवडणुकीत देशभर मानहानीकारक पराभव पत्करावा लागल्याचा परिणाम आता इतर राज्यांत दिसू लागला आहे. काँग्रेसच्या विद्यमान आमदारांना पक्षात राहणे देखील धोक्याचे वाटू लागले असून सत्ताधारी पक्षामध्ये जाण्यासाठी स्पर्धा सूर झाली आहे. सत्तेत असलेल्या चंद्रशेखर राव यांच्या पक्षात काँग्रेस विधीमंडळ पक्ष विलिन करण्याचे पत्रच १२ आमदारांनी दिले आहे.
6 वर्षांपूर्वी -
भ्रष्टाचाराचे आरोपा असलेले कृपाशंकर सिंह यांना भाजपात पावन करून घेण्याच्या हालचाली
महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने पुन्हा दलबद्दल सुरु होण्याची शक्यता आहे. त्यात सर्वाधिक भरणा हा भाजपला देण्यात येईल असं म्हटलं जातं आहे. मात्र यामध्ये इतर पक्षातील भ्रष्टाचाराचे आरोप आणि चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले नेतेमंडळी अधिक असतील असं म्हटलं जात आहे. भाजप कितीही म्हणत असेल की आम्ही भ्रष्टाचाराला थारा देत नाही, पण वास्तविक इतर पक्षातील असेच भ्रष्ट नेते भाजपमध्ये आणून त्यांना पावन करून घेण्याची सुरुवात होणार असल्याची चिन्ह दिसू लागली आहेत.
6 वर्षांपूर्वी -
काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या कृष्णकुंजवर भेटीगाठी सुरु
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्वतः शरद पवार प्रयत्नशील असताना काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांनी त्याला तीव्र विरोध केला होता. परंतु, लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव पत्करावा लागल्यावर काँग्रेसच्या नेत्यांनी थेट कृष्णकुंज गाठायला सुरुवात केली आहे. राज्याचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि गृह राज्यमंत्री माणिकराव ठाकरे यांनी आज राज ठाकरेंची निवासस्थानी भेट घेतली.
6 वर्षांपूर्वी -
आज राष्ट्रवादी-कॉंग्रेसची मुंबईत आढावा बैठक; तत्पूर्वी राजू शेट्टीं व राज ठाकरे यांची भेट
लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची आज मंगळवारी मंथन बैठक आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे विरोधीनेते धनंजय मुंडे यांच्या घरी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला कॉँग्रेसचे नेते अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टींसह इतर नेतेही उपस्थित राहणार आहेत.
6 वर्षांपूर्वी -
काँग्रेसच्या बैठकीत राहुल गांधींचा राजीनामा एकमताने फेटाळला
लोकसभा निवडणुकीत मानहानीकारक पराभव झाल्यानंतर दिल्लीत आज काँग्रेस पक्षाच्या कार्यकारणीची बैठक पार पडली. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी बैठकीत अध्यक्षपदाच्या राजीनाम्याचा प्रस्ताव सर्वांसमोर ठेवला. परंतु कार्यकारणी एकमताने राहुल गांधी यांनी राजीनामा देऊ नये असा सल्ला दिला. तब्बल साडेतीन तास चाललेल्या या बैठकीत पराभवावर जोरदार चिंतन करण्यात आलं. या बैठकीत राहुल गांधी यांचा राजीनामा कार्यकारणी समितीच्या सदस्यांनी एकमताने फेटाळला असल्याची माहिती काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत दिली.
6 वर्षांपूर्वी -
सेनेचे सर्व मंत्री बिनकामाचे असा आरोप करणाऱ्या सेना आमदाराने राज्य काँग्रेसमुक्त होऊ दिलं नाही
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आघाडीची पुरती धूळदाण झाली आहे. राष्ट्रवादीने ५ तरी जागा जिंकल्या आहेत, मात्र काँग्रेस पक्ष केवळ एका जागेवर शिल्लक राहिला आहे आणि ती जागा आहे चंद्रपूरची जिथे भाजपचे हंसराज अहिर पराभूत झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र काँग्रेसमुक्त होण्यापासून थोडक्यात वाचला आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | गुंतवणुकीचा जबरदस्त फॉर्मुला, झपाट्याने पैसा वाढवा, करोडमध्ये मिळेल परतावा, फायदा घ्या - Marathi News