महत्वाच्या बातम्या
-
फेसबुकने काँग्रेस संबंधित तब्बल ६८७ पेज, अकाऊंट्स डिलीट केले
आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर फेसबुकने कॉंग्रेस पक्षाला जोरदार डिजिटल धक्का दिला आहे. फेसबूकने काँग्रेसच्या आयटी सेलशी संबंधित असलेली तब्बल ६८७ पेज आणि अकाऊंट्स डिलीट केली आहेत. त्यांच्या माहितीनुसार आक्षेपार्ह भाषेचा वापर असलेल्या तसेच निलंबित करण्यात आलेली सुमारे ६८७ फेसबूक पेजेस आणि अकाऊंट्स फेसबूकने हटवली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
राहुल गांधी दोन मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे दोन मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे निश्चित झाले आहे. युपीतील पारंपारिक अमेठी मतदारसंघातून त्यांचे नाव यापूर्वीच जाहीर झाले आहे. तसेच आता ते केरळच्या वायनाड मतदारसंघातूनही निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेसकडून आज पत्रकार परिषद घेऊन ही अधिकृत माहिती प्रसार माध्यमांना देण्यात आली.
6 वर्षांपूर्वी -
…तर नीती आयोग बरखास्त करणार: राहुल गांधी
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोठी घोषणा केली आहे. सत्तेत परतल्यास नीती आयोग बरखास्त करण्यात येईल, अशी घोषणा राहुल यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे. नीती आयोगाने मोदी सरकारचे मार्केटिंग आणि आकड्यांमध्ये फेरफार करण्याशिवाय काहीही काम केलेले नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
२५ कोटी लोकांना दारिद्र्य रेषेबाहेर काढणार : राहुल गांधी
कॉंग्रेस सत्तेवर आल्यास देशातील जनतेला न्याय देईल, असे म्हणत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन त्यांची न्याय योजना जाहीर केली. या योजनेअंतर्गत वीस टक्के गरीब कुटुंबांना वर्षाला ७२,००० रुपये देणार, असे ते म्हणाले. पाच कोटी कुटुंबातील २५ कोटी लोकांना या योजनेचा फायदा होईल, आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या वर्गाला आर्थिक आधार मिळेल.
6 वर्षांपूर्वी -
पहिला टप्पा; उमेदवारी अर्ज भरण्याची घाई आणि शक्तीप्रदर्शन
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी निवडणूक अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. दरम्यान, आजच्या पहिल्या टप्प्यात राज्यात नागपूर, वर्धा, भंडारा, रामटेक, गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळमध्ये ११ एप्रिलला मतदान होणार असल्याने उमेदवारी अर्ज भरण्याची घाई दिसून येत आहे. काही वेळापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी नितीन गडकरी यांच्यासह स्वतः मुख्यमंत्रीही अर्ज भरताना उपस्थित असणार असल्याचे समजते.
6 वर्षांपूर्वी -
यांचं सगळंच अवघड झालं राव! अशोक चव्हाणही राजीनाम्याच्या तयारीत?
लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यावरून काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. खुद्द काँग्रेसनेतेअशोक चव्हाण यांनीच आपण प्रदेशाअध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे कार्यकर्त्याशी बोलताना म्हटले. या संदर्भातील एक ऑडियो क्लीप सध्या व्हायरल झाली असून त्यात ते राजीनामा देण्याच्या तयारीत सांगत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
देशातील मोबाईल क्रांतीचे जनक विचारतात, 'बालाकोटमध्ये खरंच ३०० दहशतवादी मारले का?'
पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात घुसून बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या तळांवर केलेल्या हवाई हल्ल्यावर सॅम पित्रोदा यांनी प्रश्न उपस्थित केले आहे. सॅम पित्रोदा हे गांधी घराण्याचे निकटवर्तीय असले तरी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना २०११ साली गुजरातमध्ये आयोजित करण्यात आलेल्या व्हायब्रण्ट गुजरात समिट वेळी त्यांना विशेष निमंत्रण देण्यात आलं होतं. विशेष म्हणजे सॅम पित्रोदा हे भारतातील मोबाईल क्रांतीचे जनक म्हणून परिचित आहेत आणि राजीव गांधी पंतप्रधान असताना टेलिकॉम क्रांती झाली त्यात त्यांची मोलाची भूमिका होती.
6 वर्षांपूर्वी -
आधी संजय निरुपम यांच्या तिकिटाचं काय ते ठरवा: मिलिंद देवरा
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या लोकसभा तिकिटाचं काय ते ठरवा, अशी आग्रही भूमिका माजी केंद्रीय राज्यमंत्री
6 वर्षांपूर्वी
मिलिंद देवरा यांनी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठीकडे केल्याचे वृत्त आहे. मागील ४ दिवसांपासून मिलिंद देवरा यांनी प्रचार प्रचार थांबवून दिल्लीत तळ ठोकला आहे. काँग्रेस पार्टीने मिलिंद देवरा यांना दक्षिण मुंबईतून तिकीट दिले आहे. परंतु, मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या तिकिटाचा आधी काय तो फैसला करा अशी भूमिका त्यांनी दिल्लीत घेतल्याचे वृत्त आहे. -
सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा: सनातन समर्थकाच्या उमेदवारामुळे धर्मनिरपेक्ष काँग्रेस अडचणीत
काँग्रेस हा धर्मनिरपेक्ष आणि कट्टर हिंदुत्ववादविरोधी पक्ष म्हणून ओळखला जातो. मात्र काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी- लोकसभा मतदारसंघातून सनातन समर्थक नवीनचंद्र बांदिवडेकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
6 वर्षांपूर्वी -
सोशल मीडिया स्ट्रॅटेजिसाठी काँग्रेसकडून देशातील ३ मोठ्या एजन्सीची नेमणूक
लोकसभा निवडणुका घोषित झाल्यावर सर्वच पक्ष प्रचार योजना आणि उमेदवारांच्या निवडीत दंग झाले आहेत. या लोकसभा निवडणुकीत समाज माध्यमांचा प्रभावी, नियोजनबद्ध तसेच भाजपाला तगडं आव्हान देण्यासाठी देशातील ३ मोठ्या एजन्सींना नेमले आहे. त्यामध्ये डिझाईनबाक्सड, निकसन आणि सिल्वरपुष या बड्या नावांचा समावेश आहे.
6 वर्षांपूर्वी -
मोदीजी लोकांना मूर्ख समजणे बंद करा: प्रियंका गांधी
काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पलटवार केला आहे. आम्ही कोणाला घाबरत नाही आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला मूर्ख समजणे बंद करावे, मागील ५ वर्षांमध्ये मोदी सरकारने भारतातील घटनात्मक संस्थांवर हल्ला केला, असे प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे.
6 वर्षांपूर्वी -
काँग्रेसच्या तिसऱ्या यादीत महाराष्ट्रातील ७ उमेदवार जाहीर
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवारांची यादी मंगळवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आली. या यादीत यात महाराष्ट्रातील एकूण ७ उमेदवारांचा समावेश आहे. दक्षिण मध्य मुंबईत एकनाथ गायकवाड तर यवतमाळमधून माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंना संधी देण्यात आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
प्रयागराज येथे प्रियांका गांधींकडून हनुमान मंदिरात पूजन, गंगा यात्रेला सुरुवात
लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. दरम्यान, कुंभ मेळ्यात भाजपचच्या देशभरातील नेत्यांनी आणि स्वतः मोदींनी गंगा स्नान केले होते. त्यानंतर उत्तर प्रदेशात महत्वाची जवाबदारी देण्यात आलेल्या प्रियांका गांधी यांनी देखील आज गंगा दर्शनाला आल्या आहेत.
6 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंचं ठरलं, या दिवशी होणार लोकसभेचा निर्णय जाहीर
मुंबई : भारतात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत आणि त्या बरोबर सर्वच पक्षांची लगबग सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने तर आपल्या उमेदवारांच्या २ याद्या जाहीर देखील केल्या. परंतु १३ व्या वर्धापनदिनी राज ठाकरे मनसेचा लोकसभेबाबतचा निर्णय जाहीर करतील याची सगळ्यांनाच उत्सुकता होती. त्यात राज ठाकरे आघाडी सोबत जाणार कि स्वबळावर लढणार अशा चर्चांना उधाण आलं होतं. परंतु मनसेला अपेक्षित असलेल्या ईशान्य मुंबई आणि कल्याणच्या जागेवर राष्ट्रवादीने आपले उमेदवार घोषित केले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
मोदींच्या गुजरातमध्ये काँग्रेसच्या सभेला मोठा जनसागर लोटला
मोदींच्या गुजरातमध्ये काँग्रेसच्या सभेला मोठा जनसागर लोटला
6 वर्षांपूर्वी -
प्रियंका गांधींच पहिलं ट्वीट; ‘हा’ दिला संदेश
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमधून मंगळवारी कार्यकारिणीची बैठक व जाहीर सभा घेऊन काँग्रेसने लोकसभा निवडणुकांचे जोरदार रणशिंग फुंकले. काँग्रेसच्या गुजरातमधील जाहीर सभेला बऱ्याच वर्षांनी इतकी प्रचंड गर्दी झाली होती. गुजरातमधील जाहीर सभेनंतर प्रियंका गांधी यांनी पहिलं ट्वीट केलं आहे. प्रियंका गांधी यांनी फेब्रुवारी २०१९ मध्येच ट्विटर अकाऊंट सुरू केलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
लोकसभेला तब्बल ५० हजार कोटी उधळले जाणार, तर समाज माध्यमांवर ५,००० कोटी
जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशात २ महिने ७ टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणूक पार पडतील हे निश्चित झाले आहे. दिल्लीतील सेंटर फॉर मीडिया स्टडीजच्या (CMS) अहवालानुसार भारतातील ही निवडणूक प्रक्रिया जगातील सर्वात खर्चिक निवडणूक ठरणार आहे. भारतातील निवडणुकीवर यंदा तब्बल ५० हजार कोटी रुपये (७ अब्ज डॉलर) इतका प्रचंड खर्च होण्याची शक्यता असून अमेरिकेतील निवडणुकीवर २०१६ साली ६.५ अब्ज डॉलर खर्च झाले होते. तर भारतात २०१४ साली निवडणुकीवर पाच अब्ज डॉलर खर्च झाले होते.
6 वर्षांपूर्वी -
मुलाच्या भाजप उमेदवारीमुळे विखे-पाटील विरोधी पक्षनेतेपद सोडणार?
नगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्यास तयार नसल्याने तिढा वाढत असताना, आता काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील मुलगा सुजय यांच्या उमेदवारीवरून विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. दिल्लीत काँग्रेस श्रेष्ठींच्या दरबारातील बैठकीचा काहीही उपयोग न झाल्याने आता अंतर्मनाचा आवाज ऐकूनच पुढचा निर्णय घ्यावा लागेल, असे हताश उद्गार विखे-पाटील यांनी माध्यमांशी बोलताना काढले.
6 वर्षांपूर्वी -
पुलवामा हल्ला मोदी व इम्रान खान यांच्यामधील पूर्वनियोजित मॅच फिक्सिंग: काँग्रेस नेते बी. के. हरिप्रसाद
जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला हा देशाच्या लष्करावर झालेला सर्वात मोठा हल्ला होता. पाकिस्तानातील जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जवाबदारी स्वीकारली होती. त्याला भारताने हवाई हल्ला करून चोख प्रत्युत्तर देखील दिलं. परंतु, सदर प्रकरणी काँग्रेस नेत्याने एक धक्कादायक आरोप केला आहे. पुलवामा हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पूर्वनियोजित पणे फिक्स केला होता, असा हा आरोप केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
रॉबर्ट वढेरा मुरादाबादमधून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात? पोस्टरबाजी
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे मेहुणे आणि प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वढेरा हे आगामी लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. इतकंच नाही तर येत्या लोकसभा निवडणुकीत ते उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचे पोस्टर देखील मुरादाबाद युवा काँग्रेसकडून मुरादाबादच्या रस्त्यांवर लावण्यात आले आहेत.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS