महत्वाच्या बातम्या
-
कर्नाटकात विरोधकांचे महागाईविरोधात आंदोलन | डीके शिवकुमार आणि सिद्धारामय्या बैलगाडीवरून विधानसभेत
कर्नाटक काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी सोमवारी पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलेंडरच्या दरवाढी विरोधात सत्ताधारी भाजप सरकारचा निषेध केला. कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे (केपीसीसी) अध्यक्ष डीके शिवकुमार आणि विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या बैलगाड्यांवरून विधानसभेत पोहोचले. कर्नाटक विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी भाजपला घेरण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी ही रणनीती आखली.
3 वर्षांपूर्वी -
सोलापुरातील काँग्रेस भवनावर हल्ला | दगड आणि शाई फेकून हल्लेखोर फरार
सोलापुरातील मध्यवर्ती भागात असलेल्या काँग्रेस भवनवर आज शनिवारी सकाळी अज्ञात हल्लेखोरांनी दगडफेक आणि शाई फेकून नव्या राजकिय वादाला सुरुवात केली आहे. काँग्रेस भवन येथे हल्ला झाला याची माहिती मिळताच सोलापुरातील काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते काँग्रेस भवनकडे धावून आले.
3 वर्षांपूर्वी -
टीम नाना पटोले | पृथ्वीराज चव्हाण यांची शिस्तपालन समिती अध्यक्ष पदी वर्णी | अंर्तगत वाद सुरु
काँग्रेसमध्ये नाना पटोले यांची प्रदेशाध्यक्षपदी निवृत्ती होऊन सहा महिने उलटल्यानंतर त्यांना काल नवीन टीम मिळाली. टीम देखील सव्वाशे नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची भरभक्कम आहे. 18 उपाध्यक्ष 65 सरचिटणीस आणि बरीच काही पदे काँग्रेस श्रेष्ठींनी भरली आहेत. यामध्ये अर्थातच नव्या जुन्यांचा संगम म्हणत प्रदेश काँग्रेस मधल्या सर्व नेत्यांना सामावून घेण्यात आले आहे.
3 वर्षांपूर्वी -
MPSC सदस्यांची यादी पाठवलीय | विधान परिषद आमदारांची यादी नसल्याने मंजूर कराल हा विश्वास - अतुल लोंढे
पुण्याच्या स्वप्निल लोणकरच्या आत्महत्येवरुन महाराष्ट्रात एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न ऐरणीवर आले होते. त्यावेळी विद्यार्थ्यी आणि पालकांना दिलासा देण्यासाठी तसंच एमपीएससीचा कारभार गतीमान व्हावा यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत महत्त्वपूर्ण घोषणा केली.
4 वर्षांपूर्वी -
पेट्रोल के दाम कम हुये की नही हुये? | वर्ध्यात पंतप्रधानांची ऑडिओ क्लिप वाजवत काँग्रेसची सायकल यात्रा
‘पेट्रोल के दाम कम हुये की नही हुये’ या पंतप्रधानाच्या जुन्या भाषणाच्या क्लिपने सोशल मीडियावर धुमाकूळ घातलेला आहे. हीच क्लिप कारंजा तालुक्यात युवक काँग्रेसच्यावतीने इंधन आणि महागाईच्या विरोधात सायकल यात्रा काढली होती. माजी आमदार अमर काळे यांच्या नेतृत्वात कारंजा ते आर्वी अशी 45 किलोमीटरची ही सायकल यात्रा शुक्रवारी काढण्यात आली.
4 वर्षांपूर्वी -
देशाची तरुणाई २०२४ मध्ये मोदी सरकार उलथवून लावेल - सुनील केदार
देशातील वाढत्या महागाईने लोकांचे नुकसान केले आहे. केंद्रात भाजप सरकार आल्यानंतर सर्वाधिक युवकांचे नुकसान झाले आहे. देशातील तरुण हे बेरोजगार झाले आहे. यामुळे हे युथ येणाऱ्या 2024 निवडणुकीत हे भाजपचे सरकार उलथून लावतील आणि काँग्रेसचे सरकार सत्तेत येईल असा इशारा राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी दिला. ते नागपुरात संविधान चौकात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या हल्ला बोल आंदोलना दरम्यान प्रसार माध्यमांशी बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
आसाम-मिझोराम सीमेवरील रक्तपात | हेच महाराष्ट, प. बंगालच्या सीमेवर घडलं असतं तर शहांनी...
आसामच्या बराक खोऱ्यातील कछर, करीमगंज आणि हैलकांडी यांची मिझोरामच्या ऐझॉल, कोलासिब आणि मामित या तीन जिल्ह्य़ांना लागून १६४ किलोमीटरची सीमा आहे. त्याबाबत दोन्ही राज्यांमध्ये वाद आहे. याच वादातून सोमवारी पुन्हा एकदा सीमेवर संघर्षाचा उद्रेक झाला. दोन्ही राज्यातील वादग्रस्त सीमा ओलांडून आसाम पोलिसांनी मिझोराममधील कोलासिब येथील एका पोलीस चौकीचा ताबा घेतल्यानंतर तेथे हिंसाचाराला तोंड फुटले.
4 वर्षांपूर्वी -
इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसची सायकल रॅली | राज्यपालांकडे विविध मागण्याचे निवेदन दिले
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या नेतृत्वात इंधन दरवाढीविरोधात मुंबईत सायकल रॅली काढण्यात आली. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, भाई जगताप आणि आपल्या कार्यकर्त्यांसह मुंबईतील हँगिंग गार्डन ते राजभवनापर्यंत सायकल चालवत राज्यपालांना निवेदन देण्यासाठी काँग्रेस नेते सायकलवरून राजभवनात गेले होते. यावेळी काँग्रेसतर्फे राज्यपालांना इंधन दरवाढीविरोधात निवेदन देण्यात आलं.
4 वर्षांपूर्वी -
५ वर्ष सत्ता द्या म्हणत मोदींनी केवळ ७ वर्षात जनतेचे जगणे मुश्कील केलंय | इंधना दरवाढीतून २५ लाख कोटी कमावले - काँग्रेस
काँग्रेस पक्षाला ७० वर्षे सत्ता दिली मला फक्त ५ वर्ष सत्ता द्या म्हणून सत्तेत आलेल्या नरेंद्र मोदींनी अवघ्या ७ वर्षात देशातील जनतेचे जगणे मुश्कील करुन ठेवले आहे. पेट्रोल, डिझेल, एलपीजी सिलिंडर, खाद्यतेलाच्या किमती सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेल्या असून मोदी सरकारने इंधनाच्या करातून २५ लाख कोटी रुपयांची कमाई केली आहे. हा पैसा देशातील जनतेच्या हितासाठी किंवा राज्य सरकारसाठी वापरला जात नाही, असा आरोप करून १९ तारखेपासून सुरु होत असलेल्या संसदेच्या अधिवेशनात मोदी सरकारला इंधन दरवाढ व महागाईप्रश्नी जाब विचारु, असे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खर्गे यांनी म्हटले आहे.
4 वर्षांपूर्वी -
पुणे कॉंग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवेंचं नगरसेवक पद रद्द । मनसे उमेदवाराच्या न्यायालयीन लढ्याला यश
पुणे महापालिकेच्या हद्दीत एक महत्वाची घटना घडली आहे. पुण्यातील लोहियानगर कासेवाडी प्रभागातील कॉंग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांचं नगरसेवक पद रद्द करण्यात आलं आहे. तसे आदेश लघुवाद न्यायालयाने दिले आहेत. अनधिकृत बांधकाम प्रकरणी पुणे न्यायालयाने काँग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांचं नगरसेवक पद रद्द केलं आहे. या प्रकरणी मनसेचे उमेदवार राहिलेले भूपेंद्र शेंडगे यांनी बागवे यांच्याविरोधात दावा दाखल केला होता. या दाव्यावर निकाल देताना पुणे कोर्टाने बागवे यांचं नगरसेवक पद रद्द करण्याचा निर्णय दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
अमरनाथ यात्रा रद्द करणारी भाजपा पंढरपूरच्या वारीसाठी आग्रही | त्यांना वारकऱ्यांच्या जीवाशी घेणंदेणं नाही - काँग्रेस
देशात पसरलेल्या कोरोना महामारीमुळे सलग दुसऱ्या वर्षी अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली आहे. ही यात्रा 28 जून ते 22 ऑगस्टपर्यंत होणार होती. मधल्या काळात कोरोना परिस्थिती नियंत्रणात आल्यामुळे श्राइन बोर्डाने अमरनाथ यात्रेच्या तारखा जाहीर केल्या होत्या. 1 एप्रिलपासून यात्रेचे अॅडवांस रजिस्ट्रेशनदेखील सुरू झाले होते. पण, कोरोनाची दुसरी लाट आली आणि यामुळे यात्रा रद्द करावी लागली. पण, भाविकांना ऑनलाइन दर्शन करता येणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
भाजपला रामराम, सुनील देशमुख काँग्रेसमध्ये परतले | गोंदियाचे माजी आमदार दिलीप बंन्सोड सुद्धा काँग्रेसमध्ये
भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार सुनील देशमुख यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी सुनील देशमुख यांनी मोठा गौप्यस्फोट केला. काँग्रेसमध्ये असताना पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांच्या वर्चस्वामुळे आमची तिकीटं कापली जायची, असा गौप्यस्फोट देशमुख यांनी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
स्वबळाची घोषणा करणाऱ्या मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत वाद निवडणुकीआधीच चव्हाट्यावर
मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर असताना मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. कारण मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्याविरोधात काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांनी थेट सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याविरोधात तक्रार केली आहे. भाई जगतापांची कार्यपद्धतीवर बोट ठेवत, आपल्याला डावललं जात असल्याचा आरोप झिशान सिद्दीकींनी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
ATM सेवाकर अजून वाढला | तो काळ दूर नाही जेव्हा मोदी सरकार पैशांना स्पर्श अन बघण्यासाठी सुद्धा कर आकारेल - सचिन सावंत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी देशाला संबोधित करताना त्यावेळी चलनात असणाऱ्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद केल्या होत्या. मोदी सरकारद्वारे त्यावेळी देशातील भ्रष्टाचार, दहशतवाद, काळा पैसा जमा करणाऱ्यांच्या विरोधात हे पाऊल उचलण्यात आलं होतं. नोटा रद्द केल्यानंतर विहित मुदतीत त्या बँकांकडे जमा करण्यास सांगण्यात आलं होतं.
4 वर्षांपूर्वी -
पंतप्रधान मोदींनी CBSE च्या परीक्षा रद्द केल्या, यावर आशिष शेलार यांचे मत काय? - सचिन सावंत
मागील काही दिवसांपासून देशात सुरू असलेल्या सीबीएसई बोर्डाच्या परीक्षांबाबत सुरू असलेल्या चर्चेवर अखेर पडदा पडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात मंगळवारी घेतलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशात निर्माण झालेल्या करोनाच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
राजे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर भेटू पाहत होते, या अभिनेत्री कोणते प्रश्न घेऊन भेटल्या होत्या? - सचिन सावंत
मराठा आरक्षण हा राज्याचा विषय आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाटते. त्यामुळेच पंतप्रधान मोदी यांची आजपर्यंत संभाजीराजे छत्रपतींशी भेट होऊ शकली नाही, असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी यावेळी मांडलेल्या भूमिकेतील एका मुद्द्यावर बोट ठेवत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट करत सवाल केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
मोदी-शहांनी स्वतः क्लीनचिट दिलेल्या या नेत्यांना CBI, ED आणि आयकर विभाग अटक करणार नाहीत - काँग्रेस
पश्चिम बंगालच्या नारदा प्रकरणात पुन्हा एकदा केंद्रीय गुन्हे अन्वेषण (CBI) ने तपास सुरू केला आहे. सीबीआयने सोमवारी अनेक ठिकाणी छापेमारी केली. यानंतर ममता सरकारमधील मंत्री फिरहाद हाकिम, सुब्रत मुखर्जी, आमदार मदन मित्रा आणि माजी महापौर शोवन चॅटर्जी यांची चौकशी करुन सर्वांना अटक करण्यात आले. त्यानंतर या सर्वांना कोर्टात हजर केले केले होते.
4 वर्षांपूर्वी -
राजकीय विरोधकांचा 'छळ' ही एकमेव 'टूलकिट' मोदी, शहा आणि आदित्यनाथ वापरतात - काँग्रेस
दिल्लीची दैनंदिन प्राणवायूची गरज ७०० मेट्रिक टनावरून ५८२ मेट्रिक टनावर आली असल्याने अतिरिक्त प्राणवायू अन्य राज्यांना उपलब्ध करून द्यावा, असे पत्र दिल्ली सरकारने केंद्र सरकारला पाठविले आहे, असे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी गुरुवारी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे गेल्या २४ तासांत १० हजार ४०० जणांना करोनाची लागण झाल्याने शहरातील सकारात्मकतेचे प्रमाण १४ टक्क्यांवर आले आहे, असेही सिसोदिया म्हणाले. सध्या कोविड-१९ रुग्णालयांमध्ये आता अधिक खाटा उपलब्ध आहेत आणि प्राणवायूच्या मागणीतही घट झाली आहे, असे सिसोदिया यांनी आभासी पत्रकार परिषदेत सांगितले होते.
4 वर्षांपूर्वी -
आमदार असते तर एका रात्रीत खरेदी केले असते | ऑक्सिजन, व्हेंटीलेटर्सला विकत घ्यायला थोडा वेळ लागतो - आ. भाई जगताप
कोरोना व्यवस्थापनातील त्रुटींमुळे आतापर्यंत सुप्रीम कोर्टाच्या निशाण्यावर असणाऱ्या केंद्र सरकारने आता सुप्रीम कोर्टालाच सल्ला दिला आहे. ऑक्सिजन पुरवठ्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्राकडे राष्ट्रीय आराखडा मागवला होता, परंतु केंद्राने एक हट्टी पवित्रा घेत सुप्रीम कोर्टालाच सल्ला दिला आहे. साथीच्या आजाराशी संबंधित धोरणांबाबत कोर्टाच्या प्रश्नांवर रविवारी केंद्राने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्र (प्रतिज्ञापत्राचा) तपशील सोमवारी उघडकीस आला.
4 वर्षांपूर्वी -
कोरोनाशी लढण्याची जवाबदारी राज्य सरकारांची | मोदींची जवाबदारी फक्त निवडणुका लढण्याची - काँग्रेस
देशात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाचा विस्फोट होताना पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात कोरोनाचे चार लाखांहून अधिक नवीन रुग्ण सापडले आहेत. तर 3 हजार 915 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. सलग दुसऱ्या दिवशी 24 तासातील कोरोना रुग्णसंख्येने चार लाखांचा टप्पा ओलांडला. गेल्या 24 तासात भारतात 4 लाख 14 हजार 188 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Pan Card Online | 90% लोकांना ठाऊक नाही पॅनकार्ड मार्फत लोन कसा मिळतो, कशा पद्धतीने अप्लाय करा, माहिती जाणून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
- Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Kotak Mutual Fund | बिनधास्त SIP करून 4 पटीने पैसा वाढवा, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड स्कीम सेव्ह करा
- RVNL Share Price | टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, RVNL शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: RVNL
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांनो इकडे लक्ष द्या, 'ही' म्युच्युअल फंड योजना 1 लाखांवर देईल 6,13,521 रुपये परतावा
- Shark Tank India | महिला सुद्धा सुरु करू शकतात असा स्टार्टअप, आई-मुलीच्या स्टार्टअपला शार्क टँक इंडियातून फंडिंग
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC