महत्वाच्या बातम्या
-
मिलिंद देवरा यांची संजय निरुपम यांच्यावर टीका, मुंबई काँग्रेसमध्ये दुफळी
आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबई कॉग्रेसससुद्धा कामाला लागली असताना अंतर्गत गटबाजी उफाळून येण्याची शक्यता आहे. मुंबई काँग्रेसमध्ये संजय निरुपम यांच्याविरुद्ध काँग्रेसच्या अनेक माजी खासदार आणि आमदारांनी आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, माजी खासदार मिलिंद देवरा यांनी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्यावर पुन्हा टीकास्त्र सोडले आहे.
6 वर्षांपूर्वी -
ते ४८ तास सावधान! या नियमाच्या आड कोणीही विजयी उमेदवारावर आधीच ट्रॅप लावू शकतो? सविस्तर
नगरसेवक पदाच्या निवडणुकीत आरक्षणामुळे अनेक विजयी उमेदवार खोटे शिक्षणाचे दाखले, जातीचे दाखले तसेच संपत्तीबद्दलची खोटी माहिती निवडणूक आयोगाला दिल्यामुळे, त्यांचं नगरसेवक पद रद्द होण्यापर्यंत विषय जाऊन पोहोचतो. परंतु, लोकसभा, विधानसभा निवडणुकीत याचा त्रास नसला तरी भविष्यात या नव्या नियमामुळे अनेक विजयी उमेदवार भविष्यात निवडणूक आयोगाच्या कचाट्यात अडकून स्वतःची खासदारकी किंवा आमदारकी गमावून बसू शकतात. विशेष म्हणजे कोणीही राजकीय विरोधक प्रतिस्पर्धीना मतदानाच्या ४८ तास आधी शिस्तबद्ध अडकवू शकतात.
6 वर्षांपूर्वी -
प्रती दिवशी १७ रूपये देऊन मोदी सरकारने शेतकऱ्यांचा अपमान केला - राहुल गांधी
प्रती दिवशी १७ रूपये देऊन मोदी सरकारने शेतकऱ्यांचा अपमान केला – राहुल गांधी
6 वर्षांपूर्वी -
प्रियंका गांधी देशभरात दौरे करतील: गुलाम नबी आझाद
प्रियंका गांधी यांचा सक्रिय राजकारणात प्रवेश निश्चित झाल्यावर आता त्यांना लवकरच काँग्रेस कार्यकारिणीमध्ये सामावून घेतले जाण्याची शक्यता आहे. तसे अप्रत्यक्ष संकेतच काँग्रेसमधून देण्यात आले आहेत. तसेच त्यांना केवळ पूर्व उत्तर प्रदेशातील प्रचारापुरता मर्यादित न ठेवता संपूर्ण भारतात काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी उतरविण्यात येईल असे संकेत सुद्धा देण्यात आले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
ब्रेकिंग न्यूज: पर्रिकर म्हणाले, अनिल अंबानींच्या फायद्यासाठी मोदींनी ‘खेळ’ केला: राहुल गांधी
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल डील प्रकरणावरुन धक्कादायक दावा केला आहे. राफेल करारात मनोहर पर्रिकरांचा कोणताही सहभाग नव्हता असे त्यांनीच मला सांगितल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. तसेच केवळ उद्योगपती अनिल अंबानी यांना फायदा मिळवून देण्यासाठी त्यांनी हा संपूर्ण खेळ रचल्याचे सुद्धा मला पर्रिकरांनी सांगितल्याचा खळबळजनक दावा राहुल गांधी यांनी केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
सेना, भाजप की काँग्रेस? लोकसभेनंतर 'या' विधानसभा क्षेत्रातील चित्र स्पष्ट होणार
सध्या अंधेरी पूर्वेचा हा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या खात्यात आहे. शिवसेनेचे रमेश लटके येथील विद्यमान आमदार आहेत. सदर मतदारसंघाचा समावेश असलेल्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून लोकसभेसाठी काँग्रेसकडून संजय निरुपम किंवा सुरेश शेट्टी यांच्यापैकी एकाला उमेदवारी मिळणार हे निश्चित आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेचं चित्र कोणाच्या बाजूने आहे याचा अंदाज येईल. या मतदारसंघात मराठी, उत्तर भारतीय, मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजाचा सारखाच प्रभाव असल्याने हा मतदार संघ काहीसा मिश्र म्हणून परिचित आहे. कोणत्याही एकाच समाजाच्या मतांवर येथे निवडून येणे जवळपास अशक्य आहे. त्यामुळे याच लोकसभा क्षेत्रातील या महत्वाच्या विधानसभा क्षेत्रात लढाई खूपच अटीतटीची ठरणार आहे हे निश्चित.
6 वर्षांपूर्वी -
मलकापूर नगरपालिकेत पृथ्वीबाबांनी भाजपला लोळवलं
राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि भारतीय जनता पक्षाचे नेते अतुल भोसले यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागलेल्या मलकापूर नगरपरिषदेच्या मतमोजणीला सकाळी सुरुवात झाली. परंतु, मतदानानंतरचे प्राथमिक कल पाहता काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षात घमासान होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती.
6 वर्षांपूर्वी -
श्रीगोंदा नगरपालिका : काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शुभांगी पोटे विजयी
भारतीय जनता पक्ष व काँग्रेस-एनसीपी आघाडीने अत्यंत प्रतिष्ठेची केलेल्या श्रीगोंदा नगरपालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी दहा वाजल्यापासून सुरू झाली आहे. काँग्रेस-एनसीपी आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शुभांगी पोटे दणदणीत विजयी झाल्या. त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार सुनीता शिंदे यांचा एकूण २१०० मतांनी पराभव केला.
6 वर्षांपूर्वी -
मलकापूर नगरपरिषद निवडणूक; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला
राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि भारतीय जनता पक्षाचे नेते अतुल भोसले यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागलेल्या मलकापूर नगरपरिषदेच्या मतमोजणीला सकाळी सुरुवात झाली आहे. परंतु, मतदानानंतरचे प्राथमिक कल पाहता काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षात घमासान होण्याची शक्यता आहे.
6 वर्षांपूर्वी -
जिंद पोटनिवडणूक : काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला रिंगणात
हरयाणातील जिंद विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. तब्बल २१ उमेदवार या पोटनिवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यात काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला मैदानात उतरल्याने काँग्रेसने सुद्धा ही पोटनिवडणूक प्रतिष्टेची केली आहे. जिंद’ची जागा राखण्यासाठीच काँग्रेसने मोठा उमेदवार रिंगणात उतरवला आहे.
6 वर्षांपूर्वी -
प्रियांका गांधी मौनी अमावस्या किंवा वसंत पंचमीला कुंभमेळात, भाजपची झोप उडण्याची शक्यता
उत्तर प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष आगामी लोकसभा निवडणुक हिंदुत्वाचा अजेंडा पुढे करून लढणार यात अजिबात शंका नाही. त्यामुळे त्यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि पक्षाच्या नवनियुक्त महासचिव प्रियंका गांधी यांनी कुंभमेळादरम्यान त्रिवेणी संगमात स्नान करण्याचा निर्णय घेतला आहे.
6 वर्षांपूर्वी -
त्या फक्त दिसायला सुंदर, राजकीय कर्तृत्व काहीच नाही: बिहार भाजप मंत्री
प्रियांका गांधी यांच्या राजकारणातील सक्रीय प्रवेशानंतर राजकीय वर्तुळातून आणि विशेष करून भारतीय जनता पक्षातून अनेक प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. दरम्यान, बिहार सरकारमधील भाजपचे विद्यमान मंत्री विनोद नारायण झा यांनी केलेल्या विधानामुळे वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.
6 वर्षांपूर्वी -
पूर्वानुभव; 'तो' IT सेल वेगळंच पसरवेल म्हणून प्रियांकाचा धर्म व शिक्षण तुमच्या माहितीसाठी
कालच प्रियंका गांधींची निवड अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस पदावर झाली आणि देशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या विषयावरून अगदी नरेंद्र मोदी सुद्धा काही मिनिटातच प्रियांका गांधी यांचं नाव न घेता व्यक्त झाले. विशेष करून त्यांना थेट सरचिटणीस पद बहाल करून उत्तर प्रदेशाच्या प्रभारी म्हणून ज्योतिरादित्य सिंदिया यांच्यासोबत जवाबदारी वाटून देण्यात आली आहे. दरम्यान, या राजकीय घटनेनंतर प्रियंका गांधी या दिवसभर ट्विटरवरील १० प्रमुख ट्रेंड्स पैकी तब्बल ९ ट्रेंड्स हे प्रियंका गांधींशी थेट संबंधित होते. त्यावरून त्यांच्या थेट सक्रिय राजकारणातील प्रवेशाचा अर्थ काढता येतो.
6 वर्षांपूर्वी -
प्रियांका गांधी ब्रह्मास्त्र थेट वाराणसी आणि गोरखपूर'वर? ट्विट मधून संकेत
प्रियंका गांधी यांच्या अचानक सक्रिय राजकारणातील प्रवेशानंतर काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. उत्तर प्रदेशात मोदी-शहा जोडीला पूर्ण हैराण करून सोडण्याची रणनीती आखली जाते आहे. त्यासाठी आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाच पराभूत करण्याची रणनीती आखण्यात येते आहे.
6 वर्षांपूर्वी -
लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसची खेळी; प्रियांका गांधींवर मोठी जबाबदारी
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं प्रियांका गांधींवर पक्षात मोठी जवाबदारी देण्यात आली आहे. प्रियांका गांधी यांची राष्ट्रीय काँग्रेसने उत्तर प्रदेशच्या प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. प्रियांका गांधींकडे युपीच्या पूर्व भागाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर युपी’च्या पश्चिम भागाचं नेतृत्व ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे देण्यात आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
बलाढ्य अर्थशक्ती? भाजपकडून प्रचारासाठी सर्व खासगी चार्टर्ड प्लेन व हेलिकॉप्टर बुक?
लोकसभा निवडणुका जस जशा जवळ येऊ लागल्या आहेत तशी राजकीय पक्षांची सुद्धा धावपळ सुरु झाली आहे. त्यात सत्ताधारी भाजपकडून विरोधकांची वेगळ्याच प्रकारे कोंडी करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे वृत्त आहे. कारण, काँग्रेसचे प्रवक्ते आनंद शर्मा यांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून आगामी लोकसभा निवडणुकीआधीच विरोधकांची राजकीय कोंडी करण्यासाठी अर्थकरणाच्या शक्तीवर देशातील जवळपास सर्वच खासगी चार्टर्ड प्लेन व हेलिकॉप्टर आधीच बुक केले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO व्हायरल: उत्तर पश्चिम जिल्हा निरीक्षकांकडून निरुपम यांची लोकसभा उमेदवारी फिक्सिंग?
उत्तर पश्चिम मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने लोकसभा निवडणूकीसाठी उमेदवार निश्चितीसाठी काँग्रेसची सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची संयुक्त बैठक काल संध्याकाळी सौराष्ट्र पटेल समाज हॉल जोगेश्वरी पश्चिम येथे आयोजित करण्यात आली होती. दरम्यान, या पूर्व नियोजित बैठकीला सुरुवात होताच महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी सुरु झाली, त्यांचा उमेदवारीसाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी आणि विशेष करून दिवंगत केंद्रीय मंत्री गुरुदास कामत यांच्या कार्यकर्त्यांनी सुरेश शेट्टी यांच्या उमेदवारीची मागणी उचलून धरली. त्यामुळे बराच वेळ तणावाचे वातावरण होते.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO: उ. पश्चिम मुंबई लोकसभा उमेदवार निश्चिती, कार्यकर्त्यांच्या माजी मंत्री सुरेश शेट्टींच्या समर्थनार्थ घोषणा
उत्तर पश्चिम मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने लोकसभा निवडणूकीसाठी उमेदवार निश्चितीसाठी काँग्रेसची सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची संयुक्त बैठक काल संध्याकाळी सौराष्ट्र पटेल समाज हॉल जोगेश्वरी पश्चिम येथे आयोजित करण्यात आली होती. दरम्यान, या पूर्व नियोजित बैठकीला सुरुवात होताच महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी सुरु झाली, त्यांचा उमेदवारीसाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी आणि विशेष करून दिवंगत केंद्रीय मंत्री गुरुदास कामत यांच्या कार्यकर्त्यांनी सुरेश शेट्टी यांच्या उमेदवारीची मागणी उचलून धरली. त्यामुळे बराच वेळ तणावाचे वातावरण होते.
6 वर्षांपूर्वी -
देशातील खऱ्या गंभीर घडामोडींपेक्षा तैमूरच्या डायपर'मधील घडामोडीत माध्यमांना रस का? सविस्तर
तसा दोष त्या गोंडस बाळाचा नाही किंवा त्याच्या आई-वडिलांचा, कारण प्रसार माध्यमांमधील जवाबदारीच हळहळू संपुष्टात येते आहे की काय, अशी परिस्थिती निर्माण होते आहे. सिनेश्रुष्टी आणि करमणूक क्षेत्रातील बातम्या हा देखील प्रसार माध्यमांतील घटक आहे हे खरं असलं, तरी सुद्धा एखादा विचारात न घेण्यायोग्य मुद्याला राष्ट्रीय स्तरावरील दैनंदिन बातमी बनविणे हे कितपत योग्य आहे, हा सुद्धा प्रश्न येतो.
6 वर्षांपूर्वी -
राम मंदिराचा जाहीरनाम्यात समावेश करा, पाठिंबा देतो; विहिंप'ची काँग्रेसला ऑफर
सलग ५ वर्षे एकपक्षीय असे बहुमताचे केंद्र सरकार चालवून सुद्धा भाजप’ला अयोध्येतील राम मंदिराच्या प्रश्नावर मार्गी लावता आलेला नाही. भारतीय जनता पक्षाने अयोध्येतील राम मंदिराबाबत घेतलेल्या संयमी भूमिकेमुळे देशभरातील हिंदुत्ववादी संघटनांमध्ये प्रचंड संताप आणि संशय निर्माण करणारं वातावरण निर्माण झाल्याने या संघटना आता मंदिराबाबत आक्रमक भूमिका घेत आहेत.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Withdrawal | पगारदारांनो EPF च्या पैशांतून होम लोन फेडत आहात का; तुम्ही जे करताय ते योग्य आहे की अयोग्य, इथे जाणून घ्या