महत्वाच्या बातम्या
-
लोकसभा: उत्तर पश्चिम मुंबईतून इच्छुक संजय निरुपम यांना स्थानिक कार्यकर्त्यांचा तीव्र विरोध?
लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे तसतशी मुंबई काँग्रेसमध्ये सुद्धा जोरदार हालचाली सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यात आता उत्तर पश्चिम मुंबईतून संजय निरुपम सुद्धा उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे वृत्त आहे. संजय निरुपम यांच्या जुन्या लोकसभा मतदारसंघातून लढविण्यापेक्षा ते स्वतःसाठी नवख्या आणि काही प्रमाणात भरवशाच्या उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुक असल्याचे काँग्रेसच्या अंतर्गत गोटातून समजते.
6 वर्षांपूर्वी -
काँग्रेसचे माजी आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी उत्तर मध्य मुंबईतून लोकसभेच्या रिंगणात?
लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे तसतशी मुंबई काँग्रेसमध्ये सुद्धा जोरदार हालचाली सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचाच एक भाग म्हणजे उत्तर मध्य मुंबईची आगामी लोकसभा निवडणूक प्रिया दत्त लढणार नसल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. परंतु, त्यांच्या जागी आता स्वच्छ प्रतिमेचे राज्याचे माजी आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी ही निवडणूक लढविण्याची शक्यता आहे.
6 वर्षांपूर्वी -
काँग्रेस उत्तर प्रदेशात सर्व जागा स्वबळावर लढवणार
महिन्याभरावर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी यूपीत सपा आणि बसपा आघाडी केल्यानंतर बाजूला सारल्या गेलेल्या काँग्रेसनं सर्वच्या सर्व जागा स्वबळावर लढवण्याचा निर्णय घोषित केला आहे. यूपीत लोकसभेच्या सर्वच्या सर्व ८० जागा मतदारसंघात काँग्रेस उमेद्वार उभे करणार असल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट झाले आहे.
6 वर्षांपूर्वी -
मल्लिकार्जुन खरगेंनी आलोक वर्मा यांना हटविण्यास विरोध दर्शविला
पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालच्या निवड समितीच्या बैठकीत CBI च्या संचालक पदावरुन आलोक वर्मा यांना तडकाफडकी हटविण्यात आले. दरम्यान, सदर निवड समितीच्या बैठकीत उपस्थित असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी आलोक वर्मा यांना हटविण्यास तीव्र विरोध दर्शविला. परंतु, ३ सदस्य असलेल्या या निवड समितीत मोदींनी आणि सर्वोच्च न्यायालयाचे ए. के. सीकरी यांनी आलोक वर्मांच्या उचलबांगडीवर शिक्कामोर्तब केले.
6 वर्षांपूर्वी -
सर्वकाही RSSच्या अजेंड्याप्रमाणे, आर्थिक आरक्षण देऊन हळूहळू इतर आरक्षण रद्द केली जातील
खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बलांना शिक्षण तसेच सरकारी नोकऱ्यांमध्ये १० टक्के आरक्षण देणारे घटनादुरुस्ती करणारे विधेयक आज वरिष्ठ सभागृह म्हणजे राज्यसभेत सादर करण्यात आले. केंद्रीय समाजकल्याणमंत्री थावरचंद गेहलोत यांनी राज्यसभेत हे विधेयक सादर केले. काल हीच प्रक्रिया लोकसभेत पार पडली होती.
6 वर्षांपूर्वी -
प्रियंका गांधी लोकसभेच्या आखाड्यात उतरण्याची शक्यता?
काही दिवसांपूर्वी ५ राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुका आणि त्यात मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगडसारख्या हिंदी भाषिक आणि मोठ्या राज्यांमध्ये काँग्रेसला मिळवलेल यश आता द्विगुणित करण्याची रणनीती आखली जात आहे.
6 वर्षांपूर्वी -
मोदी हे स्वातंत्र्यानंतर भारताला लाभलेले सर्वात वाईट पंतप्रधान: कॅप्टन अमरिंदर सिंह
पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी स्वातंत्र्यानंतर देशाला जे पंतप्रधान लाभले आहेत, त्यांच्यातील नरेंद्र मोदी हे सर्वात वाईट पंतप्रधान आहेत अशी खरमरीत टीका त्यांनी केली आहे. पंतप्रधानांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी, १९८४ मधील दंगल आणि इतर अनेक मुद्द्यांवरुन काँग्रेसला लक्ष केल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी काल मोदींवर जोरदार निशाणा साधला.
6 वर्षांपूर्वी -
मोदींची मुलाखत: बरोबर मोदीजी! प्रियांका चतुर्वेदींनी मोदींना 'त्या' शब्दांची आठवण करून दिली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली असून लोकसभा निवडणूकपूर्व ठरवून घेतलेली मुलाखत अशी विरोधकांनी त्यावर टीका केली आहे. या मुलाखतीदरम्यान मोदींनी काँग्रेसच्या विधानांवर भाष्य केलं आणि म्हणाले की, जैसी जिसकी सोच, वैसे शब्द’ असं उत्तर दिल. सदर मुलाखत जवळपास ९५ मिनिटांची होती.
6 वर्षांपूर्वी -
माझं कोणीही काही करू शकत नाही, माझ्याकडे राफेल घोटाळ्याची माहिती: पर्रिकरांची ऑडिओ क्लिप
राफेल लढाऊ विमान घोटाळ्यावरून काँग्रेसने आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्यावर सुद्धा निशाणा साधला आहे. राफेल लढाऊ विमानांच्या घोटाळ्याचे रहस्य गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांच्या बेडरूममध्ये असल्याचा धक्कादायक आरोप काँग्रेसने केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
मोदी सरकारने ऑगस्टा वेस्टलँडला काळ्या यादीतून बाहेर काढले व "मेक इन इंडियात" सामील केले
ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणावरुन काँग्रेसनं भारतीय जनता पार्टी आणि पंतप्रधान मोदींवर गंभीर आरोप करत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. काळ्या यादीत असणाऱ्या ऑगस्टा वेस्टलँड कंपनीला “मेक इन इंडियात” का सामील करुन घेतलं असा सवाल काँग्रेसच्या थेट पत्रकार परिषदेत उपस्थित केला आणि भाजप तोंडघशी पडल्याचे समजते.
6 वर्षांपूर्वी -
वेळ, खर्च, दौऱ्यांचा आकडा व आलेली गुंतवणूक बघा, मोदी नाही! मनमोहन सिंग उजवे: सविस्तर
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदेश दौऱ्यावरुन आणि त्यावर झालेल्या खर्चांवरुन सोशल मीडियावतून मोदींवर टीका करण्यात येते. मात्र, मोदींचे एकूण विदेश दौरे, वेळ, त्यासाठी आलेला खर्च आणि त्यामुळे देशात आलेली परकीय गुंतवणूक पाहता आणि त्याची तुलना डॉ. मनमोहन सिंग यांच्या सोबत करता मनमोहन सिंग हेच उजवे ठरतील अशी आकडेवारी खुद्द राज्यसभेत खासदार वीके. सिंह यांच्या उत्तरातून यांनी याबाबत माहिती दिली.
6 वर्षांपूर्वी -
मध्यप्रदेश सरकार लवकरच ज्येष्ठ शेतकऱ्यांना पेन्शन सुरु करणार
मध्यप्रदेशातील कालमनाथ सरकारने शेतकऱ्यांवर सवलतींचा सपाट सुरु केला आहे. मुख्यमंत्री कमलानाथ यांनी केवळ आठवड्याभराच्या आत दुसरा मोठा निर्णय घेतल्याचे समजते. लवकरच राज्यातील ज्येष्ठ शेतकऱ्यांना पेन्शन देण्याचा मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला जाण्याचे वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
बोफोर्स व २-जी प्रकरणात जेपीसी नेमलेली, मग राफेल प्रकरणात का नाही?
राफेल लढाऊ विमानांच्या कराराप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात टायपिंगची चूक सुधारण्यासाठी सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यावरुन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोदी सरकारवर तीव्र शब्दात निशाणा साधला आहे. आम्ही एखाद्या शब्दाची चूक समजू शकतो. परंतु, इथे तर संपूर्ण परिच्छेदतच गडबडी कशी आहे. काही झालं तरी संपूर्ण परिच्छेदातच चूक होणं अशक्य आहे, असा खरगे यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे खर्गे हे लोकलेखा समितीचे (पीएसी) अध्यक्ष सुद्धा आहेत.
6 वर्षांपूर्वी -
युपीमध्ये बुआ- भतिजाची महाआघाडी? काँग्रेसला धक्का
मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील विजयाश्री प्राप्त केल्यानंतर काँग्रेसचा आत्मविश्वास द्विगुणित झाला असला तरी उत्तर प्रदेशातून काँग्रेसला दुःखद बातमी येण्याची शक्यता आहे. कारण उत्तर प्रदेशमध्ये बसपा आणि सपा एकत्र येणार असून लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडीला सुद्धा या महाआघाडीत स्थान मिळणार आहे असं वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
जवाबदार पंतप्रधान म्हणून मी पत्रकार परिषदांना कधीच घाबरलो नाही : डॉ. मनमोहन सिंग
युपीएचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पुन्हा एकदा विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. मी कधीच असा पंतप्रधान नव्हतो, जो पत्रकार परिषदेत बोलायला घाबरायचो. मी जवाबदार पंतप्रधान म्हणून माझ्या मंत्रिमंडळाचा पत्रकार परिषदेत पत्रकारांशी नेहमीच सुसंवाद राखला होता. तसेच मी कोणत्याही परराष्ट्र दौऱ्यावरून देशात परतल्यानंतर नेहमीच जाहीर पत्रकार परिषद घेत होतो, असं सुद्धा डॉ. मनमोहन सिंग आवजून म्हणाले.
6 वर्षांपूर्वी -
तेलंगणा पाठोपाठ कमलनाथांनी 'राज' मार्गाचं वास्तव स्वीकारलं? यूपी-बिहारींना नाही तर स्थानिकांना नोकऱ्या
मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर कमलनाथ यांनी बाहेरून येणाऱ्या लोंढ्यांविरुद्ध आक्रमक भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. परप्रांतियाविरोधातील राग आळवला आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमधील लोंढे मध्य प्रदेशातील स्थानिक युवकांच्या नोकऱ्या बळकावतात. त्यामुळे आमच्या राज्यातील तरुणांना राज्यातील प्रत्येक उद्योगात ७० टक्के प्राधान्य देण्यात येणार असल्याचं नवंनियुक्त मुख्यमंत्री कमलनाथ यांनी स्पष्ट केलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
१९८४ शीख विरोधी दंगल: काँग्रेस नेते सज्जन कुमार दोषी; जन्मठेपेची शिक्षा
१९८४ साली दिल्लीत उसळलेल्या शीखविरोधी दंगल प्रकरणात दिल्ली हायकोर्टाने आज महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. हायकोर्टाच्या कनिष्ठ कोर्टाने निर्णय बदलत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सज्जन कुमार यांना दोषी ठरवलं आहे. कुमार यांना शीख विरोधी दंगल प्रकरणातील सहभागाबद्दल जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. दरम्यान, दंगल भडकवणे आणि कट कारस्थान रचणे हे दोन गुन्हे कोर्टात सिद्ध झाले आहेत. परंतु, हत्या प्रकरणात कुमार यांची निर्दोष मुक्तता झाली आहे.
6 वर्षांपूर्वी -
छत्तीसगड: मुख्यमंत्रीपदासाठी भूपेश बघेल यांची निवड
छत्तीसगडमध्ये घवघवीत यश मिळवणाऱ्या काँग्रेसचा मुख्यमंत्री पदाचा पेच अखेर सुटला आहे. याआधी मध्यप्रदेश आणि राजस्थानातील मुख्यमंत्री पदाचा तिढा सोडवण्यात राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना यश आलं होतं, मात्र छत्तीसगडचा पेच कायम होता.
6 वर्षांपूर्वी -
आलू पॉलिटिक्स'चा दुसरा अंक सुरु? पराभूत झाल्याने भाजप चा पराक्रम
आलू पॉलिटिक्स’चा दुसरा अंक सुरु? पराभूत झाल्याने भाजप चा पराक्रम
6 वर्षांपूर्वी -
निवडणूक निकालाआधी रॉबर्ट वड्रा यांच्या कार्यालयावर ईडीची छापेमारी
मागील चार वर्षांहून अधिक काळ संबंधित प्रकरणी तपास यंत्रणा काम करत होती. परंतु, सदर प्रकरणात ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाआधी रॉबर्ट वड्रा यांच्यावर कारवाईची फास आवळण्यात आल्याने वेगळीच शंका व्यक्त करण्यात येते आहे. यावेळी ते आम्हाला आत डांबून ठेवून बोगस पुरावे तयार करत असल्याचा खळबळजनक आरोप वाड्रा यांच्या वकिलांनी प्रसार माध्यमांकडे केला आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार