महत्वाच्या बातम्या
-
निवडणुका संपल्या, पेट्रोल-डिझेलची भाव वाढ सुरु - काँग्रेस
देशातील ४ राज्यांमधील आणि एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुका आता संपल्या आहेत. त्यात प. बंगाल, तामिळनाडू आणि केरळ या प्रमुख तीन राज्यांमध्ये भाजपाला मोठा फटका बसला आहे. केवळ आसाम राखण्यात त्यांना यश आलं आहे. तर पुद्दुचेरीत आधीच पक्ष फोडाफोडी करून जे घडलं होतं तेच घडलं. मात्र निकालानंतर मोदी-शहा यांची राजकीय कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय. मात्र आता त्याचे इतर परिणाम देखील सुरु झाले आहेत आणि ते थेट सामान्य लोकांशी संबंधित आहेत.
4 वर्षांपूर्वी -
मोदीजी कोरोनाविरोधात ज्या निष्ठेने संघर्ष करत आहेत, तेवढ्याच निष्ठेने RSS स्वातंत्र्य लढ्यात इंग्रजांशी लढलेला - काँग्रेस
देशात कोरोनाची दुसरी लाट दिवसेंदिवस भयंकर होत असताना दिसत आहे. शुक्रवारी येथे विक्रमी 4 लाख 1 हजार 911 नवीन संक्रमित आढळले. हे जगातील कोणत्याही देशामधून एका दिवसात मिळालेल्या संक्रमितांचा सर्वात मोठा आकडा आहे. एवढेच नाही तर हा आकडा सर्वात जास्त संक्रमित अमेरिकेमध्ये मिळालेल्या नवीन रुग्णांपेक्षा सात पटींनी जास्त आहे. येथे शुक्रवारी 58,700 केस समोर आल्या. संपूर्ण जगात 8.66 लाख नवीन रुग्णांची ओळख झाली आहे. यामधून जवळपास अर्धे (46%) भारतातच आढळले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
राजीव सातव यांची प्रकृती स्थिर असून कुठलीही गंभीर लक्षणे नाहीत | पुण्यातच उपचार - कुटुंबीयांची माहिती
कॉंग्रेसचे खासदार राजीव सातव यांची प्रकृती स्थिर असून कुठलीही गंभीर लक्षणे नाहीत. मात्र केवळ पर्यवेक्षण व रुटीन तपासणीसाठी मुंबई येथील पथक येणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी गुरुवारी दिव्य मराठीशी बोलताना दिली आहे. खासदार राजीव सातव मागील आठवड्यातच हिंगोली येथे आले होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील कोविड रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवा व रुग्णांची परिस्थिती याची सविस्तर चौकशी केली होती. जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढल्यास काय उपाययोजना कराव्या लागतील याची माहितीही त्यांनी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची भेट घेऊन घेतली होती. त्यानुसार त्यांनी पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे हिंगोली जिल्ह्यातील सुविधांबाबत कळविले होते.
4 वर्षांपूर्वी -
2016 मध्ये बँकेबाहेर लाईन, 2020 मध्ये दवाखान्या बाहेर लाईन, 2021 ला स्मशानभूमी बाहेर लाईन...अजब खेळ आहे - काँग्रेस
कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण केले जाणे अत्यंत आवश्यक आहे. परंतु लसीच्या तुटवड्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे. सध्या ४५ वर्षांवरील सर्वांना लस दिली जात आहे. परंतु त्यासाठी पुरेशी लस मिळत नसल्याने अनेक ठिकाणी केंद्रे बंद करावी लागत आहेत. पुढील महिन्यात १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. पण मर्यादित लोकसंख्येला लस मिळत नसताना लसीकरणाची महामोहीम बारगळणार की काय, अशी भीती व्यक्त होत आहे.
4 वर्षांपूर्वी -
माजी खासदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड यांचं कोरोनामुळे निधन
मुंबई कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार एकनाथ गायकवाड यांचं निधन झालं आहे. महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे वडील एकनाथ गायकवाड यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. मुंबईच्या ब्रीच कॅंडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. या उपचारादरम्यान त्यांचं निधन झाले आहे.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीसजी कृपया खोटे बोलणे थांबवा, त्या यादीत महाराष्ट्रात असलेल्या प्रकल्पांचा समावेश - सचिन सावंत
केंद्र सरकारने महाराष्ट्राला रेमडेसिविर इंजेक्शन्स आणि ऑक्सिजनचा पुरवठा करताना इतर राज्यांच्या तुलनेत दुप्पट मदत केली आहे. त्यामुळे महाविकासआघाडीमधील बोलघेवड्या नेत्यांनी रोज उठून कांगावा करु नये, अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. सध्या लोक दु:खात आहेत. त्यामुळे त्यांना अशाप्रकारचे राजकारण पसंत पडणार नाही. केंद्र आणि राज्य सरकार आपापल्यापरीने महाराष्ट्राला मदत करत आहेत. त्यामुळे मदत मिळत नसल्याचा कांगावा बंद करावा, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
4 वर्षांपूर्वी -
सॅनिटायझरने हात धुवून कोरोना गेला नाही, एकदा भाजप पासून हात धुवून बघा - काँग्रेस
देशात कोरोना संक्रमित लोकांची संख्या पहिल्यांदा दोन लाखांपेक्षा जास्त नोंदवण्यात आली. त्यानंतर कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारची मोकळीक आणि हलगर्जीपणामुळे दुसरी लाट ही अनियंत्रित झाली आहे. सरकार गर्दीच्या कार्यक्रमांवर बंधणे घालण्यात अपयशी ठरली. लस खरेदी करणे आणि व्हायरसच्या रिसर्चसाठी पैसे देण्याचे निर्णय उशीरा आले.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती | मुंबई काँग्रेसकडून कोविड टास्क फोर्स टीमची स्थापना | संपर्क क्रमांक जाहीर
राज्यात गुरुवारी कोरोनाचे ६७,०१३ नवे रुग्ण आढळले. यातील १५,७३२ विदर्भातील तर मराठवाड्यातील ७८०० रुग्णांचा समावेश आहे. राज्यात एकूण ५६८ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून यात विदर्भाचे २५९ आणि मराठवाड्याचे १६६ रुग्ण आहेत.
4 वर्षांपूर्वी -
निर्मला सीतारमन म्हणतील की ICU, व्हेन्टिलेटर्स आणि ऑक्सिजन अभावी झालेले मृत्यू हे ‘अॅक्ट ऑफ गॉड’ आहेत - काँग्रेस
देशात करोनाचा कहर वाढत असून गेल्या २४ तासांत तीन लाखांहून अधिक करोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशात पहिल्यांदाच तीन लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे भारतात नोंद झालेली रुग्णसंख्या ही जगातील सर्वाधिक दैनंदिन रुग्णसंख्या आहे.
4 वर्षांपूर्वी -
आम्हाला काय दोष-शिविगाळ करायची ती करा, पण सत्ता गेल्याची सजा निष्पाप जनतेला देऊ नका - काँग्रेस
देशभरामध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ऑक्सिजनची टंचाई निर्माण झाली आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा करणारी यंत्रणा कोलमडली आहे. असं असतानाच दिल्ली उच्च न्यायालयानेही बुधवारी केंद्र सरकारला चांगलंच फेलावर घेत, “भीक मागा, उधार घ्या, चोरी करा पण ऑक्सिजन द्या”, असं उद्वेगाने सुनावलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
इथे गुजरातमधील लोकं देवाच्या भरोसे हे हायकोर्ट सांगतंय | तर या नेत्याचं मोदींना महाराष्ट्रात आणीबाणीसाठी पत्रं
काँग्रेसचे आमदार आशिष देशमुख यांनी ठाकरे सरकारकडून कोरोनाला रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांवर टीका केली आहे. तसेच कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकारकडून करण्यात येणारे प्रयत्न अपुरे पडत असल्याचे सांगत आशिष देशमुख यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. या पत्रामधून आशिष देशमुख यांनी राज्यात आरोग्य आणि आर्थिक आणीबाणी लावण्याची मागणी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती | काही व्हॉट्सअप फॉरवर्ड्स खरोखरच फॉरवर्ड करण्याच्या योग्यतेचे असतात
देशभरात मेडिकल ऑक्सीजनचे संकट वाढत आहे आणि परिणामी इस्पितळांमध्ये मृत्यूचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. वेळेवर ऑक्सीजन मिळत नसल्याने अनेक कोरोना रुग्णांचे प्राण जात आहेत. आता केंद्र सरकार निवडणुकीच्या प्रचारातून सामान्य लोकांसाठी थोडा वेळ काढताना दिसत आहेत. केंद्र सरकारने 50 हजार मॅट्रीक टन मेडिकल ऑक्सीजनची आयात करण्याचा निर्णय घेतला आहे.
4 वर्षांपूर्वी -
जिवंत असलेल्यांना इस्पितळं नाहीत अन मृतांना स्मशान | आणि पंतप्रधान भाषणं देत आहेत
देशात कोरोनाचा वेग सलग वाढवणारा आहे. सोमवारी 1 लाख 60 हजार 694 नवीन रुग्ण आढळले. 96,727 बरे झाले आणि 880 जणांचा मृत्यू झाला. हा सलग दुसरा दिवस होता जेव्हा नवीन रुग्ण 1 लाख 60 हजारांपेक्षा जास्त आढळले. रविवारी 1 लाख 59 हजार 914 रुग्णांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.
4 वर्षांपूर्वी -
Lockdown Updates | मुख्यमंत्री आजच निर्णय घेणार, नियमावलीही आजच तयार होणार - अस्लम शेख
राज्यात सोमवारी एकूण ५१,७५१ नवे रुग्ण, तर २५८ रुग्णांचा मृत्यू झाला. यातील १३३ रुग्ण एकट्या विदर्भातील आहेत. मराठवाड्यात ८७ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत ३४ लाख ५८,९९६ रुग्णांची नोंद झाली असून २८,३४,४७३ रुग्ण बरे झाले.
4 वर्षांपूर्वी -
मोदीचा लॉकडाउन मास्टरस्ट्रोक | आमचा लॉकडाउन अत्याचार? - अतुल लोंढे
राज्यात रविवारी ६३,२९४ नव्या कोरोनाबाधित आणि ३४९ मृत्यूची नोंद झाली. गेल्या २४ तासांत ३४,००८ रुग्ण बरे होऊन घरी परतले. सध्या ५ लाख ६५,५८७ रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्णांची एकूण संख्या ३४ लाख ७ हजार २४५ वर गेली आहे. २७,८२,१६१ रुग्ण बरे झाले असून रिकव्हरी रेट ८१.६५ आहे.
4 वर्षांपूर्वी -
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचं कोरोनामुळे निधन
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि बिलोली मतदार संघाचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे शनिवारी पहाटे मुंबईत निधन झाले. ते 63 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. काही दिवसांपूर्वीच रावसाहेब अंतारपूरकर यांना कोरोनाची लागण झाली होती. तेव्हापासून त्यांच्यावर सातत्याने उपचार सुरु होते. अखेर आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.
4 वर्षांपूर्वी -
लस निर्यात, कंट्रोल, पुरवठा आणि नियम करतात मोदी | तुटवड्याला ठाकरे, नेहरू जवाबदार
सध्या राज्यात मोठ्या प्रमाणावर लसीचा तुटवडा जाणवत असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी राज्य सरकारवर आरोप केले होते. त्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सर्व आरोप फेटाळत स्पष्टीकरणही दिले. दरम्यान केंद्रीय माहिती व दूरसंचार मंत्री प्रकाश जावडेकर यांनी महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला होता. त्यावर राजेश टोपेंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार प्रत्युत्तर दिले होतं.
4 वर्षांपूर्वी -
‘युजलेस’ जावडेकर! गुजरातची हुजरेगिरी करून मातृभूमीची बदनामी करणारे हे महाराष्ट्रद्रोहीच - काँग्रेस
राज्यात केवळ दोन ते तीन दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा उपलब्ध आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारला लस पुरवण्याची कळकळीची विनंती केली. तसेच गुजरात छोटं राज्य असूनही महाराष्ट्रापेक्षा गुजरातला अधिक लसींचा पुरवठा करण्यात आल्याचा आरोप टोपे यांनी केला. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारने लसीकरणाचं योग्य नियोजन केलं नसल्याचा आरोप केला आहे. राज्यातील अनेक केंद्रांवर लसच उपलब्ध नसल्याने लसीकरण बंद ठेवण्यात आलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
परमबीर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली वाझे काम करत होता | भाजपचा खोटेपणा उघडकीस येतोच - सचिन सावंत
मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी गृह खात्याला पाठवलेल्या अहवालात माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. सचिन वाझे यांची पुनर्नियुक्ती परमवीर सिंग यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत करण्यात आली होती. मुंबई पोलीस आयुक्तांनी गृह खात्याला पाठवलेला अहवाल प्रसार माध्यमांच्या हाती लागला आहे.
4 वर्षांपूर्वी -
ग्राहकांनी स्वतः मीटर रीडिंग पाठवून सहकार्य करावं - ऊर्जा मंत्री
राज्यात गेले अनेक महिने वाढीव वीज बिलाचा मुद्दा गाजत आहे. त्याबाबत उर्जामंत्री नितीन राऊत यांनी महत्वाची माहिती दिली आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ग्राहकांनी स्वतः मीटर रीडिंग पाठवून तसंच वीज बिल भरून महावितरणला सहकार्य करण्याचं आवाहन राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केलं आहे. वीज ग्राहकांच्या तक्रारी सोडवण्याला प्राधान्य देण्याचे आदेशही यावेळी त्यांनी महावितरण व्यवस्थापनाला दिले आहेत. मंत्रालय येथे वीज बिल व थकबाकी यासंदर्भात बैठक पार पडली.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Pan Card Online | 90% लोकांना ठाऊक नाही पॅनकार्ड मार्फत लोन कसा मिळतो, कशा पद्धतीने अप्लाय करा, माहिती जाणून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
- Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Kotak Mutual Fund | बिनधास्त SIP करून 4 पटीने पैसा वाढवा, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड स्कीम सेव्ह करा
- RVNL Share Price | टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, RVNL शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: RVNL
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांनो इकडे लक्ष द्या, 'ही' म्युच्युअल फंड योजना 1 लाखांवर देईल 6,13,521 रुपये परतावा
- Shark Tank India | महिला सुद्धा सुरु करू शकतात असा स्टार्टअप, आई-मुलीच्या स्टार्टअपला शार्क टँक इंडियातून फंडिंग
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC