महत्वाच्या बातम्या
-
भाजप आमदाराच्या गाडीत EVM मशीन सापडली | निवडणूक आयोग भाजपला मदत करतंय का? - अतुल लोंढे
पश्चिम बंगाल आणि आसाम विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात गुरुवारी भरभरून मतदान झाले. पश्चिाम बंगालमध्ये ३० जागांसाठी तब्बल ८०.४३ टक्के तर आसामच्या ३९ जागांसाठी ७४.६९ टक्के मतदानाची नोंद झाली. या टप्प्यात नंदिग्राममध्ये मतदान झाले असून, ममता आणि त्यांचे प्रतिस्पर्धी भाजप उमेदवार सुवेंदू अधिकारी या दोघांनीही विजयाचा दावा केला. बंगालमध्ये हिंसाचाराच्या तुरळक घटना घडल्या. मतदान प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याच्या अनेक तक्रारी तृणमूल काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केल्या.
4 वर्षांपूर्वी -
पोलिस आयुक्तालयातील DVR गायब | परमवीरसिंह यांनी ATS ला चकविले | चौकशी व्हावी
सचिन वाझे आणि मुंबई माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यातील भेटींवर शंका उपस्थित करत काँग्रेसने काही सवाल केले आहेत. सचिन वाझेंनी गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधात थेट परमबीर सिंग यांच्याकडे तक्रार केली होती. वाझे हे एपीआय दर्जाचे अधिकारी होते. त्यांच्यावर अनेक अधिकारी होते. या सर्व अधिकाऱ्यांना बायपास करून वाझेंनी थेट सिंग यांच्याकडे तक्रार केली. त्यामुळे वाझे सिंग यांच्या किती जवळचे होते हे स्पष्ट होते.
4 वर्षांपूर्वी -
२००२ मध्ये गुजरातच्या पोलीस प्रमुखांनी अमित शहांवर पोलीस दलाचा गैरवापर केल्याचा आरोप केलेला - काँग्रेस
परमबीर सिंग यांचा लेटर बॉम्बनंतर काँग्रेसने देखील महाविकास आघडीचा बचाव करताना भाजपवर प्रहार केला आहे. या संदर्भात काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटलं की, ‘२००२ मध्ये डी. जी. वंजारा गुजरात पोलीस दलाचे प्रमुख होते. गृहमंत्री अमित शाह पोलीस दलाचा गैरवापर करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यावेळी शहांनी राजीनामा दिला होता का? वंजारा यांच्यासारखेच आरोप पोलीस अधिकारी संजीव भट यांनी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींवर केले होते. त्यावेळी मोदींनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता का?, असे प्रश्न सावंत यांनी विचारले.
4 वर्षांपूर्वी -
CDR चा स्त्रोत आणि CDR स्वतः कडे ठेवून फडणवीस २ आरोपींना पाठीशी घालत आहेत - काँग्रेस
राज्य संकल्पिय अधिवेशनात फडणवीसांनी स्वतःलाच गोत्यात आणलं आहे असंच म्हणावं लागेल. सत्ताधाऱ्यांनी देखील याची आठवण त्यांना विधिमंडळातच करून दिली होती. मात्र, त्यानंतर देखील ते माझ्यावर कारवाई करा असं तावातावाणे बोलून गेले खरे, मात्र आता राजकीय अडचणीत सापडले आहेत. काँग्रेसने ते थेट न्यायालयाचा दाखल देत फडणवीसांना सल्ला दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
सबसिडी, कर्जमाफी फक्त कॉपोर्टेस आणि मोदी सरकारच्या मित्रांना | बाकी सर्वांनी आत्मनिर्भर व्हा
आत्मनिर्भर भारत हा केवळ सरकारच्या धोरणाचा भाग नसून तो राष्ट्रीय भावना व जिद्दीचा भाग आहे. स्वयंपूर्ण भारताचा हा मंत्र आता देशातील खेड्यापाड्यात पोहोचत आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ मार्चच्या ‘मन की बात’ कार्यक्रमात व्यक्त केले होते.
4 वर्षांपूर्वी -
इंधन - गॅस दरवाढीचा निषेध | काँग्रेसचे आमदार सायकलवरून विधानभवनात
‘अक्कड बक्कड बंबे बो, 80, 90 पुरे 100’, ‘आपण पुन्हा आदिमानवांच्या दिशेने प्रवास करत आहोत का?’, असे फलक हातात घेऊन काँग्रेसने इंधन दरवाढीचा अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला. काँग्रेसच्या सर्व मंत्री, आमदार आणि नेत्यांनी आज सायकलवरून प्रवास करत विधान भवन गाठले. यावेळी काँग्रेसचे सर्व बडे नेते उपस्थित होते.
4 वर्षांपूर्वी -
मास्क लावण्याचा सल्ला पालकमंत्र्यांनी भेंडी बाजार आणि बेहराम पाड्यात पण द्यावा - मनसे
आठवडा अखेरीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. नागरिकांनी कोरोना रोखण्यासाठी आखून दिलेल्या नियमांचे पालन करावे, अन्यथा लॉकडाउनचा कटू निर्णय घ्यावा लागेल, असा त्यांनी इशारा दिला. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री वारंवार लॉकडाउनचे इशारे देत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
सरदार पटेलांचा एव्हढा घोर अपमान फक्त भाजपा आणि संघीच करू शकतात - आ. भाई जगताप
जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असे अशी ओळख असलेल्या गुजरातच्या मोटेरा येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नावं देण्यात आलं आहे. स्टेडियमचं नामकरणं नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद असं करण्यात आलं आहे. याच मैदानावर आजपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना प्रकाशझोतात रंगणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
पुदुचेरीत काँग्रेसला मोठा धक्का | अल्मपतात आलेले पुदुचेरीतील सरकार अखेर कोसळले
पॉंडिचेरीमध्ये कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे. ६ आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यामुळे अल्मपतात आलेले पुदुचेरीतील काँग्रेस सरकार अखेर कोसळले आहे. मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांना आज (२२ फेब्रुवारी) विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावेळी बहुमत सिद्ध करण्यात अपयश आले. काँग्रेसच्या सहा आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे हे सरकार पडणार, हे निश्चित होते. त्यामुळे व्ही. नाराणसामी आणि काँग्रेसच्या आमदारांनी बहुमत चाचणीआधीच सभात्याग केला. तत्पूर्वी व्ही. नारायणसामी यांनी आपल्या शेवटच्या भाषणात काँग्रेसच्या बंडखोर आमदारांवर शरसंधान साधले आहे.
4 वर्षांपूर्वी -
शिवसेना आ. वैभव नाईकांच्या कार्यपद्धतीला कंटाळून उपजिल्हा प्रमुख अभय शिरसाट काँग्रेसमध्ये
शिवसेनेतील पक्षांतर्गत वादाला कंटाळलेले उपजिल्हा प्रमुख अभय शिरसाट यांनी अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मुंबईत बुधवारी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव जगताप यांच्या उपस्थितीत अभय शिरसाट यांच्या पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला. त्यांच्या जाण्याने आगामी काळात कुडाळमध्ये शिवसेनेला खिंडार पडण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून अभय शिरसाट यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे सांगितले जाते.
4 वर्षांपूर्वी -
ट्रॅक्टर रॅली काढून काँग्रेसचं शक्तीप्रदर्शन | काँग्रेस महाराष्ट्रात एक नंबरचा पक्ष करणार
काँग्रेस नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे यांनी महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील यांच्या उपस्थितीत मावळते प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडून औपचारिकरित्या पदभार स्वीकारला आहे, मुंबईतील टिळक भवन येथे हा कार्यक्रम पार पडला, त्यानंतर मुंबईत काँग्रेसनं शक्तीप्रदर्शन करून ऑगस्ट क्रांती मैदानापर्यंत ट्रॅक्टर रॅली काढली. यावेळी हजारोंच्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
4 वर्षांपूर्वी -
जुमलाजीवी, दंगलजीवी, रक्तजीवी, अदानीजीवी, अंबानीजीवी, फेकुजीवी, थापाजीवी आणि...
मागील काही काळापासून ह्या देशात नवी बिरादारी समोर आलीय, ती आहे आंदोलनजीवी, कुठलेही आंदोलन असेल हे तिथं पोहोचतात, वकिलांचं असो, स्टुडंटसचं कुठेही आंदोलन असेल तिथं पोहोचतात, देशानं ह्या आंदोलनजीवीपासून सावध रहायला हवं, आंदोलनजीवी हे सगळे परजीवी असतात, ज्यांचं ज्यांचं सरकार आहे त्या सगळ्यांना ह्या आंदोलनजीवी, परजीवींचा अनुभव येतो असं मोदी म्हणाले होते.
4 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्र काँग्रेसचा कारभार नाना पटोले यांच्या हाती | सोबतीला 6 कार्यकारी अध्यक्ष
काँग्रेसनं नाना पटोलेंसारख्या आक्रमक नेत्याला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. नाना पटोलेंच्या साथीला 6 कार्यकारी अध्यक्ष आणि 10 उपाध्यक्षांची तगडी टीम असणार आहे. काँग्रेस हायकमांडच्या या निर्णयानंतर काँग्रेस महाराष्ट्रात बळकट कशी होणार ते पाहावे लागणार आहे. महाराष्ट्र काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डामध्ये एकूण 37 सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील प्रमुख काँग्रेस नेत्यांचा समावेश आहे
4 वर्षांपूर्वी -
नाना पटोले यांचा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा
काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला आहे. या राजीनाम्यानंतर नाना पटोले यांनी मंत्रिपद दिलं जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. याबाबत नाना पटोले यांना प्रश्न विचारला असता त्यांनी पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारु, असं उत्तर त्यांनी दिलं. पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.
4 वर्षांपूर्वी -
मी अण्णा आहे | आमच्याकडे ऑर्डर घेऊन आरोप केले जातात | अटी लागू
प्रजासत्ताक दिनापासून दिल्लीतील परिस्थिती गंभीर होताना दिसत आहे. आंदोलन सुरू असलेल्या ठिकाणी धुमश्चक्री झाल्या. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी आंदोलन तीव्र करण्याचा निर्धारही केला आहे. दुसरीकडे कृषी कायद्यांविरोधात समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलनाची इशारा दिला होता. मात्र, शुक्रवारी त्यांनी आंदोलन स्थगित करत असल्याची घोषणा केली. अण्णा हजारे यांच्या या निर्णयावर सोशल मीडियावर शंका उपस्थित केल्या जात असून, शिवसेनेनंही अण्णा हजारे यांना काही सवाल केले होते.
4 वर्षांपूर्वी -
राम मंदिरासाठी BJP-RSS'ने गोळा केलेला निधी भाजपाच्या पक्षनिधीसाठी वापरला जाण्याची शक्यता
अयोध्येमध्ये राम मंदिर उभारणीसाठी देशपातळीवरती राम मंदिर तिर्थक्षेत्र ट्रस्टच्या माध्यमातून निधी गोळा केला जात आहे परंतु या ट्रस्टबरोबरच भाजपा व आरएसएस देखील घरोघरी जाऊन रोखीने पैसे गोळा करत आहेत. भारतीय जनता पक्ष, आरएसएसची पार्श्वभूमी पाहता या माध्यमातून भाजपा-संघाकडून जनतेला लुबाडले जाण्याची मोठी शक्यता असून सदर पैसा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या घरी किंवा भारतीय जनता पक्षाच्या पक्षनिधीसाठी वापरला जाण्याची शक्यता आहे.
4 वर्षांपूर्वी -
मनसेने नेमकी कितीवेळा भूमिका बदलली आहे, हे राज ठाकरे यांनाही सांगता येणार नाही
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे १ मार्च ते ९ मार्च दरम्यान एका दिवशी अयोध्येला जाणार असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली. मनसेची आगामी निवडणुकांच्या तयारीबाबतची बैठक राज ठाकरे, अमित ठाकरे, अनिल शिदोरे आणि इतर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत पार पडली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बाळा नांदगावकर बोलत होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यातील जनतेपर्यंत पोहोचण्याचा मेगा प्लॅन केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या पत्नीला ईडीची नोटीस
महाविकास आघाडी सरकारच्या मंत्री आणि आमदारांच्या पाठीमागे लागलेला सक्तवसुली संचालनालय अर्था ईडीचा (ED) ससेमिरा अजूनही कायम आहे. आता राज्याचे सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांची पत्नी स्वप्नाली भोसले यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
फक्त शेतकरी विरोधातल्या बातम्या दाखवून गोदी मीडिया सत्य का लपवत आहे..? - भाई जगताप
मागील दोन महिन्यांपासून दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनी काढलेल्या ट्रॅक्टर मोर्चाला हिंसक वळण लागलं. आंदोलकांनी बॅरिकेड्स पाडून लाल किल्ल्यात प्रवेश केला. यावेळी अनेक भागांत आंदोलक आणि पोलीस आमनेसामने आले. लाल किल्ल्यात घुसलेल्या आंदोलकांनी शीखांचा धर्मध्वज फडकावल्यानं वादंग माजला आहे. लाल किल्ल्यात शिरलेल्या आंदोलकांची ओळख पटवण्याचं काम सध्या पोलिसांकडून सुरू आहे.
4 वर्षांपूर्वी -
शेतकरी आंदोलन हिंसक होण्यास पंतप्रधान मोदी जबाबदार | पृथ्वीराज चव्हाण यांचं टीकास्त्र
सिंधु बॉर्डरवरून ही रॅली निघणार होती. परंतु, या मार्गाने न जाता शेतकरी आयटीओपर्यंत पोहोचले. त्यामुळे पोलिसांनी शेतकऱ्यांना अडवल्याने पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये धुमश्चक्री उडाली. त्यातच दगडफेक सुरू झाल्याने पोलिसांना लाठीमार करावा लागला. याचवेळी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून जमावाला पांगवण्यास सुरुवात केली.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Pan Card Online | 90% लोकांना ठाऊक नाही पॅनकार्ड मार्फत लोन कसा मिळतो, कशा पद्धतीने अप्लाय करा, माहिती जाणून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
- Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Kotak Mutual Fund | बिनधास्त SIP करून 4 पटीने पैसा वाढवा, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड स्कीम सेव्ह करा
- RVNL Share Price | टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, RVNL शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: RVNL
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांनो इकडे लक्ष द्या, 'ही' म्युच्युअल फंड योजना 1 लाखांवर देईल 6,13,521 रुपये परतावा
- Shark Tank India | महिला सुद्धा सुरु करू शकतात असा स्टार्टअप, आई-मुलीच्या स्टार्टअपला शार्क टँक इंडियातून फंडिंग
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC