महत्वाच्या बातम्या
-
४० शेतकऱ्यांच्या आत्महत्येसाठी जबाबदार असल्याचा कंपनीवर आरोप | त्याच उद्योजकाला पद्मभूषण
दरम्यान, पद्म पुरस्कारावरून आरोप-प्रत्यारोप होणे नवे नाही. यंदाचं वर्षही यास अपवाद नसून काँग्रेसनं केंद्रातील सत्ताधारी भाजपवर पहिला वार केला आहे. प्रसिद्ध उद्योजक रजनीकांत श्रॉफ यांना ‘पद्मभूषण’ पुरस्कार देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाबद्दल काँग्रेसनं आश्चर्य व्यक्त केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
अर्णब गोस्वामींनी मुंबई पोलिसांपासून वाचण्यासाठी दिल्लीमध्ये बस्तान हलविले - आ. भाई जगताप
अर्णब आणि पार्थोदास गुप्तासोबत केलेल्या संवादातून बालाकोटच्या लष्करी कारवाई तसेच पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्याबाबतचादेखील संवाद झाल्याचे समोर आले आहे. याविरोधात केंद्र सरकारने काहीच पाऊले न उचलल्याने कांग्रेसने आता मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईतील काँग्रेस कार्यकर्ते, नेते मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणार आहेत. तसेच अर्णब यांच्या अटकेची मागणी करणार आहेत. मुंबई काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष आणि आमदार भाई जगताप यांनी शनिवारी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत ही घोषणा केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
अमेरिकेची एका माथेफिरू, उद्धट माणसाच्या तावडीतून सुटका झाली | थोडा धीर धरा...
डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते जो बायडन यांनी अमेरिेकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. वॉशिंग्टनमधील कॅपिटल हिल येथे कडेकोट बंदोबस्तामध्ये झालेल्या सोहळ्यात बायडन यांना अमेरिकेच्या मुख्य न्यायाधीशांना पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.
4 वर्षांपूर्वी -
जवानांच्या मृत्यूनंतर जल्लोष करणाऱ्यांमुळे 'भक्तांच्या' भावना दुखावल्या जात नाहीत...कोणी टीका केली?
भारतीय लष्कराच्या कारवाईबाबतची संवेदनशील माहिती अर्णव गोस्वामी यांच्याकडे कशी पोहचली? अर्णव यांनी आणि पार्थोदास गुप्तासाेबत केलेल्या संवादातून बालाकोटच्या लष्करी कारवाई तसेच पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्याबाबतचादेखील संवाद झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणाची सरकारने गंभीर दखल घेतली आहे. मुंबईत याबाबत तपासी अधिकाऱ्यांसह सुरक्षा यंत्रणांची महत्वाची बैठक मंगळवारी (दि.१८) बोलावली आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना दिली.
4 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रात काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी नाना पटोले यांची वर्णी लागण्याची शक्यता
महाराष्ट्रात काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी नाना पटोले यांच्या नावावर हायकमांडने अंतिम शिक्कामोर्तब केल्याची माहिती मिळत आहे आहे. गेल्या काही आठवड्यांपासून काँग्रेसमध्ये ही अंतर्गत बदलाची प्रक्रिया सुरु होती. त्यात नाना पटोले यांचं नाव निश्चित झाल्याचं म्हटलं जात आहे. नाना पटोले यांच्या रुपाने काँग्रेसचा नवा प्रदेशाध्यक्ष हा विदर्भातून असेल. पुढच्या दोन ते तीन दिवसात कधीही नाना पटोले यांच्या निवडीबाबत अधिकृत घोषणा होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
चॅट अर्णबचा उघड झालाय | पोलखोल भाजपाची होते आहे - भाई जगताप
टीआरपी घोटाळ्याप्रकरणी मोठ्या प्रमाणात घडलेल्या घटनेत रिपब्लिक टीव्हीचे अर्णब गोस्वामी यांच्या व्हाट्सअँप संवादाचा 500 पानी दस्तऐवज सोशल मीडियावर लीक झाल्याने अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. संबंधित चॅटमध्ये गोस्वामी यांचे पंतप्रधान कार्यालय आणि सत्तारूढ सरकारच्या सदस्यांशी जवळीक, टीआरपी त्यांच्या बाजूने झुकवणे आणि भाजपा सरकारची मदत घेण्याचे प्रयत्न आणि बरेच काही समोर आलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
पंतप्रधान मोदी यांचा ट्रम्प केल्याशिवाय राहणार नाही | विरोधात निवडणुक लढविण्यास तयार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरूद्ध लोकसभा निवडणुकीला उभारण्याची तयारी काँग्रेस खासदाराने दर्शवली आहे. पक्षाने आदेश द्यावा, मी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून लढायला तयार आहे, असं वक्तव्य काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांनी केलं आहे. भाजप ही आमची पैदास आहे. 1907 मध्ये यांनी प्रवेश केला आणि 1925 मध्ये जन्म घेतला. ज्या पद्धतीने अमेरिकेतून ट्रम्प हद्दपार झाला, त्यापद्धतीने मोदींना भारतातून हाकलल्याशिवाय राहणार नाही, असं बाळू धानोरकर यांनी म्हटलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
सोशल मीडिया | भाजपचे अपप्रचार तंत्र | काँग्रेसकडून सोशल मीडिया वॉरियर्स टीमची स्थापना
भारतीय जनता पक्षातर्फे समाज माध्यमांवर सुरू असलेला अपप्रचार, खोट्या बातम्या तसेच जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्नांना हाणून पाडण्यासाठी काँग्रेसनं जोरदार कंबर कसलीय. आता भारतीय जनता पक्षाचा अपप्रचार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे ‘सोशल मीडिया वॉरियर्स’ हाणून पाडणार आहेत, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि सोशल मीडिया विभागाचे अध्यक्ष अभिजीत सपकाळ यांनी व्यक्त केला.
4 वर्षांपूर्वी -
कृषी कायदे | १५ जानेवारीला कॉंग्रेसचा देशभरातील राजभवनांना घेराव घालणार
मागील महिन्याभरापासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्यात केंद्र सरकारला अपयश आलं आहे. उलट शेतकऱ्यांना सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला केंद्र सरकारने दिला आहे. त्याचा निषेध म्हणून येत्या 15 जानेवारी रोजी शेतकरी अधिकार दिनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस देशभरातील राजभवनांना घेराव घालणार आहे. काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी आज पत्रकार परिषदेत या आंदोलनाची घोषणा केली.
4 वर्षांपूर्वी -
मुंबई काँग्रेसनंतर राज्य काँग्रेसमध्ये मोठे बदल होणार | भविष्यातील मोर्चेबांधणी
नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात काँग्रेसमध्ये बदलाचे वारे वाहत आहे. राज्याचे महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे प्रदेशाध्यक्षपदातून मुक्त होणार आहे. नवीन दिल्लीत पोहोचून थोरात यांनी आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा प्रस्ताव दिल्याची माहिती समोर आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
डिअर NCB, तुम्ही या व्हिडीओबद्दल कंगनाला कधी फोन करणार आहात? | राम कदम सुद्धा लक्ष
सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर कंगनाने महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केले. त्यावरुन राज्य सरकारमधील अनेक मंत्री आणि नेत्यांकडून कंगनावर जोरदार टीका करण्यात आली. आता काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी कंगनाचा एक जुना व्हिडीओ ट्वीट करत, NCB’कडे कारवाईची मागणी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
काँग्रेसचा नारा माझी मुंबई, माझी काँग्रेस | मुंबईत काँग्रेस स्वबळावरच लढणार
काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून मुंबई काँग्रेसचे नवे अध्यक्ष भाई जगताप आणि कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा यांनी सोमवारी पक्षाचे प्रभारी एच. के. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आपल्या पदाची सूत्रे हाती घेतली. यावेळी आगामी निवडणुकीत मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा तिंरगा झेंडा फडकावण्याचा निर्धार भाई जगताप यांच्यासह काँग्रेसच्या सर्वच नेत्यांनी बोलून दाखवला. मुंबईत स्वबळावर लढण्याची इच्छा सर्व कार्यकर्त्यांची असून, विरोधकांसाठी जिथे आवश्यक आहे, तिथे एक घाव दोन तुकडे करून जोरदार झटका दिला जाईल.
4 वर्षांपूर्वी -
ED राजकारण | भाजपाला हा धंदा खूप महागात जाईल | वड्डेटीवार यांचा इशारा
भारतीय जनता पक्षाला राज्यातील बहुजनांचे राजकारण संपवायचे आहे. आज ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांना इडीची नोटीस आली, उद्या मला देखील येऊ शकते. बदल्याच्या राजकारणाचा पायंडा भारतीय जनता पक्षाने पाडला आहे. परंतु , त्यांनी एक कायम लक्षात ठेवावे की कोणीही सत्तेचा मुकुट घेऊन आलेला नाही. जे पेराल ते उगवेल आणि त्याचे वाईट परिणाम भोगावे देखील लागतील,’ असा इशारा ओबीसी समाजाचे नेते, राज्याचे मदत व पुनर्वसन विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवर यांनी भारतीय जनता पक्षाला दिला.
4 वर्षांपूर्वी -
काँग्रेसकडून लोटसचं ऑपरेशन | नगरमध्ये मोठे भाजप पदाधिकारी काँग्रेसमध्ये
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान, तत्कालीन सत्ताधारी भाजप-शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांचा लोंढा होता. मात्र हा लोंढा आता उलट दिशेने वाहण्यास सुरुवात झाली आहे. चक्क भाजपमधील कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat) यांच्या उपस्थितीत नगरमधील अकोले इथं हा ‘चमत्कार’ घडला आहे. संगमनेर आणि अकोले इथल्या भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
4 वर्षांपूर्वी -
मुंबईत तुमच्या आहेत त्या जागा वाचवून दाखवा | भाई जगतापांचं भाजपला चॅलेंज
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतही महाविकास आघाडीनं भाजपला जोरदार धक्का दिलाय. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका निवडणुकीतही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढेल, असा दावा केला जातोय. अशावेळी मुंबई काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष भाई जगताप यांनी काँग्रेस मुंबईत स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली तरी सहकारी पक्षांसोबत मैत्रीपूर्ण लढत केली जाईल असं देखील स्पष्ट केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
Maharashtra Congress | मुंबईत भाई जगताप यांच्यासोबत अनुभवी टीमही मैदानात
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतही महाविकास आघाडीनं भाजपला जोरदार धक्का दिलाय. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका निवडणुकीतही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढेल, असा दावा केला जातोय. अशावेळी मुंबई काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष भाई जगताप यांनी काँग्रेस मुंबईत स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केलीय.
4 वर्षांपूर्वी -
करण जोहरच्या पार्टीचा व्हिडिओ २०१९ मधील | तेव्हा गृहमंत्री फडणवीसांनी चौकशी का केली नाही
बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात एनसीबीने (NCB) निर्माता करण जोहरला समन्स जारी केलं आहे. यामुळे चांगलीच खळबळ माजली आहे. याआधी देखील एनसीबीने बॉलिवूडमधील अनेक बड्या कलाकारांना ड्रग्ज प्रकरणात समन्स पाठवून चौकशी केलीय. त्यानंतर अनेक कलाकारांच्या अडचणीत वाढही होताना दिसली. त्यामुळे आता यावेळी करण जोहरबाबत काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे
4 वर्षांपूर्वी -
मुंबई काँग्रेस अध्यक्षपद | माजी आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी आणि भाई जगताप यांची नावं चर्चेत
मुंबई विभागीय काँग्रेसच्या (Congress) अध्यक्षपदासाठी काँग्रेसचे आ. भाई जगताप, माजी मंत्री सुरेश शेट्टी, चरणसिंह सप्रा अशी नावे चर्चेत असल्याचे समजते. काँग्रेस पक्षाचे प्रभारी एच. के. पाटील यांनी आगामी निवडणुका लक्षात घेऊन राज्यातील तसेच मुंबईतील पक्ष संघटनेत बदल करण्याचे संकेत यापूर्वीच दिले होते. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदासाठी इच्छूकांच्या समर्थकांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती | तर भारत आशियातील सर्वात गरीब देश....हा?
मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स जिओ आणि मार्क झुकरबर्ग यांची फेसबुक या कंपन्यांमध्ये भागीदारीचा करार झाल्यानंतर अंबानी पुन्हा एकदा आशिया खंडातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्यांनी अलिबाबाचे संस्थापक जॅक मा यांना मागे टाकले आहे. फेसबुकबरोबर झालेल्या व्यवहारामुळे मुकेश यांची संपत्ती ४ अब्ज डॉलरने वाढून ४९ अब्ज डॉलवर पोहोचली आहे.
4 वर्षांपूर्वी -
राजस्थान शहरी स्थानिक स्वराज्य संस्थां निवडणुक | काँग्रेस मोठा पक्ष | भाजप तिसऱ्या स्थानी
राजस्थानमधील तब्बल ५० शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी ११ डिसेंबर रोजी मतदान झाले होते. शहरी भागातील एकूण १७७५ प्रभागांमध्ये ही निवडणूक झाली होती. राजस्थानचे निवडणूक आयुक्त पी.एस. मेहरा यांनी सांगितले की, ११ डिसेंबर रोजी ५० स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मतदान झाले होते. ज्यामध्ये एकूण ७९.९० टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Pan Card Online | 90% लोकांना ठाऊक नाही पॅनकार्ड मार्फत लोन कसा मिळतो, कशा पद्धतीने अप्लाय करा, माहिती जाणून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
- Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Kotak Mutual Fund | बिनधास्त SIP करून 4 पटीने पैसा वाढवा, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड स्कीम सेव्ह करा
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- RVNL Share Price | टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, RVNL शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: RVNL
- Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांनो इकडे लक्ष द्या, 'ही' म्युच्युअल फंड योजना 1 लाखांवर देईल 6,13,521 रुपये परतावा
- Shark Tank India | महिला सुद्धा सुरु करू शकतात असा स्टार्टअप, आई-मुलीच्या स्टार्टअपला शार्क टँक इंडियातून फंडिंग
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC