महत्वाच्या बातम्या
-
पेट्रोल पंपांचं नाव 'नरेंद्र मोदी वसुली केंद्र' करा | इंधन दरवाढीवरून काँग्रेसचा हल्लाबोल
पेट्रोल आणि डिझेल दरवाढीने लवकरच महागाईचा आगडोंब उसळण्याची (Rising petrol and diesel prices are likely to push up inflation) शक्यता आहे. सलग सहाव्या दिवशी कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलमध्ये वाढ केली होती. पेट्रोल २० पैशांनी तर डिझेल २६ पैशांनी महागले आहे. डिझेल दरवाढीने मालवाहतूकदारांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
4 वर्षांपूर्वी -
मला कुठल्याही चौकात बोलवा म्हणता | शेटजी, शेतकऱ्यांच्या सिंघु बॉर्डर चौकात जा की
केंद्राचे प्रतिनिधी शेतकऱ्यांना भेटत असले तरी पंतप्रधानांनी एकदाही आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतलेली नाही. दरम्यान, नोटबंदीच्या वेळी मला फक्त पन्नास दिवस द्या आणि त्यानंतर मी तुमच्यासमोर कोणत्याही चौकात यायला तयार आहे आणि तुम्ही द्याल ती शिक्षा मला मान्य असेल असं मोदींनी म्हटलं होतं. त्याचाच धागा पकडून काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी मोदींना जोरदार टोला लगावला आहे.
4 वर्षांपूर्वी -
अंबानीची जिओ आल्यानंतर BSNL देशोधडीला लागली | तीच अवस्था शेतकऱ्यांची या विधेयकाने होईल
नवीन कृषी कायद्याविरोधात निषेध करत आंदोलन करणार्या शेतकऱ्यांनी ८ डिसेंबरला भारत बंदची घोषणा केली आहे. या भारत बंद दरम्यान ८ तारखेला भारत सकाळपासून संध्याकाळपर्यंत बंद राहणार असल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलं आहे. सिंघू सीमेवर जय किसान चळवळीतील योगेंद्र यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत बंद दरम्यान 8 तारखेला सकाळपासून संध्याकाळपर्यंत भारत बंद ठेवण्यात येणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
भारत बंद’ला काँग्रेसचा जाहीर पाठिंबा | शेतकऱ्यांसोबत थेट रस्त्यावर उतरणार
मागील काही दिवसांपासून केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात पंजाब आणि हरयाणाचे शेतकरी दिल्ली सीमेवर आंदोलन करत आहे. केंद्र सरकारने संसदेत आणलेले तीन कृषी कायदे रद्द करावे, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. याच पार्श्वभूमीवर तोडगा काढण्यासाठी मोदी सरकार आणि संघटनांची शनिवारी बैठक झाली. परंतु, या बैठकीत शेतकऱ्यांच्या मागणीवर अद्याप पूर्णपणे तोडगा निघाला नसून आता पुढची चर्चा ही 9 डिसेंबरला होणार आहे. मात्र तत्पूर्वी म्हणजे ८ डिसेंबरला शेतकरी संघटनांनी भारत बंद पुकारला आहे. त्याला राजकीय पक्षांचा जाहीर पाठिंबा मिळण्यास सुरुवात झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचं पहाटे निधन
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांचं बुधवारी पहाटे निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. एका महिन्यापूर्वी अहमद पटेल यांना करोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच बुधवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. पटेल यांच्या जाण्यानं काँग्रेसवर शोककळा पसरली आहे.
4 वर्षांपूर्वी -
साहेब ६० वर्षांपूर्वी पंतप्रधान झाले असते | तर आज खोदकामात बँकांचे अवशेष सापडले असते
देशातील खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये वाढते घोटाळे आणि वाढत्या एनपीए’मुळे बँकांची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक वळणावर आहे. दुसरीकडे मंदीने अर्थव्यवस्थेला चांगेलच हैराण केले असून RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी नजीकच्या काळात आर्थिक स्थिती आणखी बिकट आणि आव्हानात्मक होईल, असा इशारा दिला होता. त्यामुळं येणाऱ्या संकटाचा सामना करण्यासाठी बँकांनी सुसज्ज राहावे, असा सल्ला दास यांनी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या प्रमुखांना दिला होता.
4 वर्षांपूर्वी -
माजी सैनिक, वीरपत्नी, स्वातंत्र्य सैनिकांसाठी थोरातांचा मोठा निर्णय | चंद्रकांत दादांना जमलंच नाही
सध्या लॉकडाउनमुळे प्रत्येकासमोर मोठा आर्थिक पेच निर्माण झाला आहे. सामान्य माणूस आणि उद्योजक आर्थिक अडचणीत सापडल्याचं चित्रं असल्याने राज्याच्या महसुलात देखील मोठी घट झाली आहे. परिणामी राज्य सरकारसमोर देखील आर्थिक पेच निर्माण झाला आहे. मात्र अशा परिस्थितीत देखील महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी असा निर्णय घेतला आहे जो माजी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना राज्याची स्थिती भक्कम असताना देखील संपूर्ण कार्यकलात जमला नव्हता.
4 वर्षांपूर्वी -
भाजपच्या मोठ्या मुस्लिम नेत्यांनी केलंय लव्ह विवाह | इतरांनी केला तो लव्ह जिहाद
उत्तर प्रदेशात लव्ह जिहादच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याने, या पार्श्वभूमीवर लवकरच लव्ह जिहाद विरोधात कठोर कायद्याची निर्मिती केली असल्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले. त्यानंतर हरियाणा व कर्नाटकमध्येही लव्ह जिहाद विरोधात कठोर कायदा आणणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच मध्यप्रदेश सरकारदेखील आता लवकरच लव्ह जिहाद विरोधात कायदा आणणार आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रीतील भाजप मधील नेतेमंडळी हा कायदा राज्यात आणावा यासाठी पुढे आले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
भाजप सरकारच्या काळातची CBI'ची अवस्था पानटपरी सारखी झालीय - काँग्रेस
सुप्रीम कोर्टाने (Supreme Court of India) सीबीआयला (CBI) एखाद्या प्रकरणाची चौकशी करायची असल्यास राज्य सरकारची परवानगी घेणे आवश्यक असल्याचे गुरुवारी स्पष्ट केले. यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांनी ‘भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या काळातची सीबीआयची अवस्था पानटपरी सारखी झालीय’ असा हल्लाबोल भारतीय जनता पक्षावर केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
काँग्रेस अध्यक्ष पदाची निवडणूक | डिजीटलपद्धतीने होणार निवड
बिहार विधानसभा निवडणुकीतही (Bihar Assembly Election 2020) मोठी हार पत्करावी लागल्याने आता काँग्रेसमध्ये पक्षाध्यक्षाच्या निवडीचे वारे वाहू लागले आहे. काँग्रेसचा आगामी अध्यक्ष डिजीटल पद्धतीने निवडण्याचा (Congress president Selection digitally) निर्णय घेण्यात आला आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक होणार असल्याचं स्पष्ट झालं असून पक्षाचा अध्यक्ष डिजीटलपद्धतीनेच निवडला जाणार असल्याचंही अधोरेखित झालं आहे.
4 वर्षांपूर्वी -
भाजपशासित राज्यांमध्ये छटपुजा उत्सव साजरा करण्यावर निर्बंध | भाजप नेत्यांना माहित नाही
कोरोना आपत्तीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी छठपूजा साजरी करण्यावर महाराष्ट्र सरकारकडून निर्बंध घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार समुद्र किनारी, नदी किनारी किंवा तलावाच्या काठी हा उत्सव साजरा करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयावर भारतीय जनता पक्षाचे आमदार राम कदम यांनी केलेल्या टीकेवर काँग्रसे प्रवक्ते सचिन सावंत यांनी चोख प्रतिउत्तर दिलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
धनगर समाजाचे नेते लहू शेवाळें यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश
धनगर समाजाचे नेते आणि जय मल्हार सेनेचे सरसेनापती लहू शेवाळे (Dhangar Samaj leader and Jai Malhar Sena commander Lahu Shewale) यांनी आज (१७ नोव्हेंबर) शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हा सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारा पक्ष असून संविधानात असलेल्या समतेच्या वाटेवरून मार्गक्रमण करणारा पक्ष आहे. समाजातील दलितांना न्याय देण्याचा पक्षाचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. लहू शेवाळे यांच्या पक्ष प्रवेशाने काँग्रेस पक्षाला आणखी बळ मिळेल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (State Revenue minister Balasaheb Thorat) म्हणाले.
4 वर्षांपूर्वी -
पोलीस व्हॅनमध्ये बचाओ-बचाओ बोंबलत होता | बाहेर आल्यावर नेल्सन मंडेला बनतोय
वास्तुसजावटकार अन्वय नाईक यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या रिपब्लिक वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला. सर्वोच्च न्यायालयाने अर्णब गोस्वामी यांना अंतरिम जामीन मंजूर केला होता. अर्णब गोस्वामी यांच्यासहित इतर दोन आरोपींना देखील न्यायालयाने जामीन मजूर केला होता. सर्वोच्च न्यायालयाने प्रत्येकी पन्नास हजारांच्या जातमुचलक्यावर तात्काळ सुटका करण्याचे आदेश देखील दिले होते.
4 वर्षांपूर्वी -
केंद्राच्या कृषी कायद्याला विरोध आणि आंदोलनं | काँग्रेसचे २६ आमदार ईडीच्या रडारवर
केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी मजूर केलेल्या कृषी कायद्याला पंजाबमध्ये प्रचंड विरोध झाल्याचं पाहायला मिळालं होतं. विशेष म्हणजे पंजाबमध्ये मोदी सरकारच्या विरोधात आणि कृषी कायद्याच्या निषेधार्त मोठ्या प्रमाणावर मोर्चे देखील काढण्यात आले होते. त्यानंतर दसऱ्याच्या दिवशी अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी रावना ऐवजी मोदींच्या पुतळ्याचे दहन केलं होते.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | काँग्रेस जिल्हाध्यक्षाला २ महिलांनी भररस्त्यात झोडलं
काँग्रेसचे उत्तर प्रदेशातील जालौन जिल्हाध्यक्षाला दोन महिलांनी कानफटवले आणि त्याला चपलेने मारहाण केली. तो पाठलाग करत असून, त्रास देत असल्याचा आरोप महिलांनी केला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
विधानपरिषद | उर्मिलाने काँग्रेसची ऑफर नाकारली पण शिवसेनेची ऑफर स्वीकारली
राज्यपाल नियुक्त 12 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार जवळपास निश्चित झाले आहेत. या जागांचा प्रस्ताव राज्यपालांना पाठविण्याचेही ठरले आहे. यामध्ये एक नाव चर्चेत आहे, ते म्हणजे उर्मिला मातोंडकर यांचे. उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली असून त्यांनी उमेदवारीस होकार दिल्याचे बोलले जात आहे. यावर काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार (Minister Vijay Wadettiwar) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
तुम्ही मला मत द्या, मी तुम्हाला लस... काय भयंकर कुटिलपणा
बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजपाने आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. इतर अनेक आश्वासनांपैकी यंदा भाजपाने करोनाच्या पार्श्वभूमीवर बिहारमधील जनतेला करोनाचा मोफत लस देण्यात येईल असं आश्वासनही आपल्या जाहीरमान्यात दिलं आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज साडे दहाच्या सुमारास बिहार निवडणुकीसाठी भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला.
4 वर्षांपूर्वी -
महिलांच्या लोकल प्रवासात रेल्वे आणि भाजपचाच आडमुठेपणा | काँग्रेसचं टीकास्त्र
मुंबईत सरसकट सर्व महिलांसाठी लोकल सुरु करण्याची मुभा राज्य सरकारने दिली होती. मात्र रेल्वे बोर्डाने त्यासाठीची संमती नाकारली. ज्यामुळे आता आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी यासाठी भाजपाला जबाबदार धरलं आहे. नवरात्र सुरु आहे.. अशात आपल्या राज्यातील माता भगिनींना लोकल ट्रेनची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य सरकार इच्छुक आहे. मात्र रेल्वे बोर्ड त्यासाठी टाळाटाळ करतं आहे. यामागे भाजपा नेत्यांचा दबाव आहे. भाजपा या घाणेरड्या राजकारणात नवरात्र सुरु आहे हा मुद्दाही दुर्लक्षित करते आहे असंही सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
पंजाब सरकार आक्रमक | विधानसभेत केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात विधेयक सादर
संसदेत विरोधकांचा विरोध डावलत संमत करण्यात आलेल्या तीन कृषी विषयक वेधयकांविरोधात पंजाबनं रणशिंग फुंकलंय. राष्ट्रपतींनी या विधेयकांवर स्वाक्षरी केल्यानंतर त्याचं आता कायद्यात रुपांतर झालं असलं. या कायद्याचा विरोध म्हणून पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी मंगळवारी पंजाब विधानसभेत कृषी कायद्याविरोधात विधेयक सादर केलं. ‘सरकार कोसळलं तरी बेहत्तर पण राज्यात कृषी कायदा लागू होऊ देणार नाही’, असं मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी विधानसभेत गर्जना केली.
4 वर्षांपूर्वी -
बिहार विधानसभा निवडणुक | काँग्रेस नेत्या मीरा कुमार यांचं फेसबुक पेज ब्लॉक
काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या आणि माजी लोकसभा अध्यक्षा मीरा कुमार यांचे अधिकृत फेसबुक अकाउंट ब्लॉक झाले आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा धक्कादायक प्रकार घडल्याने काँग्रेसकडून देखील तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे आणि त्यात फेसबुक इंडियावर देखील गंभीर आरोप करण्यात आले आहेत. स्वतः मीरा कुमार यांनी या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News