महत्वाच्या बातम्या
-
लहानसहान गोष्टींवर ट्विट करणारे पंतप्रधान शहीद जवानांसाठी चकार शब्दही काढत नाहीत - काँग्रेस
लडाख सीमेवर भारत आणि चीन यांच्यात सुरू असलेला तणाव आता शिगेला पोहोचला आहे. भारतीय लष्कराने माहिती दिली की, गालवान खोऱ्या जवळ चिनी सैनिकांशी झालेल्या चकमकीत कमांडिंग ऑफिसरसह 20 भारतीय जवान शहीद झाले आहेत. या संघर्षात चीनचं ही मोठं नुकसान झालं आहे. दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे.
5 वर्षांपूर्वी -
महाविकास आघाडीत मतभेद; काँग्रेसचे नेते दोन दिवसांत उद्धव ठाकरेंना भेटणार
निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे आज शनिवारी एक दिवसाच्या कोकण दौऱ्यावर जात आहेत. सकाळी ८.३० वाजता महसूलमंत्री हे शासकीय निवासस्थान रॉयलस्टोन येथून मोटारीने निघून ९.०० वाजता भाऊचा धक्का येथे पोहोचतील त्यानंतर रोरो बोटीने मांडवा जेट्टी येथे जातील तेथून मोटारीने अलिबाग तालुक्यातील नागांव व चौल गावाला भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी करतील त्यानंतर काशीद व नंतर मुरुड येथे भेट देऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी करतील.
5 वर्षांपूर्वी -
राजस्थान: भाजपकडून काँग्रेस आमदारांना आर्थिक प्रलोभन, ACB'त तक्रार
देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव असताना राजस्थानात मात्र भाजपा सत्ता मिळवण्याच्या प्रयत्नात मश्गुल आहे. राजस्थानमध्ये मोठे आर्थिक प्रलोभन दाखवत काँग्रेस आणि अपक्ष आमदारांना फोडण्याचा भाजपा प्रयत्न करीत आहे. तशी तक्रारच राजस्थान विधानसभेचे मुख्य प्रतोद आणि काँग्रेस आमदार महेश जोशी यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकांकडे केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस नाराज, बैठकीत चर्चा
‘हे सरकार शिवसेनेचे सरकार’, असल्याची भावना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये आलबेल नसल्याची चर्चा होती. मात्र, आता तर काँग्रेसचे मंत्रीच नाराज असल्याचे समजते. याचसाठी आज काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांची दुग्ध विकास आणि पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्या घरी बैठक बोलावली
5 वर्षांपूर्वी -
काँग्रेस करणार मजुरांचा तिकीट खर्च, सोनिया गांधींची घोषणा
केंद्र सरकारने परदेशात अडकलेल्या भारतीयांना राष्ट्रीय कर्तव्य म्हणून विमानाने निशुल्क परत आणले. मात्र, त्याच सरकारला लॉकडाऊनमुळे देशोधडीला लागलेल्या मजुरांना रेल्वेचे तिकीट माफ करता येत नाही का, असा सवाल काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी उपस्थित केला. सोनिया गांधी यांनी सोमवारी एक पत्रक जारी केले. या पत्रकात त्यांनी केंद्र सरकारच्या दुटप्पी भूमिकेवर बोट ठेवले आहे.
5 वर्षांपूर्वी -
कमलनाथ यांचा राजीनामा, काँग्रेसचं सरकार कोसळलं
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. पत्रकारांनी त्यांनी ही माहिती दिली. राज्यपाल लालजी टंडन यांना भेटून त्यांच्याकडे राजीनामा देणार असल्याचे कमलनाथ यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. भाजपने षडयंत्र रचून आमचे सरकार पाडल्याचा आरोप कमलनाथ यांनी केला. काँग्रेसच्या २३ आमदारांचे राजीनामे याआधीच मध्य प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष एन पी प्रजापती यांनी स्वीकारले आहेत. विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याआधीच कमलनाथ यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.
5 वर्षांपूर्वी -
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मध्य प्रदेशात आज बहुमत चाचणी
ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या बंडाळीमुळे अस्थिर झालेल्या कमलनाथ सरकारला आज बहुमत सिद्ध करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे आज शुक्रवारी मध्य प्रदेश विधानसभेत काँग्रेस सरकारला अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. यापूर्वी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मध्य प्रदेश विधानसभेत कमलनाथ सरकारकडून विश्वासदर्शक ठराव मांडला जाणे अपेक्षित होते. मात्र, विधानसभा अध्यक्षांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पीय अधिवेशन २६ मार्चपर्यंत स्थगित केले होते. यानंतर भाजपने न्यायालयात धाव घेतली होती.
5 वर्षांपूर्वी -
मध्य प्रदेशातील राजकारण तापलं; त्या आमदारांच्या भेटीला गेलेल्या दिग्विजय सिंहांना अटक
मध्य प्रदेशात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर आज पडदा पडेल का, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. बहुमत चाचणीवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होत असून दुसरीकडे राज्यपाल लालजी टंडन यांनी मुख्यमंत्री कमलनाथ यांना बहुमत चाचणीला आज सामोरे जाण्याचे आदेश दिले आहेत. तर बंडखोर आमदार बेंगळुरूला असताना बहुमत चाचणी घेणे हे घटनाविरोधी ठरेल असे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे म्हणणे आहे.
5 वर्षांपूर्वी -
काँग्रेसला उद्याच बहुमत सिद्ध कराव लागणार.....अन्यथा - सविस्तर वृत्त
मध्य प्रदेशात राजकीय नाट्य अद्याप संपलेलं नाही. त्याचा शेवटचा अंक उद्या होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री कमलनाथ यांना पत्र लिहून राज्यपाल लालजी टंडन यांनी उद्याच्या उद्या म्हणजे १७ मार्चलाच फ्लोअर टेस्ट घ्या, असं सांगितलं आहे. १७ मार्चला फ्लोअर टेस्ट घेतली गेली नाही, तर काँग्रेसकडे बहुमत नाही, असं मानलं जाईल, असे स्पष्ट निर्देश राज्यपालांनी दिले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना धास्तीतही सत्तेचे डोहाळे; MP विश्वासदर्शक ठरावासाठी भाजप सुप्रीम कोर्टात
मध्य प्रदेशात ९ मार्चपासून सुरू असलेलं राजकीय नाट्य विधानसभेत आजही पाहायला मिळालं. कमलनाथ सरकारची फ्लोअर टेस्ट आजही होऊ शकली नाही. उलट कोरोना व्हायरसचं कारण पुढे करत २६ मार्चपर्यंत विधान सभेचं कामकाज स्थगित करण्यात आली. दरम्यान, मुख्यमंत्री कमलनाथ यांनी राज्यपाल लालजी टंडन यांना भले मोठं पत्र लिहिलं आहे. भाजपने काँग्रेसच्या अनेक आमदारांचे अपहरण केले आहे. आमच्या आमदारांना भाजपने वेठीस ठेवलं असल्याचा आरोप मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
MP राजकीय नाट्य कोरोना धास्तीने रखडले; विधानसभेचं कामकाज 26 मार्चपर्यंत स्थगित
ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह १९ आमदारांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर कमलनाथ सरकारवर ओढावलेले संकट काही काळासाठी टळले आहे. सोमवारी विधानसभा सुरू झाल्यानंतर राज्यपाल लालजी टंडन यांच्या एका मिनिटाच्या भाषणानंतर विधानसभा २६ मार्चपर्यंत स्थगित करण्यात आली. कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे हा निर्णय घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आज विश्वासदर्शक ठरावच होऊ शकला नाही.
5 वर्षांपूर्वी -
मध्य प्रदेश: कमलनाथांनी बोलावली मंत्रिमंडळाची तातडीची बैठक
मध्य प्रदेश विधानसभेतील विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्यासाठी काँग्रेस पूर्णपणे तयार आहे. आम्हाला कोणत्याही प्रकारची चिंता वाटत नाही. उलट भाजपच तणावात आहे, असे वक्तव्य ज्येष्ठ काँग्रेस नेते हरिश रावत यांनी केले. मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांनी कमलनाथ सरकारला १६ तारखेला बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्री कमलनाथ यांनी राज्यपालांच्या भेटीनंतर दाखवलं 'व्हिक्टरी'
मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी राज्यपाल लालजी टंडन यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्यपालांना आमदारांच्या घोडेबाजारासंदर्भात एक लेखी पत्रं देऊन हस्तक्षेप करण्याची मागली केली आहे. तसेच बाहेर पडताना हात उंचावून ‘व्हिक्टरी’ झाल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला आणि परिस्थिती काँग्रेसच्या बाजूने असल्याचं सांगण्याचा प्रयत्न केला. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, अर्थसंकल्पावेळी राज्यपालांच्या भाषणानंतर फ्लोअर टेस्ट होईल, पण त्यासाठी २२ आमदारांना कैदेतून मुक्त करावंच लागेल आणि त्याशिवाय बहुमत चाचणी शक्य नसल्याचं म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यातील मिशन 'अजित पवार' अनुभवामुळे भाजपाला मध्यप्रदेशात धाकधूक - सविस्तर वृत्त
मध्यप्रदेशमधील २२ पैकी १३ बंडखोर आमदार काँगेसला सोडचिठ्ठी देणार नसल्याचा दावा पक्षाचे वरिष्ठ नेते दिग्विजयसिंह यांनी बुधवारी केला आहे. विधानसभेत कमलनाथ सरकार विश्वासदर्शक ठराव निश्चितच जिंकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.आम्हीही गप्प बसलेलो नाही किंवा झोपा काढत नसल्याचेही ते म्हणाले. ज्योतिरादित्य शिंदे हे काँग्रेसमधून बाहेर पडले, त्याचप्रमाणे त्या राज्याच्या विधानसभेतील २२ काँग्रेस आमदारांनी आपल्या पदाचे राजीनामे राज्यपालांकडे पाठविले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसच्या १९ आमदारांचे राजीनामे
काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी आपल्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर मध्य प्रदेशमध्ये पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग मिळाला. मध्य प्रदेशमध्ये सहा मंत्र्यांसह एकूण १९ आमदारांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांच्याकडे राजीनामा पाठविण्यात आला आहे. राजभवनाकडून याला दुजोरा देण्यात आला. लालजी टंडन हे होळीनिमित्त मंगळवारी लखनऊमध्ये आहेत.
5 वर्षांपूर्वी -
होळीला काँग्रेसचा रंग उतरणार! ज्योतिरादित्य शिंदे यांची अमित शहा व मोदींसोबत बैठक
देशभर रंगोत्सवाची धूम असताना दिल्लीत राजकीय वातावरण तापलं आहे. मध्यप्रदेशातल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मोठा हादरा बसण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे हे गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला गेले आहेत. पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी ते दाखल झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. ज्योतिरादित्य हे सायंकाळी भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे. या आधीत मध्यप्रदेश सरकारमधल्या शिंदे समर्थकांनी राजीनामे दिले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
मध्यप्रदेश काँग्रेसमध्ये फूट! एकाचवेळी २२ मंत्र्यांचे राजीनामे
कर्नाटकनंतर आता मध्यप्रदेशात सत्तेचं नाट्य रंगलं आहे. कमलनाथ सरकारच्या मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार केला जाणार आहे. त्यासाठी सोमवारी २२ मंत्र्यांचे राजीनामे घेण्यात आले. आता मंत्रिमंडळाचा नव्याने विस्तार करण्यात येणार आहे, मात्र दुसरीकडे कॉंग्रेसचे मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हे भाजपाच्या वाटेवर आहेत, अशा चर्चांना उधाण आले आहे.
5 वर्षांपूर्वी -
१४ वर्ष कधीही 'प्रकाशात' न आलेल्यांनी शॅडो कॅबिनेटचा निर्णय घेतला: काँग्रेस
राज्य सरकारवर वचक ठेवण्यासाठी मनसेने महाअधिवेशनात शॅडो कॅबिनेट स्थापणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार मनसेने शॅडो कॅबिनेटची स्थापना केली असून त्यात राज ठाकरेंनी विशिष्ट स्थरातील पदाधिकाऱ्यांना स्थान दिलं आहे. त्यामुळे इतर पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान शॅडो कॅबिनेटमधील प्रत्येक नेत्यावर संबंधित खात्याच्या कामावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी देण्यात येणार आहे. तसेच शॅडो कॅबिनेटमधील हे नेते एखाद्या मंत्र्याने गैरव्यवहार केला, तर त्याचा पाठपुरावा करणार आहेत.
5 वर्षांपूर्वी -
एकावर एक राज्य भाजपमुक्त होतं असल्याने मध्यप्रेदशात पुन्हा आमदारांची खेरदी?
मध्य प्रदेशात पुन्हा एकदा राजकीय घडामोडींना वेग आला. येथील काँग्रेसचे सरकार पाडण्यासाठी भाजपकडून व्युहरचना करण्यात येत आहे. त्यासाठी आमदार फोडण्याचे काम भाजपकडून करण्यात येत आहे, तसा आरोप करण्यात आला आहे. याआधी कर्नाटक आणि गोवा राज्यात भाजपने आमदार फोडत काँग्रेसला दे धक्का देत आपले सरकार स्थापन केले आहे.
5 वर्षांपूर्वी -
भाजपसाठी हरयाणातील हॉटेल म्हणजे इतर पक्षाचे आमदार लपविण्याचा अड्डे? सविस्तर
मध्य प्रदेशात पुन्हा एकदा राजकीय घडामोडींना वेग आला. येथील काँग्रेसचे सरकार पाडण्यासाठी भाजपकडून व्युहरचना करण्यात येत आहे. त्यासाठी आमदार फोडण्याचे काम भाजपकडून करण्यात येत आहे, तसा आरोप करण्यात आला आहे. याआधी कर्नाटक आणि गोवा राज्यात भाजपने आमदार फोडत काँग्रेसला दे धक्का देत आपले सरकार स्थापन केले आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Natural Farming | कृषीराजा सुखावणार; केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, 'राष्ट्रीय प्राकृतिक शेती मिशनला' मिळाली मंजुरी
- PAN 2.0 QR CODE | आता पॅन कार्ड होणार PAN QR CODE कार्ड; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, अपडेट नोट करा - Marathi News
- Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक
- Post Office MIS | पोस्टाची भन्नाट योजना; प्रत्येक महिन्याला कमवाल 9,250 रुपये, जाणून घ्या पोस्टाच्या योजनेचे फायदे - Marathi News
- SIP Calculator | आता सहज कमवता येतील 5 कोटी, गुंतवणुकीची 'ही' चाल बनवेल कोट्याधीश, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News
- Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News
- Smart Investment | केवळ 150 रुपये वाचवून आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करा, पैसे बचतीतून होईल लाखोंची कमाई
- Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेतलंय का, लवकरात लवकर लोन फेडण्याची टेकनिक आहे कमालीची - Marathi News
- Job Opportunity | तरुणांनो लाखोंच्या घरात पगार घेण्याची वेळ आली; ITBT मध्ये 526 जागांसाठी मेगा भरती सुरू, पटापट अर्ज करा
- Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल