महत्वाच्या बातम्या
-
VIDEO | मुंबईतील कोविड रुग्णालयातील आग सतर्क कर्मचाऱ्यांनी विझवली
मुंबईतील पश्चिम उपनगरात असलेल्या दहिसर येथील कांदरपाडा परिसरात कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारासाठी असलेल्या कोविड रुग्णालयात अचानक आग लागली. यावेळी रुग्णालयातील परिचारिकेने वेळीच प्रसंगावधान दाखवत मोठी दुर्घटना टाळली आहे. कोरोना बाधित रुग्णआंवर उपचारासाठी दहिसर येथील कांदरपाडा रुग्णालयात असलेल्या अतिदक्षता उपचार केंद्रात एका रुग्णाच्या शेजारी असलेल्या वैद्यकीय उपकरणाला अचानक आग लागली. यावेळी घाबरून न जाता आणि प्रसंगावधान राखत तेथे उपस्थित परिचारिकांसह वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ही आग विझवली.
4 वर्षांपूर्वी -
Unlock 5 | 30 नोव्हेंबरपर्यंत लॉकडाऊनला केंद्राची मुदतवाढ
लॉकडाउनबाबत केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. कंटेन्मेंट झोनमध्ये म्हणजेच करोना प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये लॉकडाउन ३० नोव्हेंबरपर्यंत कायम राहिल असं केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. देशात अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे. अनेक गोष्टींना केंद्र सरकारने नियम आणि अटींसह संमती दिली आहे. मात्र करोना प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये लॉकडाउन कायम असणार आहे असं केंद्रीय गृहमंत्रालयाने म्हटलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
Corona Vaccine Updates | पहिली स्वदेशी कोरोना लस मिळणार 'या’ तारखेला
कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे पसरत असलेल्या कोव्हिड19 च्या फैलावाला प्रतिबंध घालण्यासाठी जगभर विविध ठिकाणी लसींबाबत संशोधन सुरु असून भारतात भारत बायोटेक ही कंपनीही प्राधान्याने ही लस तयार करण्याच्या प्रयत्नांत आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार सर्वात निर्धोक आणि पूर्णता: भारतीय बनावटीची कोव्हॅक्सिन ही लस वर्ष 2021 च्या जून महिन्यापर्यंत बाजारात येऊ शकेल. नुकतीच या कंपनीच्या लसीला तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी परवानगी मिळाली असून तिसऱ्या टप्प्यातील चाचणी येत्या नोव्हेंबरपासून सुरू होऊ शकते अशी माहिती मिळाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
भारताचा कोरोना रिकव्हरी रेट ८९.७ टक्के | लसीचे प्रयोग प्रगतीपथावर
भारत (India) झपाट्याने कोरोनामुक्त देश होत आहे. देशाचा कोरोना रिकव्हरी रेट ८९.७ टक्के तर डेथ रेट (मृत्यू दर) १.५१ टक्के आहे. भारतात ताज्या आकडेवारीनुसार ६ लाख ८० हजार ६४४ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. देशात आतापर्यंत ७८ लाख १४ हजार ६८२ जणांना कोरोनाची लागण झाली. यापैकी ७० लाख १६ हजार ४६ जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुळे देशात १ लाख १७ हजार ९९२ जणांचा मृत्यू झाला.
4 वर्षांपूर्वी -
कोरोनाच्या लसीकरणासाठी भारताला येईल ५० हजार कोटी खर्च | प्रति लस किंमत?
अद्याप कोरोनावरील लस विकसित झाली नसली तरी लवकरच अशी लस उपलब्ध होण्याची शक्यता आहेत. त्या पार्श्वभूमीवर सरकारकडून ही तरतूद करण्यात येत आहे. दरम्यान, चीननंतर जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला दुसरा देश असलेल्या भारताला कोरोनाविरोधातील लसीकरणासाठी तब्बल ५० हजार कोटींचा खर्च येणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
फेब्रुवारी २०२१ पर्यंत आटोक्यात येईल कोरोनाचं संकट | शास्रज्ञांच्या समितीचा दावा
एकाबाजूला ऑक्सफोर्डच्या कोरोना लशीनंतर आता भारतात रशियाचीही लस दिली जाणार आहे. Sputnik V लशीचं भारतात ट्रायल करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. डॉ. रेड्डीज लेबोरेटरीज कंपनीला ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DGCI) ट्रायलसाठी परवानगी दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Covid19 Updates | राज्याचा रिकव्हरी रेट ८४.७१ टक्के | मृत्यूसंख्येत घट कायम
राज्यात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली असून रुग्णांच्या मृत्यूच्या संखेत होणारी घटही कायम आहे. मात्र गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत बुधवारी नव्या रुग्णांची संख्या थोडी वाढली आहे. गेल्या दोन दिवसांपासून हा आकडा 10 हजारांच्या खाली होता. आज दिवसभरात 10 हजार 552 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 158 जणांचा मृत्यू झाला.
4 वर्षांपूर्वी -
घसा खवखवणं म्हणजे केवळ कोरोनाचं लक्षण नव्हे | वाचा सविस्तर
भारतात गेल्या २४ तासात ६३ हजार ५०९ नवे करोना रुग्ण आढळले असून ७३० जणांचा मृत्यू झाला आहे. यासोबत देशातील करोनाबाधित रुग्णसंख्या ७२ लाख ३९ हजार ३९० वर पोहोचली आहे. देशात सद्या ८ लाख २६ हजार ८७६ अॅक्टिव्ह रुग्ण आहे. ६३ लाख १ हजार ९२८ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. तर करोनामुळे मृत्यू झालेल्याची संख्या १ लाख १० हजार ५८६ इतकी झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
जॉन्सन अॅण्ड जॉन्सन कोरोना लस | स्वयंसेवकांच्या शरीरावर दुष्परिणाम | चाचण्या थांबवल्या
कोरोना व्हॅक्सिन कधी येणार याकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे. कोणतेही एक व्हॅक्सिन जगाला तारणार नाहीय. एवढ्या मोठ्या लोकसंख्येला मोठ्या प्रमाणावर लसीची गरज आहे. यामुळे काही कंपन्यांची औषधे यशस्वी ठरावी लागणार आहेत. सोमवारी कोरोना लसीच्या आशेला आणखी एक धक्का बसला आहे. जॉन्सन अँड जॉन्सनने कोरोना लसीच्या चाचण्या थांबविल्या आहेत.
4 वर्षांपूर्वी -
Covid 19 Updates | राज्यात आज करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त झालेल्यांची संख्या दुप्पट
गेली 6 महिने कोरोनाशी निकराची झुंज देणाऱ्या राज्यासाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. गेल्या तीन महिन्यांपेक्षा जास्त काळापासून सोमवारी पहिल्यांदाच रुग्णांच्या मृत्यूसंख्येत घट झाली असून आज 165 जणांचा मृत्यू झाला. गेल्या काही महिन्यांपासून ही संख्या 300 ते 400 च्या दरम्यान होती.
4 वर्षांपूर्वी -
दुःखद बातमी | २०० कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या रुग्णवाहिका चालकाचा मृत्यू
कोरोनाच्या लढ्यामध्ये रस्त्यावर येऊन आपला जीव धोक्यात घालून कोरोना बळींवर अंत्यसंस्कार करणाऱ्या रुग्णवाहिका चालकाचा कोरोनानेच घात केला आहे. दिल्लीच्या सीलमपूर भागात ही दुर्दैवी घटना घडली आहे. दिल्लीच्या सीलमपूर भागात राहणाऱ्या ‘आरिफ खान’ यांनी कोरोनाच्या काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून 200 हून अधिक कोरोनाग्रस्तांना हॉस्पिटलमध्ये पोहोचविले होते. तसेच 100 हून अधिक कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांना स्मशान भूमीमध्ये अंत्यसंस्कारासाठी पोहोचविले होते.
4 वर्षांपूर्वी -
राज्यात एका दिवसात २६ हजार ४४० रुग्ण बरे होऊन घरी
राज्यात आज एका दिवसात नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या दुप्पट नोंदविली असून २६ हजार ४४० रुग्ण बरे होऊन घरी गेले तर ११ हजार ४१६ नवीन रुग्णांचे निदान झाले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८२.७६ टक्के एवढे झाले आहे. राज्यातील उपचाराखाली असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या देखील दिवसेंदिवस कमी होत आहे. सध्या २ लाख २१ हजार १५६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
4 वर्षांपूर्वी -
WHOची मोठी माहिती | केव्हापर्यंत येणार कोरोना व्हॅक्सीन
जगभरात कोरोना व्हायरसवरील व्हॅक्सीनची ट्रायल सुरू आहे. या दरम्यान व्हॅक्सीनबाबत जागतिक आरोग्य संघटनेने एक आनंदाची बातमी दिली आहे. WHO चे प्रमुख टेड्रोस एडनॉम गेब्रियेसस यांच म्हणणं आहे की,’एक सुरक्षित आणि कारगर व्हॅक्सीन यावर्षाच्या शेवटापर्यंत तयार होऊ शकते.’ यासोबतच ते म्हणाले की, जगातील सर्व राजकीय मंडळींना व्हॅक्सीनचं समान वितरण करण्यास सांगितल्याचं म्हणाले.
4 वर्षांपूर्वी -
Unlock 5 | सिनेमागृह पुन्हा सुरु होणार | केंद्र सरकारची नियमावली जाहीर
देशभरात सध्या अनलॉकची प्रक्रिया सुरू आहे. विविध उद्योग पुन्हा एकदा सुरू केले जात आहेत. मार्च महिन्यापासून बंद असलेले सिनेमागृह आता अखेर उघडण्यात येणार आहेत. 15 ऑक्टोबरपासून सिनेमागृह उघडण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. सिनेमागृहाच्या एकूण प्रेक्षक क्षमतेच्या 50 टक्के लोकांना एकावेळी सिनेमा पाहता येणार आहे. दरम्यान याकरता केंद्र सरकारकडून सिनेमांच्या प्रदर्शनासाठी एसओपी (Standard Operating Procedure) जारी करण्यात आली आहे. या नियमांनुसार काही कडक नियम पाळणे अनिवार्य असणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
BREAKING - १५ ऑक्टोबरपासून शाळा उघडणार | शिक्षण मंत्रालयाने लागू केल्या गाइडलाइन्स
देशातील विविध राज्यांमध्ये १५ ऑक्टोबरपासून शाळा उघडणार असून केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने त्यासंदर्भातल्या गाइडलाइन्स लागू केल्या आहेत. १५ ऑक्टोबरपासून टप्प्याटप्प्याने देशातील शाळा सुरु होणार आहेत. आधी मोठ्या वर्गाच्या आणि मग हळूहळू लहान वर्गांच्या शाळा सुरु करण्यात येतील. शाळा सुरु करण्याबाबतची मानक कार्यप्रणाली (SOP) हे राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी ठरवायचं आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळणं आणि शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची आणि आरोग्याची काळजी घेणं ही राज्यांची शाळांची जबाबदारी आहे असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. तसंच जो माध्यान आहार दिला जातो तो स्वच्छ, सुरक्षित असेल याचीही जबाबदारी राज्यांची आणि शाळांची असणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
जुलै २०२१ पर्यंत २५ कोटी लोकांचं कोविड लसीकरण पूर्ण करण्याचं लक्ष्य - आरोग्यमंत्री
कोरोनावरील लशीचे (Vaccine) जुलै २०२१ पर्यंत ५० कोटी डोस तयार करुन घेण्याचे लक्ष्य केंद्र सरकारने निश्चित केले आहे. हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी देशातील खासगी कंपन्यांचे सहकार्य घेणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन (Union Health Minister Harsh Vardhan) यांनी दिली. ते संडे संवादच्या चौथ्या भागात बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
कोरोनामुक्त झालेला रुग्ण ९० दिवसांपर्यंत पसरवू शकतो कोरोना विषाणू | संशोधन
आपण किंवा आपले मित्र, नातेवाईक किंवा कुटुंबातील सदस्यांनी कोरोनाच्या आजाराचा विलगीकरण कालावधी पूर्ण केला आहे का? आपण त्यांच्यासोबत राहात आहात का? तर आपल्याला सावध राहण्याची गरज आहे. अमेरिकेच्या विविध रुग्णालयांमधून मिळालेल्या आकड्यांच्या विश्लेषणातून असे समोर आले आहे की COVID-19 रोगाचा SARS CoV-2 हा विषाणू गंभीररित्या संसर्गित झालेल्या रुग्णांच्या शरीरात ९० दिवसांपर्यंत राहू शकतो जे कोरोनामुक्त झाले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
BREAKING - भारतीय उद्योग जगताला मिळू शकते कर्मचार्यांसाठी कोविड लस खरेदीची परवानगी
केंद्र सरकार धोरणात्मक दृष्टीने महत्त्वाच्या व्यावसायिक कंपन्यांना कोविड-१९ लस (Covid Vaccine) ही थेट विकासकांकडून खरेदी करण्यासाठी कराराची परवानगी देण्याबाबत विचार करू शकते. जेणेकरुन कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना कोविड-१९ पासून वाचवू शकतील. हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, नाव न सांगण्याच्या अटीवर एका अधिकाऱ्याने सांगितले की, भारतातील बहुतेक लस योजना केंद्र सरकारकडून देण्यात येतील आणि यासाठी सुमारे ५० हजार कोटी खर्च होण्याचा अंदाज आहे. त्यात त्यांनी असंही म्हटलं आहे की, बहुतेक तज्ञ आणि विश्लेषकांच्या मते २०२१ मध्ये भारतातील प्रत्येकाला ही लस मिळेल असं होणार नाही. सर्वांना लस मिळण्यासाठी बराच कालावधी जाणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
NCB च्या केपीएस मल्होत्रांना कोरोना | दीपिकाची केली होती चौकशी
बॉलिवूडचं ड्रग्स कनेक्शन असल्याच्या तपासात आता कोरोनाची एन्ट्री झाली आहे. नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB) चे डिप्टी डायरेक्टर केपीएस मल्होत्रा यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर केपीएस मल्होत्रा मुंबईहून दिल्लीला पुन्हा गेले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
राज्यात दिवसभरात 16,835 रुग्णांची कोरोनावर मात | 278 रुग्णांचा मृत्यू
राज्यात शनिवारी पुन्हा एकदा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. दिवसभरात 16 हजार 835 जणांनी कोरोनावर मात केली त्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यातल्या बरे होणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या ही 11 लाख 34 हजार 555 झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 79.3 टक्के आहे. दिवसभरात 14 हजार 348 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 278 जणांचा मृत्यू झाला. राज्यातला मृत्यूदर 2.64 एवढा झाला आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन