महत्वाच्या बातम्या
-
Unlock 5 | हॉटेल, उपहारगृहं, बारसाठी राज्य सरकारची नियमावली जाहीर
राज्यात मिशन बिगीन अगेन अंतर्गत हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. त्यातच कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता पुन्हा 30 ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आलं आहे. अनलॉक 5 च्या टप्प्यात गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेले हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि बार आता सुरु होणारेत. राज्य सरकारने रेस्टॉरंट, बार्स आणि हॉटेल्स पुन्हा सुरु करण्यासाठी नियमावली जाहीर केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Covid-19 । देशात २४ तासांत कोरोनाचे ८१ हजार ४८४ नवे रुग्ण
गेल्या चोवीस तासांमध्ये देशात ८१ हजार ४८४ नव्या करोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तसंच १ हजा ०९५ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. यानंतर देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या ६३ लाख ९४ हजार ४८४ वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे देशात सध्या ९ लाख ४२ हजार २१७ जणांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ५३ लाख ५२ हजार ०७८ जणांनी करोनावर मात केल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. तसंच आतापर्यंत ९९ हजार ७७३ जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याचंही सांगण्यात आलं.
4 वर्षांपूर्वी -
दिवसभरात १९,१६३ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले | ४८१ रुग्णांचा मृत्यू
महाराष्ट्रात Coronavius च्या नवीन रुग्णांची संख्या गेल्या दोन- तीन दिवसात थोडी कमी येत आहे. बुधवारी प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीतही नव्या रुग्णांपेक्षा डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. पण Covid-19 मुळे होणाऱ्या मृत्यूचा आकडा अद्याप कमी झालेला नाही. गेल्या 24 तासांत 481 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही महिन्यातली सर्वात कमी मृत्यूसंख्या सोमवारी नोंदली गेली होती. त्यात पुन्हा दोन दिवसांत वाढ झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Unlock 5 | राज्यातील रेस्टॉरंट, बार आणि फूड कोर्ट सुरू करण्यास परवानगी
राज्यातील रेस्टॉरंट, बार आणि फूड कोर्ट सुरू करण्यास अखेर राज्य सरकारने परवानगी दिली आहे. ५ ऑक्टोबरपासून राज्यातील रेस्टॉरंट आणि बार सुरू होणार आहेत. पण ५० टक्के क्षमतेने रेस्टॉरंट आणि बार सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. राज्य सरकारने अनलॉक-5 चे नियम आज जाहीर केले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
Navratri 2020 | नवरात्रोत्सवासाठी राज्य शासनाची नियमावली जाहीर
अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या Navratri 2020 नवरात्रोत्सवासाठी आता लगबग सुरु झाली आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं उत्साह काहीसा कमी असला तरीही, आदिशक्तीच्या आगमनासाठी सारे उत्सुक आहेत. या परिस्थितीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भावही नियंत्रणात रहावा यासाठी गणेशोत्सवाप्रमाणंच नवरात्रोत्सवासाठीही राज्याच्या गृह विभागाकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
KEM'मध्ये कोविड लस चाचणी | स्वयंसेवकाचा मृत्यू झाल्यास १ कोटी भरपाई
ऑक्सफर्ड विद्यापीठ-अस्त्राझेनेकाने विकसित केलेल्या ‘कोव्हीशिल्ड’ लशीची मुंबईत चाचणी सुरु झाली आहे. केईएम रुग्णालयात शनिवारी तिघा स्वयंसेवकांना ही लस टोचण्यात आली. संपूर्ण भारतात निवडक दहा केंद्रात १६०० स्वयंसेवकांवर या लशीचा प्रयोग केला जाणार आहे. केईएम रुग्णालयात शनिवारी सकाळी तिघा स्वयंसेवकांना ही लस देण्यात आली. दुपारपर्यंत या तिघांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आल्यानंतर त्यांना घरी पाठविण्यात आले.
4 वर्षांपूर्वी -
देशभरात कोरोनाच्या ८५,३६२ नव्या रुग्णांची नोंद | एकूण ५९ लाखांचा टप्पा ओलांडला
देशात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाच्या चाचण्यांची संख्या वाढवली आणि रिकव्हरी रेट चांगला असला तरीही कोरोनाच्या रुग्णांची संख्या साधारण दिवसाला 80 ते 85 हजारांच्या आसपास वाढत आहेच.
4 वर्षांपूर्वी -
देशातील मृतांची संख्या लाखाच्या जवळपास | 24 तासांत 1,129 रुग्णांचा मृत्यू
देशात कोरोनाचे नव्यानं संसर्ग होणाऱ्यांची संख्या जरी वाढत असली तरी सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात ही आकडेवारी थोडी कमी असल्याचं आणि रिकव्हरी रेट चांगल्या असल्याचं पाहायला मिळत आहे. गुरुवारी केंद्रीय मंत्रालयाकडून आलेल्या नवीन आकडेवारीनुसार २४ तासांत ८६ हजार ५०६ लोकांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला असून देशात आतापर्यंत कोरोनाचा आकडा ५७ लाखावर पोहोचला आहे.
4 वर्षांपूर्वी -
रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनाने निधन | मोदींकडून शोक व्यक्त
रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनामुळे निधन झाले. ते ६५ वर्षांचे होते. त्यांच्यावर दिल्लीतल्या एम्स रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. ११ सप्टेंबरला त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले. त्यांनी स्वत: ट्विट करून त्याची माहिती दिली होती. ते बेळगावचे खासदार होते. दरम्यान, सुरेश अंगडी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करून त्यांच्या कुटुंबीयाबद्दल संवेदना व्यक्त केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज्यात दिवसभरात कोरोनाचे २१ हजार नवीन रुग्ण | ४७९ रुग्णांचा मृत्यू
राज्यात बुधवारी 21 हजार करोनाचे नवीन रुग्ण आढळून आलेत तर 479 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 12 लाख 63 हजार झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये 19 हजार 476 रुग्ण बरे होऊन घरी गेले. गेल्या काही दिवसांपासून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही नव्या रुग्णांपेक्षा जास्त होती. त्यात आता खंड पडला आहे. आत्तापर्यंत 9 लाख 56 हजार रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात सध्या 2 लाख 72 हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
4 वर्षांपूर्वी -
२४ तासांत ८३,३४७ नवे कोरोना रुग्ण | तर १,०८५ रुग्णांचा मृत्यू
जगभरात थैमान घालणाऱ्या करोनाचा प्रादुर्भाव देशात झपाट्याने अद्यापही वाढतच आहे. देशभरातील करोनाबाधितांच्या एकूण संख्येने ५६ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. मागील २४ तासांत देशात ८३ हजार ३४७ नवे करोनाबाधित आढळले आहेत. तर, १ हजार ८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर करोनाबाधितांची एकूण संख्या ५६ लाख ४६ हजार ११ वर पोहचली आहे.
4 वर्षांपूर्वी -
देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ७५०८३ नवे रुग्ण | १०५३ रुग्णांचा मृत्यू
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कोरोनाचे ९० हजाराहून अधिक रुग्ण सापडणाऱ्या भारताला मंगळवारी काहीसा दिलासा मिळाला आहे. बऱ्याच दिवसानंतर नव्या कोरोना रुग्णांची संख्या ८० हजाराहून खाली गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे ७५०८३ रुग्ण मिळाले आहेत. तर १०५३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ५५,६२, ६६४ इतका झाला आहे. यापैकी ९,७५,८६१ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर ४४,९७,८६८ लोकांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. मात्र, आतापर्यंत देशातील एकूण ८८,९३५ लोकांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
राज्यात आज कोरोनाचे २०,५९८ रुग्ण वाढले | तर ४५५ रुग्णांचा मृत्यू
राज्यात रविवारी कोविड रुग्ण बरे होण्याचा विक्रम झाला. दिवसभरात तब्बल 26 हजार 408 रुग्णांना आज घरी सोडण्यात आले. सलग चौथ्या दिवशी रुग्ण बरे होण्याचं प्रमाण अधिक झालं आहे. 8 दिवसात बरे झालेल्या रुग्णाची टक्केवारी 70 वरून 73वर गेली आहे. आत्तापर्यंत 8 लाख 84 हजार 384 रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांमध्ये 20 हजार 598 नवे रुग्ण सापडले. तर 455 रुग्णांचा मृत्यू झाला.
4 वर्षांपूर्वी -
देशात गेल्या २४ तासांत ९३,३३७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद | तर १,२४७ रुग्णांचा मृत्यू
देशात मोठय़ा संख्येने करोनाचे रुग्ण सापडण्याचे प्रमाण अद्यापही कमी झालेले नाही. दिवसागणिक करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ५३ लाखांच्या पुढे गेली आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशात ९३ हजार ३३७ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर एक हजार २४७ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
देशात गेल्या २४ तासात ९६,४२४ नवे कोरोनाबाधित | तर ११७४ रुग्णांच्या मृत्यू
भारतात गेल्या २४ तासात ९६ हजार ४२४ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यासोबत देशातील करोनाबाधित रुग्णसंख्येने ५२ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या २४ तासात ११७४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत देशात करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ८४ हजार ३७२ इतकी झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
गेल्या २४ तासात २३,३६५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद | तर ४७४ रुग्णांचा मृत्यू
आज दिवसभरात १७ हजार ५५९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात असून आतापर्यंत ७ लाख ९२ हजार ८३२ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट ७०.७१ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर मृत्यूदर २.७५ टक्के इतका आहे. आतापर्यंत ५५ लाख ६ हजार २७६ चाचण्या करण्यात आल्या असून यामधील ११ लाख २१ हजार २२१ रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
रशियन लशीचे भारतात उपलब्ध होणार १० कोटी डोस | भारतीय कंपनी बरोबर करार
रशियात झालेली कोरोनावरील लस स्पुटनिक-व्ही लवकरच भारताला मिळणार आहे. भारतीय कंपनी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजला लसीचे १० कोटी डोस विकण्याची तयारी रशियन सोव्हेरजियन वेल्थ फंडनं दर्शवली आहे. स्पुटनिक-व्ही लस परदेशी पाठवण्याची तयारी रशियानं सुरू केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
गेल्या २४ तासात ९० हजार १२३ रुग्णांची नोंद | १२९० रुग्णांचा मृत्यू
सप्टेंबर महिन्याच्या 15 तारखेपर्यंत देशात कोरोनानं 50 लाखांचा टप्पा पार केला आहे. सप्टेंबर महिन्यात जवळपास 85 ते 95 हजार नवीन लोकांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. देशातील कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 50 लाख पार झाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
देशात २४ तासांत ९२,०७१ नवे रुग्ण | ११३६ रुग्णांचा मृत्यू
सलग पाचव्या दिवशी आज 90 हजारहून नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या एकूण कोरोनाबाधितांची संख्या 48 लाख पार झाली आहे. गेल्या 24 तासांत 92 हजार 071 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. गेल्या पाच दिवसातील हा कमी आकडा आहे. तर, एकाच दिवसात 1136 लोकांचा मृत्यू झाला आहे. यासह एकूण मृतांचा आकडा 79 हजार 722 झाला आहे. आतापर्यंत 37 लाख 80 हजार 108 लोक निरोगी झाले आहेत. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, सध्या देशात 9 लाख 86 हजार 598 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
4 वर्षांपूर्वी -
स्वदेशी ‘कोव्हॅक्सीन’ लस प्राण्यांवरील चाचणीत यशस्वी
अमेरिका, ब्रिटन, रशिया, चीन, जर्मनी आणि फ्रान्स या देशांप्रमाणे भारतानेही करोना व्हायरसला रोखण्यासाठी स्वदेशी लशीची निर्मिती केली आहे. हैदराबाद स्थित भारत बायोटेक आणि आयसीएमआरने मिळून ‘कोव्हॅक्सीन’ या स्वदेशी लशीची निर्मिती केली आहे. सध्या देशभरातील १२ वैद्यकीय संस्थांमध्ये कोव्हॅक्सीन लशीच्या मानवी चाचण्या सुरु आहेत.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Pan Card Online | 90% लोकांना ठाऊक नाही पॅनकार्ड मार्फत लोन कसा मिळतो, कशा पद्धतीने अप्लाय करा, माहिती जाणून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
- Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- RVNL Share Price | टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, RVNL शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: RVNL
- Kotak Mutual Fund | बिनधास्त SIP करून 4 पटीने पैसा वाढवा, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड स्कीम सेव्ह करा
- Shark Tank India | महिला सुद्धा सुरु करू शकतात असा स्टार्टअप, आई-मुलीच्या स्टार्टअपला शार्क टँक इंडियातून फंडिंग
- Infosys Share Price | इन्फोसिस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFY
- Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांनो इकडे लक्ष द्या, 'ही' म्युच्युअल फंड योजना 1 लाखांवर देईल 6,13,521 रुपये परतावा