महत्वाच्या बातम्या
-
भारताचे माजी क्रिकेटपटू चेतन चौहान यांचं निधन | कोरोनाची लागणही झाली होती
भारताचे माजी क्रिकेटपटू आणि उत्तरप्रदेशातील मंत्री चेतन चौहान यांचं निधन आज निधन झालं. ते ७३ वर्षांचे होते. चेतन चौहान यांना काही दिवसांपूर्वी करोनाची लागणीही झाली होती. त्यानंतर त्यांच्या किडन्या निकामी झाल्यामुळे त्यांच्यावर गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, शुक्रवारी त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. परंतु आज हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालं. चेतन चौहान यांचे बंधू पुष्पेंद्र चौहान यांनी चेतन चौहान यांचं निधन झाल्याची माहिती दिली.
5 वर्षांपूर्वी -
आज राज्यात ११,१११ नव्या कोरोना रुग्णांची नोंद | २८८ रुग्णांचा मृत्यू
महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची सतत वाढणारी संख्या राज्याची चिंता वाढवणारी आहे. आज दिवसभरात राज्यात 11,111 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर गेल्या 24 तासात 288 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात राज्यात 8837 रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
माजी खासदार निलेश राणेंना कोरोनाची लागण | ट्विटरवरून माहिती दिली
माजी खासदार आणि भाजपा नेते निलेश राणे यांना करोनाची लागण झाली आहे. निलेश राणे यांनी स्वत: यासंदर्भातील माहिती दिली आहे. करोनाची लक्षणं दिसल्यानंतर करोनाची चाचणी केली आणि त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचं निलेश राणे म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
ऑक्सफर्ड लसीची मानवी चाचणी | मुंबईतील केईएम आणि नायर हॉस्पिटलची निवड
कोरोनावरच्या ऑक्सफर्डच्या लसीची मानवी चाचणी आता मुंबईतही होणार आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटशी करार झाला आहे. भारतामध्ये ऑक्सफर्डची लस यशस्वी झाली तर त्याचं उत्पादन सिरम इन्स्टिट्यूट करणार आहे. कोव्हिशिल्ड या सिरमच्या लसीशीची चाचणी लवकरच भारतात सुरू होणार आहे. देशभरातल्या एकूण १० सेंटरमध्ये १६०० निरोगी लोकांवर या लसीची चाचणी केली जाणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
Independence Day 2020 | भारतात कोरोनाच्या 3 लशी विविध टप्प्यात - पंतप्रधान
देशभरामध्ये ७४ वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जात असला तरीही यावर्षी त्यावर कोरोनाचे सावट आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावर सॅनिटायझेशन आणि इतर खबरदारी घेण्यात आली आहे. याशिवाय लाल किल्ल्यावर होणाऱ्या कार्यक्रमात लहान मुलांऐवजी यंदा कोरोना वॉरियर्स सहभागी झाले आहेत. तसंच कडेकोड बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. स्वातंत्र्यदिनादिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. दरम्यान या काळामध्ये लस कधी येणार असा सवाल वेळोवेळी उपस्थित केला जात आहे. यावर पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणातून उत्तर दिले.
5 वर्षांपूर्वी -
देशात गेल्या २४ तासांत आढळले ६६,९९९ नवे रुग्ण | ९४२ जणांचा मृत्यू
देशात कोरोनाचं थैमान अजूनही थांबलेलं नाही. मागील काही दिवसांपासून दररोज ६० हजार किंवा त्यापेक्षा जास्त रुग्णसंख्या दिवसाला आढळून येत आहे. तर दुसरीकडे सरकारकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनानंतरही करोनाबळींचा आकडाही वाढत चालला आहे.
5 वर्षांपूर्वी -
गेल्या २४ तासांत ११ हजार ८८ कोरोना रुग्णांची नोंद | २५६ रुग्णांचा मृत्यू
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या २४ तासांत ११ हजार ८८ रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या ५ लाख ३५ हजार ६०१ इतकी झाली आहे. तर दिवसभरात २५६ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यातील मृत्युदर ३.४२ टक्के इतका आहे.
5 वर्षांपूर्वी -
बीएसएनएलचे कर्मचारी देशद्रोही आहेत | भाजप खा. अनंत कुमार हेगडेंचं वादग्रस्त वक्तव्य
केंद्र सरकारच्या अधिकाराखाली येत असलेली भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) आणि एमटीएनएल या दोन टेलिकॉम क्षेत्रातील कंपन्यांचे खासगीकरण करण्यात येणार नसल्याची माहिती केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी मार्च महिन्यात सभागृहात दिली होती. बीएसएनएल आणि एमटीएनएल या दोन कंपन्यांचे केंद्र सरकार खासगीकरण करणार असल्याने याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली होती.
5 वर्षांपूर्वी -
प्रसिद्ध शायर राहत इंदौरी यांचे ह्दयविकाराच्या झटक्याने निधन
कोरोना विषाणूचा संसर्ग देशभरात अद्यापही झपाट्याने वाढताना दिसत आहे. दरम्यान, सर्वसामान्य नागरिकांपासून अगदी व्हीव्हीआयपीपर्यंत सर्वचजण कोरोनाच्या जाळ्यात अडकत चालले आहेत. यातच प्रसिद्ध गझलकार आणि शायर राहत इंदौरी यांना कोरोनाची लागण झाली आहे राहत इंदौरी यांचे पुत्र सतलज यांनी याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर स्वत: इंदौरी यांनीही याबाबत ट्वीट केले आहे. मध्य प्रदेशातील इंदौर येथील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचे समजत आहे.
5 वर्षांपूर्वी -
सप्टेंबरपासून शाळा सुरु करण्याच्या मानसिकतेत सरकारही नाही | सध्या ऑनलाईनच मार्ग
भारतात दिवसागणिक करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. २४ तासांत ५३ हजार ६०१ नवीन लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे देशात आतापर्यंत कोरोनाग्रस्तांचा आकडा २२ लाख ६८ हजार ६७५ वर पोहोचला आहे. याशिवाय कोरोनामुळे ८७१ रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत हा आकडा ४५ हजार २५७ वर पोहोचला आहे. देशात सध्या ६ लाख ३९ हजार ९२९ कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
5 वर्षांपूर्वी -
अधिकृत जागतिक घोषणा | जगातील पहिली कोरोना लस रशियाने बनवली
रशियाच्या आरोग्य मंत्रालयाकडूनही कोरोनावरील या लसीला मान्यता देण्यात आली आहे. इतकचं नाही तर राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्या मुलीनेही लस घेतली आहे. माहितीनुसार ही लस मॉस्कोच्या गामेल्या इंस्टिट्यूटने विकसित केली आहे. मंगळवारी रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने ही लस यशस्वी ठरल्याचं मान्य केले आहे. त्यामुळे व्लादिमीर पुतीन यांनी घोषित केलं आहे की, लवकरच रशिया या लसीच्या उत्पादनाचं काम सुरु करेल आणि मोठ्या संख्येने लसीचे डोस तयार करण्यावर त्यांचा भर असेल.
5 वर्षांपूर्वी -
डिसेंबरपर्यंत भारतात उपलब्ध होईल कोरोनाची लस - अदर पूनावाला
कोरोना विषाणूवरील लशीच्या तिसºया टप्प्यातील चाचणीपर्यंत अनेक जागतिक कंपन्या पोहोचल्या असल्यामुळे ही लस मिळवण्यासाठी भारत युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. रशियन विद्यापीठाने पुढील आठवड्यात सुरवातीला या लशीची नोंदणी करण्याचे संकेत दिले असून व्यापक प्रमाणावर त्याचे उत्पादनही सुरू केले.
5 वर्षांपूर्वी -
देशभरात गेल्या २४ तासांत ५३ हजार ६०१ कोरोनाबाधित | ८७१ रुग्णांचा मृत्यू
देशात ९ दिवसांनंतर आज कोरोनाचे नवीन कमी रुग्ण सापडले आहेत. गेल्या ४ ते ५ दिवसांमध्ये ६० हजाराहून अधिक कोरोनाचे रुग्ण प्रत्येक दिवसाला सापडत होते. तर २४ तासात साधारण १००० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. हे प्रमाण आज कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे.
5 वर्षांपूर्वी -
खा. नवनीत राणा यांची तब्बेत बिघडल्याने त्यांना उपचारासाठी नागपूरला हलविण्याच्या निर्णय
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना कोरोनाची लागण झाली होती. आतापर्यंत त्यांच्या घरातील ११ जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर नवनीत राणा यांचा ही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. नवनीत राणा यांच्या दोन्ही मुलांना तसेच सासू-सासऱ्यांना याआधीच कोरोनाची लागण झाली होती.
5 वर्षांपूर्वी -
आज राज्यात ९,१८१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद | २९३ रुग्णांचा मृत्यू
आज दिवसभरात राज्यात ९ हजार १८१ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर एका दिवसात २९३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोना रुग्ण वाढण्याचं प्रमाण सतत वाढतं आहे. परंतु यात एक दिलासादायक बाब म्हणजे कोरोनाग्रस्त बरे होण्याचं प्रमाणही सतत वाढतं आहे. आज एका दिवसात राज्यात ६ हजार ७११ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
Fact Check | विशेष ट्रेन्स सुरूच राहणार | एक्स्प्रेस, मेल तसंच लोकलबाबत निर्णय नाही
भारतात कोरोनाचा संसर्ग वेगानं वाढत आहे. 1 ऑगस्ट ते 9 ऑगस्टपर्यंत मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचं समोर येत आहे. सलग चौथ्या दिवशीही 60 हजारहून अधिक नवीन कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. आतापर्यंत देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 22 लाख 15 हजार 075 वर पोहोचली आहे.
5 वर्षांपूर्वी -
भारतात कोरोनाचा संसर्ग वेगानं वाढतोय | सलग चौथ्या दिवशी ६० हजारहून अधिक रुग्ण
भारतात कोरोनाचा संसर्ग वेगानं वाढत आहे. 1 ऑगस्ट ते 9 ऑगस्टपर्यंत मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचं समोर येत आहे. सलग चौथ्या दिवशीही 60 हजारहून अधिक नवीन कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. आतापर्यंत देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 22 लाख 15 हजार 075 वर पोहोचली आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्य सरकारची कोकणातील चाकरमान्यांसाठी नियमावली | परप्रातीयांवर मेहेरबान
गणेशोत्सवासाठी १२ ऑगस्टपर्यंत जे नागरिक एसटी बस किंवा अन्य खासगी वाहनाने कोकणात येतील त्यांना १० दिवस होम क्वारंटाइन करण्यात येईल. त्यासाठी कोरोना चाचणीची आवश्यकता नाही. १२ ऑगस्टनंतर जे नागरिक कोकणात जातील त्यांच्यासाठी कोरोना चाचणी अनिवार्य आहे. ती निगेटिव्ह असेल तरच प्रवासाची परवानगी मिळेल.
5 वर्षांपूर्वी -
अमेरिकेत शाळा उघडल्या | ९७ हजार मुलांना कोरोनाची लागण | जुलैमध्ये २५ मुलांचा मृत्यू
भारतात आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्याही २० लाखांच्या पुढे गेली आहे. देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या २० लाख २७ हजार ७५ इतकी झाली आहे. सध्या देशभरात कोरोना मोठ्या विकोपाला पोहोचला असून आरोग्य यंत्रणा देखील हतबल असल्याचं सिद्ध झालं आहे. अशा मध्ये केंद्र सरकार विषाची परीक्षा घेतंय अशी चर्चा सुरु झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
युरोपियन देशांप्रमाणे मुंबईत आवाजाचा नुमना घेऊन कोविड -19 टेस्ट करण्याचा प्रयोग
जगभरात थैमान घालणाऱ्या करोनाचा प्रादुर्भाव देशभरासह राज्यात अद्यापही झपाट्याने वाढताना दिसत आहे. राज्यातील करोनाबाधितांची संख्या आता ५ लाखांपेक्षा जास्त झाली आहे. काल दिवसभरात राज्यात तब्बल १२ हजार ८२२ नवे करोनाबाधित आढळले तर २७५ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL