महत्वाच्या बातम्या
-
नागपूरमध्ये २ दिवस जनता कर्फ्यू , तुकाराम मुंढेंचा निर्णय
राज्यासह नागपूर शहरात देखील दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. या वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये लॉकडाऊनबाबत महापौर आणि आयुक्तांचे एक मत झाले आहे. लॉकडाऊनबाबत महापौरांनी बैठक बोलावलेली. या बैठकीत नागपूरचे महापौर संदीप जोशी आणि नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे दोघेही उपस्थित होते. दरम्यान, मागील काही दिवसांमधील संघर्षानंतर पहिल्यांदाच ते एकत्र असून कोरोना नियंत्रणासाठी नागपूरमध्ये दोन दिवसांसाठी जनता कर्फ्यू लावण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे पुढील ४ दिवस लोकप्रतिनिधी रस्त्यावर येतील असेही निश्चित करण्यात आले आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज्यात इयत्ता तिसरी ते १२ वीसाठी Jio TV वर एकूण १२ चॅनेल्स सुरु
एकीकडे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीच्या निकालाविषयी बोलताना या महिना अखेरीपर्यंत SSC चा निकाल लागेल, असं म्हटलं आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे दहावीचा निकाल लागायला विलंब झाला आहे. १६ जुलैला महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीचा निकाल जाहीर केला.
4 वर्षांपूर्वी -
साठाव्या वर्षी मुख्यमंत्री असलो तरी त्यासाठी अट्टहास केला नव्हता...हा योगायोग - उद्धव ठाकरे
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ दैनिकाला दिलेल्या मुलाखतीचा आणखी एक प्रोमो शुक्रवारी संजय राऊत यांनी ट्विटवरुन शेअर केला. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना सरकार पाडून दाखवा, असे जाहीर आव्हानच दिले आहे. संजय राऊत यांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना उद्धव यांनी म्हटले आहे की, मी इथेच बसलोय. माझी मुलाखत सुरु असताना सरकार पाडून दाखवा. उद्धव यांच्या या वक्तव्यामुळे आता या संपूर्ण मुलाखतीविषयी राजकीय वर्तुळाला उत्सुकता लागून राहिली आहे. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतलेली ही २५ (उद्या) व २६ (रविवार) जुलै रोजी प्रसिद्ध होणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
गेल्या २४ तासांत ९ हजार ८९५ नव्या रूग्णांची नोंद, २९८ रुग्णांचा मृत्यू
राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून गेल्या २४ तासांत तब्बल ९ हजार ८९५ नव्या रूग्णांची नोंद राज्यात करण्यात आली आहे. तर दिवसभरात २९८ जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत एकूण ३ लाख ४७ हजार ५०२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच आज दिवसभरात ६ हजार ४८४ कोरोना रूग्णांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण १ लाख ९४ हजार २५३ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना कोरोनाची लागण, लीलावती इस्पितळात दाखल
मागील काही दिवसांत राज्यातील दैनंदिन रुग्णांच्या नोंदीत वाढ होताना दिसतेय. गेल्या काही दिवसांपासून राज्यात सहा हजारांची दैनंदिन रुग्ण वाढीने बुधवारी दहा हजारांचा टप्पा ओलांडला. राज्यात बुधवारी १० हजार ५७६ रुग्णांची नोंद झाली, तर २८० कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्याची एकूण रुग्णसंख्या ३ लाख ३७ हजार ६०७ वर पोहोचली असून आतापर्यंत १२ हजार ५६६ मृत्यू झाले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
सध्या तरी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणच, शासनाकडून मार्गदर्शक सूचनांचा अध्यादेश
कोरोना संकटामुळे शाळा, महाविद्यालये बंद आहेत. मात्र, राज्यात अनेक ठिकाणी ऑनलाईन शिक्षणावर भर देण्यात येत आहे. ऑनलाई शिक्षणातून पाचवीपर्यंतच्या वर्गांना सूट देण्यात आली होती. मात्र, आता शिक्षण विभागाने सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. तसा शासन निर्णय जारी केला आहे. त्यामुळे इयत्ता दुसरीपर्यंतच्या वर्गासाठी सुद्धा ऑनलाईन शिक्षणाचे धडे मिळणार आहेत. ३० मिनिटे ऑनलाईन शिक्षण घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. यात १५- १५ मिनिटांचे दोन वर्ग घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
4 वर्षांपूर्वी -
अमिताभ बच्चन यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह ही फेक न्युज
महानायक अमिताभ बच्चन यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली असल्याची बातमी काही वेळापूर्वी वेगाने पसरली होती. मात्र त्यामध्ये तथ्य नसल्याचे समोर आले आहे.सध्या अमिताभ बच्चन नानावटी रुग्णालयामध्ये आहेत. अमिताभ यांनी ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. प्रसार माध्यमांवर असे सांगण्यात येत होते की त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे, दरम्याने हे वृत्त खोटे असल्याचे ट्वीट अमिताभ बच्चन यांनी केले आहे.
4 वर्षांपूर्वी -
राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात होताच कोरोनाचा खात्मा होईल, भाजप नेत्याचं वक्तव्य
देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. काल दिवसभरात देशात तब्बल ४५ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे कोरोना रुग्णांचा एकूण आकडा साडे बारा लाखांच्या जवळ पोहोचला. तर कोरोनामुळे मृत पावलेल्या रुग्णांची संख्या ३० हजारांच्या आसपास आहे. त्यातच कोरोनावरील लस पुढील वर्षाच्या सुरुवातीपर्यंत तरी येणार नाही, असं जागतिक आरोग्य संघटनेनं जाहीर केल्यानं संकट आणखी गहिरं झालं आहे. कोरोनावरील लस येण्यास अजून बराच कालावधी लागणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.
4 वर्षांपूर्वी -
केरळमधील घटनेवरून महाराष्ट्र सरकारचा युजीसवर निशाणा
विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) अंतिम वर्षाच्या सप्टेंबर अखेरपर्यंत घेण्याचा आदेश काढला आहे. महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याबाबत अद्यापही संभ्रमता कायम असताना केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने अंतिम वर्षांच्या परीक्षांसाठी मानक कार्यपद्धती आधीच जाहीर केली आहे. यूजीसीच्या नियमांनुसार अंतिम वर्षाची परीक्षा घेणं गरजेचं आहे, असं केंद्रीय गृह मंत्रलयाचं ठाम म्हणणं आहे. त्यामुळे यासंदर्भात यूजीसीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकातही अंतिम वर्षाची परीक्षा घेणं अत्यंत गरजेचं असल्याचं म्हटलं होतं.
4 वर्षांपूर्वी -
भीषण वाढ! २४ तासांत देशभरात ४५,७२० नवे रुग्ण, तर १,१२९ रुग्णांचा मृत्यू
कोरोनाबाधित रुग्णांचं बरे होण्याचं प्रमाण दिवसागणिक वाढत असले तरी दररोज वाढणारी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या चिंताजनक आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत करोनाचे ४५ हजार ७२० रुग्ण आढले आहेत. आतापर्यंतची ही एका दिवसातील सर्वाधिक वाढ आहे. ३० ते ४० हजारांमध्ये वाढणारी रुग्णसंख्याने आता ४५ हजारांचा टप्पा ओलांडला आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज्यात आज १० हजार ५७६ नव्या रुग्णांची नोंद, तर २८० जणांचा मृत्यू
मागील काही दिवसांत राज्यातील दैनंदिन रुग्णांच्या नोंदीत वाढ होताना दिसतेय. गेल्या काही दिवसांपासून राज्यात सहा हजारांची दैनंदिन रुग्ण वाढीने बुधवारी दहा हजारांचा टप्पा ओलांडला. राज्यात बुधवारी १० हजार ५७६ रुग्णांची नोंद झाली, तर २८० कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्याची एकूण रुग्णसंख्या ३ लाख ३७ हजार ६०७ वर पोहोचली असून आतापर्यंत १२ हजार ५६६ मृत्यू झाले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
केरळात परीक्षा देणारे विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह; ६०० पालकांविरोधात गुन्हा दाखल
विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) अंतिम वर्षाच्या सप्टेंबर अखेरपर्यंत घेण्याचा आदेश काढला आहे. मात्र, युजीसीने दिलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्रात सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेणं अशक्य असल्याचं राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं होतं.
4 वर्षांपूर्वी -
हे काय आता? घरातच कोरोनाची लागण व्हायचा धोका जास्त, दक्षिण कोरियातील निष्कर्ष
ऑक्सफर्ड विद्यापीठाने संशोधित केलेल्या कोरोना लशीच्या मानवी चाचणीचे परिणाम जाहीर झाले आणि जगभरात आशेचा किरण निर्माण झाला. चाचण्या यशस्वी झाल्याच्या या बातमीने गेले 4 महिने कोरोनामुळे नकारात्मक झालेलं वातावरण एकदम आनंदी झालं. कारण या लशीची (Covaxin) निर्मिती भारतातही होणार आहे. AstraZeneca कंपनी ही लसनिर्मिती करणार आहे आणि पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटनेही या संस्थेची करार केला असून लशीचे एक अब्ज डोस Serum Institute of India उत्पादित करणार आहे. आता लवकरच लस बाजारात येणार, अशी आशा निर्माण झाली आहे. पण जागतिक आरोग्य संघटनेनं मात्र या बातमीवर अत्यंत सावध प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
IT आणि BPO क्षेत्रात काम करणाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ची मुभा वाढवली
जून महिन्याच्या सुरुवातीपासून देशातील अनलॉकचे टप्पे सुरू झाल्यापासून कोरोनाच्या फैलावाचा वेग मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी उद्योगधंदे तसेच खासगी कार्यालये सुरू करण्याची परवानगी देण्यात आल्याने अर्थचक्र हळूहळू रुळावर येऊ लागले आहे. दरम्यान, कोरोनाच्या या संकटकाळाच ‘वर्क फ्रॉम होम’ पद्धतीने काम करणाऱ्यांबाबत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुंबई महानगरपालिका समिती अध्यक्ष अमेय घोले यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह
कोरोनाविरोधात चार महिने प्रदीर्घ लढा दिल्यानंतर आता मुंबई सावरत असल्याची सकारात्मक बाब समोर येत आहे. मुंबईत रुग्ण दुपटीचा दर तब्बल ५७ दिवसांवर पोहोचला असून बरे झालेल्या रुग्णांचा दर ७१ टक्के आहे. याशिवाय, आतापर्यंत ७२,६४८ रुग्ण कोविडमुक्त झाले.
4 वर्षांपूर्वी -
नागपूर: PPE किट घालून तुकाराम मुंडेंनी थेट कोरोना रुग्णांशी संवाद साधला
कोरोना महामारीवरील उपाययोजना ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया असून ती लोकांना विश्वासात घेऊनच करावी लागणार आहे. टाळेबंदी हा त्यावर पर्याय असू शकत नाही. जिल्ह्य़ात आता टाळेबंदी लावल्यास शेतीच्या हंगामावर परिणाम होऊ शकतो, असे नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी स्पष्ट केले. रुग्णसंख्या वाढल्याने पुन्हा टाळेबंदी लागू करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महापालिकेने तसे संकेतही दिले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
व्यक्ती एकंच, सरकारी लॅबच्या कोविड रिपोर्टमध्ये पॉझिटिव्ह, खाजगी लॅबचा रिपोर्ट निगेटिव्ह
मुंबई महानगर क्षेत्रामध्ये कोरोना रुग्णसंख्येत कल्याण-डोंबिवली महापालिका दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली असून, गेल्या काही दिवसांपासून येथे दररोज ४५० ते ५५० बाधित आढळून येत आहेत. शहरातील एकूण रुग्णांचा आकडा १७ हजारांच्या पुढे गेल्याने गेल्या १७ दिवसांपासून शहरात लागू असलेली टाळेबंदी फसल्याची चर्चा सुरू झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
देशात कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांपेक्षा बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक
देशभरात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत चालला आहे. गेल्या २४ तासांत देशात ३७,१४८ कोरोनाचे नवे रुग्ण सापडले. आतापर्यंतचा देशभरात कोरोनाबाधितांचा आकडा ११ लाख ५४ हजाराच्या पार गेला आहे. तर यामध्ये आतापर्यंत २८,०९९ लोकांचा मृत्यू झाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज्यात आज ८२४० कोरोना बाधीत रुग्णांची वाढ
राज्यात आज ८२४० कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता ३१८६९५ अशी झाली आहे. आज नवीन ५४६० कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण १७५०२९ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण १३१३३४ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
4 वर्षांपूर्वी -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती - अनिल परब
कोरोनाच्या काळात पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे राज्याच्या तिजोरीत खडखडाट निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर एसटीच्या साडेचार हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा आली असल्याचे बातमी समोर आली होती. मात्र, यावर राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी खुलासा केला आहे. कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती देण्यात आल्याचं त्यांनी ट्विटरद्वारे सांगितलं.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- EPF Withdrawal | पगारदारांनो EPF च्या पैशांतून होम लोन फेडत आहात का; तुम्ही जे करताय ते योग्य आहे की अयोग्य, इथे जाणून घ्या
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो
- BEL Vs Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 45% पर्यंत मिळेल परतावा - NSE: TATAMOTORS