महत्वाच्या बातम्या
-
भारतीयांमध्ये कोरोनाशी लढायची प्रतिकारशक्ती आपोआप निर्माण झालेली असू शकते - डॉ. रणदीप गुलेरिया
जगभरात थैमान घालत असलेलं करोना संकट कधी टळणार? हा प्रश्न पडलेल्या नागरिकांची चिंता वाढावी अशीच आकडेवारी आज समोर आली आहे. भारतात करोनाचा शिरकाव झाल्यापासून पहिल्यांदाच दिवसभरात इतक्या मोठ्या प्रमाणात बाधित रुग्ण आढळून आले आहेत. मागील २४ तासांत देशात तब्बल ४० हजार ४२५ नवे करोनाबाधित आढळले असून, ६८१ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता ११ लाख १८ हजार ०४३ वर पोहचली आहे.
4 वर्षांपूर्वी -
तेजस ठाकरे यांच्या दोन सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण
मुंबईमध्ये करोनाचा संसर्ग वाढू लागल्यानंतर आजतागायत तब्बल सव्वाचार लाखांहून अधिक मुंबईकरांची करोना चाचणी करण्यात आली असून त्यापैकी साधारण एक लाख मुंबईकरांना करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. यापैकी ७० टक्के करोनाबाधित बरे झाले आहेत. मात्र आजघडीला नवी दिल्लीमध्ये सर्वाधिक चाचण्या करण्यात आल्या असून चाचण्यांच्या बाबतीत मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.
4 वर्षांपूर्वी -
रिचर्ड होर्टन यांचे एक महत्वाचं ट्विट 'उद्या व्हॅक्सीन, फक्त सांगत आहे'
जगभरात कोरोना व्हायरसच्या लसीचे परीक्षण सुरू आहे. आता या लसींचे निकालही समोर येत आहेत. याच साखळीत मॉडर्ना इंकचेही (Moderna Inc.) नाव जोडले गेले आहे. अमेरिकेत सर्व प्रथम परीक्षण केल्या गेलेल्या COVID-19 च्या पहिल्या दोन टप्प्यांवरील परीक्षणाच्या निकालामुळे वैज्ञानिक अत्यंत आनंदात आहेत. त्यामुळे रशियाच्या सेचेनोव्ह विद्यापीठाने बनवलेली लस मानवी परीक्षणामध्ये यशस्वी ठरलेली असतानाच जगासाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. कोरोना व्हायरस विरोधात अमेरिकेच्या मॉर्डना कंपनीने विकसित केलेली लसही फेज १ च्या टप्प्यावर यशस्वी ठरली आहे.
4 वर्षांपूर्वी -
गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठी एसटी सोडणार, पण नियम...
कोरोना संकट आणि आगामी गणेशोत्सव याची सांगड कशी घालायची असा प्रश्न मुंबईतल्या चाकरमान्यांना पडला होता. कारण शिमगा आणि गणेशोत्सव हे कोकणी माणसाचे पारंपारिक आवडते सण आहेत. यासाठी सुट्टी टाकून, खाडे करुन चाकरमानी गावी जातात. सध्या कोरोना संकटामुळे त्यांच्या प्रवासावर सावट आलं होतं. पण आता चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी समोर येतेय.
4 वर्षांपूर्वी -
पिंपरीत तीन सख्या भावांचा कोरोना उपचारादरम्यान मृत्यू
पुण्यात १४ जूनपासून सतत लॉकडाऊन सुरू आहे. सर्वात कडक लॉकडाऊन लागू करूनही पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होण्याची चिन्हे नाहीत. उलट लॉकडाऊनच्याच काळात कोरोनाग्रस्तांची संख्या बेसुमार वाढत आहे. पुण्यात काल दिवसभरात २,४५९ कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली आहे. तर तब्बल ६१ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. कालची रुग्ण संख्या आणि मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या ही आतापर्यंतची सर्वाधिक मोठी संख्या आहे. पुणे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ही ५०,००० पेक्षा जास्त झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्यांना अडचणी आणि बकरी ईद साजरा करणाऱ्यांना सुविधा
गणपतीसाठी कोकणात जाऊ इच्छिणाऱ्या लोकांना येत असलेल्या अडचणींच्या मुद्द्यावरुन आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) राज्य सरकारविरोधात आक्रमक झाली आहे. गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्यांना अडचणी येतात. मात्र, राज्य सरकार बकरी ईद साजरी करण्यासाठी सुविधा देत आहे, अशी घणाघाती टीका मनसेचे सरचिटणीस संदीप देशपाडे यांनी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
शाळा कधी सुरु कराव्यात अशी पालकांकडेच विचारणा, जवाबदारी झटकण्यासाठी सरकारी पाऊल?
अद्यापही पालकांना शाळा नेमक्या कधी सुरु होणार ही चिंता सतावत आहे. यादरम्यान मानव संसाधन विकास मंत्रालयाचा भाग असणाऱ्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने राज्यं तसच केंद्रशासित प्रदेशांना पत्र पाठवलं असून पालकांकडून शाळा कधी सुरु कराव्यात यासंबंधी मत मागवण्यास सांगितलं आहे. ऑगस्ट, सप्टेंबर की ऑक्टोबर…कोणत्या महिन्यात शाळा सुरु करणं तुम्हाला योग्य वाटतं अशी विचारणा पालकांकडे करण्यास सांगण्यात आलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
महाविकास आघाडीतील मंत्री अस्लम शेख यांना कोरोनाची लागण
देशभरात कोरोनाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. आता मुंबईच्या पालकमंत्र्यांनाच कोरोनाने ग्रासले आहे. मुंबईचे पालकमंत्री आणि काँग्रेस नेते अस्लम शेख यांना कोरोनाची लागण झाली आहे. अस्लम शेख यांनी ट्विटरवरुन याबाबत माहिती दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
बापरे! आज ९५१८ नवे कोरोना रुग्ण, २५८ रुग्णांचा मृत्यू
राज्यात आज ३९०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.६२ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ६९ हजार ५६९ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ९५१८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख २८ हजार ७३० रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
4 वर्षांपूर्वी -
आरोग्य खात्याकडून कोरोनाच्या नव्या लक्षणांची माहिती - सविस्तर
जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव भारतात झपाट्याने वाढत आहे. देशात मागील २४ तासांत तब्बल ३८ हजार ९०२ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंतची एका दिवसातील ही सर्वाधिक वाढ आहे. या वाढीसह देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता १० लाख ७७ हजार ६१८वर पोहोचला आहे. तर २४ तासांत ५४३ कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावल्याने देशातील कोरोनाबळींची संख्या २६ हजार ८१६ इतकी झाली आहे. दरम्यान, देशात सध्या ३ लाख ७३ हजार ३७९ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू असून ६ लाख ७७ हजार ४२३ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
भारतात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्युच्या आकडेवारीवर अमेरिकन माध्यमांना शंका
जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव भारतात झपाट्याने वाढत आहे. देशात मागील २४ तासांत तब्बल ३८ हजार ९०२ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंतची एका दिवसातील ही सर्वाधिक वाढ आहे. या वाढीसह देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता १० लाख ७७ हजार ६१८वर पोहोचला आहे. तर २४ तासांत ५४३ कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावल्याने देशातील कोरोनाबळींची संख्या २६ हजार ८१६ इतकी झाली आहे. दरम्यान, देशात सध्या ३ लाख ७३ हजार ३७९ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू असून ६ लाख ७७ हजार ४२३ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्र पोलिस दलात २४ तासांत १३३ जणांना कोरोना, दोघांचा मृत्यू
महाराष्ट्रात शनिवारी ८ हजार ३४८ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. तर १४४ कोरोनाबळींचा नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता ३ लाख ९३७ इतकी झाली असून आतापर्यंत ११ हजार ५९६ जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. दरम्यान, राज्यात काल ५ हजार ३०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे आतापर्यंत राज्यात १ लाख ६५ हजार ६६३ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
जुन्ररमधील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक दिनेश दुबे यांचं कोरोनामुळे निधन
पुण्यात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाबाधितांची संख्याही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्याचसोबत पुण्यात अनेक लोकप्रतिनिधींनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. जुन्नरमध्ये राष्ट्रवादीचे नगरसेवक दिनेश दुबे (58) यांनाही कोरोनाची लागण झाली होती. मात्र उपचारादरम्यान आज पहाटे त्यांचे खाजगी रुग्णालयात निधन झाले. दिनेश दुबे यांच्या निधनाने जुन्नर शहर व परिसरात मोठी शोककळा पसरली आहे.
4 वर्षांपूर्वी -
भाजप नेता म्हणतो गोमूत्र प्या कोरोनाला दूर ठेवा, काँग्रेस कार्यकर्त्याचा रम-अंडीचा सल्ला
देश सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. रुग्णांच्या संख्येने दहा लाखांचा टप्पा पार केला असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी विविध उपाय केले जात आहेत आणि आता देशात समूह संसर्ग सुरु झाल्याची माहिती इंडियन मेडिकल कौन्सिलने दिली आहे. याच दरम्यान भाजपच्या एका नेत्याने कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी अजब सल्ला दिला आहे. पश्चिम बंगाल भाजपचे प्रदेश अध्यक्ष दिलीप घोष यांनी एक विधान केलं आहे. लोकांना कोरोनापासून बचावासाठी गोमूत्र पिण्याचा सल्ला दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
मागील २४ तासांत ३८ हजार ९०२ नवे कोरोना रुग्ण, तर ५४३ रुग्णांचा मृत्यू
जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव भारतात झपाट्याने वाढत आहे. देशात मागील २४ तासांत तब्बल ३८ हजार ९०२ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंतची एका दिवसातील ही सर्वाधिक वाढ आहे. या वाढीसह देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता १० लाख ७७ हजार ६१८वर पोहोचला आहे. तर २४ तासांत ५४३ कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावल्याने देशातील कोरोनाबळींची संख्या २६ हजार ८१६ इतकी झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
सावधान! भारतात समूह संसर्गास सुरुवात, इंडियन मेडिकल असोसिएशनची माहिती
गेल्या २४ तासात कोरोनाचे ३८,९०२ नवे रुग्ण वाढले आहेत. आतापर्यंतची एका दिवसातील ही सर्वात मोठी वाढ आहे. गेल्या २४ तासात ५४३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत १० लाख ७७ हजार ६१८ लोकांनी कोरोनाची लागण झाली आहे. ज्यापैकी ६ लाख ७७ हजार ४२३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत २६,८१६ जणांचा मृत्यू झाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
आज राज्यात तब्बल ८३४८ नव्या रुग्णांची भर, तर १४४ रुग्णांचा मृत्यू
आज राज्यात तब्बल ८३४८ नव्या रुग्णांची भर पडली. तर १४४ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ३,००,९३७’वर गेली आहे. तर एकूण मृत्यू ११५९६ एवढे झाले आहेत. तर मुंबईत आज ११८६ नवे रुग्ण आढळले तर ६५ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मुंबईतल्या रुग्णांची संख्या १,००,३५० एवढी झाली. तर आत्तापर्यंत ५६५० जणांचा मृत्यू झाला.
4 वर्षांपूर्वी -
राज्यात आजपर्यंत एकूण १० हजारांहून अधिक बालकांना कोरोनाचा संसर्ग
कोरोना व्हायरसची दहशत राज्यात कायम आहे. कोरोनारुग्णांच्या संख्येने राज्यात ३ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. एकट्या मुंबईतच १ लाखांवर रुग्ण आतापर्यंत सापडले आहेत. कोरोनाचा मृत्यूदर दिवसेंदिवस खाली येत असला, तरी या रोगाचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे. त्यामुळे धोका कायम आहे.
4 वर्षांपूर्वी -
इराणमध्ये अडीच कोटी नागरिकांना कोरोनाची बाधा - राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी
इराणमध्ये अडीच कोटी नागरिकांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी यांनी दिली आहे. शनिवारी एका दिवसात इराणमध्ये २ लाख ७१ हजार ६०६ रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती रुहानी यांनी टीव्हीवर देईल. एवढंच नाही तर इराणमध्ये आणखी साडेतीन कोटी लोक करोना पॉझिटिव्ह होऊ शकतात अशीही धक्कादायक शक्यता त्यांनी बोलून दाखवली. रॉयटर्सने या संदर्भातले वृत्त दिले आहे.
4 वर्षांपूर्वी -
पुणेकरांना जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी लॉकडाउनमधून एकदिवसाचा दिलासा
कोरोना व्हायरसची साखळी तोडण्यासाठी पुण्यात पुन्हा एकदा कठोर लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. करोनाची साखळी तोडण्यासाठी पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यात दहा दिवसांसाठी लॉकडाउनची घोषणा केली होती. त्यानुसार पुण्यात १४ जुलैपासून जीवनावश्यक वस्तुंची, किरकोळ, मटन, चिकन, मासे, अंडी विक्रीची सर्व दुकाने बंद होती.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार