महत्वाच्या बातम्या
-
जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख होम क्वारंटाइन, पत्नीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह
राज्यात लॉकडाऊन असूनही कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत आहे. त्यात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे, शिवसेना नेते आणि राज्याचे जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख हे स्वत: हून क्वारंटाइन झाले आहेत. शंकरराव गडाख यांची पत्नी सुनिता गडाख यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शंकरराव गडाख यांनी क्वारंटाइन होण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्री गडाख यांचाही स्वॅब तपासणीसाठी पाठवला आहे. आता गडाखांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.
5 वर्षांपूर्वी -
६ कोरोना योद्धाचं निलंबन, कोरोना आपत्तीत वसई-विरार आयुक्तांचं फुलटाईम राजकारण
सध्या वसई विरार महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. परिस्थिती चिंताजनक असली महत्वाचं विद्यमान पालिका आयुक्त गंगाथरण डी यांना फुलटाईम राजकारण करण्यातच रस असल्याचं पाहायला मिळतंय. वास्तविक साध्याचं वसई विरारमधील त्यांची कार्यशैली पाहता त्यांच्याविरुद्ध न्यायालयात खटले दाखल झाल्यास आश्चर्य वाटणार नाही. यापूर्वी देखील अधिकारांचा गैरवापर केल्याने मुंबई हायकोर्टात खटला दाखल करण्यात आल्याचं समोर आलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
चिंताजनक! देशात गेल्या २४ तासांत ३४ हजार ८८४ नव्या रुग्णांची नोंद
देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत सर्वाधिक वाढ होत असून गेल्या २४ तासांत ३४ हजार ८८४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आजच्या दिवसातील हा सर्वाधिक आकडा मानला जात आहे. नियमित मोठ्या संख्येने रुग्ण सापडत असल्याने देशभरात आता चिंता व्यक्त केली जात आहे. या नव्या रुग्णसंख्येमुळे देशात सध्या १० लाख ३८ हजार ७१६ एकूण बाधितांचा आकडा पोहोचला आहे.
5 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांकडून माल खरेदी करून विक्री, मराठी युवकाचा 'Next Fresh' ब्रॅण्ड नफ्यात
जगातील तब्बल ५५.५ कोटी कर्मचाऱ्यांना आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या २० कोटी विद्यार्थ्यांना कोरोनाचा फटका बसला आहे. मे महिन्याच्या सुरुवातील भारतातील बेरोजगारीचा दर २७.१ टक्क्यांवर जाऊन पोहोचला. तर मार्च ते एप्रिल या कालावधीत तब्बल १२.२ कोटी लोकांनी रोजगार गमावला. कोर्सेरा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मनं ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात गेल्या २४ तासात ८,३०८ नवे कोरोना रुग्ण, २५८ रुग्णांचा मृत्यू
राज्यामध्ये सलग दोन दिवस कोरोनाग्रस्तांच्या संख्येत ८ हजारांपेक्षा जास्तची वाढ झाली आहे. मागच्या २४ तासात राज्यात कोरोनाचे ८,३०८ रुग्ण वाढले आहेत, तर २५८ मृत्यूंची नोंद झाली आहे. आजही मुंबईपेक्षा पुण्यात कोरोनाचे जास्त रुग्ण वाढले आहेत. मुंबईत आजच्या दिवसात १,२९४ तर पुण्यात १,५३९ रुग्ण वाढले आहेत. मुंबईमध्ये एका दिवसात ६२ जणांचा मृत्यू झाला, तर पुणे मनपा क्षेत्रात २१ जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला.
5 वर्षांपूर्वी -
नवी मुंबई महानगरपालिकेच्या कोविड सेंटरमध्ये कोरोनाबाधित महिलेवर बलात्कार - ANI वृत्त
मुंबईत कोरोनानं थैमान घातलं असताना एक धक्कादायक घटना समोर आली आहे. क्वारंटाइन सेंटरमध्ये एक कोरोना पॉझिटिव्ह महिला रुग्णावर अतिप्रसंग करण्यात आला आहे. पनवेलमधील नवी मुंबई महानगरपालिकेच्या एका क्वारंटाइन सेंटरमध्ये गुरुवारी रात्री हा मानवतेला काळिमा फासणारा प्रकार घडला. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
बकरी ईदसाठी राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना जाहीर
बकरी ईदसाठी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षी बकरी ईद साध्या पदध्तीने साजरी करावी, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना लस निर्मितीवरून अमेरिका, रशिया, इंग्लंड आणि कॅनडामध्ये वाद
जगभरात कोरोनाचा फैलाव वाढत असून अद्यापही करोनावरील लस उपलब्ध न झाल्याने रशियाच्या या संशोधनामुळे दिलासा व्यक्त केला जात होता. पण आता अमेरिका, इंग्लंड आणि कॅनडाच्या दाव्यामुळे आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
भयंकर! अमेरिकेत मागील २४ तासांत ६८ हजार ४२८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद
कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या अमेरिकेत आतार्यंतची सर्वाधिक रुग्णवाढ नोंदविण्यात आली आहे. अमेरिकेत मागील २४ तासांत तब्बल ६८ हजार ४२८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे अमेरिकेतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ३५ लाख ६० हजार ३६४वर पोहोचली आहे. तर २४ तासांत ९७४ जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावल्याने अमेरिकेतील कोरोनाबळींची संख्या १ लाख ३८ हजार २०१ इतकी झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
चिंताजनक! राज्यात आज ८६४१ कोरोना रुग्णांची नोंद
राज्यात आज नव्या ८ हजार ६४१ नव्या रुग्णांची वाढ झाली असून २६६ मृतांची नोंद झाली आहे. त्यामुळे २ लाख ८४ हजार २८१ एकूण रुग्णांची संख्या झाली आहे. गेल्या चोवीस तासांत २६६ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाल्याने राज्यात ३.९४ टक्के मृत्यूदर असल्याचं सांगण्यात येतय. तर आज ५५२७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ५८ हजार १४० वर पोहोचली आहे. त्यामुळे सध्या महाराष्ट्रात १ लाख १४ हजार ६४८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
5 वर्षांपूर्वी -
लॉकडाउनमुळे नोकऱ्या गेल्याने मराठी तरुण आत्मविश्वासाने स्वतःच्या उद्योगांकडे
अनपेक्षितपणे आलेले करोना संकट आणि त्यामुळे जाहीर झालेले लॉकडाउन यांमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या तर काहींना चालू असलेला छोटा उद्योग बंद करावा लागला. पण, हातावर हात धरून न बसता, ‘रडायचे नाही लढायचे’, हा निश्चय करून नव्या उमेदीने अनेकांनी लघुउद्योग, घरगुती खाद्यपदार्थ पुरवणारी सेवा, छोटे व्यवसाय सुरू केले आहेत. ही पुन्हा शून्यातून सुरुवात असली तरीही हिंमत न हारता आहे त्या परिस्थितीला भिडण्याचे धैर्य अनेकांनी दाखवले आहे.
5 वर्षांपूर्वी -
अवघ्या ६५० रुपयांना मिळणार कोरोना निदान किट, IIT दिल्लीचं संशोधन
कोविड रुग्णाची तपासणी करण्यासाठी कमी खर्चाची कोविड चाचणी किट्स आयआयटी दिल्लीच्या संशोधकांनी तयार केली आहे. त्याला भारतीय संशोधन परिषदेची (ICMR) मान्यता दिली आहे. या कोविड किट्सचे लोकार्पण केंद्रीय मानव संसाधन मंत्री रमेश पोखरीवाल निशंक तर केंद्रीय मानव संसाधन राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी अकोलामधून ऑनलाईन केले.
5 वर्षांपूर्वी -
देशात कोरोनाचा उद्रेक; २४ तासांत ३२ हजार ६९५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद
भारतातील कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. देशात मागील २४ तासांत ३२ हजार ६९५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ९ लाख ६८ हजार ८७६वर पोहोचली आहे. तर एका दिवसात ६०६ कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावल्याने देशातील कोरोनाबळींचा आकडा २४ हजार ९१५ इतका झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्याच्या माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचे कोरोनामुळे निधन
राज्याच्या पहिला महिला निवडणूक आयुक्त आणि प्रसिद्ध लेखिका नीला सत्यनारायण यांचे आज कोविड-१९मुळे निधन झाले. त्यांच्यावर अंधेरी येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार सुरु होते. आज उपचारादरम्यान सकाळी चारच्या सुमारास त्यांचे निधन झाले. त्या ७१ वर्षांच्या होत्या.
5 वर्षांपूर्वी -
ठाणे पालिका: मनसेचे संदीप पाचंगे यांच्या पाठपुराव्याने रुग्णांना PPE किट निम्या दरात
ठाणे जिल्ह्यात मंगळवारी करोनाचे १ हजार ५०३ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची एकुण संख्या ५८ हजार ५०७ इतकी झाली आहे. तर, मंगळवारी दिवसभरात जिल्ह्यात ३५ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून जिल्ह्यातील मृतांची एकुण संख्या १ हजार ६८९ वर पोहोचली आहे.
5 वर्षांपूर्वी -
पुण्यात व्हेंटिलेटर अभावी निवृत्त शास्त्रज्ञाचा COVID-19ने मृत्यू
पुण्यात कोरोना रुग्णांची सतत वाढ होत आहे. त्यामुळे आरोग्यव्यवस्था डळमळीत झाली आहे. याचाच फटका आज पुण्यातील एका शास्त्रज्ञाला बसला असून व्हेंटिलेटरअभावी त्यांचा मृत्यू झाला आहे. डॉ.पी.लक्ष्मी नरसिंहन (६१) असे त्यांचे नाव आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात आज ७ हजार ९७५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद
राज्यातील करोनाचं थैमान अजूनही थांबलेलं नाही. मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये करोनाचा प्रसार वाढत असल्याचं दिसून येत आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील करोना बाधित रुग्णांची आकडेवारी जाहीर केली. राज्यात आज ७ हजार ९७५ बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णसंख्या २ लाख ७५ हजार ६४० इतकी झाली आहे. आज नवीन ३ हजार ६०६ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती आणि लॉक-अनलॉकच्या गोंधळामुळे गटारीचा सुद्धा निरुत्साह
कोरोना संसर्गामुळे निर्माण परिस्थिती लक्षात घेऊन पालिकेने जवळपास सर्वच धर्मांचा सणांवर निर्बंध घातले आहेत. अगदी गणेश विसर्जनासाठी देखील चौपाट्यांची गरज लागणार नाही अशीच स्थिती आहे. त्यासाठी दक्षिण मुंबईमध्ये पाच ठिकाणी अतिरिक्त कृत्रिम तलावांची सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रॅन्टरोड, ताडदेव, मलबार हिल, मुंबई सेंट्रल आणि गिरगाव येथे कृत्रिम तलाव उभारण्यात येणार आहेत.
5 वर्षांपूर्वी -
गुगल आणि जिओ मिळून अँड्रॉइड बेस्ड स्मार्टफोन ऑपरेटिंग सिस्टम तयार करणार
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातली जगातली मोठी कंपनी असणारी Google आता Jio प्लॅटफॉर्ममध्ये गुंतवणूक करणार आहे. गुगल रिलायन्स जिओमध्ये 33,737 कोटी रुपयांची गुंतवणूक करेल. Jio Platforms Limited चा 7.8 टक्के वाटा Google कडे असेल. अशा प्रकारे आता JPL मध्ये फेसबुक, इंटेल (Intel), क्वालकॉम (Qualcomm) आणि गुगल असे 4 मोठे भागीदार असतील. Google च्या गुंतवणुकीची घोषणा RIL चे मुकेश अंबानी यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) केली.
5 वर्षांपूर्वी -
रशियानंतर अमेरिकेतील मॉर्डना कंपनीकडून कोरोना लस बाबत आनंदाची बातमी - सविस्तर वृत्त
जगभरात कोरना व्हायरसच्या लसीचे परीक्षण सुरू आहे. आता या लसींचे निकालही समोर येत आहेत. आता याच साखळीत मॉडर्ना इंकचेही (Moderna Inc.) नाव जोडले गेले आहे. अमेरिकेत सर्व प्रथम परीक्षण केल्या गेलेल्या COVID-19 च्या पहिल्या दोन टप्प्यांवरील परीक्षणाच्या निकालामुळे वैज्ञानिक अत्यंत आनंदात आहेत. त्यामुळे रशियाच्या सेचेनोव्ह विद्यापीठाने बनवलेली लस मानवी परीक्षणामध्ये यशस्वी ठरलेली असतानाच जगासाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. करोना व्हायरस विरोधात अमेरिकेच्या मॉर्डना कंपनीने विकसित केलेली लसही फेज १ च्या टप्प्यावर यशस्वी ठरली आहे. मॉर्डना कंपनीने विकसित केलेल्या लसीची ४५ तंदुरुस्त स्वयंसेवकांवर चाचणी घेण्यात आली.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो