महत्वाच्या बातम्या
-
आज राज्यात कोरोनाचे 5257 रुग्ण वाढले, 78 रुग्णांचा मृत्यू
आज राज्यात कोरोनाचे 5257 रुग्ण वाढले आहेत. गेल्या 3 दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 5 हजारांपेक्षा अधिक संख्येने वाढत आहे. राज्यात गेल्या 48 तासात 78 रुग्णांचा मृत्यू झाला असून आधीच्या कालावधीतील 103 आणखी रुग्णांची कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. सध्या राज्यात मृत्यूदर हा 4.48 टक्के इतका आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुंबईत मास्क न वापरल्यास १ हजार रुपये दंड भरावा लागणार
कोविड १९ संसर्गासाठी लागू असलेली टाळेबंदी टप्प्या टप्प्याने शिथील करुन जनजीवन पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न शासनाकडून होत असताना काही नागरिकांकडून कोविड १९ संसर्ग प्रतिबंधात्मक मार्गदर्शक तत्त्वांचे योग्यरित्या पालन होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. विशेषत: मुखावरण अर्थात मास्कचा वापर व्यवस्थित केला जात नाही. यामुळे सार्वजनिक स्थळं, प्रवास यासह खासगी वाहनांमध्येही प्रवास करताना मास्क लावणे बंधनकारक असल्याचे निर्देश महानगरपालिका प्रशासनाने निर्गमित केले आहेत. या निर्देशांचे उल्लंघन करणाऱयांकडून १ हजार रुपये दंड वसूल करण्यासह भारतीय दंड संहितेनुसार कारवाई करण्याचाही इशारा देण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रात 31 जुलैपर्यंत लॉकडाउन वाढला, राज्य सरकारचा मोठा निर्णय
महाराष्ट्रत लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढविण्यात आला आहे. सध्या जे नियम आहेत त्यात फारसा बदल करण्यात आलेला नाही. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारच्या संवादात याचे संकेत दिले होते.
5 वर्षांपूर्वी -
फडणवीस आणि पवारांच्या बैठकीला उपस्थित असणाऱ्या भाजप आमदाराला कोरोना
पुण्यातील भाजप आमदाराला कोरोनाची लागण झाली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेअंतर्गत येणाऱ्या मतदारसंघातील आमदार कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. भाजप आमदारासह त्याच्या पत्नीलाही कोरोनाची लागण झाली आहे. आमदार आणि त्याची पत्नी हे दोघे पिंपरीतील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत.
5 वर्षांपूर्वी -
अखेर २-३ शिल्लक असलेली लक्षणं सुद्धा कोरोनाशी जोडली गेली
देशात कोरोनाचा हाहाकार वाढत आहे. रोज कोरोना रुग्णांचे आकडे रेकॉर्ड ब्रेक करत आहेत. भारतात 5.28 लाखाहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. पण या सगळ्यात, कोरोनाची काही नवीन लक्षण समोर आल्यामुळे आरोग्य विभागाच्या अडचणी वाढल्या आहेत. ताप, श्वास घेण्यात त्रास, कोरडा खोकला आणि थकवा यासारखे शारीरिक बदल झाले की ही कोरोनाची लक्षणं आहेत हेच आतापर्यंत सगळ्यांना माहिती होतं. परंतु अमेरिकेतील सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन या वैद्यकीय संस्थेनं तीन नवीन कोरोनाची लक्षणं समोर आणली आहे. पावसाळ्यात भारतात ही लक्षण मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.
5 वर्षांपूर्वी -
आज राज्यात सर्वाधिक ५४९३ कोरोना रूग्णांची वाढ
कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून राज्यात एका दिवसात पहिल्यादांच बाधित झालेल्या रुग्णांची उच्चांकी नोंद झाली. गेल्या तीन दिवसांपासून राज्यात पाच हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळून येत असून आज उच्चांकी नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील करोना बाधित रूग्णांचा आकडा १ लाख ६४ हजार ६२६ इतका झाला आहे. तर दोन हजार ३३० रुग्णांना दिवसभरात डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करून आकडेवारी जाहीर केली.
5 वर्षांपूर्वी -
आज रिपोर्ट आला, शिवसेना भवनातील अजून ३ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्री परिसरात कोरोनाचे रूग्ण आढळल्यानंतर आता थेट शिवसेनेचं मुख्यालय असलेल्या दादर येथील शिवसेना भवनातच कोरोनाचा शिरकाव झाल्याचं उघड झालं आहे. सेना भवनातील तीन जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे.
5 वर्षांपूर्वी -
पावसाळ्यात कोरोनाचा फैलाव वाढणार का? एम्सचे संचालक डॉ. गुलेरिया म्हणाले
उष्ण हवामानात कोरोनाचा विषाणू जिवंत राहत नाही तर आर्द्रता असलेल्या ठिकाणी कोरोनाचा प्रसार लगेच होतो, असा दावा विविध तज्ज्ञांनी केला होता. मात्र, एम्स रुग्मालयाचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी या प्रश्नावर अत्यंत समाधानकारक उत्तर दिलं आहे आणि याबाबत इंडिया टुडेने या वृत्त दिलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
एप्रिलमध्ये १ लाख आयुष डॉक्टरांना प्रशिक्षण, त्यापैकी ९८ हजार डॉक्टर अजून गायब
राज्यात ५३१८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. काल राज्यात १६७ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यापैकी ८६ मृत्यू हे मागिल ४८ तासांमधील तर उर्वरित ८१ मागिल कालावधीतील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.५७ टक्के एवढा आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ८४,२४५ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५२.९४ % एवढे आहे.
5 वर्षांपूर्वी -
अमेरिकेत एका दिवसात ४० हजार नवे रुग्ण, टेक्सास व फ्लोरिडात पुन्हा निर्बंध
अमेरिकेत कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच असून, एका दिवसात तब्बल ४० हजार नवे रुग्ण आढळल्याने तेथील दोन प्रांतांमध्ये काही नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. टेक्सासच्या गव्हर्नरनी सर्व बार बंद करण्याचे आदेश दिले आहेत, तर फ्लोरिडामधील रेस्टॉरंट व बारमध्ये मद्यविक्री बंद करण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
जगातील कोरोनाग्रस्तांचा आकडा १ कोटीवर, जगभर कोरोनाचे ५ लाख बळी
गेल्या ६ महिन्यांपासून जगात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोनाग्रस्तांची संख्या आता १ कोटीवर गेली आहे. वर्ल्डोमीटरच्या माहितीनुसार शनिवारी रात्री उशिरा जगातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्याने एक कोटींचा टप्पा ओलांडला. उन्हाळ्यात तापमान वाढीमुळे कोरोनाग्रस्तांची संख्या कमी होईल, असे वाटत होते. पण ती आशा फोल ठरली आहे. एप्रिल, मे आणि जून या ३ महिन्यांच्या कालावधीत ९० टक्के कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत, असे या संस्थेने आपल्या अहवालात म्हटले आहे.
5 वर्षांपूर्वी -
भीषण स्थिती! मागील २४ तासांत देशात कोरोनाचे तब्बल २० हजार नवे रुग्ण
गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे तब्बल २० हजार नवे रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. आठवडाभरापासून दररोज देशात १५ हजारांपेक्षा जास्त नवीन रुग्ण आढळत आहेत. मात्र, आता हा आकडा २० हजारापर्यंत जाऊन पोहोचला आहे.
5 वर्षांपूर्वी -
आज राज्यात ५३१८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
आज राज्यात ५३१८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर राज्यात आज १६७ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यापैकी ८६ मृत्यू हे मागिल ४८ तासांमधील तर उर्वरित ८१ मागिल कालावधीतील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.५७ टक्के एवढा आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ८४,२४५ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५२.९४ % एवढे आहे.
5 वर्षांपूर्वी -
केंद्राच्या निर्णयानंतर भारतात कोरोना रुग्णांवर वापरणार नवं औषध
कोरोना व्हायरसमुळे चिंताजनक प्रकृती असलेल्या रुग्णांवर ‘डेक्सामेथासोन’ हे औषध वापरायला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने परवानगी दिली आहे. आरोग्य मंत्रालयाने करोना व्हायरसच्या उपचारपद्धतीमध्येही काही बदल केले आहेत. मेथाइलप्रेड्निसोलोनला पर्याय म्हणून डेक्सामेथासोन (Dexamethasone) औषध वापरायला परवानगी दिली आहे. कोरोनाची मध्यम आणि गंभीर लक्षणे असलेल्या तसेच ऑक्सिजनची आवश्यकता असलेल्या रुग्णांसाठी हे औषध वापरलं जाणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
झारखंड राज्यात कोरोनाचा उद्रेक, ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन
झारखंड राज्यात कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेऊन सरकारने ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या ठिकाणी लॉकडाऊनच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात येईल असे राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे. याआधी लॉकडाऊन कालावधी फक्त ३० जून होता. राज्य सरकारने शुक्रवारी एक अधिसूचना जारी केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रात कोरोना विक्रम रचतोय...एका दिवसात ५ हजार २४ रुग्ण
महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच कोरोना रुग्णांचा आकडा एका दिवसात ५ हजारांपेक्षा जास्तने वाढला आहे. आजच्या एका दिवसात कोरोनाचे सर्वाधिक ५,०२४ रुग्ण वाढले आहेत. तर १७५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे, यातले ९१ मृत्यू हे मागच्या ४८ तासातील आहेत, ८४ मृत्यू हे मागच्या काळातील आहेत. सध्या राज्यातला मृत्यूदर हा ४.६५ टक्के एवढा आहे. राज्यात आत्तापर्यंत ७,१०६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
नवी मुंबईत कोरोनाचं प्रचंड थैमान, पुन्हा लॉकडाउनची घोषणा
नवी मुंबईत कोरोनाने प्रचंड थैमान घातलं आहे. त्यामुळे नवी मुंबईत २९ जूनपासून पुन्हा लॉकडाउन घोषित करण्याचा निर्णय पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. त्यामुळे २९ जूनपासून ७ दिवसांसाठी हा लॉकडाउन असणार आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, शहरातील ४४ कंटेन्मेंट झोनमध्ये पुन्हा लॉकडाउन असणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुंबईतले रुग्णालयाबाहेरचे १ हजार मृत्यू का लपवले?...फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबईमध्ये रुग्णालयाबाहेर झालेले १ हजार मृत्यू का लपवण्यात आले आहेत? असा प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विचारला आहे. याबाबतचं एक पत्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे. रुग्णालयाबाहेर झालेले, पण वेगवेगळ्या प्राधिकरणांनी मृत्यू प्रमाणपत्र दिलेले १ हजार मृत्यू अद्याप अधिकृत आकडेवारीत दाखवण्यात आले नाहीत, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
सलून सुरू करण्याबाबत राज्य मंत्रिमंडळानं घेतला मोठा निर्णय
कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊनच्या काळात बंद असलेल्या सलून सुरू करण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात येत्या रविवारपासून म्हणजेच 28 जूनपासून सलून सुरु करण्यास राज्य सरकारनं सशर्त परवानगी दिली आहे. राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनदरम्यान सर्व व्यवहार ठप्प होते. मात्र अनलॉकिंगनंतर हळूहळू सर्व व्यवहार सुरळीत करण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरु केले आहे.सलून या आठवड्यात सुरु होईल, अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
ऑक्सफर्डच्या AZD1222 या कोरोना लससाठी अनेक देशांकडून नोंदणी सुरू
एकाबाजूला भारतात करोनाच्या रुग्णांना बर करण्याचा दावा करत पतंजलीनं शोधून काढलेलं औषध कायदेशीर वादामुळे चर्चेत आहेत. परवानगीच्या वादा अडकलेल्या या औषधाची महाराष्ट्रात विक्री करण्यास बंदी आणण्यात आली आहे. त्याचबरोबर राजस्थान सरकारनं या औषधाच्या विक्रीवर बंदी आणली आहे. “कुणीही बाबा रामदेव यांनी तयार केलेल्या करोनावरील औषधाची विक्री करताना आढळून आल्यास कठोर कारवाई करण्यात येईल,” असा इशारा राजस्थानच्या आरोग्यमंत्र्यांनी दिला आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- BEL Vs Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 45% पर्यंत मिळेल परतावा - NSE: TATAMOTORS
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन