महत्वाच्या बातम्या
-
देशात गेल्या २४ तासात कोरोनाचे १६,९२२ नवे रुग्ण, तर ४१८ रुग्णांचा मृत्यू
देशात कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढते आहे. गेल्या 24 तासातील नव्या कोरोनाबाधितांचा आकडा 17 हजारांच्या जवळपास गेला आहे. एका दिवसांतील हा सर्वाधिक आकडा आहे. गेल्या 24 तासात 418 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 4,73,105 इतकी झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
७ दिवसांत कोरोनाग्रस्तांचा आकडा १ कोटीवर जाणार - WHO'चा गंभीर इशारा
कोरोना व्हायरसच्या जगव्यापी साथीने प्रगत देशांना हतबल केले आहे. सर्वतोपरी प्रयत्न करूनही आव्हाने वाढत आहेत. जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. एक-दुसऱ्यापासून दूर राहणे, घराबाहेर न पडणे, घरातच राहणे, हा एकमेव मार्ग आहे. यात जराही निष्काळजीपणा केल्यास भारताला जबर किंमत मोजावी लागेल. त्याचा अंदाज बांधणेही कठीण आहे, असं कळकळीने सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात ‘लॉकडाऊन’ची घोषणा केली.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना रुग्ण संख्या वाढू लागल्याने प. बंगालमध्ये ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन
देशभर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने लॉकडाऊन जारी असताना पश्चिम बंगालमध्ये आणखी ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी याबाबत घोषणा केली आहे. मात्र लॉकडाूनच्या या टप्प्यात काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
आज राज्यात कोरोनाचे ३८९० नवे रुग्ण, डिस्जार्ज मिळणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली
देशभरात कोरोनाग्रस्तांची सर्वाधिक संख्या असलेल्या महाराष्ट्रासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्यात एकाच महिन्यात दहा दिवसांच्या अंतराने एकाच दिवशी ४१६१ एवढ्या विक्रमी संख्येत कोरोनाच्या बरे झालेल्या रुग्णांना आज घरी सोडण्यात आले आहे.
4 वर्षांपूर्वी -
नाकावाटे श्वास घेऊन तो तोंडावाटे सोडल्यास शरीरातील कोरोनावर नियंत्रण ठेवता येऊ शकतं
जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO कडून रविवारी dexamethasone या औषधाच्या उत्पादन प्रक्रियेत झपाट्यानं वाढ करण्यावर भर देण्यात आला. वैद्यकिय चाचण्यांनंतर या औषधाचा वापर गंभीर स्वरुपाच्या coronavirus कोरोना रुग्णासाठी केल्यास त्याचा फायदा होऊन रुग्णाचे प्राण वाचवता येत असल्याचं सिद्ध होताच हा निर्णय घेतला गेला.
4 वर्षांपूर्वी -
तृणमूल काँग्रेसचे आमदार तमोनाश घोष यांचं कोरोनामुळे निधन
देशात कोरोना व्हायरसनं थैमान घातलं असतानाच आता धक्कादायक घटना समोर आली आहे. पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस आमदार तमोनाश घोष यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. वयाच्या ६० व्या वर्षी रुग्णालयात कोविड-19 च्या उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तमोनाश घोष यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानं त्यांच्यावर उपचार सुरू होते.
4 वर्षांपूर्वी -
कोरोनिल'ची जाहिरात थांबवा, केंद्राचा पतंजलीला दणका
जगभरातील शास्त्रज्ञ कोरोनाव्हायरसविरोधातील औषध (coronavirus medicine) आणि लस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. अशात पतंजलीने कोरोनाव्हायरसविरोधात औषध शोधून काढलं आहे. बाबा रामदेव यांनी कोरोनिल (coronil) हे औषध आज लाँच केलं. यामुळे कोरोना रुग्ण सात दिवसांत बरा होत असल्याचा दावा बाबा रामदेव यांनी केला.
4 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रात चीन, दक्षिण आफ्रिका, कॅनडा व बांग्लादेशपेक्षाही जास्त कोरोनाबाधित
देशात गेल्या २४ तासांत करोनाचे १४ हजार ९३३ रुग्ण आढळले. त्यामुळे देशभरातील करोना रुग्णांची एकूण संख्या ४ लाख ४० हजार २१५ वर पोहोचली.गेल्या २४ तासांत ३१२ करोनाबळींची नोंद झाली. त्यामुळे मृतांची एकूण संख्या १४ हजार ११ झाली आहे. आत्तापर्यंत २ लाख ४८ हजार १९० रुग्ण बरे झाले. करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.७७ टक्क्यांवर पोहोचले आहे. देशभरात १ लाख ७८ हजार ११४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
4 वर्षांपूर्वी -
चिनी सुधरायचे नाही...युलिन शहरात ‘डॉग मीट फेस्टिवल’चं आयोजन
चीनच्या वुहानमधून डिसेंबरमध्ये कोरोनाचा प्रसार होण्यास सुरुवात झाली. पाहता पाहता वुहान शहर हे कोरोनाचं केंद्र झालं होतं. जगात सगळ्यात आधी वुहानमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. मात्र कोरोनाचे एकही नवीन प्रकरण न सापडल्यानंतर वुहाननं तब्बल 76 दिवसांनी लॉकडाऊन हटवला. मात्र आता पुन्हा कोरोनानं वुहानमध्ये प्रवेश केला आहे. एवढंच नाही तर वुहानमध्ये पुन्हा एकदा क्लस्टर ट्रान्समिशन दिसून आलं आहे. त्यामुळं आता वुहानमधील सर्व लोकांची कोरोना चाचणी केली जाणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
३ दिवसांत कोरोना रुग्ण बरा होणार, रामदेव बाबांच्या पतंजलीकडून औषध लाँच
कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जग हैराण आहे. भारतात या विषाणूची लागण होणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशात बाबा रामदेव यांनी कोरोनावर पहिलं औषध शोधलं असल्याचा दावा केला आहे. आज ‘कोरोनिल’ हे कोरोना विषाणूवर उपचार करण्यासाठी बनवलेले एक औषध त्यांनी लॉन्च केलं आहे. या विषाणूचा हरवण्यासाठी आयुर्वेदिक औषध प्रभावी आहे, असा दावा बाबा रामदेव यांनी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे वाहनचालक कोरोना पॉझिटिव्ह
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या दोन वाहनचालकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या या दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. यापूर्वी राज ठाकरे यांच्या शासकीय सुरक्षारक्षकांपैकी दोघांना कोरोनाची लागण झाली होती. हे दोघेजण उपचारानंतर कोरोनातून बरे झाले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
आज राज्यात ३ हजार ७२१ कोरोना रुग्णांची नोंद
राज्यात आजही तब्बल 3721 नव्या Covid-19 रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातल्या रुग्णांची एकूण संख्या 1,35,796वर गेली आहे. आज 62 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातल्या एकूण मृत्यूंची संख्या 6283 झाली आहे. तर 1962 रुग्ण आज बरे होऊन घरी गेले आहेत. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या वाढीचा वेग प्रचंड वाढला आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. तर पावसाळ्यात आणखी रुग्ण वाढण्याची भीती मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनी व्यक्त केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
धनंजय मुंडे कोरोनामुक्त, डिस्चार्ज वेळी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे आभार मानले
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मागील अकरा दिवसांपासून ते ब्रीचकँडी रुग्णालयात करोनाच्या आजारामुळे दाखल होते. दोन दिवसांपूर्वीच त्यांची दुसरी टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर आज त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. रुग्णालयातून बाहेर पडताना त्यांनी हात उंचावून आणि हात जोडून रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त केले.
4 वर्षांपूर्वी -
शिवाजी पार्क स्मशानभूमीत कोरोना मृतांवर मोठ्या प्रमाणावर अंत्यसंस्कार, स्थानिक धुराने त्रस्त
राज्यात कोरोनाबाधितांसोबत कोरोनाबळींचा आकडाही वाढत चालला आहे. याचा परिणाम आता शहरातील स्मशानभूमीवर होताना दिसत आहे. सातत्याने क्षमतेपेक्षा जास्त कोविड मृतदेहांचे दहन केल्याने दादरमधील शिवाजी पार्क स्मशानभूमीवरचा ताण वाढला आहे. या स्मशानभूमीत दादर आणि परिसराव्यतिरिक्त लांबच्या रुग्णांचाही अंत्यविधी करण्यात येतो. अंत्यविधीवेळी होणाऱ्या धुराचा परिसरातील रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय.
4 वर्षांपूर्वी -
८१ देशांमध्ये कोरोना पुन्हा धुमाकूळ घालणार, WHO ने दिला इशारा
कोरोना व्हायरसचा धोका कमी झाला, असं कोणाला वाटत असल्यास हा चुकीचा समज आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोना संसर्गाच्या ‘नवीन आणि धोकादायक’ अवस्थेचा इशारा दिला आहे. WHOचे प्रमुख Tedros Adhanom Ghebreyesus यांनी शुक्रवारी सांगितलं की, जग कोरोना संसर्गाच्या नवीन आणि धोकादायक टप्प्यात आहे. अनेक लोक घरांत बंद राहून कंटाळले आहेत, परंतु परिस्थिती अद्यापही सुधारली नाही. कोरोना व्हायरस अजूनही वेगात पसरत आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुंबईतील S वॉर्डमधील भांडूप, विक्रोळी, कांजूरमार्ग व पवई परिसरात कोरोना रूग्ण संख्या वाढतेय
जगभरात थैमान घालणाऱ्या जीवघेण्या कोरोना व्हायरसने भारतात ४ लाख रुग्णांचा टप्पा ओलांडला आहे. मागील २४ तासांत देशात आतापर्यंतचे सर्वाधिक तब्बल १५ हजार ४१३ नवे करोनाबाधित आढळले, तर ३०६ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे आता देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४ लाख १० हजार ४६१वर पोहोचली असून आतापर्यंत १३ हजार २५४ जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे.
4 वर्षांपूर्वी -
दिल्लीत आजपर्यंत डॉक्टर, नर्सेससाहित १,२०० आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
जगभरात थैमान घालणाऱ्या जीवघेण्या कोरोना व्हायरसने भारतात ४ लाख रुग्णांचा टप्पा ओलांडला आहे. मागील २४ तासांत देशात आतापर्यंतचे सर्वाधिक तब्बल १५ हजार ४१३ नवे करोनाबाधित आढळले, तर ३०६ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे आता देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४ लाख १० हजार ४६१वर पोहोचली असून आतापर्यंत १३ हजार २५४ जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे.
4 वर्षांपूर्वी -
२४ तासांत १५,४१३ नवे रुग्ण, देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ४ लाख १० हजार ४६१वर
जगभरात थैमान घालणाऱ्या जीवघेण्या कोरोना व्हायरसने भारतात ४ लाख रुग्णांचा टप्पा ओलांडला आहे. मागील २४ तासांत देशात आतापर्यंतचे सर्वाधिक तब्बल १५ हजार ४१३ नवे करोनाबाधित आढळले, तर ३०६ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे आता देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४ लाख १० हजार ४६१वर पोहोचली असून आतापर्यंत १३ हजार २५४ जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुंबई आणि महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे - फडणवीस
कोरोनामुळे मुंबईसह महाराष्ट्रातील परिस्थिती दिवसेंदिवस हलाखीची होत आहे, असं सांगत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं असून, त्यात राज्यातील एकूण स्थिती मुख्यमंत्र्यांच्या निर्दशनास आणून दिली आहे. विशेषतः फडणवीस यांनी मुंबईतील वाढत्या मृत्यूदराबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
ग्लेनमार्क फार्माने कोरोना उपचारासाठी लाँच केले औषध...DCGI'ची मान्यता
कोविड -१९ वरील उपचारासाठी फॅबीफ्लू (FabiFlu) या ब्रँडखाली भारतात अँटीव्हायरल औषध फॅविपिरावीर (Favipiravir) लाँच केले आहे. हे औषध कोविड-१९ च्या रूग्णांसाठी आहे. तसेच ज्या रूग्णांमध्ये कोरोनाचे सौम्य आणि मध्यम लक्षणे असतील अशा रूग्णांच्या उपचाराकरता हे औषध वापरले जाईल, असे ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सने शनिवारी सांगितले आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार