महत्वाच्या बातम्या
-
मुंबईने रुग्ण संख्येत चीनमधील वूहानला मागे टाकले
मुंबईमध्ये आतापर्यंतचा कोरोनाग्रस्तांचा आकडा ५१ हजारावर गेला आहे. तर कोरोनाचे उगमस्थान असलेल्या चीनच्या वुहानमध्ये एकूण ५०,३४० रुग्ण सापडले होते. या आकडेवारीनुसार चीनच्या वुहानला मुंबईने मागे टाकले असून देशातील असे शहर बनले आहे जिथे सुरुवातीपासूनच कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत. यामुळे आज मुंबईतील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ५१,००० वर जाऊन पोहोचली आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनातून बरा झालेल्या रुग्णाला भरमसाट बिल, मनसेकडून सुटका, पोलिसात तक्रार दाखल
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येने मंगळवारी ९० हजारांचा टप्पा पार केला आहे. राज्यातील लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल केल्याने सर्वत्र गर्दी वाढत असताना कोरोनाचा संसर्ग होण्याचा वेग कमी होत नसल्याने एकीकडे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मागील काही दिवसांपासून अनेक खाजगी इस्पितळं रुग्णांवर भरमसाठ बिलं आकारात असल्याचं देखील समोर आलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
शाळा-महाविद्यालयासाठी सम-विषम फॉर्म्युला, 6 टप्प्यात सुरू होणार
कोरोना व्हायरसमुळे शाळा-महाविद्यालयं बंद ठेवण्यात आली होती. आता पुन्हा शाळा महाविद्यालयं सुरु करण्याच्या दिशेनं केंद्र आणि राज्य सरकार पाऊल उचलत आहे. केंद्र सरकारनं (NCRT) पालन आणि शिक्षकांनी काय गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कोणत्या गोष्टींचं पालन करायला हवं या संदर्भात काही गाइडलाइन्स जारी केल्या आहेत.
5 वर्षांपूर्वी -
डीएमकेचे आमदार जे अनबालागन यांचा आज कोरोनामुळं मृत्यू
देशात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. यातच आता कोरोनामुळं एका आमदाराचा मृत्यू झाला आहे. डीएमकेचे आमदार जे अनबालागन यांचा आज कोरोनामुळं मृत्यू झाला. याआधी कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर त्यांच्यावर उपाचर सुरू करण्यात आले होते. ६१ वर्षीय जे अनबालागन यांचा आजच ६२ वा वाढदिवस होता.
5 वर्षांपूर्वी -
ठाण्यातील राष्ट्रवादीचे नगरसेवक मुकुंद केणी यांचं कोरोनामुळे निधन
ठाण्यात कोरोना व्हायरसचा उद्रेक झाला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक मुकुंद केणी यांचे निधन झाले आहे. कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
5 वर्षांपूर्वी -
Unlock महाराष्ट्र सरकारची चिंता वाढवणार, आज २२५९ नवे कोरोना रुग्ण
अनलॉक नंतर वर्दळ वाढल्याने आता महाराष्ट्राची चिंता वाढली आहे. महाराष्ट्रात २२५९ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील करोना रुग्णांची संख्या ९० हजार ७८७ झाली आहे. आत्तापर्यंत ४२ हजार ६३८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर ४४ हजार८४९ रुग्ण सध्याच्या घडीला ऍक्टिव्ह आहेत. मागील २४ तासांमध्ये १२० मृत्यूंची नोंद झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
BMC पाणीपुरवठा विभागामध्ये मुख्य अभियंता शिरीश दीक्षित यांचा कोरोनाने मृत्यू
राज्यात कोरोनाचे एकूण २५५३ नवे रुग्ण सापडल्याने एकूण बाधितांचा आकडा ८८ हजार ५२८ वर पोहोचला आहे. तर, आज एकूण १०९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र आरोग्य विभागाने ही माहिती दिली. आज दिवसभरात १६६१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या ४० हजार ९७५ वर पोहोचली आहे. त्यामुळे राज्यात सद्या एकूण ४४ हजार ३७४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
5 वर्षांपूर्वी -
राज्यातील प्रशासन आणि महापालिकांच्या मदतीला केंद्राची उच्चस्तरीय पथकं तैनात
राज्यात कोरोनाचे एकूण २५५३ नवे रुग्ण सापडल्याने एकूण बाधितांचा आकडा ८८ हजार ५२८ वर पोहोचला आहे. तर, आज एकूण १०९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र आरोग्य विभागाने ही माहिती दिली. आज दिवसभरात १६६१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या ४० हजार ९७५ वर पोहोचली आहे. त्यामुळे राज्यात सद्या एकूण ४४ हजार ३७४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
5 वर्षांपूर्वी -
'या' वेळेत खुली राहणार मुंबईतील दुकानं; बीएमसीची सुधारीत नियमावली
मागील अडीच महिन्यापासून लॉकडाउनमुळे ठप्प झालेली मुंबईनगरी लॉकडाउनच्या पाचव्या टप्प्यात हळूहळू पूर्वपदावर येत आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या सुचनेनंतर अनेक अटी शिथिल करण्यात आल्या आहे. मुंबईतील लॉकडाउनबाबत पालिकेकडून आणखी अटी शिथिल करण्यात आल्या आहेत.
5 वर्षांपूर्वी -
गुगलवर अजूनही वॅक्सीन कधी येणार?, कोणता आजार कोरोना संबंधित आहे? सर्च होतंय
दिवसागणिक देशातील वाढती करोनाबाधित रुग्णांची संख्या चिंतेत भर घालणारी ठरत आहे. गेल्या सात दिवसांपासून दररोज नऊ हजारांपेक्षा जास्त करोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. आरोग्य मंत्रलायाने दिलेल्या आकडेवारीनुसार, मागील २४ तासांत देशात ९ हजार ९८७ करोनाबाधित रुग्ण आढळे आहेत. तर तब्बल ३३२ जणांचा मृत्यू झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
अनलॉक-१ दरम्यान कोरोना वाढतोय; केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी नवी नियमावली
अनलॉक १ च्या पहिल्या टप्प्यात केंद्राने सरकारी कार्यालयात कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याबाबत सांगितलं, मात्र गेल्या काही दिवसांत सरकारी कार्यालयात कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे मंगळवारी केंद्र सरकारने याबाबत नवी गाईडलाईन जारी केली आहे. या नव्या मार्गदर्शक सुचनांनुसार यापुढे ज्या कर्मचाऱ्यांमध्ये कोणतीही लक्षणं दिसत नाही अशांनाच कार्यालयात येण्याची परवानगी दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शरद पवार कोकण दौऱ्यावर
‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज मंगळवारपासून दोन दिवस कोकण दौऱ्यावर आहेत. चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात सर्वात जास्त नुकसान झालं आहे.
5 वर्षांपूर्वी -
शिवसेना नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू
मीरा-भाईंदर येथे कोरोना विषाणूची लागण झालेले शिवसेनेचे नगरसेवक हरिश्चंद आंमगावकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हरिश्चंद आंमगावर यांना आठवड्यापूर्वी कोरोना विषाणूची बाधा झाली होता. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
5 वर्षांपूर्वी -
दिल्लीत कोरोना कम्युनिटी स्प्रेड सुरु झाल्याचा दावा
दिल्लीत कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे कम्युनिटी स्प्रेडची चर्चा सुरु झाली आहे. दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी मंगळवारी म्हटले की, ‘एम्सच्या संचालकांनी दिल्लीत कोरोना विषाणूचा कम्युनिटी स्प्रेड सुरु झाल्याचे मान्य केले आहे, परंतु केवळ केंद्रच त्याची घोषणा करू शकतो.’
5 वर्षांपूर्वी -
अद्यापही कोरोनाची धोका टळलेला नाही, जगभरात कोरोनाची परिस्थिती बिघडते आहे - WHO
जगभरात कोरोनाचा प्रसार थांबता थांबत नाही आहे. यातच काही देशांनी लॉकडाऊन हटवण्यास सुरुवात केली आहे तर, काही देशांमध्ये निर्बंध कायम आहेत. मात्र सर्वांना चिंता होती ती, लक्षणं नसलेल्या कोरोना रुग्णांची. मात्र जागतिक आरोग्य संघटनेने एक चांगली बातमी दिली आहे. WHOच्या म्हणण्यानुसार Asymptomatic म्हणजेच लक्षण नसलेल्या रुग्णांपासून कोरोनाचा प्रसार होण्याचा धोका कमी आहे.
5 वर्षांपूर्वी -
मजुरांसाठी ट्रेन सोडली सरकारने, 'टाटा' करून श्रेय लाटायला आला, पोलिसांनी रोखलं
काल महाराष्ट्रनामा न्यूजने संपूर्ण सोनू सूद प्रकरणावर एक व्हिडिओ प्रसारित केला होता. तत्पूर्वी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील सोनू सूद प्रकरणात बोलताना, राज्य सरकार काही करत नसून केवळ सोनू सूद सर्व मजुरांना मदत करत असल्याची हवा निर्माण केल्याचा आरोप केला होता. विशेष म्हणजे महाराष्ट्रात पोलिसांची प्रचंड मेहनत या प्रकरणात झाकून केवळ सोनू सूदला प्रमोट केल्याचा आरोप सुरु आहे आणि त्यात बऱ्याच प्रमाणात तथ्य असल्याचं देखील पोलिसांनी महाराष्ट्रनामा न्यूजच्या टीमला सांगितलं होतं.
5 वर्षांपूर्वी -
होम कोरंटाईनच्या संपर्कात आल्याने सेनेचे सिब्बल अनिल परब यांनी काळजी घ्यावी - आ. नितेश राणे
राज्यातील कोकणात देखील कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. त्यात कोकणासाठी कोरोना टेस्टसाठी देखील विशेष सोय नाही आणि त्यामुळे अडचणी वाढत आहेत. मोठ्या प्रमाणावर लोकांना होम कोरंटाईन करण्यात आलं आहे. मात्र आता भाजपचे आमदार नितेश राणे यांनी एक फोटो ट्विट करताना धक्कादायक माहिती दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रात नव्या २५५३ रुग्णांची भर, १०९ रुग्णांचा मृत्यू, संख्या ८८ हजारांच्याही पुढे
आज राज्यात कोरोनाचे एकूण २५५३ नवे रुग्ण सापडल्याने एकूण बाधितांचा आकडा ८८ हजार ५२८ वर पोहोचला आहे. तर, आज एकूण १०९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र आरोग्य विभागाने ही माहिती दिली. आज दिवसभरात १६६१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या ४० हजार ९७५ वर पोहोचली आहे.
5 वर्षांपूर्वी -
सोनू सुदच्या मुद्द्यावरुन राजनाथ सिंह यांचा शिवसेनेवर निशाणा
महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. केंद्र सरकारकडून हवी ती सगळी मदत पुरवली गेली असली तरीही असमन्वयामुळे महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राने उत्तर प्रदेश आणि कर्नाटकचा आदर्श घ्यावा, अशी टीका केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केली आहे. भाजपच्या जनसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते.
5 वर्षांपूर्वी -
चांगलं काम करणारे भाजपामध्येच असतात याचा आम्हाला आनंद....सेनेचा आभारी
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून अभिनेता सोनू सूदवर करण्यात आलेल्या टीकेनंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी यावरुन शिवसेनेला खोचक टोला लगावला. शिवसेनेला ठाम विश्वास आहे की, सोनू सूद हे भाजपचे आहेत. या गोष्टीचा मला आनंदच वाटला. कारण, चांगले काम करणारी लोकं भाजपमध्येच असतात, अशी टिप्पणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News