महत्वाच्या बातम्या
-
केंद्रीय अर्थमंत्र्यांनी जूनमध्ये पुरवणी अर्थसंकल्प सादर केला पाहिजे - पृथ्वीराज चव्हाण
केंद्रीय अर्थमंत्र्यांनी जून महिन्यात पुरवणी अर्थसंकल्प सादर करावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला हातभार लावण्यासाठी कर आकारणी आणि कर्ज योजना यांची पुनर्रचना करण्याचं मतही त्यांनी बोलून दाखवलं.
5 वर्षांपूर्वी -
चिंताजनक! २४ तासांत आढळले आतापर्यंतचे सर्वाधिक कोरोनाबाधित
देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दररोज वाढत चालला आहे. दिवसेंदिवस या आकड्यात मोठी वाढ होत असल्याने सध्या परिस्थिती चिंताजनक होत चालली आहे. मागील २४ तासात देशात ९३०४ कोरोनाग्रस्त आढळून आले असून २६० जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशातील कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीची माहीती दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
देशात २४ तासांत ८,९०९ नवे रुग्ण; मृतांचे प्रमाण २.८० टक्के
कोरोनाच्या रुग्णांमध्ये बुधवारी सर्वाधिक वाढ नोंदविण्यात आली. गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे ८,९०९ रुग्ण आढळले असून, एकूण रुग्णसंख्या २ लाख ७ हजार, ६१५ झाली आहे. देशातील मृतांची संख्या ५,८१५ वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, सुमारे निम्मे म्हणजे १ लाख ३०३ रुग्ण बरे झाले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
मुंबईत १,२७६, पुण्यात ३४० नवे रुग्ण, रुग्णवाढीचा दर ४.१५ टक्क्यांवर
एक चांगली बातमी. राज्यात कोरोनाचा प्रसार होण्याचा दर काहीसा मंदावला आहे. देशात सर्वाधिक रूग्ण राज्यात असल्यामुळे कोरोनाचा प्रसार राज्यात कमी होणं गरजेचं होतं. गेल्या ७ दिवसांत राज्याचा सीडीजीआर म्हणजे रग्णवाढीची आकडेवारी ४.१५ टक्के होती. तर देशाचा सीडीजीआर ४.७४ टक्के होता. रूग्णसंख्या दुप्पट होण्याची आकडेवारीही १७.३५ दिवसांवर आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
चक्रीवादळ रोखण्यात राज्य सरकार अपयशी, भाजपचे शिष्टमंडळ राष्ट्रपती भवनात, काँग्रेसचा टोला
अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे महाराष्ट्रासमोर नवं संकट उभं राहिलं होतं. दुपारी १:३० वाजता चक्रीवादळानं कोकण किनारपट्टीवरून जमिनीवर पाऊल ठेवलं होतं. त्यानंतर अलिबाग मार्गे हे वादळ मुंबईत दाखल होणार होतं. त्यापूर्वीच वादळानं दिशा बदलली असून, चक्रीवादळ पनवेल, कर्जत खोपोली, नाशिक या मार्गे पुढे जाणार आहे. पुणे वेधशाळेचे प्रमुख हवामान संशोधक डॉ. अनुपम कश्यपी यांच्या हवाल्यानं स्कायमेटनं हे वृत्त दिलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
निसर्ग चक्रीवादळाचा मुंबईला असलेला धोका टळला; तरी खबरदारी घेणं सुरु
जीवघेण्या कोरोनाचा मुकाबला करत असतानाच महाराष्ट्रासमोर आणखी एक संकट उभं राहिलंय. ‘निसर्ग’ चक्रीवादळ अलिबागला धडकलं असून याठिकाणी तशी १०० ते १२० किमीच्या वेगाने वारे वाहत असून तुफान पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अलिबाग आणि मुरुडचा समुद्र प्रचंड खवळला असून रोहा, श्रीवर्धन, माणगाव, पेण आणि खोपोलीलाही बसला असून याठिकाणी घरे, झाडं, इमारतींवरील छप्परे आणि विजेचे पोल अगदी पालापाचोळ्यासारखे पडल्याचे धक्कादायक दृश्य पाहायला मिळत आहे.
5 वर्षांपूर्वी -
फडणवीस मुंबई पालिकेला शॉक द्यायला गेले, पण पुणे पालिकेमुळे त्यांनाच शॉक बसला
मुस्लिम कोरोनाबाधित रुग्णाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांना का देण्यात आली अशी विचारणा भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यांच्या आरोपाला पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाने जशास तसे उत्तर दिले आहे. कोरोना रुग्णांच्या आड भाजप घाणरेडे राजकारण करत आहे, अशी टीका या संघटनेनं केली.
5 वर्षांपूर्वी -
हिंदुस्थान युनिलीवर'कडून सरकारला २८, ८०० टेस्टिंग किट, व्हेंटिलेटर्स, PPE किटस
कोरोनाचा कहर संपूर्ण जगभरात सुरूच असून एकूण 213 देशांना मोठा फटका बसला आहे.जगभरातील जवळपास 75 टक्के कोरोनाग्रस्त फक्त 13 देशांमध्ये आहेत. या देशांमध्ये कोरोना बाधितांची संख्या 48 लाखांवर पोहोचली.
5 वर्षांपूर्वी -
श्रीमंतांची रूग्णालये सरकारच्या आदेशाला जुमानत नसल्याने कारणे दाखवा नोटीस
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा राज्य शासनाने ताब्यात घेतल्या आहेत. मात्र अद्यापही काही ठिकाणी रुग्णांना खासगी रुग्णालयांकडून अपेक्षित ते सहकार्य होत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. त्याची दखल घेऊन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल रात्री मुंबईतील खासगी रुग्णालयांना अचानक भेटी दिल्या. मंगळवारी पहाटे दोन वाजेपर्यंत आरोग्यमंत्री रुग्णालयातील खाटांच्या उपलब्धतेबाबत माहिती घेत होते.
5 वर्षांपूर्वी -
खाजगी रुग्णालयाकडून सहकार्य मिळत नसल्याने आरोग्य मंत्र्यांकडून रात्री इस्पितळांना भेटी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा राज्य शासनाने ताब्यात घेतल्या आहेत. मात्र अद्यापही काही ठिकाणी रुग्णांना खासगी रुग्णालयांकडून अपेक्षित ते सहकार्य होत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. त्याची दखल घेऊन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल रात्री मुंबईतील खासगी रुग्णालयांना अचानक भेटी दिल्या. मंगळवारी पहाटे दोन वाजेपर्यंत आरोग्यमंत्री रुग्णालयातील खाटांच्या उपलब्धतेबाबत माहिती घेत होते.
5 वर्षांपूर्वी -
तज्ज्ञ डॉक्टर चित्तरंजन भावे यांचा मुंबईत कोरोनाने मृत्यू
जगभरातील कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या यादीत भारत सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे. भारतात गेल्या २४ तासांत तब्बल ८,१७१ नव्या रुग्णांची नोंद झाल्याने एकूण कोरोनाबाधितांचा संख्या १ लाख ९७ हजार ५८१ वर पोहोचली आहे. तर २४ तासांत २०४ कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावल्याने देशातील कोरोनाबळींची संख्या ५ हजार ५९८ इतकी झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
केजरीवाल सरकारकडून कोविड १९ अॅप लॉंच
दिल्लीतील कोरोनाची स्थिती लक्षात घेता नागरिकांना योग्य वैदकीय सेवा उपलब्ध करून देता यावी, यासठी Delhi Corona अॅप लॉंच करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज पत्रकार परिषद घेत याची माहिती दिली आहे. या अॅपच्या माध्यमातून शहरातील कोणत्या रुग्णालयात किती खाटा उपलब्ध आहेत याची माहिती मिळणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
बिहारमध्ये मजुरांचा १४ दिवसांचा कॉरंटाईन होताच घरी जाताना कंडोम वाटप
कोरोनाविरुद्धच्या लढाईत केंद्र सरकार आणि राज्य सरकार झोकून देऊन काम करत आहेत. मात्र, कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. महाराष्ट्र हे कोरोनाचं हॉटस्पॉट राज्य ठरलं असून महाराष्ट्रातून परराज्यात जाणाऱ्या मजूरांची संख्या लक्षणीय आहे. त्यात, उत्तर प्रदेश व बिहारमध्ये अधिक संख्येने मजूर जातना दिसत आहेत. त्यामुळेच, क्वारंटाईन सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांना ठेवण्यात आले आहे.
5 वर्षांपूर्वी -
देवाच्या दारी अन्याय! साई संस्थानकडून अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांची ४०% वेतन कपात
देशातल्या श्रीमंत देवस्थानापैकी एक असलेल्या साईबाबा संस्थानने अत्यावश्यक सेवा देणाऱ्या आपल्याकडील कर्मचाऱ्यांची ४० टक्के पगार कपात केली आहे. अगोदरच तुटपूंज्या पगारावर जिव धोक्यात घालून काम करणाऱ्या नर्सिंग स्टाफसह सुरक्षा कर्मचारी यामुळे आर्थिक संकटात सापडले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
वादळाच्या पार्श्वभूमीवर बीकेसीच्या कोविड सेंटरमधून रुग्णांना हलवण्याचं काम सुरु
कोरोना महामारीच्या संकटाबरोबरच आता पश्चिम महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर आणि मध्य महाराष्ट्रात ‘निसर्ग’ चक्रीवादळाचे संकट उभे राहिले आहे. ३ जून रोजी हे चक्रीवादळ उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमधून जाणार आहे. या वादळाचा फटका रत्नागिरी, ठाणे, पालघरसह मुंबईलाही बसण्याची शक्यता आहे.
5 वर्षांपूर्वी -
रशियाने विकसित केलेलं 'एव्हिफेव्हीर' औषध कोरोनावर प्रभावी ठरतंय...सविस्तर
संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. अचानक आलेल्या संकटाने आतापर्यंत जगातील लाखो नागरिकांचा बळी घेतला आहे. या धोकादायक आजारावर मात करण्यासाठी सर्वच राष्ट्र प्रभावी औषधाच्या शोधात आहे. रशियाने या धोकादायक विषाणूच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी एक प्रभावी लस विकसित केली आहे. ही नवी लस लवकरच रुग्णांच्या उपाचारासाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती रशियाच्या आरोग्य यंत्रणेने दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनाव्हायरस कमकुवत होत असल्याचा दावा WHO'ने फेटाळला..काय म्हटलं?
कोरोना व्हायरसचे अनेक रुप आहे, असा दावा याआधी देखील जगभरातील अनेक शास्त्रज्ञांनी केला होता. तसेच आता इटलीतील एका तज्ज्ञ डॉक्टरांनीही कोरोनाने आतापर्यत स्वत:मध्ये अनेक बदल केले असून आतादेखील हा विषाणू आपलं रूप बदलू लागला आहे असा दावा केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनाव्हायरस आता कमकुवत होत असल्याचा इटलीतील तज्ज्ञ डॉक्टरांचा दावा
जवळपास गेल्या दोन महिन्यांपासून संपूर्ण देशात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसमुळं भारतात नागरिकांना मोठ्या प्रमाणात सामना करावा लागला. महाराष्ट्रासह देशातील बहुतांश भागांमध्ये या व्हायरसचा होणारा प्रादुर्भाव पाहता त्यामुळं प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांपुढे बरीच आव्हानं पाहायला मिळत आहेत. यातीलच सर्वाधिक मोठं आव्हान म्हणजे देशातील रुग्णांचा सातत्यानं वाढणारा आकडा.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनानंतर आफ्रिकेतील काँगो देशात ‘इबोला’ या घातक विषाणूचा संसर्ग
जवळपास गेल्या दोन महिन्यांपासून संपूर्ण देशात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसमुळं भारतात नागरिकांना मोठ्या प्रमाणात सामना करावा लागला. महाराष्ट्रासह देशातील बहुतांश भागांमध्ये या व्हायरसचा होणारा प्रादुर्भाव पाहता त्यामुळं प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांपुढे बरीच आव्हानं पाहायला मिळत आहेत. यातीलच सर्वाधिक मोठं आव्हान म्हणजे देशातील रुग्णांचा सातत्यानं वाढणारा आकडा.
5 वर्षांपूर्वी -
आपत्ती व्यवस्थापन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अमित शहांमध्ये चर्चा
महाराष्ट्रात ‘निसर्ग’ चक्रीवादळ धडकण्याचा धोका असल्याने सोमवारी रात्री उशीरा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सवर चर्चा केली. या संकटाच्या पार्श्वभूमीवर शहा यांनी मुख्यमंत्र्यांना केंद्राकडून पूर्ण मदतीचं आश्वासन दिलं.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- EPF Withdrawal | पगारदारांनो EPF च्या पैशांतून होम लोन फेडत आहात का; तुम्ही जे करताय ते योग्य आहे की अयोग्य, इथे जाणून घ्या
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो
- BEL Vs Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 45% पर्यंत मिळेल परतावा - NSE: TATAMOTORS