महत्वाच्या बातम्या
-
कोरोना रुग्ण संख्येत भारत आता जगात सातव्या क्रमांकावर
जगभरातील दोनहून अधिक देशांमध्ये कोरोनाने हाहाकार माजवला आहे. भारतातील कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत आहे. जगभरात कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या यादीत फ्रान्सला मागे टाकून भारत सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्यामुळे आता चिंता अधिकच वाढली आहे.
5 वर्षांपूर्वी -
कन्टोनमेंट झोनमध्ये ३० जूनपर्यंत लॉकडाऊन, पण ८ जूननंतरची योजना काय?
लॉकडाउन ५.० संदर्भात केंद्र सरकारकडून महत्वाची घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने लॉकडाउन संदर्भात नवीन मार्गदर्शकतत्वे जारी केली आहेत. लॉकडाउन आता फक्त कन्टेन्मेन्ट झोनपुरता मर्यादीत राहणार आहे. टप्याटप्याने सर्व आर्थिक व्यवहार सुरु होतील.
5 वर्षांपूर्वी -
परीक्षांसंदर्भात मुख्यमंत्र्यांचे कुलगुरूंना महत्त्वाचे निर्देश
एकाही विद्यार्थ्याला विषाणूचा प्रादुर्भाव होणार नाही. याची काळजी घेऊन विद्यापीठांच्या परीक्षा घेण्यात याव्यात. त्यासाठी नेमकी परीक्षा पद्धती आणि वेळापत्रक निश्चित करून विद्यार्थी आणि पालकांच्या मनातील चिंता संपविली पाहिजे. त्यादृष्टीने विविध पर्याय पडताळून पाहण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले.
5 वर्षांपूर्वी -
गुजरातचं भाजप सरकार कोरोनाबाबतची आकडेवारी लपवतंय - आ. रोहित पवार
कोरोनाच्याबाबतीत महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री ठाकरे सरकार चांगले काम करत आहेत. विरोधकांकडून केवळ राजकारण करण्यात येत आहे. महाराष्ट्र सरकार कोरोनाबाबतचे आकडे लपवत नाही. मात्र, भाजपची सत्ता असलेले गुजरात सरकार कोरोनाबाबतची आकडेवारी लपवत आहे, असा थेट आरोप राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांनी करत राज्य सरकारवर आरोप करणाऱ्या विरोधकांचा समाचार घेतलाय.
5 वर्षांपूर्वी -
संपूर्ण दिल्लीत बेड्ससहित सर्व माहिती अँपवर मिळणार; पण महाराष्ट्रात अजूनही नाही
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज जनतेशी संवाद साधला. येत्या सोमवारपासून दिल्लीकरांना रुग्णालयात दाखल होण्यासाठी इकडे-तिकडे भटकण्याची गरज लागणार नाही. यासाठी दिल्ली सरकार एक नवे मोबाईल अँप लॉन्च करणार असल्याचे केजरीवाल यांनी म्हटले.
5 वर्षांपूर्वी -
आपत्तीमुळे शिवसेना शाखांचे दवाखाने होणार; उद्धव ठाकरे लवकरच आदेश देणार
महाराष्ट्रात गेल्या २४ तासात ८ हजार ३८१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ही संख्या गेल्या अनेक दिवसांमधली विक्रमी संख्या आहे. सध्याच्या घडीला महाराष्ट्रात ३३ हजार १२४ ऍक्टिव्ह रुग्ण आहे. तर २६ हजार ९९७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. या ३३ हजारांमध्येही एक जमेची बाजू ही आहे की ८३ रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणं नाहीत.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात एका दिवसात ११४ पोलिस कोरोना पॉझिटिव्ह
राज्यात एका दिवसात ११४ पोलिस कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर एका पोलीसाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांच्या संख्या दोन हजार ३२५वर पोहोचली असून आतापर्यंत २६ पोलिसांचा मृत्यू झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
पुणे: ६ महिने वेतन न मिळाल्याने रुग्णालयाबाहेर कर्मचाऱ्यांचं आंदोलन
पुण्यात गेल्या १५-२० दिवसांपूर्वी शहरी भागापुरता मयार्दीत असलेला कोरोना विषविषाणुचा संसर्ग आता ग्रामीण भागातील खेड्या-पाड्यांपर्यंत जाऊन पोहचला आहे. शुक्रवार (दि.२९) रोजी पुणे जिल्ह्यात एकाच दिवसांत ३०२ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची वाढ झाली. यामध्ये पहिल्यांदाच ग्रामीण भागात एका दिवसांत २५ नवीन कोरोना बाधितांची वाढ झाली असून, यात एकट्या आंबेगाव तालुक्यात १५ नवीन रुग्ण सापडल्याने परिसरात धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे.
5 वर्षांपूर्वी -
पोलीस कॉन्स्टेबलला १० दिवसांनी इस्पितळातून डिस्चार्ज; घरी अवघ्या ४ तासांनी मृत्यू
वरळीतील कोरोनाग्रस्त पोलीस कॉन्स्टेबलला १० दिवसांनी कोविड सेंटरमधून डिस्चार्ज देण्यात आला. मात्र डिस्चार्ज दिल्याच्या अवघ्या ४ तासांनीच या कॉन्सेटबलचा मृत्यू झाल्याने पोलीस प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मोदीजी हे पत्र देखील एकदा नक्की वाचाच; प्रियंका गांधींची मोदींना विनंती
उत्तर प्रदेशातील भानू गुप्ता नावाच्या एका व्यक्तीनं ट्रेनसमोर येऊन आत्महत्या केली. त्यानं त्यापूर्वी एक भावूक करणारं आणि आपल्या व्यथा मांडणारं पत्र लिहिलं होतं. तसंच त्यानं आपण आत्महत्या का करत आहोत हेदेखील सांगितलं होतं. दरम्यान, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी हे पत्र शेअर करत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जरूर वाचावं अशी विनंती त्यांनी केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मोदी २.० सरकारची वर्षपूर्ती; पंतप्रधानांचा जनतेशी पत्रसंवाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाला आज ३० मे रोजी एक वर्ष पूर्ण झालं आहे. या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींनी जनतेला उद्देशून एक पत्र लिहलं आहे. दरवेळेस पंतप्रधान मोदी व्हिडिओच्या माध्यमातून जनतेला संबोधित करतात. मात्र आज खास दिनानिमित्त मोदींनी जनतेला पत्र लिहलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
अमेरिकेकडून जागतिक आरोग्य संघटनेबरोबरचे संबध संपुष्टात - डोनाल्ड ट्रम्प
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना व्हायरसच्या मुद्द्यावरून चीनवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. त्याचप्रमाणे ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेबरोबरचे संबध संपुष्टात आणले आहेत. त्यानी WHO मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. चीनवर हल्लाबोल करत ट्रम्प यांनी असे म्हटले आहे की, चीनने जागतिक आरोग्य संघटनेची दिशाभूल केली आहे. चीन नेहमीच काही गोष्टी लपवत आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
आज राज्यात २६८२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद, तर ११६ मृत्यू
महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये २६८२ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर ११६ मृत्यू झाले आहेत. तर गेल्या चोवीस तासांमध्ये ८ हजार ३८१ रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या चोवीस तासात आलेल्या संख्येनंतर आता महाराष्ट्रातील करोना रुग्णांची ६२ हजार २२८ इतकी झाली आहे. आत्तापर्यंत राज्यात २६ हजार ९९७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
आज पुणे शहारात २४२ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, १० रुग्णांचा मृत्यू
राज्यात अधिकच वाढत आहे. मुंबई व पुणे ही दोन्ही प्रमुख शहरं करोनाबाधितांच्या संख्येत सर्वात पुढे दिसत आहेत. आज दिवसभरात पुणे शहारात २४२ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले तर दहा जणांचा करोनाने बळी घेतला.
5 वर्षांपूर्वी -
मुबईतील धारावीत आज ४१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद
मुंबईतील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत आज ४१ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. मात्र याच परिसरात आज कोणत्याही मृत्यूची नोंद झालेली नाही. नव्या आकडेवारीनुसार आता एकूण रुग्णांचा आकडा १७१५ वर पोहोचला आहे.
5 वर्षांपूर्वी -
प्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारुवाला यांचे निधन
प्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारुवाला यांचे आज निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. त्यांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, बेजान दारुवाला यांचा मुलगा नास्तुर दारुवाला यांनी दैनिक भास्करला सांगितले की, बेजान दारुवाला यांचा मृत्यू निमोनिया आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे झाला. दारुवाला यांच्यावर अपोलो हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.
5 वर्षांपूर्वी -
यंदाचा पालखी सोहळा पायी होणार नाही, पण इतर ३ पर्याय दिले
कोरोना व्हायरसच्या संकटामुळे इतिहासात पहिल्यांदाच देहू आणि आळंदीचा पायी पालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे. आषाढी वारी बद्दल निर्णय घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वारकऱ्यांच्या प्रतिनिधींमध्ये पुण्याच्या काऊन्सिल हॉलमध्ये बैठक झाली. या बैठकीत हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला.
5 वर्षांपूर्वी -
लॉकडाउन: महाराष्ट्रातून गुजरातला जाणारा २४ टन तांदूळ पकडला
कोरोना संकटात लढण्यासाठी उद्भवलेल्या परिस्थितीमुळे देशभर लॉकडाऊन सुरू आहे. या लॉकडाऊनच्या काळात गोरगरीबांना अन्नधान्य पुरवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून मोफत अन्न धान्य दिलं जातंय. मात्र रेशनवर या अन्नधान्याचा काळाबाजार होताना दिसतोय. असाच एक काळाबाजार करण्यासाठी निघालेला एक ट्रक पोलिसांनी जामखेड तालुक्यात पकडला. या ट्रकमध्ये तब्बल २४ टन तांदूळ सापडला आहे. हा ट्रक गुजरातला जात होता.
5 वर्षांपूर्वी -
कंत्राटी डॉक्टर आणि बंधपत्रित डॉक्टरांचं मानधन समान करण्याचा निर्णय
राज्य सरकारनं बंधपत्रित डॉक्टरांच्या मानधनात वाढ करण्याबरोबरच कंत्राटी डॉक्टरांचे आणि बंधपत्रित डॉक्टरांचं मानधन समान करण्याचा निर्णय घेतला आहे. बंधपत्रित आणि कंत्राटी डॉक्टरांच्या मानधनासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी मोठा निर्णय घेतला. बंधपत्रित डॉक्टरांच्या मानधना वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर राज्यात कंत्राटी पद्धतीनं कार्यरत असलेल्या डॉक्टरांनाही सरकारनं दिलासा दिला आहे. कंत्राटी डॉक्टरांचं आणि बंधपत्रित डॉक्टारांचं मानधन समान करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला.
5 वर्षांपूर्वी -
गुजरातमधील रुग्णालयांच्या दुर्दशेवर ताशेरे ओढणाऱ्या न्यायाधीशांची बदली
रुग्णालयातील अवस्था अतिशय दयनीय असून, ती कोणा एका अंधारकोठडीपेक्षा वेगळी नाही किंबहुना परिस्थिती त्याहूनही वाईट आहे या शब्दांत उच्च न्यायालयानं राज्य शासनाचा खरपुस समाचार घेतला होता. गेल्या शुक्रवारी करण्यात आलेल्या निरिक्षणानंतर शनिवारी याबाबचा अहवाल देण्यात आला होता. शुक्रवारपर्यंत अहमदाबाद येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचा आकडा ३७७ वर पोहोचला होता.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY