महत्वाच्या बातम्या
-
गुजरातमधील रुग्णालयांची अवस्था अंधारकोठडीपेक्षा भीषण; गुजरात उच्च न्यायालयाकडून ताशेरे
भारतात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात अद्याप यश आलेलं नसून रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रविवारी भारताने इराणला मागे टाकलं असून करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या यादीत १० व्या क्रमांकावर पोहोचला आहे. गेल्या २४ तासात भारतात ६५६६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत एका दिवसात मिळालेले हे सर्वाधिक रुग्ण आहेत. तर १५३ मृत्यूंची नोंद झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात १५ जून पासून शाळा सुरु करण्याचा विचार; पण सरकार धोका उचलणार?
देशात सतत वाढत असलेल्या कोरोनाव्हायरस संक्रमणादरम्यान, महाराष्ट्र सरकार १५ जूनपासून शाळा पुन्हा सुरू करण्याचा विचार करत आहे. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना असे संकेत दिले आहेत. राज्यात शाळा हळूहळू सुरू होतील आणि पहिल्या टप्प्यात रेड झोन नसलेल्या भागात शाळा सुरू केल्या जातील.
5 वर्षांपूर्वी -
मागील २४ तासांत ६७६७ नवे रुग्ण, एकूण रुग्णांचा आकडा १,३१,८६८
आज पुन्हा एकदा भारतात कोरोनाव्हायरसच्या नवीन प्रकरणांनी नागरिकांची चिंता आणखी वाढवली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, मागील २४ तासांत कोरोनाची ६७६७ नवीन प्रकरणं नोंदवली गेली आहेत. समोर आलेल्या नवीन प्रकरणांमुळे देशात कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांची संख्या वाढून १,३१,८६८ झाली आहे. शनिवारी कोव्हिड-19 (Covid-19) मुळे १४७ लोकांचा मृत्यू झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
मारुती सुझुकीच्या प्लांटमध्ये एका कर्मचाऱ्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह; कंपनीत खळबळ
देशाच्या औद्योगिक पट्टय़ातील उद्योगधंदे टप्प्याटप्प्याने सुरू होत असतानाच मोठय़ा कंपन्यांसह लघुउद्योगांना कुशल तसेच अकुशल कामगारांचा तुटवडा जाणवत असल्याचे चित्र समोर आले आहे. दोन महिने ठप्प असणाऱ्या उद्योगनगरीचे खरे चित्र पूर्ण क्षमतेने काम सुरू झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
दुःखद! राज्यात तब्बल १६७१ पोलिसांना कोरोनाची बाधा, १८ मृत्यू
राज्यात कोरोनामुळे आणखी ६० जणांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात कोरोनाचे २६०८ नवीन रुग्ण आढळून आले आहेत तर त्याचवेळी ८२१ रुग्णांनी करोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. राज्यातील रुग्णसंख्येचा आकडा ५० हजारच्या दिशेने मार्गक्रमण करत असून आज हा आकडा ४७,१९० वर पोहचला आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात २६०८ नवे कोरोना रुग्ण, ६० मृत्यू, एकूण संख्या ४७ हजारांच्या पुढे
राज्यात करोनामुळे आणखी ६० जणांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात करोनाचे २६०८ नवीन रुग्ण आढळून आले आहेत तर त्याचवेळी ८२१ रुग्णांनी करोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. राज्यातील रुग्णसंख्येचा आकडा ५० हजारच्या दिशेने मार्गक्रमण करत असून आज हा आकडा ४७,१९० वर पोहचला आहे. सध्या प्रत्यक्षात ३२,२०१ करोना बाधित रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत.
5 वर्षांपूर्वी -
मुंबई-पुण्यात तब्बल ४.८५ लाख लोकं होम क्वारंटाइन
सध्या राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ४४ हजार ५८२ झाली आहे. आज २९४० नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. मुंबईत एकूण २७,२५१ रुग्णसंख्या झाली असून, राज्यात ६३ रुग्णांचा मृत्यू झाला असून मुंबईत २७ करोना रुग्ण मरण पावले.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती: ब्राझीलमध्ये मृतदेह दफन करायला जमीन अपुरी पडत आहे
जगात कोरोनानं थैमान घातले आहे. आतापर्यंत ५० लाखांहून अधिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, ३ लाखांहून अधिकांचा मृत्यू झाला आहे. मात्र आता या मृतांच्या आकड्यावर संशय व्यक्त केला जात आहे. याआधी ब्रिटन आणि चीनवर कोरोना मृतांचा आकडा लपवल्याचा आरोप करण्यात आला होता. आता आणखी एका देशानं कोरोना मृतांचा आकडा लपवल्याचं समोर आलं आहे. हा देश आहे इटली.
5 वर्षांपूर्वी -
पुणे: ससून इस्पितळात ५६ वर्षीय डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू
मुंबई पाठोपाठ पुण्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंतेचा विषय झाला आहे. मात्र त्यात अजून काही चिंता वाढविणाऱ्या गोष्टी घडत आहेत. कारण काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेले पुण्यातील ५६ वर्षीय डॉक्टरांचा पुण्यातील ससून इस्पितळात कोरोनामुळे अखेर मृत्यू झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनाचे मृतदेह दफन करण्यास मुंबई हायकोर्टाची परवानगी
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह दफन करण्यास मुंबई हायकोर्टाने परवानगी दिली आहे. कोरोनाग्रस्त व्यक्तीचा मृतदेह दफन करु नये याबाबत अनेक याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आल्या होत्या. यावर मृतदेह दफन करण्यास परवानगी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई हायकोर्टाने घेतला आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुंबईच्या लाईफलाईन सेवेबाबत शरद पवार आणि मुख्यमंत्री रेल्वेमंत्र्यांशी बोलणार
राज्यातील लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये मुंबईतील लोकल ट्रेन सुरु करण्याबाबत एकमत झाले. किमान अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी तरी लोकल सेवा सुरु करावी, असे बैठकीत निश्चित झाले.
5 वर्षांपूर्वी -
भारतातील कोरोनाचं वाढतं प्रमाण; WHO'चा भारताला लॉकडाऊनबाबत सल्ला
मागील काही दिवासांपासून सातत्याने वाढत असलेल्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येने शुक्रवादी नवा उच्चांक गाठला आहे. शुक्रवारी एकाच दिवसांत कोरोनाचे सहा हजार ६५४ नवे रुग्ण सापडल्याने देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या १ लाख २५ हजार १०१ झाली आहे. दरम्यान, देशात कोरोनामुळे मृत्य झालेल्यांची संख्या ३ हजार ७२० पर्यंत पोहोचली आहे.
5 वर्षांपूर्वी -
३५ लाख स्थलांतरीत मूळगावी परतले, श्रमिकांसाठी अजून २६०० ट्रेन धावणार - रेल्वे मंत्रालय
देशात ४ कोटीपेक्षा जास्त मजूर रोजगारासाठी स्थलांतर करतात. या मजुरांना आपल्या मूळ गावी जाण्यासाठी रोज २०० रेल्वेगाड्या धावत आहेत. रस्त्याने चालणाऱ्या स्थलांतरीतांचे समुपदेशन करून त्यांना श्रमिक ट्रेनने (Shramik Special Train) जाण्याची विनंती करावी अशा सूचना राज्य सरकारांना देण्यात आल्या आहेत, आतापर्यंत २६०० पेक्षा जास्त रेल्वेच्या फेऱ्या झाल्या असून त्यातून ३५ लाख स्थलांतरीत (Migrant) आपल्या गावी पोहोचले आहेत. तर आणखी २६०० ट्रेन धावणार असल्याची माहिती आज केंद्रीय रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विनोद कुमार यादव यांनी दिली. केंद्रीय गृहमंत्रालय आणि रेल्वे मंत्रालयाकडून आज संयुक्तरित्या पत्रकार परिषद घेण्यात येत आहे.
5 वर्षांपूर्वी -
शस्त्राने नाही तर सेवेने आपल्याला हे युद्ध जिंकायचे आहे - मुख्यमंत्री
राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ४४ हजार ५८२ झाली आहे. आज २९४० नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. मुंबईत एकूण २७,२५१ रुग्णसंख्या झाली असून, राज्यात ६३ रुग्णांचा मृत्यू झाला असून मुंबईत २७ करोना रुग्ण मरण पावले.
5 वर्षांपूर्वी -
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचे ८ नवे रुग्ण; तर मुंबई पोलिसदलातही आकडा वाढतोय
राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ४४ हजार ५८२ झाली आहे. आज २९४० नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. मुंबईत एकूण २७,२५१ रुग्णसंख्या झाली असून, राज्यात ६३ रुग्णांचा मृत्यू झाला असून मुंबईत २७ करोना रुग्ण मरण पावले. राज्यात आज ८५७ करोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १२ हजार ५८३ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या ३० हजार ४७४ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
5 वर्षांपूर्वी -
राज्याला आज नाटकाची नाही तर सहकार्याची गरज - आ. रोहित पवार
कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात उद्धव ठाकरे सरकारला अपयश आल्याचा आरोप करत भाजपने आज राज्यभरात आंदोलन केलं. भाजप नेत्यांनी केलेल्या आरोपांना शिवसेनेनं उपरोधिक शब्दांत उत्तर दिलं आहे. देवेंद्र भौ, आमचं चुकलंच, असं म्हणत शिवसेनेनं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांना उत्तर दिलं.
5 वर्षांपूर्वी -
खासगी इस्पितळातील लूटमार थांबणार, खासगी इस्पितळांतील ८०% खाटांचा ताबा सरकारकडे
कोरोनाच्या साथीमुळं राज्यातील आरोग्यसेवेची बिकट झालेली परिस्थिती व खासगी रुग्णालयांकडून पुरेसं सहकार्य मिळत नसल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या सर्व खासगी रुग्णालयांतील ८० टक्के खाटा ताब्यात घेण्याचे आदेश सरकारनं दिले आहेत. जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना याबाबत कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना लस येण्यास उशीर होणार, लॉकडाउन उठवताना सर्व देशांनी सावध राहावं - ज्येष्ठ अमेरिकन शास्त्रज्ञ
कोरोनावर लवकर लस मिळण्याची शक्यता मावळत चालली आहे. नजिकच्या काळात करोनाची लस मिळेलचं याची शाश्वती नाही, असा इशारा कॅन्सर आणि एचआयव्हीवर संशोधन करणाऱ्या अमेरिकन शास्त्रज्ञाने दिला आहे.
5 वर्षांपूर्वी -
अम्फान चक्रीवादळ : प. बंगालला १, ००० कोटींची तात्काळ मदत, पंतप्रधानांची घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी पश्चिम बंगालमधील अम्फान वादळामुळे झालेल्या नुकसानीचं हवाई सर्वेक्षण केलं. केंद्राच्या वतीने त्यांनी बंगालला १ हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. चक्रीवादळामुळे झालं नुकसान भरून निघून बंगाल पुन्हा उदयास येईल अशी त्यांना आशा आहे. पीएम मोदी म्हणाले की, या दु: खाच्या घटनेत ते पश्चिम बंगालसोबत आहेत. बंगालवर कोरोना आणि अम्फान या दोन्ही आपत्तींशी एकत्र लढत आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्तीत सुद्धा भाजपकडून आंदोलनासाठी लहान मुलांचा वापर, निष्काळजीपणाचा कहर
देशातील २० टक्के करोना रुग्ण महाराष्ट्रात असून राज्य सरकारची निष्क्रियता सातत्याने पहायला मिळत असल्याची टीका माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. राज्य सरकार आणि त्यांचे मंत्री आभासी जगात जगत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे. सोशल मीडियावर पेड गँग तयार करुन आणि काही लोकांना आपला प्रवक्ता करुन आपण लढाई जिंकू असं सरकारला वाटत आहे असंही ते म्हणाले आहेत.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IREDA Share Price | शेअरमध्ये जबरदस्त घसरगुंडी, गडगडतेय शेअर प्राईस, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: IREDA
-
Suzlon Share Price | मार्केट क्रॅशमध्ये सुझलॉन शेअर 6.54 टक्क्यांनी घसरला, टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON