महत्वाच्या बातम्या
-
देशभरात मागील २४ तासांत ४ हजाराहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद
कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. अमेरिका, इटलीसारखे देश कोरोनापुढे हतबल झाले आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही ४१ लाखांवर गेली आहे. तर दुसरीकडे देशामध्ये कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णांची संख्यादेखील वाढतेच आहे. कोरोनामुळे देशातील स्थिती चिंताजनक आहे. यावर मात करण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र तरीही कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून आता चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
BLOG - रेशनिंग दुकानदारांच्या व्यथेची कथा..!!
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आज जीवनावश्यक सेवा देणाऱ्या सर्व घटकांचा सन्मान होत आहे.अगदी डॉक्टर,पोलीस पासून सफाई कर्मचारी यांच्या पर्यंत सर्वच लोकांचा सन्मान होतोय आणि ते योग्यही आहे.परंतु याच काळात जीव धोक्यात घालुन रोज २०० ते ४०० लोकांना धान्य वाटप करणाऱ्या रेशन दुकानदार यांना मात्र सन्मानाची वागणूक मिळताना दिसत नाही,लोकांच्या दृष्टिने अजूनही ते लुटारू असेच आहेत बहुदा त्यामुळे त्यांना सहानुभूती मिळत नाही.परन्तु जेवढे महत्त्वाचे काम डॉक्टर आणि पोलिसांचे आहे तेवढेच महत्वपूर्ण काम रेशनिंग दुकानदार यांचे आहे कारण आज अनेकांची पोटाची भूक तो भागवत आहे.
5 वर्षांपूर्वी -
जितेंद्र आव्हाड यांची कोरोनावर मात...सुखरूप घरी परतले!
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. ठणठणीत बरे होऊन ते आज घरी परतले आहेत. आपल्यावर यशस्वी उपचार करणाऱ्या फोर्टिस रुग्णालयाच्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे त्यांनी आभार मानले आहेत. पुरोगामी महाराष्ट्रासाठी लढण्यास पुन्हा त्याच जोमानं सज्ज होऊया, असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
पोलिस दल हादरलं! २४ तासांत राज्यात १५० पोलिसांना कोरोनाची लागण
डॉक्टर, नर्स, सफाई कामगारानंतर आता पोलिसांनाही करोनानं ग्रासलं आहे. राज्यात आतापर्यंत ७८६ पोलिसांना कोरोनानं ग्रासलं आहे. तर सात जणांचा करोनानं बळी घेतला आहे. ७६ पोलिसांनी करोनावर मात केल्याची माहिती महाराष्ट्र पोलिसांनी दिली आहे. मागील २४ तासांत राज्यात तब्बल दीडशे पोलिसांना करोनानं ग्रासलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुंबई: सेव्हन हिल्स इस्पितळात ६० वर्षीय कोरोना रुग्णाची फास लावून आत्महत्या
मुंबईत आणखी ७४८ आणखी करोनाग्रस्त सापडले असून रुग्णांचा आकडा ११,९६७ वर गेला आहे. गेल्या पाच दिवसात २८४४ रुग्ण वाढले आहेत. तर आज नव्याने २५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे मृतांचा आकडा ४६२ वर गेला आहे.
5 वर्षांपूर्वी -
माझी प्रकृती ठणठणीत..काळजी नसावी - अमित शहा
सोशल मीडिया गृहमंत्री अमित शाह यांच्या तब्बेतीबाबत एक ट्विट व्हायरल होत होते. या ट्विटमध्ये अमित शाह यांना हाडाचा कॅन्सर झाल्याचं म्हटलं होतं. सोबतच रमजान महिना असल्यामुळे त्यांच्या तब्बेतीसाठी प्रार्थना करा असा मजकूर या ट्विटमध्ये लिहिलं होतं. या ट्विटचा खुलासा स्वतः अमित शाह यांनी केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
गुजरात: कोरोना नष्ट करण्यासाठी आनंदीबेन पटेल यांना मुख्यमंत्री करा - भाजप खासदार
देशातील कोरोनाबाधितांची संख्या ६० हजारांच्या जवळ पोहोचली आहे. आतापर्यंत २०० हून अधिक जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण सापडलेला नाही. तर दुसरीकडे देशातल्या जवळपास ७५ जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची झपाट्यानं वाढते आहे. त्यामुळे आता भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) या जिल्ह्यांमधल्या परिस्थितीचा आढावा घेणार आहे. या जिल्ह्यांमध्ये कम्युनिटी ट्रान्समिशनला सुरुवात झाली आहे का, याचा अभ्यास आयसीएमआरकडून केला जाणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
बहुसंख्य कंपन्या कर्मचाऱ्यांचे वेतन, बोनस कापण्याच्या तयारीत, केंद्राकडे या मागण्या
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा परिणाम देशाच्या अर्थचक्रावर होत असतानाच बहुसंख्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि बोनस कापण्याचा निर्णय घेतला आहे. वर्षभर काम केल्यानंतर प्रत्येक नोकरदारवर्ग मे महिन्याच्या अखेरीपासून पगारवाढ आणि बोनसची वाट पाहत असतो. आपल्या कामाचं कौतुक हे या पगारवाढ आणि बोनसमधून कर्मचाऱ्यांना कंपनी देत असते. पण आता सगळ्या कंपन्यांची याकडे करडी नजर आहे. कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता कंपन्या पगारवाढ आणि बोनस कापण्याच्या तयारीत आहेत.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना व्हायरस हा कोणत्याही लसीशिवाया निघून जाईल - डोनाल्ड ट्रम्प
कोरोना व्हायरसचा कहर संपूर्ण जगासमोरील एक मोठं आव्हान ठरलं आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून या विषाणूच्या संसर्गामुळे जगातील कित्येक देश आणि या देशांतील कैक नागरिक प्रभावित झाले आहेत. अनेकांना तर, यामध्ये आपले प्राणही गमवावे लागले आहेत. अशामध्येच सध्याच्या घडीला कोरोनाचा सर्वाधिक कठीण परिस्थितीचा सामना करावा लागणारा देश म्हणून अमेरिकेचं नाव पुढे येत आहे.
5 वर्षांपूर्वी -
लोकं कोरोना पेक्षा सरकारी रुग्णालयाला जास्ती घाबरत आहेत - संदीप देशपांडे
राज्य शासनाचे आदेश निघाल्यानंतर जराही वेळ न घालवता आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून इकबाल सिंह चहल यांनी रात्रीच मुंबई पालिका आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला आहे. विशेष म्हणजे मुंबईवरील करोनाचं संकट लक्षात घेऊन चहल यांनी सूत्रे स्वीकारताच रात्री उशिरा चारही अतिरिक्त आयुक्तांसोबत बैठक घेऊन करोना साथीच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला व आवश्यक सूचना केल्याचे कळते.
5 वर्षांपूर्वी -
वुहानमधील जिवंत प्राण्यांच्या बाजारपेठेची कोरोना व्हायरसच्या फैलावात भूमिका - WHO
जागतीक आरोग्य संघटनेवरही (WHO) चीनची बाजू घेत असल्याचे अनेक आरोप झाले. मात्र, आता डब्ल्यूएचओने म्हटले आहे, की चीनमधील वुहान मार्केटच कोरोना व्हायरसच्या प्रसारासाठी जबाबदार आहे. त्यांनी या दिशेने अधिक संशोधन होण्याची आवश्यकता असल्याचेही म्हटले आहे.
5 वर्षांपूर्वी -
फेसबुक व गुगल २०२० संपेपर्यंत Work From Home निर्णयाच्या तयारीत
जगभरात ३८ लाख ५० हजारांवर लोकांना कोरोनाची लागण झाली असून २ लाख ६६ हजारांवर लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाची सर्वाधिक झळ बसलेल्या अमेरिकेत कोरोना बळींची संख्या ७५ हजारांच्या जवळ पोहचली असून कोरोनाची साथ आल्यापासून अमेरिकेत बेरोजगार झालेल्यांची संख्या ३ कोटी ३० लाखांपर्यंत पोहचली आहे. यावरून कोरोनाचे संकट किती भयावह आहे हे लक्षात येईल.
5 वर्षांपूर्वी -
सायन रुग्णालयात नवे प्रभारी, नवे पालिका आयुक्त, मग महापौरांचं काय? - आ. नितेश राणे
राज्य शासनाचे आदेश निघाल्यानंतर जराही वेळ न घालवता आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून इकबाल सिंह चहल यांनी रात्रीच मुंबई पालिका आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला आहे. विशेष म्हणजे मुंबईवरील करोनाचं संकट लक्षात घेऊन चहल यांनी सूत्रे स्वीकारताच रात्री उशिरा चारही अतिरिक्त आयुक्तांसोबत बैठक घेऊन करोना साथीच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला व आवश्यक सूचना केल्याचे कळते.
5 वर्षांपूर्वी -
मुंबईत लष्कराची गरज नाही, सगळे नागरिक हे सैनिकांसारखेच आहेत - मुख्यमंत्री
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. औरंगाबादमध्ये रेल्वेने मजुरांना चिरडलेली घटना अत्यंत वेदनादायी असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. दुसरीकडे लॉकडाऊन कधीपर्यंत ठेवायचा हे जनतेच्या हातात आहे, मुंबईत लष्कराची गरज नाही असंही त्यांनी सांगितलं.
5 वर्षांपूर्वी -
मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांची बदली
राज्यातील ‘आयएएस’ अधिकाऱ्यांच्या राज्य सरकारने शुक्रवारी बदल्या केल्या आहेत. यात मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांची बदली केली आहे. प्रवीण परदेशी यांची नगरविकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी बदली केली आहे. आता प्रवीण परदेशी यांच्या जागी इक्बाल चहल हे मुंबई महापालिकेचे नवे आयुक्त असणार आहेत.
5 वर्षांपूर्वी -
लॉकडाउन परिणाम: भारतात डिसेंबरपर्यंत २ कोटी बाळांचा जन्म होईल - UNICEF चा अंदाज
भारतात यावर्षी मार्च ते डिसेंबर या काळात सर्वाधिक २ कोटी मुलांचा जन्म होईल, असा अंदाज युनिसेफने वर्तवला आहे. ११ मार्च ते १६ डिसेंबर दरम्यान, जगभरात एकूण ११ कोटी ६० लाख मुलांचा जन्म होईल. यापैकी एकट्या भारतामध्ये २.१ कोटी, चीनमध्ये १.३५ कोटी मुलांचा जन्म होईल, असंही युनिसेफने नमूद केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
देशभरात ३३९० नवे कोरोना रुग्ण, एकूण रुग्णसंख्या ५६ हजारांच्याही पुढे
देशभरात करोनाचे ३३९० रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. २४ तासांमध्ये समोर आलेली ही संख्या आहे. त्यामुळे देशाची रुग्णसंख्या ही ५६ हजार ३४२ इतकी झाली आहे. तर मागील चोवीस तासात १३७३ रुग्ण बरे झाले आहेत. आत्तापर्यंत १६ हजार ५४० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रनामा इफेक्ट: त्या एसआरपी पोलिसांना सरकारकडून मदत पोहोचली
देशात कोरोनानं कहर वाढलेला असताना भारताचा आकडाही झपाट्यानं वाढत चाललाय. त्यातही मुंबईची वाढती संख्या तर अत्यंत धक्कादायक. त्यामुळे जनतेच्या मदतीसाठी महाराष्ट्रातील अनेक ‘एसआरपी’ कंपन्या तातडीनं बोलावून घेण्यात आल्या आहेत. सोलापूर ‘एसआरपी कॅम्प’मधील एक तुकडीही ‘कोरोना वॉरियर्स’ म्हणून मुंबईत दाखल झालीय.
5 वर्षांपूर्वी -
दारूविक्रीसाठी ‘होम डिलिव्हरी’चा विचार करावा; सुप्रीम कोर्टाची सूचना पण आदेश नाही
लॉकडाउनच्या निर्णयाला मुदतवाढ देताना केंद्र सरकारच्या नियमावलीनुसार अनेक राज्यांनी दारुविक्रीला परवानगी दिली. मात्र, दारुविक्रीच्या आदेशात स्पष्टता नसल्याचं सांगत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या खंठपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयानं कोणताही आदेश देण्यास नकार देत याचिका निकाली काढली.
5 वर्षांपूर्वी -
संकटाच्या निमित्ताने सुरु केलेल्या PM केअर्सचं ऑडिट गरजेचं - राहुल गांधी
देशव्यापी लॉकडाऊन समाप्त करण्याच्या योजनेबाबत केंद्र सरकारने पारदर्शकता दाखवण्याची आवश्यकता असल्याचे असे मत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केले आहे. देशातील परिस्थिती लवकर नियंत्रणात आणायची असेल तर विविध राज्यांमधील मुख्यमंत्र्यांवर केंद्र सरकारने विश्वास ठेवण्याचीही गरज आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो