महत्वाच्या बातम्या
-
कोरोनाबद्दलची लोकांच्या मनातील भीती दूर करण्यात सरकार अपयशी ठरतंय
देशव्यापी लॉकडाऊन समाप्त करण्याच्या योजनेबाबत केंद्र सरकारने पारदर्शकता दाखवण्याची आवश्यकता असल्याचे असे मत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केले आहे. देशातील परिस्थिती लवकर नियंत्रणात आणायची असेल तर विविध राज्यांमधील मुख्यमंत्र्यांवर केंद्र सरकारने विश्वास ठेवण्याचीही गरज आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
गुजरात सरकार गुजराती नागरिकांना राज्यात घेत नाही - बाळासाहेब थोरात
नोंदणी होऊन आपापल्या गावी परतण्याची इच्छा असणाऱ्या लाखो मजुरांची स्थिती गेल्या दोन-चार दिवसांपासून आगीतून फुफाटय़ात पडल्यासारखी झाली आहे. अपुरी माहिती, अफवा यांच्यासह रेल्वे स्थानकांपर्यंत पोहोचण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे राज्यभरातील सर्वच शहरांमधील मजुरांचे अडकलेले तांडे कुटुंबकबिल्यासह महामार्गावरून वणवण फिरत असल्याचे चित्र आहे.
5 वर्षांपूर्वी -
औरंगाबाद: १६ मजूरांचा अपघाती मृत्यू, मदतीबाबत मोदींचं आश्वासन
जालन्यातील एका कंपनीत काम करणाऱ्या १६ मजूरांचा अपघाती मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. शुक्रवारी पहाटेच एक मोठी भीषण दुर्घटना झाल्याचे समोर आले आहे. बदनापूर ते करमाडदरम्यान मालगाडीखाली चिरडून १४ जणांचा जागीच मृत्यू झाला. उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
जून, जुलैमध्ये कोरोना सर्वाधिक धोकादायक असेल, एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया
देशभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ५० हजारच्या पुढे गेली आहे. १७ मेपर्यंत देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. मात्र लगेचच कोरोनाची रुग्ण संख्या कमी होणार नाही याबाबत वारंवार तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे जून, जुलै या महिन्यात कोरोनाचे सर्वाधिक धोकादायक असेल, असं वक्तव्य एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया (Randeep Guleria) यांनी केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती: राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे 'या' सूचना मांडल्या...सविस्तर
राज्यातील वाढत्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली. मंत्रालयात झालेल्या बैठकीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर उपस्थित होते. या बैठकीनंतर राज ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधत मुख्यमंत्र्यांना केलेल्या सूचनांची माहिती दिली.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना व्हायरस पर्ल हार्बर आणि ९/११ हल्ल्यापेक्षाही भीषण – डोनाल्ड ट्रम्प
कोरोनामुळे अमेरिकेत आतापर्यंत ७२ हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला असून १२ लाखाहून अधिक लोकांना लागण झाली आहे. कोरोनामुळे सुपर पॉवर असा उल्लेख केल्या जाणाऱ्या अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेलाही मोठा फटका बसला आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीचा उल्लेख करताना डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना व्हायरसचा हल्ला पर्ल हार्बर आणि ९/११ पेक्षाही भयंकर असल्याचं सांगितलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
COVID 19 Vaccine: इस्रायल भारताला कोरोना लस निर्मितीची माहिती देणार
इस्रायल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकल रिसर्चने कोरोना व्हायरस अॅंटीबॉडी किंवा पॅसिव्ह लस (COVID 19 Vaccine) विकसित करण्याचा टप्पा पूर्ण केला आहे. या लसीच्या क्लिनिकल चाचण्या सुरु झाल्या आहेत का? तसेच याची लस विकसित करण्यासंबंधीची माहिती इतरांना देणारा का? या प्रश्नावर इस्रायलचे भारतातील राजदूत रॉन मल्का बोलत होते.
5 वर्षांपूर्वी -
हसत हसत म्हणाले, सगळ्यांनी मास्क घातलाय, म्हणून मी मास्क घातलेला नाही
राज्यात कोरोनाचे बुधवारी सर्वाधिक रुग्ण आढळले. गेल्या २४ तासांत राज्यभरात १,२३३ रुग्ण आढळल्याने राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या १६,७५८ वर पोहोचली. राज्यात बुधवारी कोरोनामुळे ३४ जणांचा मृत्यू झाला. त्यात मुंबईतील २५ जणांचा समावेश आहे. राज्यातील एकूण कोरोनाबळींची संख्या ६५१ वर पोहोचली आहे. राज्यातील परिस्थितीवर केंद्रानंही चिंता व्यक्त केली असून, करोनाचा प्रसार थोपवण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात लवकरच बैठक आयोजित केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्र्यांनी बोलावली सर्वपक्षीय नेत्यांची बैठक; पण राज ठाकरे मास्कशिवाय?
राज्यात कोरोनाचे बुधवारी सर्वाधिक रुग्ण आढळले. गेल्या २४ तासांत राज्यभरात १,२३३ रुग्ण आढळल्याने राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या १६,७५८ वर पोहोचली. राज्यात बुधवारी कोरोनामुळे ३४ जणांचा मृत्यू झाला. त्यात मुंबईतील २५ जणांचा समावेश आहे. राज्यातील एकूण कोरोनाबळींची संख्या ६५१ वर पोहोचली आहे. राज्यातील परिस्थितीवर केंद्रानंही चिंता व्यक्त केली असून, करोनाचा प्रसार थोपवण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात लवकरच बैठक आयोजित केली जाणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
Uber Cab कडून ३७०० कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्याची घोषणा
कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनचा अनेक कंपन्यांवर फरक पडत आहे. नुकतीच अमेरिका आणि जगातील सर्वात मोठी जिम कंपनी Gold Gym ने या काळात आपलं दिवाळ निघाल्याच घोषित केलं. यानंतर आता जगातील सर्वात मोठी कॅब सर्व्हिस कंपनी उबर (Uber)वर देखील संकट कोसळलं आहे. कंपनीने जाहिर केलं आहे की, आर्थिक संकटामुळे अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढावं लागेल.
5 वर्षांपूर्वी -
आ. नितेश राणे यांच्यामुळे मुंबई पालिकेचं वास्तव समोर; रुग्णांच्या शेजारी मृतदेह
सायन रुग्णालयात मृतदेहांशेजारीच रुग्णांवर उपचार सुरू असल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. रुग्णालयातील एका वॉर्डमध्ये काही मृतदेह ठेवण्यात आले होते. त्यांच्या शेजारीच रुग्णावर उपचार सुरू असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
फडणवीसांनी कालच्या प्रकारावर सर्व शिव-शाहू भक्तांची माफी मागावी - संभाजीराजे भोसले
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून छत्रपती राजर्षि शाहू महाराज (Chhatrapati Shahu Maharaj) यांना अभिवादन केलं होतं. यामध्ये त्यांनी छत्रपती शाहू महाराजांचा उल्लेख ‘थोर सामाजिक कार्यकर्ते’ असा केला. यातील ‘कार्यकर्ते’ या शब्दावर आक्षेप घेत शाहूप्रेमी नागरिकांनी फडणवीस यांच्या टीका केली. त्याचबरोबर अनेकांनी माफीची मागणीही केली. या वादावरून संभाजीराजे भोसले (Chhatrapati Sambhajiraje Bhosale) यांनी आपली भूमिका स्पष्ट करत विरोधकांचा समाचार घेतल आहे.
5 वर्षांपूर्वी -
COVID 19 Vaccine: कोरोनाची लस शोधणाऱ्या शास्त्रज्ञाची गोळ्या झाडून हत्या
कोरोनामुळं संपूर्ण देशात हाहाकार माजला आहे. अमेरिकेत कोरोनाचे सर्वात जास्त बळी आहे. या सगळ्यात अमेरिकेतील पेन्सिल्वेनिया प्रांतात कोरोना व्हायरसबाबत संशोधन (COVID 19 Vaccine) करणाऱ्या चीनच्याय प्राध्यपकाची गोळी मारून हत्या करण्यात आली आहे. हे प्राध्यापक कोरोना विषाणूच्या सेल्युलर यंत्रणेचा शोध लावण्याच्या अगदी जवळ होते, जो या संसर्गावर उपचार करण्यास खूप उपयुक्त आहे. पेन्सिल्वेनियाची राजधानी असलेल्या पिट्सबर्गमधील रॉस शहरात ३७ वर्षीय बिंग लियू यांना त्यांच्याच घरात घुसून गोळी मारण्यात आली. लियू हे पिट्सबर्गच्या विद्यापीठातील औषध विभागात काम करत होते.
5 वर्षांपूर्वी -
LG Polymers: विशाखापट्टणममध्ये गॅस गळती, ७ जणांचा मृत्यू, ५००० जणांवर उपचार सुरू
विशाखापट्टणमच्या पॉलिमर कंपनीत (LG Polymers) झालेल्या विषारी वायूच्या गळतीमुळे गुरुवारी सहा जणांचा मृत्यू झाला. विशाखापट्टण शहरालगत असणाऱ्या गोपालापट्टण परिसरात ही कंपनी आहे. सरकारकडून लॉकडाऊनचे निर्बंध शिथील करण्यात आल्यानंतर आज पहाटे ही कंपनी (LG Polymers) पुन्हा सुरु करण्यात आली. त्यावेळी काही कामगार प्लांट सुरु करण्याच्या तयारीत होते. तेव्हा अचानकपणे विषारी वायूच्या गळतीला सुरुवात झाली. यामुळे अनेक कामगार जागीच बेशुद्ध पडायला सुरुवात झाली. आतापर्यंत साधारण १७० जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून २० जण गंभीर आहेत.
5 वर्षांपूर्वी -
Budh Purnima: बुद्धांनी सांगितलेल्या चार मार्गांवरून देशाची वाटचाल - पंतप्रधान
बुद्धपौर्णिमेनिमित्तानं (Budh Purnima) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधनन केलं आहे. यावेळी जनतेशी संवाद साधताना त्यांनी बुद्धपौर्णिमेच्या (Budh Purnima)जनतेला शुभेच्छा दिल्या यासोबतच आंतरराष्ट्रीय बौद्ध संघाचं कौतुक केलं आहे. कोरोना व्हायरसमुळे जगभरात होणाऱ्या पूजा आणि समारंभांचं लाईव्ह प्रक्षेपण दाखवत आहेत त्यामुळे लोकांना लॉकडाऊनच्या काळात घरबसल्या पाहता येणार आहे. वेळ, काळ आणि स्थिती बदलली तरीही गौतम बुद्धांनी दिलेला संदेश कायम प्रवाही आहे. संघटनात्मक भावनेतून आपण या महासंकटावर मात करू शकतो असंही पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
चिंता वाढली! एका दिवसात महाराष्ट्रात १२३३ नवे कोरोना रुग्ण; ३४ जणांचा मृत्यू
कोरोना व्हायरसनं देशात तसंच राज्यात थैमान घातलं आहे. देशात, राज्यात करोनाग्रस्तांचा आकडा वाढत आहे. दरम्यान एका दिवसात महाराष्ट्रात तब्बल १ हजार २३३ नवे रुग्ण समोर आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. तर दिवसभरात ३४ करोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्याचंही सांगण्यात आलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात दोन दिवसांत ७०० कोरोना रुग्णांना डिस्चार्ज
राज्यात गेल्या दोन दिवसात कोरोनाच्या सुमारे ७०० रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. सोमवारी आणि मंगळवारी अनुक्रमे ३५० आणि ३५४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. सलग दोन दिवस एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होण्याची ही पहिलीच वेळ असून सुमारे सव्वा महिन्यात २८१९ रुग्णांना घरी सोडण्यात आले.
5 वर्षांपूर्वी -
पेट्रोल आणि डिझेलवर एक्साईज ड्युटी वाढवून भाजपा स्वतःची सुटकेस भरतेय
मंगळवारी रात्रीपासून पेट्रोलवर १० रूपये तर डिझेलवर १३ रुपयाचे उत्पादन शुल्क वाढवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. यावरून काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. मोदी सरकार सतत उत्पादन शुल्क वाढवून संपूर्ण फायदा आपल्या सुटकेसमध्ये भरून घेत आहे, असा आरोप प्रियांका गांधी यांनी केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यातील स्थितीवरून केंद्रीय आरोग्य मंत्री आणि मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा होणार
कोरोनाविरुद्धची लढाई जिंकण्यासाठी सर्वोत्तोपरी प्रयत्न सुरु आहेत. गेल्या सुमारे तीन महिन्यांपासून राज्य शासन कोरोनाशी मुकाबला करत असून विविध उपाययोजना करत या कोरोना साथीला अद्यापपर्यंत नियंत्रणात ठेवले आहे. चाचण्यांचा वेग सुद्धा लक्षणीयरित्या वाढविल्यामुळे रुग्ण संख्या देखील वाढत आहे. रुग्ण बरे होऊन घरी जाण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. त्याचवेळी खबरदारी म्हणून नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालय आणि पुणे येथील आझम कॅम्पसमधील मस्जिदमध्ये कोविड-१९ विरुद्ध लढण्याची तयारी करण्यात येत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विट करत दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
ना पॅकेज, ना धोरण; लॉकडाउनच्या पद्धतीवर सोनिया गांधीची मोदी सरकारवर टीका
लॉकडाउनचा कालावाधी १७ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यानंतर पुढे मोदी सरकार काय करणार? कसं करणार? असे प्रश्न काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी उपस्थित केले आहेत. काँग्रेस शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत सोनिया गांधी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News