महत्वाच्या बातम्या
-
LA-४'मधील अधिकाऱ्यांच्या निर्णयामुळे मरोळ पोलीस वसाहतीत लहान मुलांचा जीव टांगणीला
मुंबईत गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाचे ६३२ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर २४ तासांमध्ये २६ करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे मुंबईतील करोना रुग्णांची संख्या ९ हजार ७५८ इतकी झाली आहे. आत्तापर्यंत मुंबईत कोरोनाची लागण होऊन ३८७ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबई महापालिकेने यासंदर्भातली माहिती दिली आहे. त्यानुसार मुंबईत सध्या कोरोना मोठ्याप्रमाणावर पसरत आहे आणि त्यात अनेक पोलिसांना देखील लागण झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुंबईतील चाळी आणि झोपडपट्ट्यांमध्ये कोरोनाचा वाढता आलेख
महाराष्ट्रात कोरोनाचे ८४१ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर २४ तासात ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्राची रुग्णसंख्या १५ हजार ५२५ इतकी झाली आहे. मुंबईची रुग्णसंख्या ९ हजार ७०० च्या पुढे गेली आहे तर महाराष्ट्रातली रुग्णसंख्या ही १५ हजार ५०० च्या पुढे गेली आहे. महाराष्ट्रासाठी ही चिंता वाढवणारी बातमी आहे.
5 वर्षांपूर्वी -
देशात कोरोनाचा कहर थांबेना; २४ तासांत १२६ जणांचा मृत्यू
देशात कोरोनाग्रस्तांची संख्या ५० हजारांचा टप्पा गाठण्याच्या तयारीत आहे. देशातील सतत वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या देशाची चिंता वाढवणारी आहे. देशात कोरोनाग्रस्तांची संख्या ४९ हजार ३९१ वर पोहचली आहे. आतापर्यंत देशात १६९६ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर १४ हजार १८३ लोक कोरोनातून मुक्त झाले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
कोकणातून आंब्याची वाहतूक करणाऱ्या चालकाला कोरोना, ग्रीन झोन संकटात
राज्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या १४ हजार ५४१ वर पोहोचली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करत राज्यातील आकडेवारीची माहिती दिली आहे. यानुसार सोमवारी महाराष्ट्रात नवे ७७१ करोना रुग्ण आढळले. तर ३५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सोमवारी ३५० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत एकूण २६४५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
सरकारच्या नोकरभरती रद्द करण्याच्या निर्णयामुळे तरुणांमध्ये नैराश्य येईल - विनोद पाटील
कोरोनामुळे करण्यात आलेलं लॉकडाऊन आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेचा गाडाच बिघडल्याने राज्यरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे. कोरोनाचं संकट दीर्घकाळ चालणारं असल्याने भविष्यातली तरतूद लक्षात घेऊन अर्थमंत्रालयाने सर्व विभागांवर कठोर आर्थिक निर्बंध लादले आहेत. यात फक्त आरोग्य, औषधी आणि अन्न पुरवढा विभागाला सुट देण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुंबईची चिंता वाढली, धारावीत एकाच दिवसात ३३ नवे रुग्ण
राज्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या १४ हजार ५४१ वर पोहोचली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करत राज्यातील आकडेवारीची माहिती दिली आहे. यानुसार सोमवारी महाराष्ट्रात नवे ७७१ करोना रुग्ण आढळले. तर ३५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सोमवारी ३५० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत एकूण २६४५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
कल्याण-डोंबिवलीतील नोकरदारांना मुंबईला जाण्यास मनाई
कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगरच्या हद्दीतून मुंबई-ठाण्यात कामानिमित्त जाणाऱ्यांना पुन्हा कल्याण-डोंबिवली आणि उल्हानगरात प्रवेश मिळणार नाही. कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कल्याण-डोंबिवली आणि उल्हानगरातून मुंबईला कामासाठी जाणाऱ्यांना पुन्हा शहरात प्रवेश देण्यात येऊ नये, असे आदेशच या दोन्ही पालिकांच्या आयुक्तांनी काढले आहेत. येत्या ८ तारखेपासून हे आदेश लागू करण्यात येणार आहेत.
5 वर्षांपूर्वी -
ठाण्यातील रांजणोलीत १,००० खाटांचे सुसज्ज कोविड सेंटर उभं राहणार
ठाणे जिल्ह्यात करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता रांजणोली येथे एक हजार खाटांचे सुसज्ज असे कोविड सेंटर उभारण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. टाटा आमंत्रा या गृहसंकुलाच्या आवारात हे केंद्र उभारण्यात येणार आहे. मुंबई-नाशिक महामार्गाला लागूनच ही व्यवस्था उभी केली जात असून ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, शहापूर आणि ग्रामीण भागातील रुग्णांनाही येथे पोहचणे शक्य होणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
एवढी घाई का करताय? पुढे आयुष्यभर निवांत 'बसता' येईल ना! - आ. रोहित पवार
जवळपास दीड महिन्यानंतर दारूचा थेंब घशाखाली ओतायला मिळणार या आशेने दारूच्या दुकानांसमोर गर्दी करून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवणाऱ्या तळीरामांना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मार्मिक भाषेत शालजोडीतून टोले लगावले आहेत. जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. एवढी घाई कसली करता? आता घरात थांबा. नंतर ‘निवांत’ बसा, असा चिमटा रोहित पवार यांनी काढला आहे.
5 वर्षांपूर्वी -
खराब आर्थिक स्थितीतही पगाराबाबत अनेक कंपन्यांकडून गुड न्यूज...नक्की वाचा
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा परिणाम देशाच्या अर्थचक्रावर होत असतानाच बहुसंख्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि बोनस कापण्याचा निर्णय घेतला आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीतही एफएमसीजी आणि ग्राहकोपयोगी वस्तूंची निर्मिती करणाऱ्या काही कंपन्यांनी मात्र कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावण्यासाठी वेतनात आणि बोनसमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही वाढ गेल्या वर्षभरातील (मार्चपासून एप्रिलपर्यंत) असल्याचेही कंपन्यांनी स्पष्ट केले आहे.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रातील तुमचे मित्र मंडळी, नातेवाईक विदेशात अडकले? हा फॉर्म भरा
देशात करोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून राज्याला याचा मोठा फटका बसला आहे. करोनामुळे जाहीर करण्यात आलेला लॉकडाउन आणि करोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेचं खूप मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान या संकटाचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकारने आपल्या खर्चात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच अनेक नव्या विकास योजना आणि भरती प्रक्रियांवर काही दिवसांसाठी स्थगिती आमली आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनाच्या संसर्गावर नियंत्रण येऊ नये हीच चीनची इच्छा..कारण? - गुप्तचर संस्थांचा अहवाल
जगातला कोरोना मृत्यूचा आकडा अडीच लाखांच्या जवळ गेला आहे. २ लाख ४८ हजार ६५३ जणांचा मृत्यू झालाय. तर ३५ लाख ८४ हजार ११६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. ११ लाख ६१ हजार ६७७ लोक बरे झाले आहेत. रशियात एकाच दिवसात तब्बल १० हजार ५८१ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या ०१ लाख ४५ हजार २६८ एवढी झाली आहे. राजधानी मॉस्कोमध्ये सगळ्यात जास्त कोरोनाचे रुग्ण आहेत.
5 वर्षांपूर्वी -
विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; JEE, NEET परीक्षांची तारीख जाहीर
आयआयटीमध्ये प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. आता जेईई मेन्स परिक्षा १८, २०, २१, २२ आणि २३ जुलैला आणि जेईई ऍडव्हान्स ऑगस्टमध्ये होणार आहे. तसेच, वैद्यकीय प्रवेश परिक्षा ‘NEET’ ही 26 जुलै रोजी होणार असून, सीबीएससीच्या दहावी व बारावीच्या परिक्षांबाबत लवकरच निर्णय होणार असल्यीची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
आपल्याला कोरोनासोबत जगण्याची सवयच करावी लागेल - डॉ. रणदीप गुलेरिया
कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. जगभरात आतापर्यंत ३६ लाख ४२ हजार ०६६ लोकांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. यापैकी २ लाख ५२ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ११ लाख ९३ हजार लोक कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच मागील २४ तासांमध्ये ७८३७७ नवे कोरोनाचे रूग्ण आढळून आले आहेत. तर ३८७७ लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे.
5 वर्षांपूर्वी -
यूपीत १०० कोटी पेक्षा जास्त रक्कमेची दारू विक्री; दिल्लीत कोरोना फी लागू
सोमवारपासून अनेक राज्यांमध्ये दारूची दुकानं उघडल्यामुळे मद्यप्रेमींच्या दुकानाबाहेर लांबच लांब रांग लागल्याचं पाहायला मिळालं. अनेक ठिकाणी सोशल डिन्स्टसिंगचे तीनतेरा वाजलेले दिसले. दारूच्या दुकानाबाहेर सामाजिक अंतराचे नियम लोकांनी धाब्यावर बसवल्यानंतर अनेक राज्य सरकार सतर्क झाल्याचं पाहायला मिळत आहे. बंगळुरुमध्येही दुकानांबाहेर लागलेल्या रागांमध्ये सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे मोठया प्रमाणावर उल्लंघन झाले. अनेकांनी स्वत:हासाठी दुसऱ्यांना रांगेत उभे केले होते. दारूची दुकाने सुरु होताच पहिल्याच दिवशी अनेक राज्यांना बऱ्यापैकी महसूल मिळाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना लस संशोधनाला यश...इस्त्रायलच्या संरक्षण मंत्र्यांचं ट्विट
कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. जगभरात आतापर्यंत ३६ लाख ४२ हजार ०६६ लोकांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. यापैकी २ लाख ५२ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ११ लाख ९३ हजार लोक कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच मागील २४ तासांमध्ये ७८३७७ नवे कोरोनाचे रूग्ण आढळून आले आहेत. तर ३८७७ लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे.
5 वर्षांपूर्वी -
देशात मागील २४ तासांत सर्वाधिक १९५ मृत्यू; ३९०० नवे कोरोना रुग्ण
देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ३९०० नवे रुग्ण आढळले आहेत. तर १९५ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचे नवे रुग्ण आणि आणि मृत्यू झालेलांचा हा आतापर्यंतचा सर्वाधिक मोठा आकडा असल्याचं आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
यूपीए सरकारने चांगली धोरणे राबविली होती, आज ते होताना दिसत नाही - अभिजीत बॅनर्जी
करोना फैलावाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी सध्या वेगवेगळ्या मान्यवरांशी लॉकडाऊन चर्चा करताना अर्थव्यवस्थेविषयी चिंता व्यक्त करताना दिसत आहेत. मंगळवारी त्यांनी नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांच्याशी खास बातचीत केली. यावेळी, अभिजीत बॅनर्जी यांनी ‘यूपीए सरकारनं चांगल्या अर्थनीती लागू केल्या होत्या. परंतु, आता मात्र त्या नीती सरकार लागू करताना दिसत नाही. यूपीए सरकारनं ज्या आधारावर या योजना लागू केल्या होत्या त्यांना सद्य सरकारनंही योग्य असल्याचं सांगितलंय आणि त्याच्यावरच काम केलंय’, असं म्हटलंय.
5 वर्षांपूर्वी -
मुंबई पालिकेच्या GS वॉर्डमधून आजपर्यंत ३०५ जण ठणठणीत बरे झाले
मुंबईतील महापालिकेच्या GS वॉर्डमधील निरनिराळ्या इस्पितळातून आजपर्यंत एकूण ३०५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. दरम्यान मुंबईत कोरोनाचे ५१० नवे रुग्ण आढळले आहेत. तर करोनाची लागण झाल्याने १८ जणांचा मृत्यू झाला आहे. नवे रुग्ण आढळल्याने मुंबईतील करोनाग्रस्ताची संख्या ९ हजार १२३ इतकी झाली आहे. कोरोनाची लागण होऊन आत्तापर्यंत एकट्या मुंबईत ३६१ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबई महापालिकेने ही माहिती दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
चिंता वाढली: राज्यात कोरोनाचे ६७८ नवे रुग्ण, मृत्यूची संख्या ५२१ वर
मुंबईत करोनाचे ५१० नवे रुग्ण आढळले आहेत. तर करोनाची लागण झाल्याने १८ जणांचा मृत्यू झाला आहे. नवे रुग्ण आढळल्याने मुंबईतील करोनाग्रस्ताची संख्या ९ हजार १२३ इतकी झाली आहे. करोनाची लागण होऊन आत्तापर्यंत एकट्या मुंबईत ३६१ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबई महापालिकेने ही माहिती दिली आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY