महत्वाच्या बातम्या
-
दिल्लीत एकाच इमारतीत राहणाऱ्या ४१ जणांना कोरोनाची बाधा
दक्षिण-उत्तर दिल्लीतील डीएम ऑफीसकडून मिळालेल्या माहितीनुसार १९ एप्रिल रोजी येथे एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने ही इमारत सील करण्यात आली होती. सर्वसाधारणपणे तीनपेक्षा अधिक रुग्ण सापडल्यावर परिसर सील करण्यात येतो. मात्र येथे असलेल्या दाट लोकवस्तीमुळे एक रुग्ण सापडल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून परिसर सील करण्यात आला होता.
5 वर्षांपूर्वी -
IFSC: एकही दमडीचं काम केलं नसल्याने मोदी सरकारवर आरोप - फडणवीस
देशाची आर्थिक राजधानी मुंबईचं आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र होण्याचं स्वप्न मोदी सरकारने गुंडाळलं आहे. आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र म्हणजेच आयएफएससीचं मुख्यालय गुजरातची राजधानी गांधीनगरमध्ये होणार असल्याचं केंद्र सरकारने स्पष्ट केलं असून याबाबतची अधिसूचना काढण्यात आली आहे. गांधीनगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट गिफ्ट सिटी आकारास येत आहे. त्यातच आता आयएफएससीचं मुख्यालय गांधीनगरला हलवल्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्तीत घात केला; मुंबईचं आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र गुजरातला हलवलं
देशाची आर्थिक राजधानी मुंबईचं आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र होण्याचं स्वप्न मोदी सरकारने गुंडाळलं आहे. आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र म्हणजेच आयएफएससीचं मुख्यालय गुजरातची राजधानी गांधीनगरमध्ये होणार असल्याचं केंद्र सरकारने स्पष्ट केलं असून याबाबतची अधिसूचना काढण्यात आली आहे. गांधीनगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट गिफ्ट सिटी आकारास येत आहे. त्यातच आता आयएफएससीचं मुख्यालय गांधीनगरला हलवल्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे.
5 वर्षांपूर्वी -
कामगार महाराष्ट्रातून युपीला बसेसनं घरी; ७ जणांना कोरोनाची लागण
उत्तर प्रदेश सरकारनं विविध राज्यात अडकलेल्या आपल्या नागरिकांना परत नेण्यासाठी बस सोडल्या होत्या. त्यामाध्यमातून विविध राज्यातील कामगारांना परत नेण्याचं काम सुरू आहे. उत्तर प्रदेश सरकारनं महाराष्ट्रातून कामगारांना बसेसनं घरी पोहोचवलं होतं. या कामगारांची तपासणी केल्यानंतर, यात सात जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. हे कामगार झाशी मार्गे बस्ती जिल्ह्यात दाखल झाले होते. बस्तीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी याविषयीची माहिती दिली.
5 वर्षांपूर्वी -
मुंबईत एकाच दिवशी ७५१ नवीन रुग्ण; ५ जणांचा मृत्यू
मुंबईतील करोनाबाधित रुग्णांचा आकडा आणखीच फुगत चालला आहे. आज एकाच दिवशी करोनाचे ७५१ नवीन रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे. त्याचवेळी मृत्यूचे प्रमाण मात्र कमी झाले असून गेल्या २४ तासांत करोनामुळे ५ रुग्ण दगावले आहेत. मुंबईत करोनाबाधित रुग्णांची संख्या आता ७ हजार ६२५ इतकी झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ
मागील २४ तासांमध्ये देशभरात कोरोनाचे २२९३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ७१ जणांचा मृत्यू झाला आहे. एकाच दिवसात नोंदवल्या गेलेल्या रुग्णांचा हा आतापर्यंतचा सर्वाधिक मोठा आकडा आहे. गेल्या काही दिवसांमध्ये भारतात प्रत्येक दिवशी साधारण १५०० ते १९०० च्या दरम्यान रुग्णांची संख्या वाढत होती. मात्र, आता पहिल्यांदाच हा आकडा २००० च्या पुढे गेला आहे. भारताच्यादृष्टीने ही अत्यंत चिंतेची बाब आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात आज २६ मृत्यू; १००८ नवे रुग्ण, ११५०६ एकूण बाधित
राज्यात आज १०६ करोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १८७९ रुग्ण बरे झाले आहेत. आज करोनाबाधित १००८ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्णसंख्या ११ हजार ५०६ झाली आहे. तर एकूण ९१४८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
5 वर्षांपूर्वी -
देशात लॉकडाउन आणखी दोन आठवड्याने वाढला
देशभरातील लॉकडाउन दोन आठवड्यांनी वाढवण्याची घोषणा केंद्र सरकारनं केली आहे. यासंदर्भात केंद्र सरकारनं एक पत्रक जारी केलं आहे. ३ मे रोजी लॉकडाउनचा दुसरा टप्पा पूर्ण होणार होता. त्यापूर्वीच पुन्हा एकदा लॉकडाउन वाढवण्याची घोषणा सरकारनं केली आहे. या लॉकडाउन दरम्यान रेड झोनमधील कोणत्याही भागांना सवलत देण्यात येणार नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
३ तारखेनंतर काही भागात मोकळीक पण....? सविस्तर वाचा
कोरोनामुळे गेल्या महिना-दीड महिन्यापासून लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या राज्यातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. ३ मेनंतर राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर आणि औरंगाबादसह इतर रेड झोन वगळता इतर झोनमध्ये परिस्थिती पाहून आतापेक्षा अधिक मोकळीक दिली जाईल. लॉकडाऊनमध्ये अधिक शिथिलता दिली जाईल, असं सांगतानाच पण ही शिथिलता देताना कोणतीही घाईगडबड करण्यात येणार नाही. तुम्हीही मोकळीक दिल्यानंतर काळजी घ्यायची आहे. नाही तर आजवर केलेल्या तपश्चर्येवर पाणी फिरेल, असं मुख्यमंत्री म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
भीषण! अमेरिकेत लॉकडाउनविरोधात बंदुका घेऊन आंदोलन
कोरोना विषाणूने सर्वाधिक प्रभावित अमेरिका झाली असून आतापर्यंत ६३ हजार नागरिकांनी प्राण गमावले असून, १० लाखांहून अधिक लोकांना या विषाणूचा संसर्ग झाला आहे. जगभरातील कुठल्याही देशातील ही सर्वाधिक संख्या आहे. अमेरिकेसाठी दिलासादाक बाब म्हणजे आतापर्यंत एक लाख ५५ हजार जणांनी या महामारीचा पराभव केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
अमेरिका लॉकडाउन हटविण्याच्या तयारीत; आर्थिक कोंडी झाल्याने निर्णय
कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेमध्ये लागू केलेली सुरक्षित वावरासंबंधीच्या मार्गदर्शक तत्त्वांची मुदत आज गुरुवारी संपत असून, ही मुदत वाढविणार नसल्याचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी स्पष्ट केले. दरम्यान, ट्रम्प यांचे जावई व सल्लागार जेरेड कुश्नेर यांनी येत्या जुलै महिन्यापर्यंत अमेरिकेला पुन्हा एकदा वैभव प्राप्त होईल, असे म्हटले आहे.
5 वर्षांपूर्वी -
हैदराबादमधून हटियासाठी पहिली विशेष रेल्वे गाडी सोडण्याचा निर्णय: ANI वृत्त
देशातील कोरोनाबाधितांची संख्या ३४ हजार ७८० वर पोहोचली आहे. त्यातील ९०६८ जण बरे झाले असून बुधवारी ६३० जण कोरोनामुक्त झाले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण १४ दिवसांमध्ये १३.२४ टक्क्यांवरून २५.१९ वर गेले आहे. देशाचा रुग्ण दुप्पट होण्याचा सरासरी वेग ३.४ वरून ११ दिवसांवर आला आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावाधी वाढल्याने आरोग्य यंत्रणांना मोठा दिलासा मिळाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी दिली.
5 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्र्यांच्या आमदारकीचा प्रश्न हायकोर्टात; तर केंद्रीय निवडणूक आयोगालाही पत्र
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आमदारकीचा तिढा सुटण्याची चिन्ह दिसतं नाहीयत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची यावरी भूमिका अद्याप स्पष्ट होत नाहीय. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यांशी याविषयावर संवाद साधला. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सर्वबाजुने प्रयत्न सुरु ठेवले आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला यासंदर्भातील पत्र पाठविले आहे.
5 वर्षांपूर्वी -
मालेगावात आतापर्यंत ४२ पोलिसांना कोरोना, तर सोलापुरात एकाच दिवशी २१ रुग्ण
कोरोनाचं ‘हॉटस्पॉट’ असलेल्या मालेगावात बाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असतानाच, आता करोनाविरोधी लढणाऱ्या योद्ध्यांनाही या विषाणूच्या साखळीनं घट्ट विळखा घातला आहे. मालेगावात आतापर्यंत ४२ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
रिलायन्स इंडस्ट्रीज या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करणार
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या व्यवसायावर कोरोना साथीचा परिणाम झाला आहे. विशेषत: हायड्रोकार्बनच्या व्यवसायात तोटा सुरु झाला आहे. कारण रिलायन्सच्या रिफाईंड प्रोडक्ट आणि पेट्रोकेमिकल्सची मागणी कमी झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
चिंता वाढली! देशात १८२३ नवे करोना रुग्ण, २४ तासात ६७ मृत्यू
देशात मागील २४ तासांत १,७१८ नवे रुग्ण आढळले असून एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा हा ३३,०५० वर पोहचला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने यासंदर्भात माहिती दिली. कोरोना विषाणूचे देशातील संक्रमण रोखण्याच्या दृष्टिने सुरु असणारे प्रयत्नांना सकारात्मक यश मिळत आहे, असेही आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी स्पष्ट केले. देशातील कोरोनाग्रस्तांच्या दुप्पट होणारा आकड्याचा वेग आता मंदावला आहे. ११ दिवसांनी देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दुप्पट होत आहे. हे दिवस वाढत जातील तसे आपण कोरनावर नियंत्रण मिळवू, असेही अग्रवाल यांनी म्हटले आहे.
5 वर्षांपूर्वी -
अमेरिकेत कोरोनाचा कहर; तर ट्रम्प निवडणुक रॅलीच्या तयारीला
अमेरिकेत कोरोनाचा कहर सुरु आहे, अमेरिकेत बुधवारी २८,००० नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर २५०० हून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्याचवेळी राष्ट्राध्यक्षपदासाठी होणाऱ्या निवडणुकीची तयारीही सुरु आहे. विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार असतील. तर डेमोक्रेटिक पक्षातर्फे जो बिडेन अध्यक्षपदाचे उमेदवार असतील. वर्षअखेरीस होणाऱ्या या निवडणुकीची चर्चा जगभरात सुरु आहे.
5 वर्षांपूर्वी -
केवळ ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यातील रिट्विट करण्यासाठी मोदींना फॉलो केलं होतं
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे कार्यालय असलेल्या व्हाइट हाउसने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विटरवर अनफॉलो केल्यानंतर देशभरात अनेक चर्चा सुरू आहेत. त्यातच आता व्हाइट हाउसच्यावतीने याबाबतचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. त्यामुळे आता या वादावर पडदा पडण्याची शक्यता आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनावर 'रेमडेसिवीर' औषध सापडले; अमेरिकेने केला दावा
जगभरातील १८० हून अधिक देशामध्ये करोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. या विषाणूचा संसर्ग झाल्याने जगभरात २ लाख २७ हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. करोना विषाणूवर परिणामकारक ठरणाऱ्या लसीचा शोध घेण्याचा प्रयत्न जगभरातील ८० वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून सुरु असतानाच अमेरिकेमधून एक सकारात्मक बातमी समोर आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा - आयएलओ अहवाल
संयुक्त राष्ट्र संघाच्या आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने कोरोना विषाणूमुळे लोकांच्या नोकरी जाणार असल्याचा अंदाज पुन्हा एकदा वर्तवला आहे. या संघटनेनुसार एप्रिल ते जून या अवघ्या तीन महिन्यातच सुमारे ३०.५ कोटी लोकांच्या पूर्णवेळ नोकऱ्या जाणार आहेत. यापूर्वी या संघटनेने प्रत्येक आठवड्यातील ४८ तासांची पूर्णकालिक नोकरी असलेल्या १९.५ कोटी लोकांच्या नोकऱ्या जाणार असल्याचे म्हटले आहे. जगभरात हाहाकार माजवलेल्या या विषाणूमुळे लॉकडाऊन वाढवला जाणार आहे. त्यामुळे या संघटनेला पुन्हा एकदा आपल्या अहवालात बदल करावा लागला आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
RVNL Share Price | रेल्वे कंपनीचा शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीत, मल्टिबॅगर शेअरची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्सची जोरदार उसळी, मजबूत खरेदी सुरु, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: TATAMOTORS