महत्वाच्या बातम्या
-
उद्याचा महाराष्ट्र दिनी इतिहासाचं स्मरण करून कामाला लागू - शरद पवार
‘कोरोनाच्या रूपानं आज राज्यावर संकट आलंय. मात्र, संकटांवर धैर्यानं मात करण्याचा महाराष्ट्राचा इतिहास आहे. उद्याचा महाराष्ट्र दिन साजरा करताना या इतिहासाचं स्मरण करून कामाला लागू या. यश नक्कीच मिळेल,’ असा जबरदस्त आत्मविश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज व्यक्त केला.
5 वर्षांपूर्वी -
संकट आहे, पण त्यावर मात करण्याचा आपला इतिहास; नक्कीच जिंकू: शरद पवार
लॉकडाउनमुळे उद्योग, व्यापार, व्यवहार पूर्णपणे ठप्प असून याचा विपरित परिणाम महाराष्ट्राच्या अर्थकारणावर होणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्य़क्ष शरद पवार यांनी सांगितलं आहे. शरद पवार यांनी फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी देशभरात अनेक ठिकाणी आर्थिक संकट उभं राहणार असून त्यासाठी सर्वांनी एकत्रित चर्चा करुन मार्ग काढला पाहिजे असं आवाहनही केलं. सोबतच मुंबई, पुण्यात महापालिका आणि शासकीय यंत्रणेने मोठ्या प्रमाणात कार्यक्रम हाती घेतला असल्याने संख्या वाढत असल्याचं सांगितलं.
5 वर्षांपूर्वी -
शून्य रुग्ण संख्येवरच लॉकडाउन उघडला जाईल असं वाटत असेल तर ते अशक्य
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. लॉकडाउनचा दुसरा टप्पा येत्या ३ मे रोजी पूर्ण होणार आहे. लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर देशातील उद्योगधंदेही बंद आहेत. त्याचाच परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे. यादरम्यान काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लॉकडाउन सह अन्य समस्यांवर भाष्य केलं. “शून्य संख्येवरच लॉकडाउन उघडला जाईल असं वाटत असेल तर ते अशक्य आहे,” असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात कोरोनाचे ५९७ नवे रुग्ण, २४ तासात ३२ मृत्यू, आकडा ९,९०० च्याही पुढे
राज्यात नव्याने आढळलेल्या ५९७ नव्या रुग्णांसह कोरोनाग्रस्तांचा आकडा ९ हजार ९१५ वर पोहचला आहे. मागील २४ तासांत ३१ नव्या रुग्णांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला. यात मुंबईतील २६ रुग्णांसह पुण्यातील ३, सोलापूर आणि औरंगाबादमधील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. राज्यातील मृत्यांचा आकडा हा ४३२ इतका झालाय. राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीत चढ-उतार पाहायला मिळत आहे. दिवसागणिक मुंबईत सर्वाधिक रुग्ण आढळत असून त्यापाठोपाठ पुणे आणि नागपूरमधील मालेगावातही रुग्णांचा आकडा वाढतानाचे चित्र आहे.
5 वर्षांपूर्वी -
पोलिसांची पूर्वतयारी, रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती सुरु
लॉकडाउनमुळे विविध राज्यांमध्ये गेले ३६ दिवस अडकून पडलेल्या स्थलांतरीत मजूर, विद्यार्थी, पर्यटकांना आणि धार्मिक यात्रेकरूंना आपापल्या घरी जाण्याची मुभा देणारा मोठा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतला आहे. या निर्णयानुसार आता या अडकलेल्या नागरिकांना आंतरराज्यीय प्रवास करता येणार आहे. या नागरिकांची पाठवणी करणे, तसेच त्याना राज्यात प्रवेश देण्यासाठी राज्य सरकार तसेच केंद्रशासित प्रदेशांना नोडल प्राधिकरणाची स्थापना करावी अशा सूचना केंद्रीय गृह मंत्रालयाने केल्या आहेत.
5 वर्षांपूर्वी -
लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या कामगार, विद्यार्थ्यांना घरी जाण्यास केंद्राची परवानगी
लॉकडाउनमुळे विविध राज्यांमध्ये गेले ३६ दिवस अडकून पडलेल्या स्थलांतरीत मजूर, विद्यार्थी, पर्यटकांना आणि धार्मिक यात्रेकरूंना आपापल्या घरी जाण्याची मुभा देणारा मोठा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतला आहे. या निर्णयानुसार आता या अडकलेल्या नागरिकांना आंतरराज्यीय प्रवास करता येणार आहे. या नागरिकांची पाठवणी करणे, तसेच त्याना राज्यात प्रवेश देण्यासाठी राज्य सरकार तसेच केंद्रशासित प्रदेशांना नोडल प्राधिकरणाची स्थापना करावी अशा सूचना केंद्रीय गृह मंत्रालयाने केल्या आहेत.
5 वर्षांपूर्वी -
ना नफा ना तोटा या तत्वावर घरे विकून मोकळे व्हा....अन्यथा
केंद्र सरकारने टाळेबंदीत मर्यादित शिथिलकरणाचा निर्णय घेतल्याचा उद्योग, व्यावसायिकांना काहीच लाभ झालेला नाही. अनेक अटी आणि शर्तीमुळे व्यावसायिक बेजार झाले आहेत. ग्रामीण भागात टाळेबंदी शिथिल करण्यात आली. मात्र, उद्योग किंवा व्यवसाय सुरू करण्याच्या परवानगीसाठी प्रशासनाकडून घालण्यात आलेल्या अटीमुळे उद्योग-व्यवसाय सुरू करणे शक्य होत नसल्याचे चित्र आहे.
5 वर्षांपूर्वी -
हैदराबाद: लॉकडाउनला कंटाळून स्थलांतरीत मजूर रस्त्यावर, पोलिसांवर दगडफेक
कोरोना लॉकडाऊनमुळे परराज्यात अडकलेल्यांना आपल्या राज्यात पुन्हा पाठवायला केंद्र सरकारने सशर्त परवानगी दिली आहे. केंद्रीय गृहखात्याने परराज्यात अडकलेले मजूर, विद्यार्थी, पर्यटक आणि यात्रेकरूंना त्यांच्या राज्यात जायला परवानगी देण्यात आली आहे, पण याबाबत गृहखात्याने काही अटी ठेवल्या आहेत.
5 वर्षांपूर्वी -
खुशखबर!! शाळांच्या परीक्षा रद्द झाल्या, पण विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळणार
पहिली ते नववी आणि अकरावीच्या गुणपत्रिका देण्याच्या सर्व शाळांना सूचना सरकारकडून देण्यात येणार आहे. शिक्षण विभाग लवकरच याबाबत सूचना जारी करणार आहे. लॉकडाऊनमुळे पहिली ते नववी आणि अकरावीची परीक्षाच झालेली नाही. मात्र या वर्गातील विद्यार्थ्यांना त्यांच्या मागील परीक्षांचे मूल्यमापन करून गुण दिले जाणार आहेत. त्यामुळे शाळांनी या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका तयार कराव्यात आणि त्या ऑनलाईन वितरित कराव्यात अशा सूचना लवकरच शाळांना दिल्या जाणार आहेत. या गुणपत्रिकांवरुन पुढच्या वर्गात प्रवेश घेता येणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
बळींचा संभाव्य आकडा घटल्याने मतदारांनी मला पुन्हा मत देण्यास हरकत नाही
करोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीची तारीख बदलण्यास अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नकार दिला आहे. ३ नोव्हेंबर रोजी तेथे अध्यक्षीय निवडणूक होत आहे. व्हाइट हाऊस येथे पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, निवडणुकांच्या तारखा बदलण्याचा विचार आपण करूच शकत नाही, तसे करण्याचे काही कारणही नाही.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री अनिल देशमुख
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आणीबाणीच्या विधानाचा गृह मंत्री अनिल देशमुख यांनी खरपूस समाचार घेतला आहे. राज्याचं पाच वर्षं नेतृत्व केलेल्या व्यक्तीने अशा पद्धतीनेटीका करणे अयोग्य असून, आपत्तीच्या वेळी राजकारण करणे योग्य नसल्याचे अनिल देशमुख म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
गृहमंत्री फडणवीसांच्या काळातील क्लिप; म्हणाले 'असंच चालायचं महाआघाडी सरकारमध्ये'
भारतीय जनता पक्षाचे नेते महाविकास आघाडी आणि विशेष करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यातही धार्मिक वाद कसा वाढेल याची विशेष काळजी घेतली जाते असाच एकूण अनुभव येतो. अगदी त्यासाठी कोणतीही शहानिशा न करताच समाज माध्यमांवर झोड उठवली जाते.
5 वर्षांपूर्वी -
लॉकडाउनमुळे अनेक क्षेत्रांवर प्रभाव पडल्याने करोडो लोकांच्या नोकऱ्या जाणार - MSME रिपोर्ट
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अनेक उद्योगधंदे बंद आहेत. कोरोनामुळे जीडीपीमध्ये मोठा वाटा असणार्या खाजगी, गुंतवणूक आणि परदेशी व्यापाराला चांगला फटका बसला आहे. यामुळे कोट्यावधी लोकांचा रोजगार जाण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या कहर हा उद्योगधंद्यांवर देखील भारी पडणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे कार्यालय 'व्हाइट हाउस'कडून मोदी अनफॉलो
एकाबाजूला आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्यासाठी काम करणाऱ्या अमेरिकन सरकारच्या वॉचडॉग ग्रुपने मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या आपल्या अहवालात भारताला २००४ नंतर आतापर्यंत सर्वात वाईट रेटिंग दिलं आहे. या अहवालात भारतात अल्पसंख्याकांवर अत्याचार वाढत चाललेल्या १४ देशांपैकी एक असल्याचं म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादीचे माजी खासदार आनंद परांजपे यांची कोरोनावर मात
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष आणि माजी खासदार आनंद परांजपे यांनी करोनावर मात केली आहे. करोनाची लागण झाल्याने आनंद परांजपे आणि त्यांच्या पत्नी सोनल परांजपे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मंगळवारी रात्री आनंद परांजपे आणि त्यांच्या पत्नी सोनल परांजपे यांना होरायझन रुग्णालयामधून डिस्चार्ज देण्यात आला. आनंद परांजपे एका नेत्याच्या संपर्कात आल्याने करोनाची लागण झाली असल्याचं सांगितलं जात आहे.
5 वर्षांपूर्वी -
एकट्या चीनमुळे १८४ देशांना नरकयातना भोगाव्या लागत आहेत - डोनाल्ड ट्रम्प
जगभरात कोरोनानं थैमान घातलं असून याचा सर्वात मोठा उटका अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेत कोरोनामुळे जवळपास ६० हजार जणांचा मृत्यू झाला आहे. यातील सर्वाधिक मृत्यू न्यूयॉर्कमध्ये झाले आहेत. तसेच करोना विषाणूमुळे अमेरिकेतील बळींचा आकडा ७० हजारांपर्यंत जाऊ शकतो, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. मात्र, मूळातील बळींचा संभाव्य आकडा हा अधिक असून तो कमी झाल्यामुळे मतदारांनी आता मला त्यामुळे नोव्हेंबरमध्ये पुन्हा मत देण्यास काही हरकत नाही, असे ते म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
ते जॅकेट कायमचं उतरलं की हा ‘Lockdown Look’ आहे? - फडणवीसांची खिल्ली
मंगळवारी दुपारच्या सुमारास फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन असून राज्य सरकारला जाब विचारण्याची मागणी केली. राज्यात अघोषित आणीबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण करुन पत्रकार-संपादकांमध्ये दहशत निर्माण केली जात असल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला आहे. माध्यमांची मुस्कटदाबी आणि अभिव्यक्तीची गळचेपी थांबवा अशी मागणी यावेळी त्यांनी केली.
5 वर्षांपूर्वी -
फ्रान्समध्ये ११ मे पासून शाळा सुरु करण्याचा विचार; पालक म्हणतात पाठवणार नाही
कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी जगभरात मोठया प्रमाणावर संशोधन सुरु आहे. वेगवेगळया देशांमध्ये करोना व्हायरस विरोधात लस निर्मितीचे काम वेगात सुरु आहे. सिगारेटमध्ये असणारा निकोटिन हा घटक करोना व्हायरसवर प्रभावी ठरु शकतो का? या दृष्टीने आता फ्रान्समध्ये संशोधन सुरु आहे. निकोटिनमुळे कोरोना व्हायरसच्या संक्रमणापासून बचाव होऊ शकतो, फ्रान्समधल्या संशोधनातून ही बाब समोर आली आहे. ‘फ्रांस-२४’ या स्थानिक वृत्तवाहिनीने याबद्दल माहिती दिली होतं.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनाने ३० लाखांपेक्षा जास्त बळी जातील, तर १०० कोटी लोकांना लागण होईल: इंग्लंड IRC
करोनाच्या जागतिक साथीमध्ये चीनच्या भूमिकेची चौकशी करायला हवी या अमेरिकच्या मागणीनंतर चीनने टीका केली आहे. करोना साथीला प्रतिसाद देताना अमेरिकेची चूक झाल्याचा दावा करून, अमेरिकेने ही चूक मान्य करावी, असे चीनने म्हटले आहे. ‘अमेरिकेतील लोक आणि आंतरराष्ट्रीय समुदायाच्या चिंतेकडे अमेरिका लक्ष देईल, अशी आशा आम्ही करतो. जागतिक आरोग्य संघटनेलाही (डब्ल्यूएचओ) या तपासात बोलावता येऊ शकते,’ असे चिनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी सोमवारी सांगितले.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनावर प्लाझ्मा थेरपीच्या सफलतेचा कोणताही पुरावा नाही - आरोग्य मंत्रालय
देशात गेल्या २४ तासात करोनाचे १५९४ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे देशातील करोना रुग्णांची संख्या २९ हजार ९७४ एवढी झाली आहे. आत्तापर्यंत करोनामुळे ९३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या चोवीस तासात करोनामुळे ५१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भातली माहिती दिली आहे. आत्तापर्यंत देशभरात ७ हजार २७ करोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. २२ हजार १० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Withdrawal | पगारदारांनो EPF च्या पैशांतून होम लोन फेडत आहात का; तुम्ही जे करताय ते योग्य आहे की अयोग्य, इथे जाणून घ्या