महत्वाच्या बातम्या
-
२०२०-२१ आर्थिक वर्षासाठी भारताचा विकास दर ०.८ टक्के राहील - फिच रेटिंगचा अंदाज
करोना व्हायरसमुळे आधीच अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. आता फिच या आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्थेने चिंतेत भर घालणारी बातमी दिली आहे. फिचने २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी भारताच्या विकास दरात आणखी घट वर्तवली आहे. भारताचा आर्थिक विकास दर ०.८ टक्के राहील असा अंदाज वर्तवला आहे. तीन आठडयांपूर्वी याच फिचने भारताचा आर्थिक विकास दर दोन टक्के राहिल असे म्हटले होते.
5 वर्षांपूर्वी -
केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जुलै २०२१ पर्यंत स्थगित
केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आणि निवृत्तीवेतनधारकांना एक जानेवारी २०२० पासून देय असलेला महागाई भत्ता सध्या देण्यात येणार नसल्याचे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे. देशातील कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असल्याचे समजते.
5 वर्षांपूर्वी -
राज्याच्या तिजोरीत महसूल येण्यासाठी सरकारकडे वाईन शॉपचा पर्याय - राज ठाकरे
‘राज्याची आर्थिक परिस्थिती सध्या बिकट आहे. कर्मचाऱ्यांचे पगार द्यायलाही पैसे नाहीत. त्यामुळं महसुलाचा ओघ सुरू करण्याचा विचार आता सरकारनं करायला हवा. वाईन शॉप्स सुरू ठेवून त्याची तजवीज करता येऊ शकते. त्यामुळं कुठल्याही नैतिक गुंत्यात न अडकता राज्य सरकारनं तसा निर्णय घ्यावा,’ अशी मागणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. ‘दारू पिणाऱ्यांचा विचार करा असा माझ्या म्हणण्याचा उद्देश नाही, हेही त्यांनी आवर्जून स्पष्ट केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
इंग्लंडमध्ये कोरोना प्रतिबंधक लस निर्मितीसाठी मानवी चाचणी सुरू - ऑक्सफर्ड विद्यापीठ
जगात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव सुरूच आहे. आतापर्यंत जगात कोविड -१९ च्या रुग्णांची संख्या वाढून २६,३७,६८१ झाली आहे. कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत १,८४,२२० लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ७,१७,७५९ लोकं रूग्णालयातून बरे होऊन घरी गेले आहेत. अमेरिका, स्पेन, इटली, फ्रान्स, जर्मनी आणि ब्रिटन हे जगातील सर्वाधिक प्रभावित देश आहेत. अमेरिका कोरोनामुळे संक्रमित आणि मृत्यू झालेल्या लोकांच्या संख्येच्या बाबतीत रोज नवीन संकटात सापडत आहे.
5 वर्षांपूर्वी -
लॉकडाउननंतर परप्रांतीयांना घरी जाण्यासाठी मुंबई पुण्यातून गाड्या सोडा - अजित पवार
येत्या ३ मे रोजी लॉकडाऊन संपल्यानंतर रेल्वे सुरू झाल्यावर राज्यातील विविध भागात थांबलेले परप्रांतीय मजूर त्यांच्या घरी जाण्यासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडून गर्दी करण्याची शक्यता आहे. त्यामुळ कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने या मजूरांना त्यांच्या घरी जाण्यासाठी मुंबई आणि पुण्यातून विशेष रेल्वे सोडण्यात यावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांच्याकडे केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
हा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प
हा काही फ्ल्यू नाही. हा तर अमेरिकेवर झालेला हल्ला आहे, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. व्हाईट हाऊसमध्ये नैमित्तिक पत्रकार परिषदेत त्यांनी आपली ही भूमिका मांडली. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, आमच्यावर हल्ला झालाय. हा काही फ्ल्यू नाही. आतापर्यंत कोणीच भूतकाळात असे काही पाहिलेले नाही. त्यामुळे हा हल्लाच आहे.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्र CM फंडाला CSR लागू करावा यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली
केवळ पीएम केअरला केलेली मदतच कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) म्हणून ग्राह्य धरली जाणार असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्री सहायत्ता निधीत जमा केलेली रक्कम सीएसआरमध्ये मोजली जाणार नसल्याचं मोदी सरकारनं सांगितलं आहे. विशेष म्हणजे २ आठवड्यानंतर केंद्रानं याबद्दलचं स्पष्टीकरण दिलं होतं.
5 वर्षांपूर्वी -
घाबरू नका! मे महिन्यात मुंबईत कोरोनाचे काही लाख रुग्ण वाढणार हे वृत्त खोटं - बीएमसी
राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूच्या चाचण्या घेण्यात येत आहेत. आतापर्यंत ९० हजारहून अधिक चाचण्या करण्यात आल्या असून मृतांच्या दरातही घट झाली आहे. सध्याची परिस्थिती ही आशादायी असून राज्य सरकार कोरोना विषाणूच्या संकटातून सावरण्यासाठी सर्वोत्परी प्रयत्न करत आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. राजेश टोपे म्हणाले की, राज्यात एकूण ३८ लॅब उपलब्ध असून प्रत्येक दिवसाला ७ हजारहून अधिक चाचण्या घेणे शक्य होत आहे.
5 वर्षांपूर्वी -
इराणच्या गणबोटने त्रास दिल्यास सरळ उडवून टाका; ट्रम्प यांचे US नौदलाला आदेश
कोरोना व्हायरसने जगभरात थैमान पसरलं आहे. कोरोनामुळे जगभरात जवळपास 1 लाख 70 हजारांहून अनेक मृत्यू झाले आहेत. जगभरात कोरोनाग्रस्तांची संख्या २४ लाख ८३ हजार ८६ इतकी झाली आहे. तर अमेरिकेत ४२ हजार ३६४ लोकांचा मृत्यू झाला आहे. जगात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या देशातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी आकडेवारी आहे. त्यानंतर इटलीमध्ये २४ हजार ११४ जणांचा बळी गेला आहे. तर त्यानंतर स्पेनमध्ये २१,२८२ लोक दगावले आहेत. ब्रिटनमध्ये १६,५०९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
नवी मुंबईतील महापे स्थित आयटी कंपनीतील १९ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसागणिक काहीसा वाढत असतानाच मंगळवारी एकाच दिवशी कोरोनाच्या १५० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. ही सध्याच्या घडीची अत्यंत दिलासादायक बाब समोर येत आहे. आतापर्यंत कोरोनातून सावरलेल्या एकूण ७२२ रुग्णांना घरी सोडण्यात आलं आहे. या ७२२ जणांपैकी पुरूषांची संख्या सर्वाधिक ४४१ असून त्यात २८१ महिलांचाही समावेश आहे.
5 वर्षांपूर्वी -
फेसबुक-जिओ डीलमुळे जागतिक गुंतणूकदार भारताकडे आकर्षित होतील - आनंद महिंद्रा
फेसबूककडून बुधवारी एक मोठी घोषणा करण्यात आली. रिलायन्स उद्योग समूहातील जिओचे १० टक्के समभाग खरेदी करण्याची घोषणा फेसबूककडून करण्यात आली. ५.७ अब्ज अमेरिकी डॉलर अर्थात ४३,५७४ कोटी रुपये फेसबूककडून जिओमध्ये गुंतविण्यात येणार आहेत. भारतातील सोशल मीडियामध्ये आपला परीघ आणखी विस्तारण्यासाठी फेसबूककडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्य मंत्रिमंडळ बैठकीला हजेरी लावणाऱ्या मंत्र्याला कोरोनाची लागण; रिपोर्ट पॉझिटिव्ह
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारमधील एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे. धक्कादायक म्हणजे या मंत्र्याने सोमवारीच मंत्रालयामध्ये एका बैठकीला हजेरी लावल्याने खळबळ उडाली आहे. या मंत्र्याची तब्येत मंगळवारी काहीशी बिघडली होती. यामुळे त्यांच्यावर फोर्टिस हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. या मंत्र्याने सोमवारी मंत्रालयात बैठकीला हजेरी लावल्याने त्यांना भेटलेल्या अधिकारी, कार्यकर्त्यांनाही क्वारंटाईन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. स्वतः मुख्यमंत्री आणि शरद पवार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत असं वृत्त आहे.
5 वर्षांपूर्वी -
देशातील ६४ टक्के मृत्यू फक्त महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशमधील
राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा सतत वाढताना दिसतोय. महाराष्ट्रात 5218 कोरोनाबाधित आढळले आहेत. राज्यात आतापर्यंत 722 रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत राज्यात 251 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. वर्धा, भंडारा, गडचिरोली, नांदेडमध्ये एकही कोरोनाबाधित आढळला नाही.
5 वर्षांपूर्वी -
उपासमारीमुळे जगभर १३.५० ते २५ कोटी लोक उपाशीपोटीच मरण्याची शक्यता - WFP प्रमुख
कोरोना व्हायरसने जगभरात थैमान पसरलं आहे. कोरोनामुळे जगभरात जवळपास १ लाख ७० हजारांहून अनेक मृत्यू झाले आहेत. जगभरात कोरोनाग्रस्तांची संख्या २४ लाख ८३ हजार ८६ इतकी झाली आहे. ही संख्या वाढण्याचीही शक्यता आहे. एएफपीने ही आकडेवारी राष्ट्रीय अधिकारी आणि जागतिक आरोग्य संघटनेकडून मिळालेल्या माहितीनुसार देण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
आम्ही डॉक्टरांना सुरक्षा पुरवतो, तुम्ही आंदोलन करु नका; गृहमंत्र्यांची विनंती
देशावर कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे. कोरोनाविरोधातील लढाईमध्ये स्वत:च्या जीवाची पर्वा न करता डॉक्टरांची टीम रात्रं-दिवस मेहनत करत आहे. अशामध्ये नागरिकांनी कोरोना तपासणी करण्यासाठी आलेल्या डॉक्टरांच्या टीमवर हल्ला केल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. या घटनांना लक्षात घेता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टरांना संरक्षण देण्याचे आश्वासन दिले आहे.
5 वर्षांपूर्वी -
मागील २४ तासांत अमेरिकेत कोरोना विषाणूमुळे २७५१ जणांचा मृत्यू
कोरोनामुळे जगभरात आतापर्यंत एक लाख ७० हजार जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये युरोपमधील एक लाख सहा हजार ७३७ जणांचा समावेश आहे. अमेरिकेत सर्वाधिक म्हणजे ४२ हजार ३६४ जणांचा, इटलीमध्ये २४ हजार ११४ जणांचा, स्पेनमध्ये २१ हजार २८२ जणांचा, फ्रान्समध्ये २० हजार २६५ जणांचा आणि ब्रिटनमध्ये १६ हजार ५०९ जणांचा मृत्यू झाला आहे. जगभरात करोनाबाधितांची संख्या २४ लाख ८३ हजार ८६ इतकी आहे.
5 वर्षांपूर्वी -
वाधवान बंधूंना सीबीआयच्या ताब्यात देणार - गृहमंत्र्यांची माहिती
“वाधवान कुटंबीयांच्या क्वारंटाइनची वेळ आज दुपारी दोन वाजता संपत आहे. त्यामुळे आपल्या पोलीस खात्यातर्फे सक्तवसुली संचलनालय (ईडी) आणि सीबीआय यांना पत्र लिहून त्यांना आपल्या ताब्यात घ्यावं असं कळवलं आहे. सीबीआय वाधवान कुटुंबीयांना घेऊन जात नाही तोपर्यत वाधवान कुटुंब आमच्या ताब्यात राहणार आहे. सीबीआयने आमच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांच्याकडे सोपवू,” अशी माहिती अनिल देशमुख यांनी यावेळी दिली.
5 वर्षांपूर्वी -
पालघर हत्याकांड : जंगलात लपलेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी ड्रोनची मदत
पालघरमध्ये चोरीच्या संशयावरुन दोन साधू आणि त्यांच्या गाडी चालकाची जमावाने निर्घृणपणे हत्या केली होती. या घटनेप्रकरणी आतापर्यंत १०१ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यापैंकी एकही जण मुस्लिम नाही, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. गृहमंत्र्यांनी आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला यावेळी त्यांनी हे सांगतिले.
5 वर्षांपूर्वी -
फेसबूक जिओमध्ये तब्बल ४३,५७४ कोटीची गुंतवणूक करणार
फेसबूककडून बुधवारी एक मोठी घोषणा करण्यात आली. रिलायन्स उद्योग समूहातील जिओचे १० टक्के समभाग खरेदी करण्याची घोषणा फेसबूककडून करण्यात आली. ५.७ अब्ज अमेरिकी डॉलर अर्थात ४३,५७४ कोटी रुपये फेसबूककडून जिओमध्ये गुंतविण्यात येणार आहेत. भारतातील सोशल मीडियामध्ये आपला परीघ आणखी विस्तारण्यासाठी फेसबूककडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
परराज्यातील मजुरांसाठी विशेष ट्रेनची व्यवस्था करा, CM ठाकरेंची केंद्राकडे मागणी
एकट्या मुंबईत ३४५१ कोरोनाबाधित असून १५१ जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे मनपात १५० कोरोनाबाधित असून ४ जण दगावले आहेत. तर ठाण्यात २२ जण बाधित असून २ जण दगावले आहेत. नवी मुंबईत ९४ जणांना कोरोनाची लागण झाली असून तिघांचा मृत्यू झाला आहे. तर कल्याण-डोंबिवली मनपात ९३ जण कोरोनाग्रस्त आढळले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. तर उल्हासनगरमध्ये एक जण कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार