महत्वाच्या बातम्या
-
AIDS'वर लस बनवण्याच्या प्रयोगातून विनाशकारी कोरोना विषाणू तयार झाला: लूक मॉटेंग्नियर
चीनमधील वैज्ञानिकांनी वुहान येथील मांसविक्री केंद्रामधून करोनाचा मानवामध्ये संसर्ग झाल्याचा दावा केला आहे. मात्र अमेरिकेमधील अनेक तज्ञांनी वुहानमधून करोनाचा विषाणू जगभरात पसरण्यामागे या शहरामधील व्हायरोलॉजी प्रयोगशाळेचा संबंध असल्याचे मत व्यक्त केलं आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॅम्पिओ य़ांनीही या विषाणूची निर्मिती कशी झाली यासंदर्भात अमेरिकेकडून चौकशी सुरु असल्याची माहिती दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
चेक महागात पडला; इमरान खान यांना चेक देणारी व्यक्ती कोरोना पॅझिटिव्ह
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची करोना व्हायरसची चाचणी होऊ शकते किंवा त्यांना आयसोलेशनमध्ये राहायला सांगितले जाऊ शकते. काही दिवसांपूर्वी इम्रान खान पाकिस्तानातील एका प्रसिद्ध समाजसेवकाला भेटले होते. त्या समाजसेवकाचा करोनाचा चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून इम्रान खान यांची सुद्धा Covid-19 ची चाचणी केली जाईल किंवा त्यांना आयसोलेशनमध्ये रहायला सांगितले जाऊ शकते. द हिंदू ने हे वृत्त दिले आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना रॅपीड टेस्ट थांबवा, ICMR'चे सर्व राज्यांना आदेश
कोरोना विषाणूची लागण झाली आहे किंवा नाही यासाठी प्राथमिक स्वरुपात घेण्यात येत असलेल्या रॅपीड टेस्टमध्ये काही त्रूटी असल्याची तक्रार आयसीएमआरकडे आली आहे. या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही राज्यांनी पुढील दोन दिवस रॅपीड टेस्ट करु नये, असे आयसीएमआरने म्हटले आहे. दोन दिवसात आयसीएमआरचे पथक यासंदर्भात तपासणी करेल, त्यानंतर नवी अधिसूचना काढली जाईल, अशी माहिती आयसीएमआरचे प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर यांनी दिली.
5 वर्षांपूर्वी -
मुस्लिमांसाठी भारत स्वर्ग, इथे त्यांचे अधिकार सुरक्षित: भाजप नेत्याची ग्वाही
देशभरात सुरु असणारे एकंदर धार्मिक वाद आणि धर्माच्या राजकारणावरुन काही अंशी दिसणारा असंतोष या साऱ्यामध्येच आता एका केंद्रीय मंत्रीमहोदयांचं वक्तव्य लक्ष वेधून जात आहे. अल्पसंख्यांक आणि मुस्लिम धर्मीयांसाठी भारत जणू स्वर्गच आहे, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री मुक्तार अब्बास नक्वी यांनी केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
शहरात चिंता वाढली...तबलिगींना लवकरात लवकर डोंबिवली शहराबाहेर इतरत्र हलवावे - आ. राजू पाटील
सध्या जगभर थैमान घातलेल्या कोरोना या रोगापासून आपली कल्याण डोंबिवली पण सुटू शकली नाही. यावर मनसेचे आमदार राजू पाटील मोठी चिंता व्यक्त करताना सरकारला देखील विनंती केली आहे. त्यावर सविस्तर बोलताना मनसे आमदार राजू पाटील यांनी म्हटलं आहे की, सध्या कोरोनाबाधित रूग्ण सापडण्यात कल्याण डोंबिवलीचा महाराष्ट्रात तिसरा किंवा चौथा क्रमांक लागत आहे. कल्याण-डोंबिवलीत हा रोग पसरण्यासाठी इथे नाममात्र असलेली आरोग्यसेवा तसेच काही लोकांचा हलगर्जीपणा कारणीभूत ठरत असल्याचे प्रथमदर्शी दिसत आहे. आपण नुकतीच केडिएमसीचे आयुक्त म्हणून सुत्र हाती घेतली असली, तरीही आपण या परिस्थितीतही कोरोनाशी दोन हात करताना जनतेला दिसत आहात.
5 वर्षांपूर्वी -
चीनला मोठा आर्थिक धक्का, १००० विदेशी कंपन्या भारतात येण्याच्या तयारीत
चीनमधून आलेला कोरोना विषाणू संपूर्ण जगात धुमाकूळ माजवत आहे. याचा थेट परिणाम लोकांच्या जीवनाबरोबरच अर्थव्यवस्थेवरही पडत आहे. चीन हे जगातील सर्वांच्या पसंतीचे मॅन्यूफॅक्चरिंग हब आहे. परंतु, त्यांचा हा किताब लवकरच हिसकावला जाण्याची शक्यता आहे. या विषाणूमुळे निर्माण झालेल्या अडचणींमुळे सुमारे १००० विदेशी कंपन्यांनी सरकारी अधिकाऱ्यांशी भारतात कारखाना सुरु करण्याबाबत चर्चा सुरु केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
आमच्यावर विश्वास ठेवा, खरा विनाश तर अजून दिसायचाय - WHO'चे अध्यक्ष
जगभरातील २०० हून अधिक देशांमध्ये फैलावलेल्या करोनाच्या संसर्गाची २४ लाखांहून अधिकजणांना बाधा झाली आहे. करोनाने जगभरात एक लाख ७० हजारांहून अधिक बळी घेतले आहेत. युरोप आणि अमेरिकेत करोनाने थैमान घातले आहेत. मात्र कोरोनाची ही फक्त सुरुवात आहे, वाईट काळ येणं अजून बाकी आहे असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिला आहे.
5 वर्षांपूर्वी -
घटना गैरसमजुतीतून घडली; आपत्तीच्या काळात राजकारण करणे चुकीचे
आज कोरोनाचा सामना करण्यासाठी कठोर नियमांची गरज आहे. मुंबई आणि पुण्यात मोठा धोका संभवतो आहे. त्यामुळे याठिकाणी करोन नियम करा, असा सल्ला राज्यसरकारला राष्ट्रादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे. त्याचवेळी पालघरचे राजकारण करणे चुकीचे आहे, असे मत पवार यांनी व्यक्त केले.ते फेसबुक लाईव्हद्वारे बोलत होते. पालघरला जे झाले त्याचा जो काही संबंध असेल तर त्याच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. या प्रकरणातील काही लोकांना अटक करण्यात आली आहे. पालघर प्रकरण आणि करोनाचा कोणताही संबंध नाही. पालघरचे राजकारण घडायला नको हवे होते, असेही ते म्हणालेत.
5 वर्षांपूर्वी -
राष्ट्रपती भवनात कोरोनाचा रुग्ण, १२५ कुटुंब क्वारंटाईन
कोरोनाचा सामना करण्यासाठी देश सज्ज झाला असून खबरदारीचे सर्व उपाय केले जात आहेत. मात्र तरीही देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढून हा आकडा आता तब्बल १८ हजारांवर गेला असल्याची माहिती मिळत आहे. गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनामुळे ४७ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे तर १ हजार ३३६ कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. यामुळे देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या १८ हजार ६०१ वर पोहचली आहे. तर ५९० जणांचा मृत्यू झाला आहे. १४ हजार ७५९ जणांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून ३२५२ लोकांना उपचारानंतर घरी पाठण्यात आले आहे.
5 वर्षांपूर्वी -
८० टक्के रूग्णांमध्ये कोरोनाची लक्षणंच नाहीत; सरकारची डोकेदुखी वाढली
आयसीएमआरच्या साथी आणि संसर्गजन्य रोग विभागाचे राष्ट्रीय प्रमुख पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले की, करोना सामना करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत. पण सकारात्मक अहवाल आढळलेल्या जवळपास ८० टक्के रूग्णांमध्ये करोनाची कोणतीही लक्षणं दिसून आली नाहीत. ही बाब चिंताजनक आहे. त्यामुळे करोना बाधितांचा शोध घेऊन उपचार करणे कठीण जात आहे.
5 वर्षांपूर्वी -
देशात २४ तासांत १,३३६ नवे रुग्ण, ४७ जणांचा मृत्यू
कोरोनाचा सामना करण्यासाठी देश सज्ज झाला असून खबरदारीचे सर्व उपाय केले जात आहेत. मात्र तरीही देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढून हा आकडा आता तब्बल १८ हजारांवर गेला असल्याची माहिती मिळत आहे. गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनामुळे ४७ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे तर १ हजार ३३६ कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. यामुळे देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या १८ हजार ६०१ वर पोहचली आहे. तर ५९० जणांचा मृत्यू झाला आहे. १४ हजार ७५९ जणांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून ३२५२ लोकांना उपचारानंतर घरी पाठण्यात आले आहे.
5 वर्षांपूर्वी -
४६६ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ४,६६६ वर
राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा ४ हजार ६६६ वर पोहचला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आज ४६६ नवे रुग्ण आढळले आहेत. कोरोना विषाणूचे संकट थोपवण्यासाठी ३ मे पर्यंत देशव्यापी लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. आतापर्यंत ९ मृतांसह राज्यातील मृतांचा आकडा हा २३२ वर पोहचला आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनामुळे आर्थिक नुकसान; जर्मनीने चीनला १३० बिलियन यूरोचं बिल पाठवलं
जगभरात करोनाचे थैमान सुरू असून संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या एक लाख ६० हजारांहून अधिक झाली आहे. अमोरिकेमध्ये करोनाने थैमान घातले असून मृतांची संख्या वाढत आहे. अमेरिकेत करोनाच्या संसर्गाने ४० हजारांचा मृत्यू झाला आहे. तर, बाधितांची संख्या ७ लाख ५० हजारांहून अधिक झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती: पुणे आणि मुंबईत केंद्राची पथकं पाहणी करणार
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरु असणारं लॉकडाऊन पाहता आता या परिस्थितीतून साऱ्या देशाला बऱ्याच आशा आहेत. अशी माहिती सोमवारी आरोग्य मंत्रालयाकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. यामध्ये नमूद करण्यात आल्यानुसार जवळपास १८ राज्यांमध्ये कोरोनाची लागण होण्याचं दुपटीने वाढणारं प्रमाण घटलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
औरंगाबाद: ३१ कोरोना रुग्णांपैकी १४ रुग्ण बरे होऊन सुखरूप घरी
राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या ४ हजार ४८३ वर पोहोचली आहे. ही सकाळी ११ वाजेपर्यंतची आकडेवारी असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. यामध्ये भिवंडी १,कल्याण डोंबिवली १६, मीरा भाईंदर ७, बृहन्मुंबई १८७, नागपूर १, नवी मुंबई ९, पनवेल ६, पिंपरी चिंचवड ९, रायगड २, सातारा १, सोलापूर १, ठाणे २१, वसई विरार २२ अशी २८३ नवीन रुग्णांची वाढ झाली असल्याचं राजेश टोपे यांनी नमूद केलं.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती: अमेरिकेत कोरोनामुळे ४० हजार ५८५ नागरिकांचा मृत्यू
कोरोनामुळे जगभरात रविवापर्यंत १ लाख ६५ हजार ०५४ जणांचा मृत्यू झाला असून १९३ देशांमध्ये २४ लाख ०६ हजार ८२३ हून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे, त्यापैकी पाच लाख १८ हजार ९०० जण उपचारानंतर बरे झाले आहेत. वल्डोमीटर वेबसाइटच्या आकडेवारीनुसार, अमेरिकेला करोनाचा सर्वाधिक फटका बसला असून तेथील मृतांची संख्या ४० हजारांच्या पार गेली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुंबईत ५३ पत्रकारांना कोरोनाची लागण; चेन्नईत २ पत्रकारांची टेस्ट पॉझिटिव्ह
सोमवारी सकाळपर्यंत भारतातील करोनाबाधितांचा आकडा १७,२६५ पर्यंत पोहचलाय तर ५४३ जणांना आपला जीव गमवावा लागलाय. मात्र, दिलासादायक म्हणजे सध्याच्या घडीला देशातील तब्बल ३३९ जिल्हे करोनामुक्त आहेत. त्यामुळे, या भागांना लॉकडाऊनमधून थोडी सूट (सशर्त) मिळण्याची चिन्हं आहेत. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशातील एकूण ७४७ जिल्ह्यांपैंकी तब्बल ४०८ जिल्ह्यांतून करोना संक्रमणाची प्रकरणं समोर आली आहेत. मात्र सध्या ३३९ जिल्ह्यांमध्ये एकही रुग्ण आढळलेला नाही.
5 वर्षांपूर्वी -
भारतातील मोठ्या स्टार्टअप्स'मध्ये चीनची सर्वाधिक गुंतवणूक; पण उद्देश डेटा सायन्स?
टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन मागे घेणं ही भारतीय कंपन्यांसाठी डोकेदुखी ठरू शकते, असं वरिष्ठ अधिकाऱ्यांचं मत आहे. ‘ईटी’ला काही कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊन हळूहळू मागे घेतल्यामुळे कंपन्यांसमोर नवी आव्हाने उभी राहणार आहेत. अर्थव्यवस्थेची चाकं असलेल्या १६ प्रकारच्या कंपन्यांना निर्मितीची परवानगी द्यावी, अशी शिफारस उद्योग विभागाने केली आहे. एका शिफ्टमध्ये काम सुरू होण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे. या शिफ्टमध्ये कर्मचाऱ्यांची सुरक्षा आणि आरोग्य यावर भर देण्यात येईल.
5 वर्षांपूर्वी -
अनेक देश चीनमधून मॅन्युफॅक्चरिंग प्लांट इतरत्र हलवण्याच्या विचारात; भारताला मोठी संधी
आंतरराष्ट्रीय नाणे निधी म्हणजेच आयएमएफ आणि जागतिक बँकेने व्यापार सुरू ठेवण्याचं आवाहन सर्व सदस्य राष्ट्रांना केलं आहे. करोनाशी लढा देताना व्यापार सुरू ठेवणंही आवश्यक असल्याचं या दोन संस्थांनी म्हटलं आहे. वैद्यकीय पुरवठा आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवल्याचे विपरित परिणाम समोर येतील, असाही इशारा आयएमएफ आणि जागतिक बँकेने दिला आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यपालांनी तसं केल्यास तो निर्णय अनैतिक आणि घटनाबाह्य ठरेल: घटनातज्ज्ञ प्रा. उल्हास बापट
राज्य मंत्रिमंडळाने राज्यपाल नियुक्त जागेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव सुचविल्यानंतरही ठाकरे यांची विधानपरिषदेवर नियुक्ती न करण्यात आल्याने संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर काल टीका केली होती. ‘राजभवन हे फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये, असं सांगतानाच का कळत नाही, पण मला रामलाल नामक निर्लज्ज राज्यपालाची आठवण येते, असं ट्विट राऊत यांनी केलं होतं.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News