महत्वाच्या बातम्या
-
मुस्लिम धार्मिक कार्यक्रमात उपस्थिती लावलेले पुण्यातील ६० लोक विलगीकरणात
निजामुद्दीनमधील तबलिग जमात मरकजच्या मौलानावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सरकारच्या आदेशांचं उल्लंघन करून मोठ्या प्रमाणावर धार्मिक कार्यक्रम आयोजित केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सरकारने जमावबंदीचे आदेश देऊनही आणि सोशल डिस्टन्सिंगच्या सूचना असतानाही त्या न पाळल्याचा मौलानांवर आरोप आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती: मुंबईत महापालिकेकडून तब्बल १४६ परिसर सील
कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी मुंबई महानगर पालिकेनं मुंबई आणि उपनगर परिसरातील एकूण १४६ परिसर पूर्णपणे सील केले आहेत. या सील केल्या गेलेल्या ‘no-go zones’मध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण आढळले आहेत किंवा बाधा झालेले रुग्ण या परिसरातील लोकांच्या संपर्कात आले असल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे खबरदारीची पावलं उचलत हे परिसर सील करण्यात आले आहेत. हे परिसर सील करताना इथल्या लोकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत सुरुच राहिल याची खबरदारी आम्ही घेतली असल्याचं पालिकेचं म्हणणं आहे.
5 वर्षांपूर्वी -
ती व्यक्ती COVID १९ पॉझिटिव्ह तरी अजून घरीच; आ. राजू पाटील यांचा सतर्कतेचा इशारा
दरम्यान, राज्यात करोनाबाधीत रुग्णांची संख्या आज २३० वर पोहचली असून यातील १२२ रुग्ण मुंबई आणि ठाणे परिसरातील असल्याने या दोन्ही महानगरांमध्ये अधिक खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. मुंबई, ठाण्यानंतर पुण्यात करोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. पुण्यात आतापर्यंत करोनाचे ४६ रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर सांगलीत करोनाचे २५, नागपूरमध्ये १७, अहमदनगरमध्ये ५, रत्नागिरीत १, औरंगाबादमध्ये १, यवतमाळमध्ये ३, साताऱ्यात १, सिंधुदुर्गात १, कोल्हापुरात २, जळगावात १, बुलडाण्यात ३ करोनाबाधीत रुग्ण आढळले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
अनेक लोकांनी सहकार्य न केल्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढला: केंद्रीय आरोग्य मंत्रालय
देशामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत चालला असून रुग्णांच्या संख्येतही दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत आहे. अशातच ‘काही ठिकाणी नागरिकांनी सहकार्य न केल्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग वाढला.’, असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे. दिल्लीमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी ही माहिती दिली.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना इम्पॅक्ट: अमेरिकन नौदलाच्या जहाजात १००० खाटांचं रुग्णालय तयार
जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेत करोनाचा संसर्ग वेगाने फैलावत आहे. अमेरिकेतील रुग्णालयांमध्ये रुग्णांसाठी जागा अपुऱ्या पडत आहेत. करोनाच्या संसर्गाशी लढण्यासाठी तात्पुरते रुग्णालये, उपचार केंद्र सुरू करण्यात येत असून या अमेरिकन लष्कराची मदत घेण्यात येत आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका न्यूयॉर्क शहराला बसला आहे. आता चक्क नौदलाचे १००० खांटांचे जहाज न्यूयॉर्कमध्ये पोहोचले आहे. गव्हर्नर अँड्रू काओमो यांनी त्याचे स्वागत केले. अमेरिकेत कोरोनाने आतापर्यंत ३१७० हून अधिक लोकांचा बळी घेतला आहे.
5 वर्षांपूर्वी -
स्वतःच्या जीव धोक्यात घालणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा व पोलिसांचा पगार का कापता?
‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आरोग्य व आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपासून, विधीमंडळाचे सर्व सदस्य तसेच स्थानिक स्वराज संस्थांच्या सदस्यांपर्यंत सर्व लोकप्रतिनिधींच्या मार्च महिन्याच्या वेतनात ६० टक्के कपात करुन त्यांना ४० टक्के वेतन देण्यात येणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
तबलीघी जमातीच्या धार्मिक कार्यक्रमामुळे दिल्ली, युपी व तेलंगणा सरकारची डोकेदुखी वाढली
दिल्लीतील निजामुद्दीन येथे तबलीघी जमातीच्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या काही लोकांचा करोनामुळे मृत्यू झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. तेलंगणमध्ये सोमवारी कोरोना व्हायरसने ६ जणांचा मृत्यू झाला आहे. हे सहा जण दिल्लीतील निजामुद्दीनमध्ये आयोजित तबलिगी जमातीच्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाले होते. हे लक्षात घेत उत्तर प्रदेशाच्या पोलिस महासंचालकांनी १८ जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांना या कार्यक्रमात सहभागी झालेल्या लोकांचा शोध घेण्याचे आदेश दिले आहेत. निजामुद्दीनमधील धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या १० लोकांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर, २०० लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
5 वर्षांपूर्वी -
भाजप आमदाराच्या मुलीच्या लग्नाला मुख्यमंत्री येडियुरप्पा व ३ हजार पाहुण्यांची उपस्थिती
कोरोनाव्हायरसने साऱ्या जगात हाहाकार माजला आहे. मागील २४ तासात जगभरात ६१ हजारहून अधिक रुग्णांची नोंद झाली. यामुळे आता कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ७ लाख ८४ हजारावर पोहचली आहे. तर मृतांची संख्या ३७ हजार ६३९. मागील २४ तासात ३४१९ लोकांचा मृत्यू झाला. यातील अमेरिकेतच २० हजारहून अधिक नवीन रुग्ण समोर आले आहेत. तर स्पेनमध्ये ९१३ लोकांचा मृत्यू झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
स्पेनमध्ये कोरोनाचा थैमान; मागील २४ तासांत ९१३ जणांचा मृत्यू
कोरोनाव्हायरसने साऱ्या जगात हाहाकार माजला आहे. मागील २४ तासात जगभरात ६१ हजारहून अधिक रुग्णांची नोंद झाली. यामुळे आता कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ७ लाख ८४ हजारावर पोहचली आहे. तर मृतांची संख्या ३७ हजार ६३९. मागील २४ तासात ३४१९ लोकांचा मृत्यू झाला. यातील अमेरिकेतच २० हजारहून अधिक नवीन रुग्ण समोर आले आहेत. तर स्पेनमध्ये ९१३ लोकांचा मृत्यू झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना हेल्पलाइनवर फोन केला; म्हणाला ४ सामोसे पाठवून द्या...त्यानंतर हे झालं
जगभरात कोरोनाच्या साथीने अक्षरशा थैमान घातल्याचे पाहायला मिळत आहे. भारतात देखील सर्वत्र भीतीचं वातावरण असून सरकारी यंत्रणा देखील अत्यंत दबावाखाली असल्याचं पाहायला मिळत आहे. भारतात देखील रुग्णांचा आकडा हजाराच्या पार गेल्याने चिंता वाढल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे देशभरातील राज्य सरकारने देखील स्वतःच्या परीने सर्व उपाययोजना सुरु केल्या आहेत आणि त्यासाठी कोरोना संबंधित हेल्पलाईन देखील सुरु केल्या आहेत.
5 वर्षांपूर्वी -
भारत वगळता जगात मंदीचं सावट; पण त्याची कारणं संयुक्त राष्ट्रालाही माहित नाहीत
करोना व्हायरसमुळे संपूर्ण जग या वर्षात मंदीचा सामना करणार आहे. काही ट्रिलियन डॉलरचं अर्थव्यवस्थांचं नुकसान होणार आहे. याचा मोठा फटका विकसनशील देशांना बसणार आहे, पण चीन आणि भारताला याचा फटका बसणार नाही, असा दावा संयुक्त राष्ट्राच्या व्यापार अहवालातून करण्यात आला आहे. जगातील दोन तृतीयांश लोकसंख्या विकसनशील अर्थव्यवस्थांमध्ये राहत असून करोनामुळे अभूतपूर्व आर्थिक नुकसानीचा सामना करत आहे. यूएनने यातून सावरण्यासाठी २.५ ट्रिलियन डॉलरच्या पॅकेजची गरज बोलून दाखवली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मृतदेहाचे फक्त दहन करण्याचा मुंबई महापालिकेचा आदेश तासाभरात मागे; नियमावली लागू
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीवर अंत्यविधी करण्यासाठी मुंबई महापालिकेकडून खास प्रोटोकॉल पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोरोनाग्रस्त मृत व्यक्ती कोणत्याही धर्माचा असला तरी त्याच्या मृतदेहाचे दहनच करण्यात यावे, असे आदेश मुंबई महापालिका आयुक्त प्रविण परदेशी यांनी दिले आहेत. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता महापालिका आयुक्तांनी हा निर्णय घेतला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे. मुंबईमध्ये सोमवारी आणखी एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा ८ वर पोहचला आहे.
5 वर्षांपूर्वी -
पीएम रिलीफ फंड असताना 'पीएम-केअर' का? अनेकांकडून शंका उपस्थित
कोरोना विषाणूच्या संसर्गाविरूद्ध लढण्यासाठी तयार करण्यात आलेल्या नवीन ट्रस्ट ‘पीएम-केअर’ वर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. हा ट्रस्ट निधी उभारण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आला आहे. मात्र मागील अनेक वर्षांपासून पीएम रिलीफ फंड किंवा पंतप्रधान मदत निधी अस्तित्वात असताना, पुन्हा ‘पीएम-केअर’ का असे गंभीर प्रश्न आतापासूनच उपस्थित होऊ लागले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
चिंता मिटली! लॉकडाऊनमुळे हफ्ता चुकला तरी CIBIL वर परिणाम होणार नाही
करोनाला रोखण्यासाठी देशभरात लागू झालेल्या लॉक डाऊननंतर अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी केंद्र सरकारपाठोपाठ रिझर्व्ह बँकेने आज मोठी घोषणा केली. बँकेने प्रमुख व्याजदरात ०.७५ टक्क्याची कपात करून तो ४.४० टक्के करण्यात केला आहे. व्याजदर कपातीने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असून गृह, वाहन यासह इतर कर्जांचा दर कमी होणार असून मासिक हप्त्याचा भार हलका होणार आहे. त्याशिवाय ३ महिने कर्जाचे हप्ते स्थगित करण्याच्या सूचना बँकांना देण्यात आल्या आहेत.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनासंदर्भात पोलिसांकडून देशभर हटके जनजागृती मोहीम
करोना व्हायरसचा देशभरात दिवसेंदिवस वाढता प्रार्दुर्भाव लक्षात घेत पंतप्रधान मोदींनी १४ एप्रिल पर्यंत देशभरात लॉक डाऊनचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत नागरिकांनी अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावे असेही सांगण्यात आले आहे. जगभरात करोना व्हायरस या आजारामुळे थैमान घातले आहे. या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी सरकारने देशात लॉक डाऊन जाहीर केले आहे शिवाय अनेक उपाययोजना देखील केल्या जात आहेत. नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन सरकारकडून सातत्याने केले जात आहे. या साठी जागोजागी पोलीस देखील तैनात करण्यात आलेले आहेत. मात्र तरी देखील काही नागरिक घराबाहेर पडताना दिसत आहेत.
5 वर्षांपूर्वी -
मुंबई कांदिवलीत सॅनिटायझरचा साठा करणारी टोळी पकडली
राज्यात करोनाची लागण होण्याचं प्रमाण दिवसागणिक वाढतच असून आज आणखी १५ करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यात पुण्यातील तब्बल पाच जणांचा समावेश आहे. नव्या रुग्णांमुळं राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा २१५ वर गेला आहे.
5 वर्षांपूर्वी -
पासपोर्ट धारकांच्या चुकांची किंमत रेशनकार्ड धारकांना क्रूरपणे चुकवावी लागत आहे? सविस्तर वृत्त
बरेली, ३० मार्च: कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशव्यापी बंदमुळे बेरोजगार आणि बेघर लोक आता आपल्या गावी व खेड्याकडे जाण्यास निघाले आहेत. अशा प्रकरणात वकील अलख आलोक श्रीवास्तव यांनी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेत म्हटले आहे की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे हजारो स्थलांतरित कामगार आपल्या कुटुंबीयांसह शेकडो किलोमीटर चालत आहेत. त्यांच्याकडे जगण्याची सुविधा नाही किंवा घरी पोहोचण्याचे साधन नाही, या लोकांना भयंकर अडचणी येत आहेत. या लोकांना निवारा गृहात ठेवून सुविधा उपलब्ध करून देण्याचे राज्य सरकारांना आदेश द्यावेत, असा याचिकेत उल्लेख करण्यात आलेला आहे. मात्र देशात गरीब श्रीमंत असे दोन गट असल्याचं कोरोनाच्या आपत्तीनंतर दिसतं आहे. […]
5 वर्षांपूर्वी -
जगातील दीड लाख कोरोनाबाधित रुग्ण बरे, तर ८०% जणांना रुग्णालयाची गरज पडली नाही
कोरोना विषाणूमुळे जगात दहशत निर्माण झाली आहे. हा विषाणू ज्या वेगाने पसरत आहे, ते अत्यंत भीतीदायक आहे. परंतु, कोरोना विषाणूचा अर्थ मृत्यू हा नाही. जगात आतापर्यंत सुमारे ७ लाख २२ हजार लोक कोरोनाबाधित झाले आहे. यापैकी ३३ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. तर १ लाख ५१ हजार लोक पूर्णपणे बरे झाले असून ते सामान्य आयुष्य जगत आहेत.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्तीत न्यूयॉर्कच्या आरोग्य खात्याचा लोकांना सेक्स संदर्भात हा सल्ला....
कोरोना व्हायरसमुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जगभरात कोरोनामुळे आतापर्यत २७,३७० हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर जवळपास ६,००,००० जणांना त्याचा संसर्ग झाला आहे. जगातल्या बहुतांश देशांमध्ये करोना व्हायरसमुळे लॉकडाउन आहे. दरम्यान, सुट्टीचे पहिले २-३ दिवस संपल्यानंतर आता घरी बसून कंटाळा येऊ लागला आहे. लोकांना वेळेचा सदुपयोग कसा करता येईल, यासाठी टीव्हीवरुन काही कार्यक्रमही दाखवले जात आहेत.
5 वर्षांपूर्वी -
पुण्यात कोरोनाचा पहिला बळी; ५२ वर्षीय व्यक्तीचा उपचारा दरम्यान मृत्यू
पुण्यामध्ये कोरोना विषाणूने पहिला बळी घेतला आहे. पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारा दरम्यान ५२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. २२ मार्च रोजी या व्यक्तीला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मृत्यू झालेल्या रुग्णांला मधूमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होता. त्यात या रुग्णाला कोरोनाची लागण झाली होती. सोमवारी उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला, पुण्याच्या महपौर मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार