महत्वाच्या बातम्या
-
लॉकडाउन'मध्ये नैराश्यात भर घालू नका; वाईनशॉप खुली करा
राज्यातील करोना रुग्णांचा आकडा थांबताना दिसत नाही. राज्यात आज पुन्हा सात नवे रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी मुंबईत पाच आणि नागपूरमध्ये दोन रुग्ण आढळल्याने राज्यातील करोना रुग्णांची संख्या १६०वर गेली आहे.दरम्यान, देशभरात करोनाचे १९ नवे रुग्ण आढळल्याने देशातील करोना रुग्णांची संख्या ८३४वर पोहोचली असून देशात आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला आहे. संपूर्ण देशातच करोनाचे रुग्ण वाढत चालल्याने आरोग्य यंत्रणेसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
लॉकडाउन पण जवाबदारीचं काय? रामायणाच्या वनवासाआड गरिबांचा वनवास दिसेनासा?
कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. आता घरी बसलेल्या नागरिकांच्या मनोरंजनासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. येत्या शनिवारी, म्हणजे आज २८ मार्चपासून दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिनीवर प्रचंड गाजलेल्या रामायण मालिकेचे पुनर्प्रक्षेपण सुरु झालं आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विट करून याबद्दल माहिती दिली होती.
5 वर्षांपूर्वी -
नातवासाठी रक्त शोधत भटकणाऱ्या आजोबाला पोलिसांनी पकडले; पण त्यांनीच रक्त मिळवून दिले
महाराष्ट्रात संचारबंदी लागू झाल्यापासून मुंबई पोलिसांनी शहरात कडक कारवाई सुरू केली आहे. २० ते २६ मार्चपर्यंत संपूर्ण शहरात अटक केलेल्यांची संख्या २८९वर पोहोचली आहे. २२ आरोपी अद्याप हाती न लागल्याने पोलिसांचा तपास सुरू आहे. तर आतापर्यंत जामीन मिळालेल्यांची संख्या १७६ आहे. या धावपळीत एका करोना संशयितास ताब्यात घेऊन तातडीने रुग्णालयात रवाना करण्याचे कामही पोलिसांनी केले आहे.
5 वर्षांपूर्वी -
अबॉट लॅबचा विक्रम; कोरोना COVID १९ चाचणी फक्त ५ मिनिटांत
संपूर्ण जगात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूसमोर जागतिक महाशक्ती असलेली अमेरिकेत हतबल झाल्याचे चित्र दिसत आहे. अमेरिकेतील कोरोनाबधितांचा आकडा एक लाखांच्यापार पोहोचला आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे १५४४ जणांचा मृत्यू झाला आहे. जॉन हॅपकिंग विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासात अमेरिकेत सुमारे १८ हजार जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर ३४५ जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख ७१७ एवढा झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
अमेरिकेत कोरोनाची लागण झालेल्यांचा आकडा १ लाखांच्या पार
संपूर्ण जगात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूसमोर जागतिक महाशक्ती असलेली अमेरिकेत हतबल झाल्याचे चित्र दिसत आहे. अमेरिकेतील कोरोनाबधितांचा आकडा एक लाखांच्यापार पोहोचला आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे १५४४ जणांचा मृत्यू झाला आहे. जॉन हॅपकिंग विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासात अमेरिकेत सुमारे १८ हजार जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर ३४५ जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख ७१७ एवढा झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
इटलीमध्ये कोरोनाचा तांडव; २४ तासांत १००० जणांचा मृत्यू
जगभरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून रुग्णांची व मृतांची संख्या वाढतच आहे. करोना विषाणूचा संसर्ग आतापर्यंत १९५ देशांत पसरला असून पाच लाख नागरिकांना याची लागण झाली आहे. २६ हजारांपेक्षा आधिक नागरिकांचा या महामारीनं बळी घेतला आहे. चीनच्या वुहान या शहरातून उद्भवलेल्या या कोरोना विषाणूने इटलीत हाहाकार माजवला आहे. इटलीत चीनपेक्षाही सर्वाधिक मृतांची नोंद झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
चला बाहेर या...मोकळ्या जागेत शिंका...कोरोना पसरवा म्हणणाऱ्याची नोकरी गेली
जगभरात करोना विषाणूने हाहाकार माजवला असून जगभरात २४ हजारांहून अधिक रुग्णांचा बळी गेला आहे. भारतातही या विषाणूचा संसर्ग वाढत असून आतापर्यंत भारतात साडेसातशेहून अधिक लोकांना करोनाचा लागण झाली आहे. लॉकडाऊनचा आज चौथा दिवस असून करोनाची आज काय स्थिती आहे, याकडे सर्व भारतीयांचे लक्ष लागले आहे. अशा परिस्थितीत इन्फोसिस कंपनीतील एका इंजिनियरने धक्कादायक ट्विट केलं आणि सर्वत्र खळबळ माजली होती. त्यानंतर इन्फोसिस कंपनीने सर्व पडताळणी करून संबंधित कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढून टाकले आहे.
5 वर्षांपूर्वी -
ब्रिटनचे पंतप्रधान आणि आरोग्यमंत्र्यांना देखील कोरोनाची लागण
कोरोनाने ब्रिटनमध्येही थैमान घातलं आहे. बाधितांची संख्या वाढत असतानाच आज ब्रिटनला मोठा धक्का बसला. पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असून त्यांना कोरोना असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे त्यांना तातडीने आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. त्यांच्या संपर्कात जे लोक आलेत त्यांनाही क्वारंटाइन करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
जग लॉकडाउनमुळे चिंतेत; तर चीनमध्ये 'फटा पोश्टर निकला हिरो'; चित्रपटगृह खचाखच
कोरोना व्हायरसने जगभरात हाहाकार माजवला आहे. कोरोनामुळे जगभरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या आता १४ हजार पार गेली आहे. यामध्ये सर्वाधिक मृत्यू हे इटलीमध्ये झाले आहेत. इटलीमध्ये आतापर्यंत ५ हजार ४६१ लोकांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. मागील २४ तासांबाबत बोलायचे झाले तर इटलीमध्ये ६५१ लोकांनी आपला जीव गमावला आहे. इटलीमधील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होताना दिसत आहे. इटलीमध्ये मृतांची संख्या पाच हजारांवर पोहोचली आहे. त्यातही गेल्या रविवारपासूनचे आकडे जास्त भितीदायक आहेत. त्यानंतर स्पेन, फ्रांस आणि अमेरिकेत देखील भीषण परिस्थिती झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १५३ वर; २८ नव्या रुग्णांची नोंद
महाराष्ट्रात आज दिवसभरा करोनाचे २८ नवे रुग्ण आढळले असून राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या १५३ झाली आहे. दुसरीकडे आतापर्यंत २४ करोनाबाधीत रुग्ण उपचारांती बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, करोनामुळे राज्यात आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
लॉकडाउन: कुठे मोटरसायकलवरून वडिलांचा मृतदेह तर कुठे अंत्ययात्रेत सोशल डिस्टन्स
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात सध्या लॉकडाऊन सुरू असून रस्त्यांवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे कासा भागातील पालघर तालुक्यातील चिंचारे येथील एका व्यक्तीचा मृतदेह त्याच्या दोन मुलांनी चक्क दुचाकीवरून आपल्या घराकडे नेला. चिंचारेचे रहिवासी असलेल्या लडका देवजी वावरे (वय 60) यांना 24 मार्च रोजी सकाळी 8 वाजता सर्पदंश झाला होता. त्यांना उपचारांसाठी कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार पूर्ण झाल्याचं सांगत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज दिला.
5 वर्षांपूर्वी -
भारताचा विकास निम्याने घटणार; मोठ्याप्रमाणात आर्थिक अडचणी वाढणार
करोनाला रोखण्यासाठी देशभरात लागू झालेल्या लॉक डाऊननंतर अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी केंद्र सरकारपाठोपाठ रिझर्व्ह बँकेने आज मोठी घोषणा केली. बाजारात रोकड उपलब्धता वाढवण्यासाठी एसएलआर दर ३ टक्के करण्यात आला आहे. यामुळे बँकांना १.७ लाख कोटींची अतिरिक्त रोकड उपलब्ध होणार आहे. याशिवाय आणखी दोन उपाययोजनांमुळे येत्या ३० जून पर्यंत बाजारात ३.७४ लाख कोटीची अतिरिक्त रोकड उपलब्ध होणार असल्याचे आरबीआयने म्हटल आहे. त्याशिवाय ३ महिने कर्जाचे हप्ते स्थगित करण्याच्या सूचना बँकांना देण्यात आल्याचे दास यांनी सांगितले.
5 वर्षांपूर्वी -
राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गॅरेंटी अंतर्गत केंद्र ११,४९९ कोटींचं वाटप करणार
करोनाला रोखण्यासाठी देशभरात लागू झालेल्या लॉक डाऊननंतर अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी केंद्र सरकारपाठोपाठ रिझर्व्ह बँकेने आज मोठी घोषणा केली. बाजारात रोकड उपलब्धता वाढवण्यासाठी एसएलआर दर ३ टक्के करण्यात आला आहे. यामुळे बँकांना १.७ लाख कोटींची अतिरिक्त रोकड उपलब्ध होणार आहे. याशिवाय आणखी दोन उपाययोजनांमुळे येत्या ३० जून पर्यंत बाजारात ३.७४ लाख कोटीची अतिरिक्त रोकड उपलब्ध होणार असल्याचे आरबीआयने म्हटल आहे. त्याशिवाय ३ महिने कर्जाचे हप्ते स्थगित करण्याच्या सूचना बँकांना देण्यात आल्याचे दास यांनी सांगितले.
5 वर्षांपूर्वी -
सांगलीत तब्बल १२ जणांना कोरोनाची लागण; परीसरातील सर्व सिमा सील
महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. राज्यात आज एकूण १७ नवीन रुग्ण आढळले आहे. सांगलीमध्ये आज नवे १२ रुग्ण आढळले आहे. तर नागपूरमध्ये ५ रुग्ण आढळले असून राज्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्याही तब्बल १४७ वर पोहोचली आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनाशी युद्धासाठी भारतीय लष्कर सज्ज, 'ऑपरेशन नमस्तेची' घोषणा
कोरोनामुळे स्थिती गंभीर होतं चालल्याने भारतीय लष्कर देखील सज्ज झालं आहे. इंग्रजी वृत्तपत्र इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत लष्करप्रमुखांनी कोरोना विषाणूच्या आव्हानांवर चर्चा केली. लष्करप्रमुख नरवणे यांच्या माहितीनुसार, संकटाच्या या वेळीही लष्कर आपले काम करीत आहे आणि सध्या सर्व कामकाज कामे सुरु आहेत. आतापर्यंत अनेक देशांनी या संकटाला तोंड देण्यासाठी सैन्याची मदत घेतली आहे. ज्यावर सैन्य प्रमुख म्हणाले की, भारतीय सैन्य देशातील जनतेसाठी आहे, जर गरज निर्माण झाली आणि सरकारने सांगितले तर सैन्य पूर्णपणे तयार आहे.’
5 वर्षांपूर्वी -
कोरोना व्यतिरिक्तही अनेक आजार आहेत याचा डॉक्टरांना विसर..घाबरून स्थानिक क्लीनिक्स बंद
कोरोनामुळे देशभरात भीतीचं वातावरण असताना या आजाराला घाबरून आपल्या क्लिनिकवर गर्दी होऊ नये म्हणून स्थानिक डॉक्टर्स त्यांचे दवाखाने बंद ठेवून आहेत. मात्र त्यामुळे इतर रोजचे आजार आणि त्यांच्या निदानासाठी जायचं तरी कुठे असा प्रश्न सामन्यांना पडला आहे. राज्यातील करोनाच्या रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढतच असून आज त्यात पाच जणांची भर पडली आहे. करोना रुग्णांचा आकडा आता १३५ झाला आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. तसंच, खासगी डॉक्टरांनी आपल्या क्लिनिक सुरू ठेवाव्यात, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
5 वर्षांपूर्वी -
अनेकपण गरिबांना वेळेत मदत करण्यात व्यस्त; भाजपचं मात्र 'मोदी-किट' मार्केटिंग
मोदींनी २१ दिवसांचा लॉकडाउन केल्यानंतर इतके दिवस कुटुंबाने जगायचे कसे या प्रश्नाने रोजंदारीवर कामं करून पोट भरणाऱ्या लोकांचं आयुष्यच टांगणीला लागलं आहे. कामाच्या निमित्ताने जेथे हे मजूर कामगार वास्तव्यास होते तेथे कामच नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे आणि २१ दिवस असेच शांत बसून राहिलो तर कोरोना आधीच आयुष्य असंच संपणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे २१ दिवस न थांबता हे मजूर त्यांच्या गावी म्हणजे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात थेट पायी चालत जाताना दिसत आहेत. संपूर्ण देशातील हायवेवर हेच चित्र पाहायला मिळत आहे.
5 वर्षांपूर्वी -
२१ दिवस लॉकडाउन; काम नसल्याने उपाशी मरण्यापेक्षा मजूर गावाकडे पायी चालत
मोदींनी २१ दिवसांचा लॉकडाउन केल्यानंतर इतके दिवस कुटुंबाने जगायचे कसे या प्रश्नाने रोजंदारीवर कामं करून पोट भरणाऱ्या लोकांचं आयुष्यच टांगणीला लागलं आहे. कामाच्या निमित्ताने जेथे हे मजूर कामगार वास्तव्यास होते तेथे कामच नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे आणि २१ दिवस असेच शांत बसून राहिलो तर कोरोना आधीच आयुष्य असंच संपणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे २१ दिवस न थांबता हे मजूर त्यांच्या गावी म्हणजे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात थेट पायी चालत जाताना दिसत आहेत. संपूर्ण देशातील हायवेवर हेच चित्र पाहायला मिळत आहे.
5 वर्षांपूर्वी -
पिंपरी-चिंचवडमधील ३ करोनामुक्त झालेल्या व्यक्तींना डिस्चार्ज; स्टाफकडून टाळ्या
पिंपरी-चिंचवडमधील तीन करोनामुक्त झालेल्या व्यक्तींना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. परंतु, त्यांना आणखी दोन आठवडे होम क्वारंटाइनमध्ये राहण्यास सांगितले आहे अशी माहिती डॉ. विनायक पाटील यांनी दिली आहे. गेल्या १४ दिवसांपासून पाटील हे त्यांच्यावर उपचार करत होते. आज तिघांना रुग्णवाहिकेतून घरी सोडण्यात आले असून त्यापूर्वी तिघांचे आणि डॉ. विनायक पाटील यांचे पोलीस, आरोग्य कर्मचारी आणि इतर स्टाफने टाळ्या वाजवून उत्साह वाढवला.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम होणार: शरद पवार
देश आणि राज्यावर आलेलं करोनाचं संकट अत्यंत गंभीर आहे. केवळ माणसांवरच नाहीतर पशू-पक्ष्यांवरही त्याचा परिणाम होणार आहे, असं सांगतानाच करोनामुळे देशाच्या आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेवर दीर्घकालीन परिणाम होणार असून प्रत्येकाचं आर्थिक गणितही बिघडणार आहे. या संकटाचा अर्थव्यवस्थेवर वर्षे-दीड वर्षे परिणाम राहील, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Pan Card Online | 90% लोकांना ठाऊक नाही पॅनकार्ड मार्फत लोन कसा मिळतो, कशा पद्धतीने अप्लाय करा, माहिती जाणून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
- Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- Kotak Mutual Fund | बिनधास्त SIP करून 4 पटीने पैसा वाढवा, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड स्कीम सेव्ह करा
- RVNL Share Price | टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, RVNL शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: RVNL
- Shark Tank India | महिला सुद्धा सुरु करू शकतात असा स्टार्टअप, आई-मुलीच्या स्टार्टअपला शार्क टँक इंडियातून फंडिंग
- Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांनो इकडे लक्ष द्या, 'ही' म्युच्युअल फंड योजना 1 लाखांवर देईल 6,13,521 रुपये परतावा
- EPFO Passbook | पगारदारांनो, तुम्ही EPF मधून किती वेळा पैसे काढले आहेत, आता तुम्हाला पेन्शन मिळेल का, नियम लक्षात ठेवा