Credit Card New Rules | तुमच्याकडे क्रेडिट कार्ड आहे? | मग आता अडचणी येणार नाहीत | अधिक जाणून घ्या
देशाची मध्यवर्ती बँक आरबीआयने क्रेडिट कार्डच्या नियमांबाबत नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये करण्यात आलेले बदल पुढील महिन्यात १ जुलैपासून लागू होणार आहेत. त्याचबरोबर राज्य सहकारी व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका वगळता इतर सर्व बँकांना नवे नियम लागू होणार आहेत. नव्या नियमानुसार आता क्रेडिट कार्ड जारी करणाऱ्या बँका आणि वित्तीय संस्थांना ग्राहकाच्या परवानगीशिवाय कार्ड देता येणार नाही.
3 वर्षांपूर्वी