Credit Debit Card | क्रेडिट-डेबिट कार्ड मार्गदर्शक तत्वांसाठी नवी डेडलाइन | अधिक जाणून घ्या
क्रेडिट-डेबिट कार्डबाबतच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या अंमलबजावणीसाठी रिझर्व्ह बँकेने नवी डेडलाइन दिली आहे. बँकांच्या आणि बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांना (एनबीएफसी) ग्राहकांच्या संमतीशिवाय कार्ड सक्रिय करण्यासह काही नियमांचे पालन करण्यासाठी क्रेडिट आणि डेबिट कार्ड देण्यास रिझर्व्ह बँकेने मंगळवारी तीन महिन्यांची मुदतवाढ दिली. बँका आणि एनबीएफसी १ जुलैपासून ‘क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड – इश्यूज अँड कंडक्ट डायरेक्शन्स, २०२२’ या मास्टर निर्देशाची अंमलबजावणी करणार होते. पण सध्या ती 3 महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे.
3 वर्षांपूर्वी